वेड्यांचा बाजार
प्रवेश पहिला
नमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥
वर्षती मेधजल, शातविति भूमितल,
सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥
गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद,
उधळि निज हृत्सुखद शब्द रत्नाकरा !
(गोविंदाग्रज)
(मधुकर व वसंत)
(स्थळ रस्ता)
मधुकर: वेडयांचा बाजार आहे आमचे घर म्हणजे ! वसंतराव, एकेकाचा प्रकार ऐकलात तर अक्कल गुंग होऊन जाईल तुमची! नाहीतर उगीच वेणूताईचे लग्न इतके लांबणीवर पडले असते का आज काही नाही तरी सोळावे वर्ष असेल तिला पण आमचे तात्या पडले. ज्येतिष्याच्या नादात ! आण्णासाहेबांना सगळा वैद्यकाचा व्यापार आणि आईला देवधर्म पुरतात ! बरे दादाविषयी म्हणाल तर त्याने संन्यासदीक्षा घ्यावयाची फक्त बाकी ठेविली आहे!
वसंत : खरेच, माधवरावांच्या डोक्यात हे वेड कसे काय आले ?
मधुकर:लग्न झाले तोपर्यंत सर्व ठीक होते, पुढे त्यांना कळले की, वहिनीला लिहिता वाचता येत नाही म्हणून; आणि हे म्हणजे पक्के सुधारणावादी केला निश्चय की, पुन्हा म्हणून बायकोचे तोंड पहावयाचे नाही, आणि त्या सुमारास विवेकानंद, स्वामी रामतीर्थ, हंसस्वरूप या मंडळींच्या व्याख्यानांचा प्रसार सुरू झाला होता. त्या वैतागात आमच्या दादासाहेबांनीही परमार्थाची कास धरिली इकडे बिचारी रमावहिनी माहेरी चागले लिहायला वाचायला शिकली, पण उपयोग काय ? इतक्या अवकाशात दादासाहेब पूर्ण विरक्त बनले वहिनींना घरी आणावयाचे नाव काढले की हे घर सोडण्याच्या प्रतिज्ञा करायला लागतात !
वसंत: पण मधुकर, मला वाटते की माधवरावांचे हे वैराग्य फार दिवस टिकणार नाही हे दोन दिवासांचे वारे दिसते सगळे काही प्रयत्न केला तर माधवराव अजून ठिकाणावर येतील !
मधुकर: येतील तेव्हा खरे पण आज तर घरात ऐका वेडयाची भर पडली आणि बाकीच्यांच्या वेडांना उठावणी मिळाली! तात्या म्हणतात त्याला साडेसाती आहे सध्या अण्णा म्हणतात, अभ्यासाने आणि जाग्रणाने त्याचे डोके फिरले आहे आणि आई म्हणते कुणी तरी जादूटोणा केला आहे! वसंत आणि तिघांचेही आपापल्या परीने सारखे उपाय चालू असतील..
मधु: ते काही विचारू नका त्यांच्या पत्रिकेची वर्षफळे काढण्यात तात्या वर्षेच्या वर्षे घालवितात; अण्णांच्या औषधांनी आणि काढयांनी त्याची अन्नपाण्याची सुध्दा गरज भागविली आहे आणि आईने तर अंगाऱ्याधुपा-यांनी त्याला शुद्ध बैरागी बनविला आहे !
वसंत: काय विलक्षण मंडळी हा प्रकार पाहून तुम्हाला अगदी वेडयासारखे होत असेल!
मधु: अहो इतक्याने कुठे आटोपते आहे सारे ? दादाच्या लग्नात आपण चुकलो असे प्रत्येकाला वाटते आहे आणि वेणूताईच्या
लग्नाबद्दल फाजील सावधगिरी घेऊ न मागच्या चुकीचा वचपा भरून काढण्याची तिघांनीही आपापल्या मनाशी गाठ बांधून ठेविली आहे !
वसंत: आमची यमुताई मोठी भाग्याची म्हणून निर्विघ्नपणे तुमच्या पदरात पडली म्हणायची!
मधु: त्यावेळी आमच्या मंडळीत इतकी जागृती झाली नव्हती. नाहीतर माझ्या लग्नाचा प्रकारसुध्दा वेणुताईच्या लग्नासारखाच
झाला असता. हल्ली मात्र खरा तमाशा चालला आहे घरात वेणुताई आणि दादा यांच्या कल्याणासाठी तिहेरी उपायांचा सारखा मारा सुरू आहे.
वसंत: यमुताई कधीकधी या गोष्टी सांगते, पण इतका प्रकार असेल असे नव्हते आम्हाला वाटत! मग कदाचित् ती मुद्दाम सांगत नसेल!
मधु: ती सांगणार किती तुम्हाला अण्णांनी या दोघांसाठी औषधांचा असा साठा करून ठेविला आहे घरात की तो पाहून मुर्डी आजच्या वैद्यांनासुध्दा लाज वाटावी आईने दोघांच्या हातापायांत गंडेताईतांची इतकी गर्दी केली आहे की दोघांनीही ताबूतांत फकिरी घेतली आहे असा भास होतो. आणि तात्यांनी तर या दोघांची वर्षफळे, पत्रिका यांच्या नकला करण्यासाठी आणि टिपणे करण्यासाठी वीस रुपये दरमहाचा एक स्वतंत्र कारकून ठेवून दिला आहे!
वसंत: आणि माधवराव हे सारे मुकाटयाने सोशीत असतात वाटते!
मधु: तो इकडे लक्षच देत नाही भोवती बैराग्यांचा एक ताडा असला म्हणजे झाले त्याने तर घराला धर्मशाळेची कळा आणून ठेवली आहे.
वसंत : अशा घोटाळ्यांत सारी जबाबदारी तुम्हालाच सांभाळावी लागते हे स्वाभाविकच आहे. मधुकर, मी वेणूच्या लग्नाचा विषय आज मुद्दामच काढिला आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल.
मधु: तुम्ही न बोलता तुमचा हेतू माझ्या डोळ्यांसमोर नेहमी उभा असतो; पण ज्या गोष्टीचा इलाज आपल्या हाती नाही तिचा नुसता उच्चार करण्यात काय हाशील आहे या विचाराने मी नेहमी स्वस्थ बसतो.
वसंत: तर काय आमच्या प्रीतिविवाहाची आशा मी सोडून द्यावी म्हणता ? मधुकर, आमचा प्रीतिविवाह म्हणजे एखाद्या नाटकातली नाही तर कादंबरीतील बडबड समजू नका तुमच्या लग्नात वेणू मला देण्याबद्दल जी सारखी थट्टा चालली तिचा आमच्या दोघांच्याही मनावर अगदी तात्पुरताच परिणाम झाला नाही. लग्नानंतर यमुताईबरोबर मी तुमच्या खेडेगावी एक महिनाभर होतो त्यावेळी एकमेकांच्या अधिक परिचयाने तो परिणाम दृढ झाला तुमच्या लग्नातल्या थट्टेला आम्ही लग्नापेक्षा जास्त महत्त्व देऊ लागलो. पुढे, तुम्हाला माहीतच आहे, मी जरी त्यानंतर कधी तुमच्या घरी आलो नाही तरी या तीन चार वर्षांत आमच्या यमुताईबरोबर वेणू आमच्या घरी दोन चार वेळा महिना महिना राहिली होती. या अवकाशात आमच्या एकमेकांच्या गुणांची आम्हाला पारख पटून तुमच्या लग्नातल्या थट्टेला आमच्या लग्नाने खरेपणाचे स्वरूप देण्याचा निश्चय केला आणि या कामात माझी सारी भिस्त, मधुकर, एकटया तुमच्यावरच आहे. आमच्या लग्नाला तुमची आडकाठी नाही ना !
(राग यमन ताल- दादरा )
वैवाहिक दीक्षा जधि प्राप्त हो तुला । प्रमोत्सव होई की तेवि तो मला ॥ध्रु.॥ आप्तवर्ग बाधिति ती सूत्र बंधने ॥ तीच करिति सुदृढ सुनव प्रेम बंधने ॥ अंकुरित प्रेमांकुर होइ त्या पळा ||1||
मधु: असल्या अनुरूप विवाहाला दुर्दैवाखेरीज दुसऱ्या कोणाची आडकाठी असणार? मी मागेच एक दोन वेळा तुमच्याबद्दल गोष्ट काढिली होती; पण तात्या म्हणतात तुमचे टिपण जमत नाही. आई म्हणते परतवेल होते आणि अण्णा तर वैद्याच्या मुलाखेरीज कोणाचे नाव सुध्दा काढू देत नाहीत. यंदा तात्यांनी पुढल्या महिन्यात वेणूचे ग्रह साधारण बरे आहेत तेव्हा तेवढ्यात लग्न करून घ्यायला हरकत नाही म्हणून लग्नाला कशीतरी परवानगी दिली आहे एकदाची तेव्हा आता लोकाची तोंडे बंद करण्यासाठी निदान त्या बाळाभाऊ शी का होईना पण एकदाचे वेणूचे लग्न करण्याचा मी विचार केला आहे.
वसंत : बाळाभाऊ कोण हा !
मधु: अहो तो आमच्या गावच्या वैद्यबुवांचा मुलगा वैद्यबुवानी अण्णाच्यावर आपल्या वैद्यकाचे चांगलेच जाळे पसरले होते. अण्णा त्याच्या अगदी अर्ध्या वचनात वागत असत. वैद्यबुवांच्या अंतकाळी अण्णांनी त्यांना वचन दिले की वेणू बाळाभाऊ ला देईन म्हणून आता। बाळाभाऊने स्वतः नकार दिल्याखेरीज अण्णा म्हणतात मी काही माझ्या वचनाला बाध आणणार नाही.
वसंत : बरे निदान मुलगा तरी बरा आहे का ?
मधु : कसला बरा ? जाणून बुजून पोरीला विहिरीत लोटायची घरच्या माणासानी शिकण्यासाठी इथे ठेवला आणि मुलाने नाटकाचा उदधरिला उठता बसता नाटकाखेरीज बोलणे नाही ! नेहमी नाटकवाल्यात पडलेला !
वसंत : आणि अशा माकडाच्या पदरी तुम्ही असले रत्न बांधणार ? मधुकर, यापेक्षा वेणूला खरोखरीच एखाद्या-
मधु: वसंतराव, मला काहीच कळत नाही असे समजू नका! पण हा लोकापवाद मोठा कठीण आहे! चवाठयावरची कुत्री भाकरीच्या तुकडयाने तरी भुकायची थांबतात; कावळा व्रण असेल तिथे तरी चोच मारितो, विंचवाला छेडले तरच तो नागी चालवितो; पण लोकाच्या कुटाळकीची तन्हा या सर्वांच्या विरहित असते. तेव्हा असा देखता डोळयांनी आगीत पाय घालायला तयार झालो आहे. बरे दुर्दैवाने त्याचे टिपणही तात्यांच्या पसंतीस उतरले आहे! आज आता तेवढयासाठीच निघालो आहे. कुठून तरी त्याला हुडकून काढून एकदा मुलगी समक्ष पहा म्हणजे शास्त्रोक्त झाले म्हणून सांगतो.
वसंत: धिक्कार असो आमच्या समाजाला विचारी मनुष्याला असा अविचार करणे भाग पडते आणि त्याबद्दल त्याला कोणी दोष देत
नाही! अरेरे असे प्रकार पहात बसण्यापेक्षा सन्यास घेऊ न वनवास पत्करलेला बरा! मधु वसंतराव असे अगदी निराश होऊ नका ! चला आज त्या बाळाभाऊला बोलावू, त्याला दोन गोष्टी सांगून पाहू मीही आज रात्री पुन्हा तुमच्याबद्दल गोष्ट काढून पाहतो! पाहू, प्रयत्नांती परमेश्वर ! नाहीतर होणाराला पाठ दिलीच पाहिजे चला, त्या बाळाभाऊ चा तपास काढू.
वसंत: काशीच्या नव्या पाठशाळेतून शिक्षण संपवून परीक्षा दिल्यानंतरसुध्दा तेथेच राहिलो असतो आणि सन्यास घेतला असता--
मधु: वः मग दादाला हसायला कुठे जागा उरली ? चला अहो, हातपाय गाळू नका. चला.
(राग-विहाग, ताल-त्रिवट)
सजुनि तुम्हा सन्यासी होता सुरत तिळहि हंसण्या वारण इतरों को तुम्ही हंसती ॥धु॥ हा विषाद द्या त्यजुनि तुम्ही प्रयत्न करूनि वरा नव यशा ||1||
प्रवेश दुसरा
(वेणू व यमुना)
वेणू: (यादवराया भाई याहो.)
भीमकबाळा ती वेल्हाळा टाकुनि गोपाळा ॥ निश्चय केला बघुवराने द्यावी शिशुपाला ॥ विवाहकाळी खळ तो आला तव राजस बाळा || शोकभराने विव्हळ झाली दोष लावि भाळा ॥ अजुनि तरी या दासीसाठी याही गोपाळा ।। जवळी आली काळवेळ ही संकट हे टाळा || ऐन समय का निष्ठुर झाला ? काय असे केलें ॥ दीनावरिचे प्रेम सदाचे आज कुठे गेलें ॥ कधि वाहिन ही काया माझी देवा तव पायी ॥ कधि पाहिनसें झालें मजला सांवळि ती काया || कधी साठविन रूप मनोहर या नयनी देवा ॥ मिळेल केव्हा अभागिनीला प्रेमाचा ठेवा ॥ नका करू छळ याहुनि माझा अजुनी घननीळा || वाट बघु किति घेउनि हाती अश्रूची माळा ॥ किती आळवू परोपरीने कठ कि हो सुकला ॥ तरिहि यावया अजुनी माझा माधव का चुकला ॥ सर्वसाक्षि भगवंता आता अंत नका पाहू ॥ की विषपाली प्राण तरी हा पदकमला वाहू || मीच अभागी म्हणुनी आपण अजुनी नच आली ॥ ब्रह्म सगुण जे दुर्लभ सकला मिळे कसे मजला | रडता यापरि अश्रुजलाने पदर भिजुनि जाई ॥ ऊर भरुनि ये शब्द न चाले-
यमुना: हे हो काय वन्स ? गाणे म्हणता म्हणता तुमची सुध्दा अगदी तुमच्या गाण्यातल्या भीमकबाळेसारखी स्थिती झाली!
वेणू: वहिनी, तुझे आपले भलतेच भीमकवाळेसारखी स्थिती व्हायला मला गं काय झाले आहे! एखादे गाणे म्हणताना मनुष्य तसे तद्रूप नाही का होत ?
यमुना: वेणू वन्स ! पुरे झाली ही बतावणी; तुमच्यासारखी शिकलेली नसेन म्हणून काय झाले इतके का मला कळत नसेल? सांगा पाहू तुमच्या मनात काय असेल ते. वा गडे, माझ्याजवळ सुध्दा आडपडदा ?
वेणू: वहिनी, रागावू नकोस अशी बायकांच्या मनाला कुठे तोंड असते का ? इतके दिवस तुला मी माझे दुःख मुद्दाम सांगितले नाही. तू तरी काय करणार बापडी ! रमावहिनीचे दुःख आपल्याला पुष्कळ माहीत आहे. पण काय उपाय होतो आपल्या हातून तिथे तरी ? तीच माझी गत एरवी आडपडदा कशाचा? फार झाले तर डोळे निपटीत बसावे हेच बायकांचे समाधान.
यमुना: (पदराने तिचे डोळे पुसून) नका रड़, वन्स. शपथ आहे तुम्हाला माझ्या गळ्याची. आजच तुम्हाला इतके वाईट वाटायला काय झाले ? सांगा पाहू मला.
वेणू: सांगते, पण वहिनी, ऐकून घेतल्यावर तू माझी थट्टा नाही ना करणार ?
यमुना: काय बोलता वन्स चला. तुमचे बोलणे तुम्हालाच शोभते. हीच का माझी परीक्षा केलीत आजवर ? आम्ही नावाच्या नणंद-भावजयी; पण सख्ख्या बहिणीप्रमाणे आतापर्यंत वागत आलो आणि तुमचे हे बोलणे ? मग काय बोलायचे माणसाने पुढे !
(राग देस. ताल झपताल.)
असुनी भगिनि भाव का हा दुजा भाव ? मळवा न तें नांव ॥ध्रु.॥ कथुनि कारण मला करू नका शौक हा मी देत वचनाला ॥ ठेवा न त्या नाव की हा दुजा भाव ? | मळवा न तें नीव ॥1॥
वाटायचे!
वेणू: रागावलीस पुन्हा ! तसे नव्हे वहिनी, पण सुखातल्या माणसाला दुःखी माणसाच्या दुःखाची चांगलीशी कल्पनाच करिता येत नाही. म्हणून मी तसे बोलले तुला लावून बोलण्यासाठी नव्हे ! वितीच्या यातना वितीलाच माहीत दुस-यांना तिचे दुःख हलकेच आहे असेच
यमुना: बरे, तसे का होईना ? मी मुळीच बोलत नाही आता! आधी मला सांगा आणि मग पहा मी बट्टा करते का काय ते ? हातच्या काकणाला आरसा कशाला हवा? सांगा पाहू तुम्हाला का वाईट वाटले मघाशी.
वेणू: सांगायलाच कशाला हवे ? तूच सांग बरे वहिनी, माझी स्थितीसुध्दा त्या भीमकबाळेसारखीच नाही का
यमुना: ती कशी काय ?
वेणू: नीट आठवण कर म्हणजे तुझ्यासुध्दा तेव्हाच लक्षात येईल.
यमुना: (थोडा वेळ विचार करून) माझ्या नाही बाई काही लक्षात येत
वेणू: असे वेड पांघरलेस तर कुठून येणार लक्षात!
यमुना: वेड नव्हे वन्स, खरेच नाही आठवत मला काही.
वेणू: बरे, तुझ्या लग्नातली तरी तुला चांगली आठवण आहे ना ?
यमुना: अगदी चांगली आठवण आहे! पण तिच्यावरून काय समजायचे इथे !
वेणू: बोहल्यावर तू आणि मधुदादा होता! मागे मी मुहूर्ताचा कहा घेऊ न उभी होते, आठवते का तुला ?
यमुना: हो, न आठवायला काय झाले ? डोळ्यांदेखतच्या गोष्टी त्यावेळी जाऊ बाईनी तुमच्या नी आमच्या वसंतदादाच्या पदराला गाठ मारली. मुलींनी तुम्हाला वसंतदादाचे नाव घ्यायचा आग्रह केला, अखेर तुम्ही लाजून अगदी रडकुंडीला आला तेव्हा मीच ती गाठ सोडली, तेव्हाचीच गोष्ट ना ?
वेणू: तेव्हाचीच कशाला, तीच गोष्ट आता तरी आले ना सारे लक्षात ?
यमुना: अस्सं अस्सं आता लक्षात न यायला वेडी का आहे मी! वेणू वहिनी का बरे इतकी घाई केलीस, त्यावेळी ती गाठ सोडायची ?
यमुना: हे काय वन्सं ? (तिचे डोळे पुसते) या गोष्टी कुणाच्या हातच्या का असतात ! झाली, पाच वर्षे होऊन गेली त्या गोष्टीला !
वेणू: पाच वर्षे झाली का ग वहिनी तुझ्या लग्नाला ?
यमुना: हो यदाच्या श्रावणातली माझी पाचवी मंगळागौर ना ? वर्षांना काय लागते व्हायला! आली गेली वर्षे.
वेणू: मला ही गोष्ट अगदी काल झाल्यासारखी वाटते. वहिनी, त्या दिवसापासून मला एवढ्या एकाच गोष्टीचा सारखा निदिध्यास लागला आहे. वहिनी, पुन्हा येईल का गं तशी वेळ कधी?
यमुना: हो देवाच्या मनात आले तर तसे सुध्दा घडून येईल.
वेणू: मला तुझे असे मोघम आशीर्वाद नकोत. तू घेशील का मनावर माझे एवढे काम? तुझी अगदी जन्माची उतराई होईन..
यमुना: हात्तिच्या, त्याला एवढी काकळूत कशाला करायला पाहिजे, मला नको का आहे असे झाले तर, एकदा मी गोष्ट काढली सुध्दा होती जवळ! आज पुन्हा काढीन.
वेणू: "पुन्हा काढीन" नाही एवढयाने नाही व्हायचे माझे समाधान उन्हाच्या घापेत उडत्या पाखराच्या सावलीने काय विसावा मिळणार? तू मधुदादाला अगदी गळ घाल आणखी
यमुना: आणखी वसंतदादाला सुध्दा ना ?
वेणू: हो, दोहींकडे अगदी आळ घेऊन बैस काही म्हटल्या काही आपला हट्ट सोडू नकोस. नाहीतर पहा, बाबा काही करोत, माझ्या मनासारखे नाही झाले तर मी काही माझ्या जिवाचे-
(राग यमन ताल-त्रिवट)
सोसुनि दुःखा यापरि, ऐशी । होऊ भार का या जगतासी ? ॥ध्रु.॥ प्रिय गोष्टींचा त्याग करोनि अप्रिय तेही प्रिय मानोनि, घालू माळा का दुःखासी ? ॥1॥
यमुना: पुरे मेले हे बोलणे वन्स, तुम्ही अगदी बिनघोर रहा. मी काय पाहिजे ते करीन. पण तुमच्या मनासारखे घडवून आणीन. आता तर झाले ना !
वेणू: तुझ्या तोंडात साखर पडो म्हणजे झाले....
यमुना: बरे, पण वन्स, आजच तुम्हाला इतके वाईट वाटून घ्यायला काय झाले ?
वेणू: आज दुपारी जेवणावर बाबा काय म्हणाले ते सांगितले नाही वाटते मधुदादाने तुला ?
यमुना: कुठून सांगणे होणार, तुमचे तरी काय विचारणे.
वेणू: हो, खरेच, राजाराणीची गाठ पडायची ती मंचकावरच झाले. मुरडलेस नाक पोर व्हायची वेळ आली तरी आमच्या वहिनीचे पोरपण काही गेले नाही अजून.
यमुना: बरे काय म्हणत होते मामंजी ?
वेणू: बाबांनी मधुदादाला सांगितले की ते ते हे आहेतना त्यांना म्हणावे उद्या येऊ न मुलीला शास्त्रोक्त पाहून जा एकदा म्हणून! म्हणजे उद्याच्या वैशाखात घेऊ उरकून कार्य झाले !
यमुना: कुणाला, आपल्या वैद्यबुवांच्या बाळाभाऊ ना वाटते ?
वेणू: हो.
यमुना: मग त्यांच्या नावाची लाज वाटायला लागली वाटते इतक्यात!
वेणू: बघ केलीस खरी भलतीच बट्टा, अग लाज कशाची? जे नाव ऐकायलासुध्दा नको ते कशाला तोंडावाटे काढू उगीच ?
यमुना: आणि उद्याच बाळाभाऊ तुम्हाला पहायला येणार वाटते ?
वेणू: हो अन् हे ऐकल्यापासून माझा जीव कसा खालीवर होत आहे सारखा! सांगशील ना तू मधूदादाला आजच ?
यमुना: सांगेन, सांगेन, अगदी खचित सांगेन, तुम्ही काही काळजी करू नका.
(सदाशिव येतो)
वेणू: या सदुभाऊ इतक्या उन्हाचे कुणिकडे ?
सदा: ताईने तुम्हाला बोलविले आहे घरी!
वेणू: कुणी ! रमावहिनीने का ?
सदा: हो, तिला करमत नाही म्हणून तुम्हाला बोलविले आहे घटकाभर बसायला
वेणू: खरेच किती दिवसांत रमावहिनीकडे गेले नाही, शनवार शनवार आठ, आदितवार नऊ आणि आजचा सोमवार दहा चल वहिनी तू पण,
यमुना: अशा उन्हाच्या अंमळशाने-
वेणू: गाडी आणियते हवी तर मग तर झाले ना ?
सदा: आणावयाला नकोच. मी आणलीच आहे आमची गाडी.
वेणू : झाले तर मग गाडीत नाहीना झोप लागणार उन्हाची आमच्या दादाच्या नाजूक राणीला ? चल.
यमुना: दमा जरा सदुभाऊ चहा करते आणि मग,
सदा: नको, आता तुमच्या घरी करा चहा. चला लौकर यमू-बरे चला. (जातात)
प्रवेश तिसरा
(सुशीला व लीला बसल्या आहेत. लीला वाचीत आहे.)
सुशीला : लीलाताई, इतका वेळ मी इथे येऊन बसले आहे; पण अजून तू एक शब्दसुद्धा बोलली नाहीस. माझ्यावर रागावली आहेस वाटते?
लीला : काय बोलतेस ताई! तुझ्यावर, माझ्या सुशीलाताईंवर मी रागावेन? आईच्या मागे तुझ्या लहानपणापासूनच मातृपदाच्या थोरवीने तू माझी जोपासना केलीस आणि तुझ्यावर रागावू? ताई, या काव्यरत्नावलीतही ही तांब्याची कविता वाचली नाहीस वाटते तू?
सुशीला: कोणती? ही का? काय आहे? 'विधवेचे स्वप्न मी नाही वाचली अजून! लीला : ताई, मी सुद्धा या अनाथ विधवेशी तद्रुप झाले होते; माझे जागतेपणाचे ते तंद्रीचे स्वप्न हाक मारून तू घालविलेस, तेव्हा मला फारच वाईट वाटले.
सुशीला: लीले, त्या विधवेचे स्वप्नातले स्वप्न ते! तिच्या दुःखमय स्थितीत जाऊन त्या स्वप्नाचा अनुभव घेऊन आपल्याला काय करायचे आहे? तिच्यापेक्षा आपले स्वप्न किती चांगले आहे!
लीला: आपले कोणते स्वप्न ते?
सुशीला : या संसाराचे! मायामोहाच्या निद्रेत आत्माला हे संसाराचे स्वप्नच पडत नाही तर काय? तेव्हा त्या विधवेप्रमाणे सौभाग्याच्या स्वप्नातून जागे होऊन भयंकर वैधव्याची जागृती भोगीत बसायचे त्यापेक्षा आपले हे वैधव्याचे स्वप्न संपून ईशज्योतीत एकरूप झालेल्या पतीबरोबर अखंड सौभाग्याची तेजोमय जागृती अनुभवणे किती तरी चांगले नाही का? त्या स्वप्नापेक्षा आयुष्याचे स्वप्न जरा लांबलचक मात्र असते; आणि म्हणूनच त्याच्यापेक्षा याचा खरेपणा जास्त भासतो; बाकी खरे म्हटले तर दोन्ही स्वप्नेचा भक्तिरूप सखीने ही मायानिद्रा मोडल्यावर जी अक्षय्य सौभाग्य जागृती मिळेल तिच्या मानाने ही दोन्ही स्वप्ने सारखीच.
लीला : ताई, तुला असे बोलताना ऐकले म्हणजे मला पुराण्यातल्या स्त्रियांची आठवण होते आणि सावित्रीने सत्यवानाला यमाच्या हातातून परत आणिले, सीमंतिनीने चित्रागदाचा यमुना डोहातून उद्धार केला, तशी तू सुद्धा आपल्या पतीला त्या समुद्रातून वर काढशील असे वाटू लागते.
सुशीला : वेडी आहेस झाले! माझ्यावर तुझी ममता फार तुला असं वाटतं. त्या योर देवीची आणि माझी बरोबरी कशी होईल! जवळचे काचेचे दिवे आकाशातल्या दूरच्या ता-यांपेक्षा जास्त तेजस्वी दिसतात म्हणून त्यांची तुलना कोण करील? दुःख सहन करण्याचा अभ्यास करीत गेलीस तर तुला सुद्धा माझी स्थिती सहज आणिता येईल. लीला ताई, माझ्या स्थितीची गोष्टच बोलायला नको, आई वारल्यानंतर माझी सुशीलाताई जवळ नसती तर या भयाण जगात माझ्याच्याने एक क्षणभर सुद्धा राहावले नसते. ताई, एका आंधळ्या मुलाने प्रकाश काय असतो असे विचारले आहे, तसेच सुख काय असते हे सुद्धा बालविधवेला दुस-याच्या सांगीवरून कळेल तेवढेच मला सुखदुःखाची भिन्नता कळेनाशी होऊन दुःखाची तीव्रताच काय ती जाणवते. वरातीच्या मिरवणुकी पाहुन दृष्टी भांबावून जाते. मंगलवाद्यांचा आवाज ऐकला म्हणजे पोटात भडभडून येते. सुखाची वर्णने वाचली म्हणजे अंगावर शहारे येतात; आणखी ताई, रागावू नकोस, देवाच्या मूर्ती पाहिल्या. देवीच्याजवळ असलेल्या देवाच्या मूर्ती पाहिल्या, म्हणजे तिरस्कार येतो. सर्व दिवस अगदी एकसारखे वाटून आयुष्य म्हणजे एकाच दुःखदायक दिवसरात्रीचे चक्र वाटते. एकच विचार, एकच स्थिती, एकच दुःख, एकटी मी आणखी ताई मी एकटीच आहे, नाहीतर काय? बाळपणीच्या जगातल्या आनंदाचा आत्मा नाहीसा होऊन त्याचे आज नुसते चित्रच मी पहात नाही का? प्रत्येक वस्तूतले वस्तुपण नाहीसे झाले आहे. ताई, क्षमा कर: एका गोष्टीत मात्र अजून प्रेम, जिवंत प्रेम, जगदी या अगदी या अभागनीच्या सुद्धा हाती लागणारे प्रेम अनुभवाला येते आणि ते फक्त माझ्या ताईच्या या प्रेमळ अलिंगनातच! ताई एकेकदा मला वाटते की, आपल्या आईने मरताना तुझ्या देहात प्रवेश तर केला नसेल ना! अहाहा! ताई, पडू दे ती आसवे माझ्या या करपलेल्या हृदयावर! आईचे डोळे पाण्याने भरले म्हणजे अगदी असेच दिसत असत, ताई, या बालवयात तुझ्या अंगी इतके वैराग्य, वैधव्याच्या ब्रह्मचर्यात अशी आईची वत्सलता ही कुठून आली?
सुशीला : लीले, यात मी काही अधिक का केले आहे? वैधव्यदुःखाचा अनुभव घेत असताना त्याच प्रसंगात सापडलेली तू दिसलीस, त्यामुळे सहजच तुझ्या ठिकाणी मला हतभागी सुशीलाच दिसू लागली, आणि माझ्या दुःखाच्या जाणिवेने मी तुझ्याकडे पाहू लागले. तोच तितक्यात आईनेही आपल्याला सोडल; तेव्हा तर माझे सारे लक्ष तुझ्याकडेच लागले तुझ्या दुःखाचा अनुभव मला तुझ्या अंत:करणाची स्थिती पटविण्यापुरताच होऊन माझ्यावर आलेल्या जबाबदारीमळे मल विचाराच्या स्वाधीन झाले. लीले दुःखमय स्थितीतून परदुःखाची जाणीव झाल्याने खरे आपलेपण सर्वाठायी दिसून येते आणि नसत्या आपलेपणाचा विसर पडतो.
लीला : अहाहा! ताई, आपण जवळ-जवळ एका वयाच्या, पण तू विचाराने किती दुःखमुक्त झाली आहेस! माझ्या विचारशक्तीचा उपयोग मला माझ्या दुःखाची तीव्रता कळण्याइतका मात्र होतो.
सुशीला : आणखी म्हणूनच, लीलाताई, तुला मी नेहमी सांगते की, तू पुनर्विवाहाला है, असे तोड वाईट का करितेस? मी काही हा तुझा कमीपणा समजत नाही. तुझ्यासारखी अति कोमल मनाची माणसे प्रेमाच्या आधारावाचून जिवंतच राहावयाची नाहीत.
लीला: आता कशाला हवी प्रेमाची गोष्ट? पण काय ग ताई, जयंत आणि त्याचे मित्र विद्याधर अजून कसे बरे आले नाहीत? आज जयंत किती तरी दिवसांनी भेटणार!
सुशीला: (स्वगत) प्रेमाची गोष्ट काढताच ही शून्य दृष्टीने पाहू लागली आणि हिला एकदम जयंताची आठवण झाली यावरून माझ्या मनातला चोरटा तक खरा आहे असे वाटू लागते, देवा, या निराशेच्या प्रेमाचा खेळ कसा संपविणार आडेस, तुझे तुलाच ठाऊक (उघड) खरेच, गाडीची वेळ तर केव्हाच होऊन गेली. बरे, आपली वीणा, त्या वसंतरावांना आणि द्रुमनला आणण्यासाठी गेली आहे तिचाही अजून पत्ता नाही, पण हा पहा गोकुळ आलाच! (गोकुळ येतो)
लीला: काय रे गोकुळ आले का जयंत?
सुशीला: आणखी पाहुणे आहेत का बरोबर?
गोकुळ : जरा दम खा आधी तात्यासाहेबांनी सांगितलेले काम करतो आणि मग तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो नाही तर त्यांचे काम विसरून जाईन आणि साराच घोटाळा होईल. जयंत आले आहेत: पाहुणेही आले आहेत! पाहुण्यांचे नाव पहा काय आहे-
सुशीला: अरे, तू पाहुण्यांचे नाव आधी विसरणार, की काकांचे काम आधी विसरणार?
गोकुळ: झाले! दोन्ही एकदम विसरलो. आता दोहोंची एकदम आठवण करणार काय बरे? तात्यासाहेबांचे नाव काय आणि त्या पाहुण्यांचे काम काय? छे बुवा, कोणकोणत्या गोष्टी आपण विसरलो याची माणसाला आठवण राहती कीनई तर काय बहार होती? पण आता आठवणीच्या विचाराला सवड कोठून मिळणार? हे पहा, इकडून हे जयंत आणि पाहुणे आले आणि इकडून या वीणाताई, वसंतराव आणि द्रुमनताई यांना घेऊन आल्या. अगदी नाटकी योगायोगच हा! (एकीकडे जयंत, विद्याधर व कमलाकर व एकीकडून वीणा, द्रुमन व वसंत ही मंडळी येतात.)
वसंत : (काही वेळ गेल्यावर, जयंतास) वा जयंत याचा काय अर्थ? पाहुण्यांचा आणि मंडळींचा परिचय अजून करून देत नाहीस याला काय म्हणावे? विलायतेत अशा दिरंगाईला शिष्टाचार समजत नाहीत! हिंदू. अगदी हिंदू आहेस तू.
जयंत: (वसंतास) माफ कर बुवा, मी आहे खरा हिंदू! तुझे हे विलायती शिष्टाचार मी ताबडतोब विसरतो. विद्याधर, आमचे थोरले मामा बाबासाहेब यांच्या कन्या या सुशीला आणि लीली! यांच्या दुर्दैवाची कहाणी मी तुम्हाला सांगिलतीच आहे. या आमचे धाकटे तात्यासाहेब यांच्या कन्या वीणाताऊ, या आमच्या घरातल्या सुधारणेच्या अधिष्ठात्री देवताच आहेत. स्त्रियांनी लग्न न केल्यापासून त्यांचे किती फायदे आहेत हे शिकण्यासाठी थोडे दिवसापूर्वी यांचा विलायतेस जाण्याचा मानस होता; पण प्रेमपाशात सापडल्या. लौकरच याचे वसंतरावांशी हिंदू पद्धतीनेच लग्न व्हावयाचे आहे.
विद्याधर : हिंदू पद्धतीनेच म्हणजे? नाही तर दुसरी कोणती पद्धती ?
जयंत: इंग्रजी! वसंतराव आणि वीणाताई यांना जे जे इंग्रजी ते ते मनापासून आवडते! हिंदू जीविताला ती दोघेही अगदी कंटाळलेली आहेत. आमच्या शहरातल्या सुधारणेची सारी भिस्त या वसंतरावांवरच आहे. हे नुकतेच विलायतेहून कायद्याची परीक्षा देऊन आले आहेत.
विद्याधर : विलायतेहून कायद्याची परीक्षा म्हणजे-
जयत: समजलो: तुमचा तर्क बरोबर आहे बरा आयताच विषय निघाला. विद्याधर. या आमच्या चिमुकल्या मित्रमंडळाने फार दिवसापासून असा एक नियमच ठरवून टाकला आहे की, होता होईतो एक भाषा बोलताना तीत दुस-या भाषेचे शब्दच आणावयाचे नाहीत. त्यातल्या त्यात आमच्या वसंतरावांनी सुद्धा अजून या नियमाला मान दिला हे विशेष! विद्याधर: वाः मी तर असा नियम मोठया आनंदाने पाळीन! (द्रुमनकडे पाहून) बरे, या कोण?
वसत : पाहिलेस जयंत, पुन्हा चुकलास! किती हिंदू आहेस रे! माझ्या आधी द्रुमनताईचीच ओळख करून द्यायला पाहिजे होती! विलायतेत अग्रपूजेचा मान नेहमी स्त्रियांनाच द्यावा लागतो! या नियमाच्या उल्लंघनाने शिष्टाचाराच्या राज्यात तिकडे मोठा गुन्हा केल्यासारखा होतो!
जयत: याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. विद्याधर, वसंतरावांच्या भगिनी या द्रुमन, दुर्दैवाने यांच्यावरही वैधव्याचा प्रसंग आलेला आहे. आणि हे आमचे कमलाकर, तात्यासाहेबांच्या शालकाचे चिरंजीव. हेही लहानपणापासून इथेच असतात. असे हे आमचे लहानसे मित्रमंडळ आहे.
गोकुळ : (स्वगत) म्हणजे? या सुधारकाचे हे मित्रमंडळ आणि मी जुन्या मताचा म्हणून शत्रुमंडळ वाटते? मला वाटत होत की, मी एकटाच विसराळू आहे. पण आज जयंत सुद्धा माझी ओळख करून द्यायचे विसरलेच की! काही हरकत नाही; आपल्याला हे सुधारकी चोचले कशाला हवे? आपणच आपली ओळख करून घ्यावी पण काय नाव या पाहण्याचे? जयतांनी आताच घेतले की काय बरे? (आठवतो.)
जयंत: विद्याधर-
गोकुळ : (एकदम) हो खरेच, विद्याधर अहो विद्याधरसाहेब, ओळख व्हायचा मीच चुकून राहिलो आहे तेवढा! माझे नाव गोकुळ कृष्णवताराची खूणगाठ बांधून ठेवा म्हणजे नाव लक्षात राहील. लहानपणापासून तात्यासाहेबांनीच माझे पालनपोषण केले, पुढे लग्न करून दिले-
जयंत: गोकुळ, तुला चुकून विसरलो त्याची क्षमा कर बाकी विसराळूपणाशी तुझा तसा निकट संबंध आहे यात शंका नाही. विद्याधर, हा आमचा गोकुळ अगदी लहानपणापासून आमच्या इथे असतो; मनुष्य मीठा प्रामाणिक, ममताळू आणि गरिब आहे.
गोकुळ : मी उद्धारक मताचा आहे हे सांगावयाला विसरू नका नाही तर सर्वांबरोबर पाहुणे मलाही सुधारकच समजावयाचे! हो, मी आहे जरा फटकळ आपल्याला कोणी महार म्हटले तर चालेल, पण सुधारक म्हटलेले नाही खपायचे!
सुशीला: खरेच विद्याधर, आमचा गोकुळ इतका धर्माभिमानी आहे की सिंहस्थात पत्त्यातल्या राजाराण्यांची सुद्धा लग्ने लावीत नाही... वीणा आणि इकडे पुनर्विवाहाची चाल पाडण्यासाठी वसंतराव पत्त्यांतल्या राण्यांची मुद्दाम दोन दोनदा लग्ने लावतात.
गोकुळ : विद्याधरसाहेब, हा सारा फाजील शिक्षणाचा परिणामा
वसंत: यात माक्ष शंका नाही या बाबतीत मात्र गोकुळ अक्षरश: बाळबोध वळणाचा आहे.
गोकुळ : असे कुत्सित नजरेने पाहू नका, वसंतराव यात मला नाही काही कमीपणा वाटत! विद्याधरसाहेब, आमचे घराणे खरोखरीच इतके बाळबोध वळणाचे की, स्त्रीशिक्षण तर आमच्या घरात नव्हतेच पण पुरुषांपैकीसुद्धा कित्येकांना तरी लिहितावाचता येत नव्हते.
कमलाकर : पण विद्याधर, गोकुळचा अजून मुख्य गुण राहिलाच आहे. विसरभोळेपणात गोकुळ अगदी अद्वितीय आहे. पावसात भिजताना कधी कधी त्याला छत्री उघडण्याचा सुद्धा विसर पडतो.
गोकुळ: आणखी अहो काय आपले नाव? पुन्हा विसरलो!
विद्याधर: माझे नाव.
गोकुळ: हो, खरेच विद्याधरा विद्याधरसाहेब, इतका काही मी विसराळू नाही. पण या कमलाकरांचा मुख्य गुण म्हणजे परनिंदा! आजपर्यंत सर्वांची निंदा करण्याइतकच याचा सारा वेळ गेल्यामुळे निरुद्योगीपणामुळे हल्ली हेच सर्वांच्या निंगेला पात्र होऊन बसले आहेत.
सुशीला: गोकुळ, अशा वेळी आपण जर एकमेकाच्या उखाळ्या पाखाळ्या काढू लागलो तर हे पाहुणे काय बरे म्हणतील? विद्याधर, तुम्ही आमच्या गोकुळचा आणि वसंतरावांचा वादविवाद ऐकला नाही अजून!
वीणा: शास्त्रविहित आचारांचा त्याच्यासारखा पुरस्कर्ता सापडावयाचा नाही. 2
वसंत::हो, बाप जिवंत असल्यामुळे श्राद्धाचे पुण्यकर्म दवडण्यापेक्षा श्रद्धाचा हक्क मिळवण्यासाठी बापाचा घात करावा असे हे म्हणतात!
विद्याधर: वाहवा अशी प्रखर धर्मजागृती असल्यावर सुधारकांना बीमोड व्हावयाला कितीसा उशीर लागणार?
जयत: पण एक दोन बाबतीत मात्र गोकुळ स्वतःच सुधारक मताचा आहे!..
लीला: हो, खरेच, बायकोच्या जाचाने असा विपरीत प्रकार झाला आहे खरा गोकुळचा! दुमन घरात स्त्री-पुरुषांना सारखे हक्क असावेत हे सुधारकांचे म्हणणे गोकुळाला सर्वस्वी मान्य आहे; कारण त्याच्या घरात त्याटा कशावरही हक्क चालत नाही!
लीला : आणखी सुधारक आपल्या बायकांना नावानेच हाक मारतात तसा गोकुळही नेहमी बायकोच्या नावाने हाक मारीत असतो!
विद्याधर: म्हणजे, कजाग आहे वाटते याचे कुटुंब?
कमलाकर: ती कजाग कशाची? हाच अजागळ आहे झाले! नव-याला डोके नसले म्हणजे बायका डोक्यावर बसतात! गोकुळ या म्हणतात काय अर्थ आहे? भगवान शंकराला एक सोडून पाच ढोकी होती तरी गंगामाई डोक्यावर बसल्याच की नाही अखेर आधीच बायका तोंडाळ त्यातून ही तर इतकी बोलभाड आहे म्हणता, की दिवसभर तर बोलतेच बोलते पण रात्री झोपेत सुद्धा बोलत असते आणि ते सुद्धा अगदी खड्या सुरात आवाज असा खणखणीत आहे की, लग्नात विहिणीचा कलकलाट चालला तरी हिचे बोलणे शेजारणीला साफ ऐक जाते! बोला आता!
सुशीला : गोकुळला अव्वाच्या सव्या गोष्टी सांगण्याचे भारी वेड आडे. अशी काही त्याची बायको मुलुखमैदान नाही अगदी!
गोकुळ : खरेच नाही! सुशीलाताई, आमच्या हिला मुलुखमैदान म्हणून तिची किंमत कोण कमी करील? विजापूरच्या मुलुखमैदान तोफेच्या आवाजाने नुसत्या गर्भिणीचेच गर्भपात झाले म्हणतात! पण हिच्या तोंडाची तोफ सुरु झाली म्हणजे माझ्यासारखा पुरुष सुद्धा गर्भगळीत होतो!
वसत: अरे, अरे! स्त्रिया म्हणजे गृहदेवता, पण आमच्या समाजात त्यांची कोण हेटाळणी चालते ही! विलायतेस आपल्या बायकोबद्दल असे बोलणाराला खरोखर तोफेच्याच तोंडी दिल असता
गोकुळ : मग मलाही तिच्या तोंडाला तोफेला बळी दिलेलाच नाही का?
कमलाकर : कसले आले आहे तोड? यांच्यातच पाणी नाही म्हणून जरा तोड करू लागली की, एक श्रीमुखात देऊन एका तोंडाची दोन तोड़े करावीत झाले!
गोकुळ: चांगला उपाय आहे हा! एका तोंडानेच सध्या मी बेजार झालो आहे; मग दोन तोडे झाल्यावर काय करावे लागणार न कळे!
वसंत : या गोकुळला असे बोलताना ऐकला म्हमजे तळपायाची आग मस्तकाला जाते. पण एकट्या गोकुळलाच का दोष लावावा? सारा समाजच जेथे स्त्रियांच्या हक्काची पायमल्ली करीत आहे तेथे एकट्यालाच जबाबदार कोणी धरावा?
गोकुळ: अशी काय पायमल्ली चालली आहे ती कळू तरी द्या! येऊन जाऊन पुनर्विवाह म्हणजे पाट लावावयाची मोकळीक नाही हेच ना? द्रुमन अमुक एकच गोष्ट कशाला हवी? पायापासून डोक्यापर्यंत सारखा अन्याय चालला आहे.
वीणा : एखाद्या बेइमान नव-यासाठी सुद्धा त्याच्या निर्दोषी स्त्रीला आपल्या सुंदर केशकलापाला मुकावे लागते, हा केवढा अविचार!
गोकुळ : वीणाताई, वपन केल्यावर सुद्धा जर या बायका मृतपतीचा केसांनी गळा कापावयाला चुकत नाहीत, तर मग वपन न केले तर काय होईल? प्रौढ विधवाना कदाचित हा केशवपनाचा आळा नसला तर एक वेळ चालेल, पण अल्लड वयाच्या बालविधवाना तर-
सुशीला: हे जुलमाचे नैतिक बंधन पाहिजेच म्हणतोस?
विद्याधर : अशा गोष्टीचा आमच्या समाजाकडून तीव्र निषेध होत नाही ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे। सामाजिक सुधारणेला पाऊल पुढे टाकावयाला ही किती योग्य जागा आहे!
गोकुळ: याच काय, पण कुठल्याही बाबतीत, जुन्या चालीचा समाज विधवा पुढे आली की कधीच पुढे पाऊल टाकणार नाही!
जयंत: निषेधाची गोष्ट दूर राहिली. पण उलट हा निर्जीव समाज विधवाचा जिवंतपणीच जीव घेऊन पुरुषांना वाटेल तितकी लग्ने करण्याची मोकळीक देतो-
वसंत : वेश्यागमनाच्या निंद्य अन्यायाकडे कानाडोळा करतो यापेक्षा दुर्दैवाची सीमा कोणती?
विद्याधर : खरोखरी, आमच्या पुरुषवर्गाची शिथिल नीतिमत्ता वेश्येच्या रूपाने, समाजात उजळ माथ्याने वावरताना पाहिली म्हणजे उद्विग्न मनाला स्त्रियांना मिळणारे अन्याय द्विगुणित दिसतात आणि अशा क्रूर समाजाबद्दलच्या आपलेपणाचा सुद्धा क्षणभर विसर पडतो!
वीणा: ते काही नाही; सुशीलाताई, तुला मी बजावून ठेविते, आता पदमाकराकडून तात्यासाहेबांकडे तुझ्याबद्दलची पुनर्विवाहाची मागणी आली म्हणजे तू बिनदिक्कत त्याच्या मागणीला रुकार दे; तसेच द्रुमन, तू सुद्धा! वसंत द्रुमनताईच्या बाबतीत माझा नाइलाज झाला आहे.
विद्याधर: का बरे?
वसंत: आमचे निस्सीम हिंदू हाडाचे वडील दुमनताईच्या पुनर्विवाहाची गोष्ट काढताच, जानव्याटा गळफास घेण्याची तयारी करतात आणि मातोश्री चुलीत सती जावयाला तयार होतात
विद्याधर : पण तुमच्या एकदर बाण्यावरून तर तुमच्या घरी सुधारणेला इतका मज्जाव असेल असे कोणालाही वाटणार नाही.
गोकुळ : दिव्याखाली अंधारा यांच्या घरात हेच काय ते कुलदिपक निपजले आहेत, बाकी चहूकडे अंधार आहे सारा! गरीब बिचारे यांचे वडील, द्रुमनताईच्या शिक्षणाचे नाव काढल्याबरोबर माथ्यात राख घालून बसतात! एकदा तर कधी बरे वीणाताई, काय झाले ते (आठवतो.)
वीणा: बरे, आठवण झाली म्हणजे साग एखादे वेळी! विद्याधर, एवढे मात्र खरे की, द्रुमनताईंना मराठी लिहिणे सुद्धा वसंतरावांनी अगदी चोरून मारून शिकविले आहे. द्रुमनताईंना आमच्या इथे यावयाची परवानगी मिळते ती सुद्धा फार दिवसांच्या घरोब्यामुळे! तू मात्र मागे घेऊ नकोस पुनर्विवाहाबद्दल तूर्त शब्दच काढावयाला नको! पण सुशीलाताई, तू मात्र मागे घेऊ नकोस पुनर्विवाहाची मुहूर्तमेढ घरात उभारावयाला तुझ्यासारखी देवताच पुढे व्हावयाला पाहिजे!
विद्याधर : काय! सुशीलाबाईंच्या पुनर्विवाहाचे घाटत आहे?
कमलाकर: (स्वगत) हा एक घटकेचा पाहुणा हे ऐकून इतका का बरे गांगरून गेला? घटकेच्या नेहाच्या मानाने ही चलबिचल अंमळ फाजीलच म्हणावयाची!
वसंत : अहो, मी तुम्हाला सर्व वृत्तांत सांगतो! विद्याधर, या गावात पदमाकर म्हणून एक सघन विधुर आहेत; शिक्षणही श्रीमतीच्या मानाने बरेच झाले आहे म्हणायचे! त्यांचा आमच्या सुशीलाताईंशी पुनर्विवाह लावण्याचा जुना मानस-
विद्याधर: मग तो अजून सिद्धीस का जात नाही?
गोकुळ: तसे व्हावयाला सुशीलाताईंचीच आडकाठी आहे
कमलाकर : (स्वगत) सुशीलाताईंची आडकाठी आहे हे ऐकून सात्त्विक महात्मा जरासा प्रसन्न झाल्यासारखा दिसला! एकूण शुद्ध मित्रत्वापेक्षा जास्त सलगीची महत्त्वाकाक्षा दिसते स्वारीची!
वीणा : आजपर्यंत चालत आलेली रुढी कशी मोडावी याचा सुशीलाताईला मोठा प्रश्न पडलेला आहे.
विद्याधर : का बरे? सुशीलाबाईसारख्या सुशिक्षित माणसाला रूढींचे इतके भय नको आहे, इतर काही कारणे असल्यास गोष्ट निराळी!
सुशीला: इतर कारणासाठीच पुनर्विवाह मला नको आहे. परोपकाराच्या मार्गाने सुखाची हानी सर्वापरी भरून येते.
वसंत : सुशीलाताई, काय हे बोलणे ! कसला कर्माचा परोपकार करीत बसता आहात? विलायतेत कोणतीही बाई असे बोलायची नाही! परोपकाराचे वेड निव्वळ हिंदूपणाचे आहे! तुमच्या शिक्षणाचा तुमच्यावर मग काय परिणाम झाला?
सुशीला: वसंतराव, या गोष्टीची सांगून समज पढावयाची नाही! मला पाहिजे तर वेडी म्हणा, पण पुनर्विवाहाची मला तशी आवश्यकता वाटत नाही.
विद्याधर : जयत, तुमचे सुधारणेबद्दल आजपर्यंतचे उद्गार ऐकून मला वाटत होते, तुम्ही तर सुशीलाबाईना पुनर्विवाहाबद्दल सर्वाहून विशेष आग्रह कराल पण मी मघापासून पाहतो आहे. तुम्ही अगदी मौन धरून बसला आहात! जरासे चमत्कारिकच आहे हे!
जयंत : माझ्या मौनाचे कारण हेच की, मलाही हा पुनर्विवाह इष्ट वाटत नाही.
विद्याधर: मग पुनर्विवाहाला तुमची समती-
जयंत : पूर्ण आहे. पण हा पुनर्विवाह मात्र नको! पद्माकराच्या दुष्टपणाची ज्याला ज्याला चांगली माहिती आहे तो तो असेच म्हणेल.
गोकुळ : हे कारण नसते तरी सुद्धा आपण पुनर्विवाहाच्या आडच आले पाहिजे! श्रुतिस्मृतीचा पुनर्विवाहाला मुळीच पाठिंबा नाही।।
विद्याधर : वा! जसे काही बाकीचे सारे प्रकार श्रुतिस्मृतांच्या आधारानेच चालले आहेत! ज्या धर्मग्रंथांना आम्ही यच्चयावत् बाबतीत बिनदिक्कत धाब्यावर बसवितो त्याच्याकडे या एकाच बाबतीसाठी धाव घेणे म्हणजे निव्वळ पोरखेळच आहे. अगदी अनाचार करताना सुद्धा श्रुतीचे ऐकावयाचे नाही आणि स्मृतीची स्मृति होऊ द्यावयाची नाही त्यांच्या न्याय्य आज्ञांना फाटा द्यावयाचा आणि एका अघोर अन्यायाच्या समर्थनासाठी मात्र त्यांची कास धरावयाची. हा कोठला न्याय?
गोकुळ : असे का बरे म्हणता? सनातन धर्मांच्या पक्क्या पायाची उभारणी श्रुतिस्मृताच्या जोरावर झालेली आहे. ज्या ईश्वरदत्त संपत्तीच्या जोरावर आमच्या पूर्वजानी सा-या जगाला तुच्छ मानीत आलो, ज्याच्या हृदयात आम्हा आर्याचे आर्यत्व आज हजारो वर्षे आम्ही दडवून ठेविले आहे-
वसत: आर्यत्व दडवून ठेविले आहे हे मात्र अगदी खरे.
गोकुळ: थांबा, वसतराव, मला पुरतेपणी बोलू द्या! आर्यत्व दडवून ठेविले आहे, ज्या ग्रंथात विमाने आहेत, आगगाड्या आहेत, तारायंत्रे आहेत. पाश्चिमात्य सा-या सुधारणा आहेत, ज्यात ईश्वराचे अंत:करण आहे, ज्यात आर्य ऋषींची वाणी आहे, ज्यात रूढीचा आत्मा आहे. ज्यात पापपुण्याची शहानिशा केलेली आहे. ते आमचे वेद, त्या आमच्या श्रुति, त्या आमच्या स्मृति, ती आमची उपनिषदे, ती ब्राह्मणे-
वसंत: ती तुमची ब्राह्मणे, ती तुमची भटे! भले शाब्बास! कुठे पाठ केले होते हे सारे? आज तुझ्या या भाषणाने तू सुधारकांना अगदी चीत केलेस नाही? पापपुण्याच्या मोठ्या बहारीच्या कल्पना आहेत या. पण हे विचारांचे नवकोटनारायण आचाराच्या बाबतीत मात्र सुदाम्यापेक्षा दरिद्री असतात. ए कंगाल, या मोठमोठ्या ग्रंथांच्या नुसत्या जोरदार उच्चाराने आजच्या आचरट आचारीचे समर्थन कसे होणार? रामनाम पवित्र असले तरी पोपटाला त्याची पवित्रता काय कळणार?
गोकुळ : वसंतराव, आपल्याला उत्तर कोण देणार? मी थोडाच विलायतेस जाऊन जानवे तोडून शेंडी काढून मोकळा झालो आहे? मी जर देशी पोपट असेन तर आपण विलायती पोपट आहात इतकंच! पण हे पहा अहो विद्याधर, मी अजून मुद्दाम बोललो नाही! अहो, पुनर्विवाहाचा प्रचार सुरु झाला तर कंटाळलेल्या बायका नावडत्या नव-याला विष देऊन पुनर्विवाहाचा रस्ता मोकळा करतील, समजला? धडाधड हत्या होतील हत्या !!
वसंत : वा! काय पण कल्पनेची कसरत ही! हिंदूखेरीज असली कल्पना दुस-याला सुचायची नाही! विलायतेत कोणाला असे बोलताना मी कधीच ऐकले नाही! हा गोकुळ तर हिंदूतला हिंदू आहे अगदी! हे पहा, ए हिंदू. असे होऊ लागले तर काही वाईट नाही! आज बालहत्या होत आहेत त्या बंद होऊन उद्या पतिहत्या होतील एवढेच एक स्त्री फार झाले तर एक-दोन पतींचा नाश करील; पण आज एका विधवेला कितीतरी बालहत्या करता येतात! तेव्हा लोकसंख्याच्या दृष्टीने सुद्धा एकदरीने फायदाच होणार! समजला? यापेक्षा या आचरट शंकेचे सरळ समाधान करीत बसण्याचे कारण नाही.
विद्याधर : गोकुळ तुमची ती भीती निराधार आहे. आज ज्या जातीत पुनर्विवाह प्रचलित आहेत त्याच्यात जसे अनर्थ कितीसे होत आहेत? त्यांचीच साक्ष घ्या म्हणजे झाले!
सुशीला: मला या वादविवादाचा आता इतका कंटाळा आला आहे म्हणता, की काकांना या बाबतीत एकदा कायमचे उत्तर देऊन मी केव्हा मोकळी होईन असे झाले आहे मला! काकाच्या दिवाणखान्यात जाऊ (सर्व जातात. जयत जाऊ लागतो तोच मनोरमा येते) मनोरमा काही झाला का गप्प? मी आल्याबरोबर तुमच्या तोंडाला असे कुलूप बसते आणि एरवी मोठया पंडितासारखे बोलत असता, असे मी तुमचे काय घोडे मारले आहे? मनोरमा होय बरे! मला चांगली आठवण आहे हो! पण आपण असे नेहमी विसरता, आणि म्हणूनच मला अशी आठवण करून द्यावी लागते! जयंत: मनोरमे, शुद्ध प्रेमाने एका मनुष्याला दुस-या मनुष्याशी, त्यातून स्त्री- पुरुषांना एकमेकांशी निष्काम बुद्धीने बोलता यावयाचे नाही. हीच जिथे सा-या समाजाची अनुदार दृष्टी, तेथे तुलाचा दोष कोणी द्यावा? मनोरमा कवितेचा आणि लग्नाचा काय संबंध? आमच्या आईला माझ्यासारखेच कवितेचे नावही माहीत नव्हते. पण बाबांनी असा त्रागा जयंत तुझा बाप मोठा खबीर मनाचा! पण मी तसा नाही! जेथे जिवाचे प्रेम नाही, आयुष्याचे एकजीव काव्य नाही-
गोकुळ : अरे, अरे अरे! सुशीलाताई, तात्यासाहेबानी सांगितलेले काम विसरलो म्हणून म्हणत होते ते हेच! हे पहा, पदमाकरकडून आलेले पुनर्विवाहाच्या मागणीचे पत्र हे तुमच्याजवळ द्यावयाला तात्यासाहेबांना जाऊन सांगते की, साफ नकाराचे उत्तर लिहा म्हणून! चला, सारी
मनोरमा: अहो, जरा थांबा पाहा आता तुम्ही चांगले आला, पण मला भेटायची आठवण होते का तुम्हाला? मी मघापासून आपली पाहते आहे. इतका वेळ झाला तरी तुमचा आपला नेहमी बाजार चाललाच आहे म्हटले, आता चांगले चार सहा महिने मुंबईस होता; तितक्या वेळात काही तरी अक्कल आली असेल!
जयंत: (स्वगत) अरेरे, आनंदाच्या भरात इतका वेळ माझ्या दुर्दैवाची मला आठवण झाली नव्हती! क्षणभर का होईना, मी स्वतःला विसरलो होतो; पण देवाला ते कोठून रूचणार!
जयंत: मनोरमे, तू माझी पत्नी ना?
जयंत: मनोरमे, मला दुःख द्यावयाला का तू जन्मली आहेस?
मनोरमा: काय बाई बोलणे तरी माझ्या बोलण्यापासून तुम्हाला त्रास होतो नाही? असे माझे बोलणे असते तरी काय? तिम्हाला गोकुळकाल्यात या घोड्याएवढ्याला पोरीबरोबर उचलू देत नाही हेच ना?
जयंत: अरेरे, मनोरमे, काय हे नसते कुतका एवढ्यासाठी का मी सुशीलाताईशी आणि लीलाताईशी बोलत असतो?
मनोरमा: नाही तर कशासाठी? नेहमी पहावे तो तुमची संभाषण चाललेली! दुसरे काय बोलायचे असते हो एवढे?
मनोरमा : अहाहा! मी काही अगदी बोडल्याने दूध पीत नाही! या साळकायाशी तुम्ही हसता खिदळता आणि माझ्याशीच बोलताना का बरे तोड कडू होते? बोला आता काय ते!
जयंत: काय बोलू हेच मला कळत नाही! मनोरमे, तू माझी पत्नी खरी, पण तुझ्या मनोवृत्तीत हा जो एवढा फरक आहे त्यामुळे काय बोलायचे याचाच निर्णय होत नाही! लहानपणापासून कल्पनेच्या काव्यानंदावर तरंगणारा माझा प्रेमात्मा वस्तुस्थितीच्या वणव्यात पार होरपळून गेला आहे! भावी आयुष्याच्या कल्पना काव्यात आपल्या लग्नाच्या- केला नव्हता त्या दोघानी चांगला संसार थाटला. आठ मुलगे आणि आम्ही पाच मुली त्यांना झालो; आणि हे सारे कवितेची एक ओळ सुद्धा म्हटल्यावाचून!
मनोरमा: पुन्हा आपले तेच! अहो, कवितेला काय चुलीत जाळावयाची आहे! आमटी आळणी झाली तर तेथे कवितेचे आधण ओतून काही येईल का? निगोड चहात कवितेची दोन पाने बुचकळून गोडी आणता येईल का? म्हणे तुला कविता कळत नाही! मग कवितेच्या चोपड्याची एक रास करून तिच्याशी का नाही लग्न केले? सारी सोगे! म्हणे तुझे माझे हृदय जमत नाही! आणि या बायकोच्या बाजारात मन रमते वाटते?
जयंत: राक्षसिणी, का उगाच वाग्बाण सोडतेस? दुःखित जिवाला दुस-या तशाच दुःखी जिवांना धीर देण्यात थोडेसे समाधान वाटते, आणि एवढ्यासाठीच अनाथ बालविधवाकडे लक्ष वेधते।
मनोरमा: हो! हो! लक्ष पुष्कळ वेधेल; पण मी वेधू देईन तेव्हा ना! हजार रूपये हुंडा आणि शिवाय करणी, मानपान सारे करून बाबांनी मला येथे ढकलली, ती काही तुमचा हा तमाशा पहावयाला नाही!
जयंत: चल जा, काय बोलायचे असेल ते एकीकडे जाऊन बोल. माझ्या मनाला उगीच संतापवू नकोस! जा येथून!
मनोरमा: जाते बरे! काय न्याय आहे बघा! (स्वगत) माझ्या आता चांगलं ध्यानात येत चाललं आहे सारे! एकदा स्वारीला चांगले राजरोस पकडते आणि मग दाखवते कसे काय सुख आहे ते! (जाते)
जयंत: (स्वगत) हरहर, हेच का माझे संसारसुख! जमीन-अस्मानाप्रमाणे एकमेकापासून दूर राहणा-या दोन भिन्नवृत्ती जिवाना कृत्रिम उपायांनी एकत्र बांधावयाचे आणि एकजीव झालेल्या, देहमात्र भिन्न, पण एकवृत्ती हृदयांना एकमेकापासून दूर ठेवावयाचे! परमेश्वरा, मी बालपणीच काढलेल्या आशेच्या चित्रावर काव्याच्या आत्म्याने कल्पनासृष्टीत जवळ जवळ सजीव खेळणा-या भावी चित्रावर असे निराशेचे काळे ढग टाकून मूळच्या मनोहर स्मृतीमुळे ते अधिक भयकर केलेस, त्यापेक्षा बाळपणीच तो चित्रपट फाइन का टाकला नाहीस? प्रेमरंगाने भरलेल्या हृदयाचा पेला तेव्हाच फोडून टाकावयाचा होतास वर्तमानाचे वातावरण भेदून भविष्याच्या पटावर लीलेने कल्पनाचित्र काढण्यापूर्वीच आशादृष्टीचे कलम मोडून टाकावयाचे होतेस. अरेरे! नीरस, हृदयशून्य, जडवृत्ती मनोरमेची प्राप्ती आणि तीही काव्यमय, हृदयसर्वस्व लीलेची आशा भग्न झाल्यावर! पण नको आता लीलेचा विचार बंधुप्रेमाच्या दृष्टीनेच केला पाहिजे. प्रेम आणि लीला याची कल्पनेतली जोडीसुद्धा जगाच्या दृष्टीने पापमय ठरेल! क्रूर कृत्रिम जगता! अशी किती हृदये तुझ्या बोजड नियमाखाली पार चुरडून गेली असतील! पण जगाचा यात काय दोष? लोकदृष्टी कल्पनेच्या क्षितिजाने दूरस्थ आकाशाला जमिनीशी स्वर्गाच्या बेसुमार वर्णनाने नरकयातनेचे स्वरूप देते! देवा! अदभुतरम्य काव्यसृष्टी जर व्यवहाराच्या वस्तुस्थितीत कधीच उतरण्यासारखी नसेल तर प्रतिभाशाली कवी निर्माण करून त्यांच्या आशापूर्ण भविष्यचित्रांनी तरुणांना नसता मोह का पाडितोस? अहाहा! ही पहा लीला आली आहे, काव्यदृष्टी खरी आहे! पण हृदया, आता बंधुप्रेमाला जागृत कर! परमेश्वरा, प्रेममय कल्पनाचे माझ्या मनातून आता निर्बीज करून टाक. (लीला येते)
लीला: सारी मंडळी वर गेली आणि तुम्ही मागे राहिला तेव्हाच मला वाटले की, तुमचे मन स्वस्थ नाही आणि म्हणून मी मुद्दाम थांबत इकडे आले. जयत: लीलाताई, मी दुःखात असतो तर खरोखरीच तुझ्या मायाळू साह्याने माझे समाधान झाले असते (हसून ) पण जेथे दुःखच नाही, तेथे या तुझ्या ममतेने तुझ्या हृदयाची थोरवी मात्र दिसून येते!
लीला : नका, असे हसून आपले दुःख लपवू नका! भयाण खिन्नतेला झाकावयाला या कृत्रिम हास्याचे विरल आच्छादन कसे पुरणार? त्याने उलट खिन्नता जास्त भयाण दिसते. जयत: लीले. तू म्हणतेस तेच खरे आहे! काळवंडलेले प्रेत झिरझिरीत मलमलीखाली झाकले तर विशेषच भयंकर दिसते. पण लीले, दुःख दुस-याला, त्यातून स्वतःच्या दुःखाने चूर झालेल्या तुझ्यासारख्या जिवाला सांगून काय उपयोग?
लीला : का बरे? तुम्ही नेहमी माझे सांत्वन करता तसे मीही तुमचे दुःख हलके करण्याचा यत्न करीन!
जयंत: वेडी नाही तर! चल, मंडळी वर वाट पाहात असतील.
लीला : नका सांगू वाटेल तर मला आपले दुःख! पण मला अगदी स्पष्ट दिसते आहे. (त्याच्याकडे पाहते)।
जयंत: (स्वगत) अहाहा! ही दृष्टी काय बोलत नाही? बोललेले फक्त कळते पण न बोललेले अगदी हृदयात भिनते! पण या दृष्टीला दृष्टी देऊन उपयोगी नाही! (तोंड फिरवितो) अरे, ही पहा दुसरी नजर! मनोरमा संशयाच्या दृष्टीने आमच्याकडे पाहात आहे. आता येथे उभे राहून मुळीच उपयोगी नाही. (प्रगट) लीले, चल लौकर, तात्यासाहेब वाट पहात असतील. (जातात)
प्रवेश चवथा
(अण्णासाहेब यशोदाबाई)
अण्णा : काय करावे आता प्रकृतीला ! अगदी तीळ खपेनासा झाला आहे ! आज सकाळी आग्निमांद्य झाले म्हणून चूर्ण आणविले वैद्यबुवाकडून तो लागलीच इतकी क्षुधा प्रदीप्त झाली की साऱ्या मुलखाची खाई खाई सुटली आहे! काय ही भूक!
यशोदा: मग खायचे होते काही थोडेसे देऊ का आणून काही ?
अण्णा: अगे, खायचे काय कपाळ मागे त्या रामभाऊला असेच अग्निमांद्य झाले; पुढे चूर्ण घेतल्याबरोबर अशीच खाई खाई सुटून त्या नादात खाल्लेही काही त्याने थोडेसे झाले सहा महिने खाटेला खिळून पडावे लागले! वैद्य तरी आता कोणता आणावा ?
यशोदा: खरे तर काय ? इतके वैद्य झाले पण मेल्या एकाच्यासुध्दा हाताला गुण नाही. सारे मेले-- -
अण्णा: अग, वैद्याला शिव्या देऊ नयेत अशा वैद्यांच्या स्वाधीनच्या का या गोष्टी आहेत? वैद्य काय करणार इथे ? आताशा हवा पहा ना कशी असते ती ! सकाळी सारे आभाळ झाकलेले ! दुपारी अंगाच्या कारंजी होतात आणि संध्याकाळी गार वारा लागतो ! रात्री असाच वाऱ्याचा खेळ घटकेत वारा इतका बंद होतो की श्वासोच्छवास सुध्दा बंद व्हायची वेळ येते, तर घटकेत असा वारा सुटतो की घरे सुध्दा उडून जातील असे वाटते ! घर पडेल म्हणून बाहेर यायचे म्हटले तर लागलीच सर्दी व्हावयाची! काय करावे काय या वाऱ्याला ?
यशोदा असे वाऱ्याशी भाडून काय होणार? हे सारे बाहेरचेच आहे आणि त्यानेच इकडे असे वाटते!
यशोदा: नाही म्हणून कसे चालेल? परवा का कालच वाटते, कोपऱ्यात तेलाचा डबा होता आणि सकाळी बघते तो डबा आपला अंगणात
अण्णा: अगे उडाला असेल या वाऱ्याने!
यशोदा: तसेच, परवा पहाटे पहाटेस गोठयात सारखी खडबड आणि सकाळी कपिलेने दुधाचा एक थेंब दिला असेल तर शपथ!
अण्णा: वाऱ्याने वासराचे दावे तुटले असेल, नाही तर या उन्हाने गाय आटली असेल झाले!
यशोदा: काही नाही, वेणूला पाहिले तर काल आपली एकदम उचकीच लागली; घटका झाली. दोन घटका झाल्या, उचकी आपली तशीच ! नाना उपाय केले; पण ज्याचे नाव ते अंबाबाईच्या नावाने अंगारा लावला; म्हटले चुकले, काही चूक झाली असेल तर आईने पदरात घ्यावी झाले घटकेत उचकी बंद !
अण्णा: बाकी ती आताशा फारच झुरणीस लागल्यासारखी दिसते..
यशोदा: पहावत नाही पोरीकडे ! कसली गेंदासारखी पोर, पण फाटयासारखी झाली आहे बघता बघता ! खाणे नाही, पिणे नाही ! इकडे पोरीची ही दशा आणि तिकडे लोकाची घालूनपाडून बोलणी ! नकोसा झाला आहे जीव! कुणी म्हणतात पोरीन लग्नाची
तर कुणी म्हणते तिचे मीठ तोडले आहे!
अण्णा: धास्ती कसली आणि मीठ कसले ? तिला मुळी पहिल्यापासूनच क्षयाची भावना आहे!
यशोदा: आता बोलले तर येईल राग? क्षय नाही, खोकला नाही हा सारा बाहेरवा आहे! म्हणून हे सारे खेळ होताहेत.
अण्णा: पण बाहेरखा व्हायला आम्ही काय कुणाचे खाल्ले आहे ?
यशोदा: आज सकाळीच मी पिल भटाचा देव खेळविला, देवाने स्पष्ट सांगितले, की करजगावच्या विहिरीवर तुझी मूल तिन्हीसांजची न्हाऊ नमाखून, डोकीत गजरा घालून गेली होती तिथे तिला बाहेरचा पायरव झाला तसा मागे मी एकदा अंबाबाईला गोंधळ बोलले होते तो काही अजून घातला नाही त्याची ही सारी घरात नड आहे!
अण्णा: तुला नाही उद्योग आणि त्या पिलभटालाही नाही उद्योग ! घाला गोंधळ झाले; पण घरात कुणाचे औषध मात्र बंद करू नका !
(मधुकर व पिलंभट येतात.)
मधु: अण्णा, देऊन आलो वसंतरावांची पत्रिका आजोबाजवळ !
पिलंभट: हे पनवेलकरांचे क्षीणामृत वेणूताईसाठी! या माधवरावाच्या कफपित्तवातनाशक गोळया दिल्या आहेत भाऊ शास्त्री घाटयांनी ! आणि ही तुमच्या काढयांची औषधे ! पिंपळी, हिरडा, बेहडा, कोष्टिकोलिंजन, घमासा, पित्तपापडा, वावडिंग, डिकेमाली...
अण्णा: भले शाबास! पण, पिलंभट, जीर्णज्वर काही हटत नाही अजून पाहा, बरे, आहे का आता ताप !
पिलंभट: (नाडी पाहून) ओ, हो, हो, पुष्कळ ताप आहे अंगात काढा बदलला पाहिजे असे वाटते!
यशोदा: (अण्णांच्या अंगाला हात लावून कुठे आहे कुठे ताप उगीच पराचा कावळा करायचा झाले.
अण्णा: अगं, नाही कसा ताप ? कालपासून अंगात कणकण आहे नी म्हणे ताप नाही काल रात्री आचवायला बागेत गेलो आणि जरा बोलत उभा राहिलो जरासा उघडया अगाने वाऱ्यात; तेव्हा मन कचरले! आणि म्हणे ताप नाही !
यशोदा: मग हाताला लागत नाही कुठे माझ्या ?
पिलं : बाईसाहेब, हाडीज्वर हाताला कसा लागणार ? बोलून चालून चोरटे दुखणे हे त्यांतला दरदी असेल त्यालाच कळायचे !
अण्णा: (कण्हत ) अहाहा, काय पाठीत कळ आली पाहा.
पिलं: ही झुळूक आली ही, वाऱ्याची तिने!
मधु: बरे अण्णा, पत्रिकेचे तसेच राहिले वसंतरावांची-
अण्णा : वसंतराव, वसंतराव, माळ का करून घालायची आहे वसंतरावाची ! छप्पन्न वेळा सांगितले आणि आता पुन्हा सागतो एकदा, की तो सोन्याने भरला असला तरी मला त्याला मुलगी द्यायची नाही!
यशोदा: पण उगीच का जिवाचे पाणी करून घ्यायचे ते! तिने ज्याचे तीळतांदूळ खाल्ले असतील तो येऊ न आपण
तिला आपण कशाला उगीच संताप करून घ्यायचा ?
होऊ न घेऊन जाईल
अण्णा: तसे नव्हे; मी एकदा सांगितले की मी वेणू बाळाभाऊ ला देणार, त्याच्या वडिलांना माझे वचन गेले आहे ते काही मी मोडणार नाही आणि बाळाभाऊ ने आपण होऊ न नको म्हटले तर दुसऱ्या एखाद्या वैद्याच्या घरी देईन! पोरीला क्षय आहे, तिला वैद्याच्याच घरी दिली पाहिजे.
यशोदा: बाळाभाऊ चे ठिकाण काही वाईट नाही: आज इतके दिवसाचा नाद आहे आणि मुलगाही माहितीचा ! बसक्या बांध्याचा आणि पोरीची जात पडली उफाडयाची म्हणून वरणभात व्हायची भीती आहे थोडीशी, पण तेवढ्यावर काही हातचे स्थळ घालवायला नको!आता अमळ मुलगा आहे.
मधु: पण जे करायचे ते जरा विचाराने केले तर बरे नाही का ?
यशोदा: अरे सारे खरे; पोरीला सुख लागले पाहिजे; मुलगा हाताचा घड पाहिजे,-
पिलं: नाही तर आपली हातातोंडाशी गाठ..
यशोदा: हो; सगळे खरे; पण करायचे कसे पोरीचे बाशिंगबळ असे की आजवर लग्नाचे नाव सुध्दा निघायची पंचाईत. आता कुठे
हातातोडास गाठ पड़ते तोच ही कुसपटे कशाला हवीत ? कुठून तरी पोरीला हळद लागली म्हणजे मिळविली असे झाले आहे. थोरापोरी बोलबोलून नकोसे केले आहे मला.
मधु: पण, आई, लोकांसाठी का लग्न करायचे आहे ? उगीच एखाद्या उडाणटप्पूला घरला आणि दिली पदराला गाठ तर तिकडून पुन्हा लोक नावे ठेवनारच.
अण्णा : आताच्या लोकाना भारी समजायला लागले. आम्ही याच्या वयाचे होतो पिलंभट, पण वडिलांचे समोर बोलण्याची प्राज्ञा नव्हती कधी काही मागणे सवरणे झाले तर ते सुध्दा चिठ्ठीने तोंडातून म्हणून व निघायचा नाव कशाला पाहिजे!
पिलं: हल्ली सुध्दा आम्ही पाहात नाही का प्रत्यक्ष तात्यासाहेबांच्या तोंडी लागताना आपण अण्णासाहेबांना अजून तर काही पाहिले नाही. अगदी सांभाच्या पिंडीवर हात मारून सांगावे कुणी यातले एक अक्षर खोटे असेल तर !
अण्णा: तात्यांची मर्जी निराळी दिसली अमळ की आमचे आपले माघार घ्यायचे ठरलेले; पण आमचे चिरजीव पाहा.
मधु: अण्णा, तुम्हाला येती राग, पण काही वेळाच अशा असतात.
यशोदा: ऐकरे, मधु, भारी तोंड तुला, आपला साधारण कल पाहिला; सोडून दिली गोष्ट, सर घोडया पाणी खोल, उगीच तोड करायचे कारण काय ?
मधु: आई, आता तोंड न केले तर उद्या लोक तोंड काढू देणार नाहीत कुठे तुला सांगितले ना नाटकमंडळीत काय चालले होते ते, अशा वेडयापिराच्या गळ्यात पोर बाचली तर लोक काय म्हणतील ?
अण्णा: अरे, नाटकमंडळीत गेले आले एखादे वेळी म्हणून काय होते त्याने ? पोरपण आहे, होतोच असा हडपणा थोडा माणसाच्या हातून ! आम्ही लहान होतो तेव्हा किर्लोस्करांचे नाटक नवीनच निघाले होते आम्ही खुशाल जात येत होतो. अण्णा मोठा योग्य पुरुष ! लाख मनुष्य ! शरीराने असा सुदृढ असे की हा एक दंड कधी ताप नाही, खोकला नाही; काही नाही...
पिल: व अण्णाची गोष्ट कशाला हजारी माणसाचा पोशिंदा तो! अत्तराचे दिवे जाळलेत त्याने भटाभिक्षुकाला मुठीने पैसे द्यावे त्याने. आल्यागेल्याला, गोब्राह्मणाला खेळ पहायची सदर परवानगी! आताचे नाटकवाले कसले भुकेबंगाल ! कुणाला फुकट सोडतील का नाटकाला ? नाव कशाला ? अण्णाची गोष्ट कशाला ?
अण्णा: त्यांचा आमचा माठो घरोबा पण म्हणून माणसातून का उठून गेलो होतो ? त्यातलेच बाळाभाऊ थे काम आस्ते आस्ते संसाराचे ओझे पडू लागले की तितके राहात नाही ते वारे बरे, हा वसंतराव तरी काय असा लागून गेला आहे मोठा ? त्याचे तरी काय हात लागले आहेत आकाशाला ?
मधु: काय वाईट आहे वसंतराव? आपल्या दादासारखी त्याची सुध्दा वकिलीची परीक्षा झाली आहे !
यशोदा: मग यांनी काय दिवे लावले एवढे शिकून, तर त्याने लावायचे राहिले आहेत ? शिवाय आमच्या मुलीला माहेरकरांचे वळणच निराळे देव नाही, धर्म नाही; शिवण नाही टिपण नाही ! त्या मुलाचे गुण तर काही विचारूच नका तुम्ही पाहिलेच असतील आपल्या मधूच्या लग्नात, पिलंभट !
पिलं: हो, न पाहायला डोळ्यावर भात का बांधला होता माझ्या ? बाई. शिकलेले लोक ना हे !
यशोदा: अहो, शिकलेले झाले म्हणून काय झाले आमची मुले नाहीत का शिकलेली? पण शिकण्याशिकण्याच्या परी आहेत ना ?
पिल: आमच्या मुलांची गोष्ट कशाला पाहिजे ? मधु माधवाच्या एवढाल्या परीक्षा झाल्या पण कधी बुवा पायरीला पाय लावतील ? जीभ कापून देईन मी आपली हवी तर! लौकिक केवढा, अगत्य काय माणसाचे! केव्हाही पानतंबाखूला चार सहा आणे मागा नाही म्हणून नाहीच निघायचे एकाच्या तोंडातून! तेच याच्या जवळ कधी मागितले-मागतो कोण आधी आपण तर त्याने एकदा नाही म्हटल्यापासूनच कानाला खडा लावला आहे पण एकदा म्हटले सकल्प सांगतो, उदक सोडा म्हणे आम्हाला सकल्प नको; म्हटले तशीच दक्षणा द्या. धर्माला पाठ देऊ नये अशी म्हणे, धर्म आंधळया गळयांना करावा. तात्पर्य काय, अखेर दक्षणा दिली नाही, साफ नाही म्हटले!
यशोदा : ते असो; पण मधूच्या लग्नात वसंतराव करीत होता विडे आणि चुना होता थोडासा कोरडा. या मुलाने पाणी घेतले हाती तेव्हा म्हटले मामाच्या भाच्याने चुन्यात पाणी घालू नये तर म्हणतो त्याचे काय व्हायचे आहे ? खुशाल त्याने पाणी टाकले चुन्यात झाले, म्हटले
तर, शनवारी आदरून दूध घ्यायचे. भरल्या घरात दिवे लावताना जेवायला बसायचे, असे नाही ते करायचे.
पिलं: तसेच वरातीच्या वेळी माझा देव खेळविला ना तुम्ही आणि देवान मधुकरावरून उतरलेला नारळ, याने घेतला तो हाती म्हटले हा उतरलेला नारळ हाती घेऊ नये, द्या इकडे मी करतो त्याची व्यवस्था. त्याने तिथल्या तिथे फोडला नारळ आणि हसत हसत खाऊ न टाकला.
यशोदा: छेगं बाई मी नाही द्यायची माझ्या पोरीला असल्या मुलाला ! साराच मेला भ्रष्टाकार!!
अण्णा: आणि शरीराने तरी काय आहे ? बरगडीन् बरगडी मोजून घ्यावी मुलाची! मला वाटते त्याला क्षयाची बाधा असावी !
पिल: हो, हो, आहेच ना कालच मी त्याला खोकताना पाहिला. खोकला म्हणजे क्षयाचे मूळ आहे. येरव्ही यायचाच नाही. (अण्णासाहेब खोकतात.) नाही तर हे खणखणीत खोकणे पाहा, खोकण्याखोकण्याच्या तरी परी आहेत. त्या पोराचे शरीर काय आणि खोकणे काय ?
अण्णा: छे, हो, अगदीच पाप्याचे पितर पोरीला काय डोळे झाकून विहिरीत का लोटावयाची आहे ?
मधु: (स्वगत) बिचाऱ्या वसंतरावाचे ग्रह काही ठीक दिसत नाहीत! (पाहून झाले, हे तात्या आलेच! यांचे काही निराळेच असेल
आणखी.(तात्यासाहेब व माधव पत्रिकाची भेडोळी घेऊन येतात)
माधव: है ही घ्या पत्रिकाची बिंडाळी सारी (खाली टाकतो.)
तात्या: अरे अरे, माधव, पत्रिका ना त्या वेडया अशा टाकू नयेत त्या !!
पिलं: हो, जन्मजन्माचा संबंध त्यात एखाद्या पत्रिकेतला एखादा ग्रह या घरातला या घरात लवंडला तर फट् म्हणता ब्रह्महत्या व्हायची.
तात्या: व पिलंभट, वसंतरावाची पत्रिका घेऊन मी तुमची वाट पाहात बसलो म्हटले आता याल, मग बाल अखेर कंटाळून मीच आलो माधवाबरोबर पत्रिका घेऊ न इकडे.
पिल: मी गेली अण्णासाहेबांची औषधे आणायला त्यांचा जीर्णज्वर आज जरा बळावला आहे!
तात्या: आता काय सांगावे या लोकांना ? अरे, औषधे घेऊन काय होणार कपाळ? जीर्णज्वर नाही आणि विषमज्वर नाही: ही सारी ग्रहांची पीडा आहे! यदा आण्णाला मुळी शनीची महादशा आहे!
पिलं: हो, हो, तरीच शरीर काळे ठिक्कर पडत चालले आहे शनीखेरीज काळसरपणा नाही जपजाप्य करायला हवे उद्यापासून.
मधु: बरे, तात्या, त्या टिपणाचे काय झाले ?
तात्या: आज इतके दिवस घालविले तेव्हा अखेर दोन टिपणे वेणूच्या टिपणाशी जमतातशी आढळली अगदी झाडून जुन्यापान्या साऱ्या कुंडल्या पालथ्या घालल्या ही विक्रमाची ही काशीकर गागाभट्टाची ही थोडीबहुत जमते. पण त्याला मरून झाली अडीचशे वर्षे आता ही हिंदुस्थान देशाची आणि ही बाळाभाऊ ची कुंडली या दोन्ही मात्र जमतात.
पिलं: तेव्हा त्यात बाळाभाऊ च बरे हो, हिंदुस्थान देशाशी तर लग्न नाही लावता येत.
मधु : पण ती वसंतरावाची नाही जमत कुडली ?
तात्या: मुळीच नाही. ती तर अगदीच जमत नाही. फारच भयंकर योगायोग
मधु: साधारण जमत असेल तर पाहा अगदीच फार बारकाईने
तात्या: छतु वेडया नावसुध्दा काढू नकोस त्या मुलाचे! त्याच्या लग्नी राहू, के द्रात मंगळ, त्रिकात शनि असे सारे ग्रह अनिष्ट पडले आहेत. काय सांगू तुला, अरे, त्याच्या गळ्यात लग्नाची माळ पडल्याबरोबर त्याला मृत्यू येणार. अगदी मृत्यू ठेवलेला,
पिलं: मी म्हणतो निदान अपमृत्यू अपमृत्यूला तर मरण नाही ना ?
अण्णा: आणि ही पाण्याची पितरे अपमृत्यूने सुध्दा मरायची !
पिलं: तर काय? यांना मरायला मृत्यूच कशाला हवा! खरे की नाही माधवराव ? माधवराव कशाचा मृत्यू आणि कशाचा जन्म हे सारे या स्थूल देहाचे विकार आहेत. अतवत इमे देहा
नित्यस्येक्ताः शरीरिणः । आत्म्याला या उपाधी मुळीच नाहीत. आत्मा अविनाशी, अविकारी अनंत असा आहे त्याला नाश नाही, नैन छिदति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैन क्लेदयत्यापे न शोषयति मारुतः ॥ पंचवीस तत्त्वांचा मेळ म्हणजे देह. मात्र, वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृहाति नरोऽपराणि ॥ तशातला आत्मसंक्रमणाचा प्रकार मायाभ्रमाने मूढ जीव त्याला मरण म्हणतात. बाकी खरे पाहता, आत्मा अमर आहे "नाय इति न हन्यते !"
यशोदा: माधव हे रे काय बडबडणे? एक ुलत्या एक बहिणीच्या लग्नाचे घाटते आहे आणि-
माधव: बहीण, भाऊ आहे, बाप सर्व भ्रम आहे हा. का तब कांता कस्ते पुत्रः संसारोयमतीव विचित्रः कस्य त्वं त्वा कुत आयातः| मी.
कोण याचा विचार केला पाहिजे! संसार मृगजलवत आहे. गेल्या जन्मीची बहीणभावडे कुठे गेली, पुढच्या जन्मीची आता कुठे आहेत; हा सारा मायेचा खेळ आहे. "अहं ब्रह्मास्मि" मी ब्रह्म तू ब्रह्म, तात्या ब्रह्म, आण्णा ब्रह्म-
पिल: मीही ब्रह्म आहे; पत्रिका ब्रह्म आहेत; पैसा ब्रह्म आहे.
माधव: एक सद्विप्रा तदहुधा वदन्ति ते शोधून काढले पाहिजे! ब्रह्म हविर्ब्रह्म भोक्ता ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम् !
मधु: दादा, जरा थांब मुख्य कामाचा ब्रह्मघोटाळा होतो आहे सारा तात्या, पत्रिकेवर इतका भरवसा ठेवून कसे चालेल ? वेळ थोडी चुकली तर लागलीच जमीनअस्मानाचे अंतर पडते भविष्यात.
पिलं: हो, सरासरी आणि शतमान
मधु: म्हणून म्हणतो की पत्रिकेकडे थोडे दुर्लक्ष केले तर नाही का चालणार? मुलगा चांगला आहे.
तात्या: भलतेच काही तरी मुलगा चांगला आहे; पण लाभला पाहिजे ना? विषाची परीक्षा पहायची की काय? खुळा नाही तर आजन्म मुका राहीन माझे बोलणे खोटे झाले तर
पिलं: भलतेच होण्यमाण कुठे चुकते काय ?
यशोदा: शिवाय परतवेल होईलते निराळेच.
मधु: मग काय हा नाद सोडून द्यायचा? दैव पोरीचे दुसरे काय ?
अण्णा: चला मधु, जा आणि बाळाभाऊ ला आताच घेऊ न ये.
मधु: जातो. काय करायचे ? मर्जी प्रभूची !
माधव: मधु वेढया, असा हताश काय होतोस? काय करायचे ते केले पाहिजे! परिणाम काही का होईना ?
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ॥ मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सगोऽस्त्वकर्मणि ॥
(पडदा पडतो.)