shabd-logo

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023

36 पाहिले 36

प्रवेश पहिला

( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)

बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भावांचे किंवा बापाचे साह्य किंवा समति मिळाली आहे का ? असे साह्य मिळते तर कित्येक कादंबऱ्यांचा पहिल्या प्रकरणातच शेवट झाला असता आणि बहुतेक नाटके नाटकातल्या पाच अंकांऐवजी उजळणीतल्या पाच अंकांतच आटोपली असती! प्रेमाची खरी लज्जत चोरटेपणातच आहे; पण या अरसिकांना त्याची काय किंमत ? तिच्या नाही, माझ्या प्रियेच्या बापाची, भावाची निदान आईची जरी आमच्या विवाहाला आडकाठी असती तर आमच्या या प्रीतिविवाहाला नाटकाचे किती सुरेख स्वरूप आले असते. तरी माझ्याकडून मी किती सावधगिरी ठेविली आहे. मोहनतारेतल्या मोहनाप्रमाणे, प्रियेची बागेत चोरून भेट घेण्यासाठी या भिंताडावरून उडी मारून मी आत आलो. किती त्रास पडला मला. माझा ढोपर फुटून पाय अगदी जायबंदी झाला. मोहनचा काही ढोपर फुटला नाही. नाटकातले नायक भाग्यवान् खरे! उडया मारताना त्यांचे ढोपर फुटत नाहीत. कित्येक जखमा लागल्या तरी त्यांना दुःख होत नाही जेवणाखाण्याची त्यांना ददात नाही नाही तर हल्लीचे नीरस जीवित ! ढोपरं फुटतात पण नाही, असे भिऊ न उपयोग नाही प्रेमात संकटे तर यायचीच. (पाहून) अरे, पण माझ्या येण्याचे सार्थक झालेसे वाटते. कारण-

ही सुरसुंदरी जणुं खाली उतरोनी भूवरि आली ॥ ती ही गगनिची रंभा उर्वशिकीं।

पण, ही सुंदरी केर टाकण्याकरिता येत आहे, त्या अर्थी ही ती नसावी कुठल्याही नाटकात, काव्यात, कादंबरीत, नायिका केर वगैरे टाकिताना दृष्टीस पडली नाही, ही तिची एखादी मोलकरीण चुकलो, मोलकरणींना काव्यात जागाच नाही तिची एखादी दासी किंवा निदान - सखी असावी ! (निरखून पाहून) पण, छे, माझी शंका निराधार आहे हीच ती माझी प्रिया, कारण-

सुवर्ण केतकी परि जो दिसतो वर्ण नव्हे तो दुसरीचा ॥ सडपातळ हा नाजुक बांधा खचित त्याच मृदुदेहाचा || वगैरे

अरेरे, कोण भयंकर हाल है! कोणत्याही सुंदर स्त्रीवर असा दुर्धर प्रसंग आला नसेल. ही सुंदरी केर टाकणार! परमेश्वरा, हे पाहण्यापेक्षा मी अंध का नाही झालो? हे काय पहायाचे नशिबी आले! प्रभू विचित्र किती तव चरित्र तर्क न कोणाचा चाले || कोमल शकुंतलेला झाडांना पाणी घालायला लावणाऱ्या त्या थेरड्या कण्वापेक्षा हिचा थेरडा फारच अविचारी असला पाहिजे. करू का सूड घ्यायची प्रतिज्ञा ? लाडके, सुकुमार वेणू, टाक, टाक तो केर खाली; पण हे काय? या केराकडेच माझी नजर इतकी का बरे लागत आहे? हं. मोहनतारेत तारेच्या हातांतल्या घागरीप्रमाणे आपणही फुंकलो गेलो असतो तर फार बरे झाले असते असे मोहनला वाटले तसेच मलाही वाटत असले पाहिजे. अहाहा, मी जर असा केर होऊन झाडलो गेलो असतो तर आणखी काय पाहिजे होते? वा केरा, धन्य आहेस तू. हा केर ज्या उकिरडयावर पडेल तो उकिरडा धन्य, त्याच्यावर लोळणारा गाढव सुध्दा धन्य धन्या त्रिवार धन्य त्या केरांतला कागदाचा फाटका तुकडा मला प्रणयपत्रिकेसारखा वाटतो; त्यातली धूळ हीच अंगारा (तिच्याकडे पाहात राहतो.)

वेणू: (स्वगत) जरा कुणाचे पाऊल वाजले की कोणी मला पहायला येत आहे असे मला वाटते. वहिनीने मला इतका चीर दिला खरा, पण तिचे बापडीचे तरी काय चालणार? असो, नशीब आपले, जे व्हायचे असेल ते होईल. आता देवासाठी चार कळया तरी काढून ठेवाव्या. (राग -पिलु ताल-त्रिवट) कलिका करिती केलि का गणिति न नाशास का ? ॥धृ.॥ आत्मार्पण करुनी ईशा मजही सूचवीति का ? ॥1॥ (फुले काढू लागते)

बाळा : (स्वगत) आता पुढे कसे व्हावे ? अशात हिच्यावर एखादे संकट येईल तर काय बहार होणार आहे; पण संकट तरी कोणते येणार ? भद्राप्रमाणे घटोत्कचासारखे राक्षस या कलियुगात नसल्यामुळे तशी संकटे येण्याचे मार्गच बंद झाले आहेत. निदान वीरतनयातल्या शालिनीप्रमाणे एखादा वाघ येईल म्हणावे तर त्याचाही काही संभव नाही. या घराजवळच्या बागांतून अरण्यातल्या सिहवाघांबद्दलची भूक कुत्र्यामांजरांवरच भागविली पाहिजे. हा निदान शाकुंतलासारखा एखादा भ्रमर मात्र या बागेत असेल कुठे तरी पण त्याला या आताच्या पोरी भितात तरी कुठे? त्याच्या गुजारवाने आताशा कोणी गुंगतही नाही. प्रेमाच्या बाजारातल्या सान्याच पदार्थांचा भाव उतरल्यासारखा दिसतो. प्रणयीजनांच्या या गैरसोई परमेश्वर कधी दूर करील तो सुदिन (पाहून) आहा ती एक माशी तिच्या तोंडापुढे येत आहे. माशी का असेना ? बुडत्याला काडीचा आधार व्हावेच आता पुढे (पुढे होऊ न माशी हाकलतो. वेणू दचकते.) सुदरी, भिऊ नकोस. काय ही तुझी स्थिती? सुंदरी,घेउनि पंकजपत्राचा पंखा घालू का शीत वारा ॥ वगैरे

वेणू: आहे काय हा गोंधळ ? आणि तुम्ही इथे आला कसे ?

बाळा: कसा आलो हे भगवान् कामदेवाला ठाऊक!

वेणू: म्हणजे ?

बाळा: त्या पडक्या भिंताडावरून येताना माझ्यावर काय काय सकटे आली याची तुला कल्पनाही नसेल. काय सांगू सुंदरी, माझा सदरा फाटला, धोतराला आछूट भरला, हा पाहा माझा ढोपरही फुटला आहे; पण त्याचे काय आहे. प्रणयीजनांनी संकटे ही सोसलीच पाहिजेत !

वेणू: इतके सायास घ्यायचे कारण ?

बाळा: कारण ? कारण तूच तुझ्याखेरीज दुसरे कोण ?

वेणू: काय मी ? मी काय केले यात ?

बाळा: काय केलेस? तूच पहा बरे, सुंदरी !

हैं काय बरें त्वां केलें ॥ 
मृणालसममुक्तालतिकेतें । 
दावुनि जैसे हस वरातें ।
 तैसें मम मानसजन्म्यातें ॥
  बहु दूर विलोभुनि नेलें ॥

वेणू: मोठाच चमत्कार म्हणायचा! बरं, तुम्हाला यायचेच होते तर इतर रस्ते का थोडे पडले होते ? घरात यायचे होते नीट !

बाळा: घरात! छे प्रणयीजनांची पहिली भेट अरण्यात निदान एखाद्या बागेत तरी पडावी असा सिद्धांतच आहे ! अर्जुन सुभद्रेला भेटला तो अरण्यात मोहनाने तारेला पाहिले तेही बागेत दुष्यंत शकुंतलेची भेट पहा, अरण्यातच कामसेन रसिकेला भेटला बागेतच एवढी जहाबाज त्राटिका; पण प्रतापरावाला बागेतच भेटली फार कशाला, मतिविकार अगदी आजकालचे नाटक ना ? त्यात सुध्दा चकोर चंद्रिकेची भेट तुळशीवृंदावनात होते!

वेणू: अस्से; पण अशा रीतीने येताना तुम्ही सारासार विचार पहायाचा होता थोडा ? लोक काय म्हणतील तुम्हाला-

बाळा: सुंदरी, प्रेमवेडयाला लोकांची भीती कधी असते का? सारासार विचार पहावयाला किंवा लोकांची बोलणी ऐकायला मला अवकाश नाही कारण प्रणय तरंगांसचें विवश वाहतो जवें । जलखें पाहवे गतिमुळें न ऐकवे | योगबले जणुं यति । ब्राह्मउपाधींप्रती । प्रणयीजन निवारती खेद मुळि न त्यां शिवे ॥1॥

वेणू: इतके प्रेम आहे तुमचे माझ्यावर? मला नव्हते हे माहीत!

बाळा: इतकेच काय ! यापेक्षाही जास्त वेणू सुंदरी-तुजविण वृथा गमे संसार संसार सौख्य कुठचें ॥ थवनि ॥


वेणू: बरे, पण इतके दिवस हा तुमच्या प्रेमाचा उमाळा असाच राहिला आणि आजच त्याला असा पूर कशाने आला ?

बाळा: इतके दिवसाची गोष्ट निराळी! आता तरुणपणाची गोष्ट निराळी बाळपणीचा काळ निघून गेला तो! त्या वेळी "जे ब्रह्म काय ते मायबाप ही जोडी ॥ खेळात काय गोडी ॥" पण आता ते खेळ नकोत, त्या आट्यापाट्या नकोत, ते बैदूल नकोत, ती लगडी घालणे नको असे झाले आहे! आणि ते का म्हणशील तर-आलि कालिं या मज तरुण दशा | निःशंकपणे रमणे गेले प्रणयकेलि मज सुचती ऐशा ॥

धात्रीपूर्वी निधि वाटे तो सांप्रत गणती तरुणी प्रियशा

वेणू : बरीच मनोरंजक आहे तुमची कहाणी! बरे झाले ना तुमचे पहाणे ? जाते मी आता.

बाळा : (तिला अडवून) वा हे काय ? चाललीस कुठे अशी तू ? मी तुला जाऊ देणार नाही, नुसता तुला पहावयास मी आलो हा तुझा संशय खोटा आहे. सुंदरी, भूमिजल तेज नम! पाणि तुझा सखे ॥ (तिचा हात धरतो, ती रागाने दूर जाऊ न उभी राहते. )

वेणू : है खबरदार! अंगाला हात लावाल तर !

बाळा : (स्वगत, विस्मयाने) मला वाटले होते की माझे श्रम जाणून ही आता मला आलिंगन देऊन सुभद्रेप्रमाणे ॥ बहुत छळियले ॥ पद म्हणणार! पण ही तर संतापून दूर उभी राहिली नाटकातल्या मुख्य खुब्या हिला ठाऊक नाहीत असे दिसते! आमच्याकडे स्त्रीशिक्षण नाही त्याचे हे दुष्परिणाम ! आता हिचे समाधान केले पाहिजे. (प्रकट) सुंदरी, अशी रागावू नकोस अशा वेळी रागावणे म्हणजे अगदी जरसिकपणा आहे! एकसुध्दा नाटक पाहिले नाहीस वाटते तू? तरीच म्हणून म्हणतो नच सुंदरी करू कोपा । मजवरि करी अनुकंपा || (वगैरे) काय, अजून तुला माझी दया येत नाही ? -

वेणू : (स्वगत) काय म्हणावे आता या मूर्खपणाला ? (प्रकट) तुमच्याकडे पाहील त्याला तुमची दया येणारच म्हणा-

बाळा: (आनंदाने) झाले तर मग कर टाकि सखे ग या कठी | फिरविन हनुवटी शिणविन तनुकटी | (वगैरे)

वेणू : (स्वगत) या स्वारीला बेतानेच जायला लाविले पाहिजे. (प्रकट) हे पाहा, तुमच्या आवडत्या नाटकातलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारते! आताच तुम्ही म्हटले ना की मी एकही नाटक पाहिले नाही म्हणून ते पुष्कळसे खरे आहे आणि तुम्ही तर असे रसिक! मग तुमची

शारदा : म्हणते त्याप्रमाणे रेशमाच्या शेल्याला सुताच्या दशीप्रमाणे मी तुम्हाला शोभले तर पाहिजे ना ? तेव्हा हा नाद तुम्ही सोडून! तुमच्यासारखी एखादी रसिक मुलगी पाहून तिच्याशी लग्न करा !

बाळा: ठीक विचारलेस ! असेच शालिनीने शूरसेनाला विचारिले तेव्हाचे त्याचेच उत्तर तुला देतो! वेडे.

अशि ही सगुणखनि देह त्यजोनी जगि या दिसोनी न येहल कुणी । शरचंद्र अतिनिर्मल जैसा शोभवि तारागार । विमल देही शुध्द आत्मा तेविं करित सुविहार ॥ निरखोनी, विदेही मुनिही मतिहीन होई ॥1॥

असा मूर्ख अंध-वेडा; पुढे शालिनीचे वाक्य आहे! दुसरी रसिक मुलगी आता पाहणे म्हणजे प्रेमाला हरताळ लावण्यासारखेच आहे! पुष्कळदा नायिकेपेक्षा दासीची सोगे सुरेख दिसतात; परंतु कोणत्याही नाटकातला नायक तिकडे दुकून पाहायचा नाही आणि प्रियेचे दोष त्याला गुणासारखेच वाटतात. कारण अनिवार मनुज करि अंतरी ज्या वस्तुवरी प्रीति (वगैरी) म्हणून म्हणतो, लाडके, आता अंत पाहू नकोस ! ये अशी, बैस मजसरशी नाही कुणी दुसरे का शंका धरिशी बिंबाधरे ॥

वेणू : (स्वगत) छे: हे वाढतच चालले! आता आटपते घेतलेच पाहिजे. (प्रकट) मी मघापासून पाहते आहे; लाज नाही वाटत तुम्हाला असे भलभलते बोलायला ! जनलज्जा, जनलज्जा काही वाटू द्या थोडी !

बाळा: सुंदरी का रागावतेस आता उगाच ? रागावण्याचा काळ गेला

जे जे तू बोलसी तें मजला का श्रुत नसे ॥
परि त्याचे काय आता मज भरले स्मरपिसें ॥
म्हणून आता मी तुझे मुळीच ऐकणार नाही माडिवरि चल ग गडे जाऊ ड्राइकरी! नाही तर हा अस्सा मी सोडीत नाही !

वेणू: चला, व्हा दूर। शरम नाही वाटत तुम्हाला एवढे वय वाढले त्याची काहीच का लाज नाही ?

बाळा: आता मलाही राग आवरत नाही! फार वेळ तुझे बोलणे ऐकून घेतले मी तुझ्या बापानेच मला इथे बोलाविले आहे! पाहू बरे आता काय करतेस ती वेणू आजवरि हेका धरूनि अनेका ॥ वगैरे ) तिचे चुंबन घ्यावयास जातो.) 1

वेणू: (घाबरून) धावा हो धावा दादा, अहो अण्णा

बाळा: बोलाव, कोणालाही बोलाव! मी सुध्दा आता कीचकासारखा बेफाम झालो आहे! येऊ देत भीम येऊ देत: अर्जुन येऊ देत!

कोण येतो तो पाहतो मजसि माराया।
प्राण त्याचा प्रथम घेतो कोप शमवाया
युवतिकुकुमतिलक पुसुन पुसुनि नंतर या (तिचे कुकु पुसतो)
शुध्दबीजांकुर नर हा सिध्द झाला या ॥

(एकदम थबकून) अरेरे, काय अविचार करीत होतो मी ? कोणत्याही नायकाने अजून असा अत्याचार केला नाही! प्रणयिनीने धिक्कार केला तर फार झाले तर मूर्च्छित पडायचे! नायिकेला त्रास प्रतिनायकाने द्यायचा! जा वेणू, जा. नाटकाच्या नियमाबरहुकूम मला आता मूर्च्छितच पडले पाहिजे. (ती जाते) हाय ॥ गेली प्रिया गेलि गेली प्रिया गेलि गेली | हर हर शेवटची साकी सुध्दा मला उंच सुरात म्हणवत नाही.

पाषाणापरि मस्तक झाले स्पष्ट दिसे ना काही ।।
भ्रम पडलासे वाटे मतिला अंगही हालत नाही ॥ जिव्हा जड पडली प्रिये ये ॥ ( मूर्च्छित पडतो.) 

(पडदा पडतो)


प्रवेश दसरा

(यमुना, मधु व वसंत)

यमुना: मग काय ? हो म्हणायचे ना ? वसंतदादाचा विचार काही वावगा नाही !

मधु: वावगा नाही खरा; पण जर बाजू अंगावर आली तर मात्र फजीतीला पारावार नाही ! बाळाभाऊ ची नाटकी तन्हाच ही ! चोहीकडे हसे होईल फसगत झाली तर!

वसंत: समजले ! प्रयत्न करून पाहायचा, बोलूनचालून वेडयांचा बाजार हा ! साधले नाटक, नाही तर प्रहसन आहेच पुढे !

मधु: साधला तर ठीक आहे प्रयत्न पण

यमुना: पण नको नी बीण नको ! घरातल्या माणसांनाच काय हसायचे ? इकडे सुध्दा संशयाचे वेडच आहे, नाही तर काय ?

वसंत: पहा, एका कामात दोन कामे होत आहेत जबाबदारी सारी माझ्यावर ! मधु तो नाटकातला तात्या इतके सारे करणार कसा? त्याला असा मुलगा कोण मिळणार?


वसंत: ते तर मी हो हो म्हणता जमवून आणीन पंचाईत आहे जरा या दुसऱ्या कामाची रमाबाई गावी येणार कशा?

यमुना: दादा, त्याची नको तुला काळजी ते माझ्याकडे लागले. जाऊ बाईंना मी सांगेन सारे समजावून आपले कल्याण होते आहे तिथे अडथळा कोण करणार?

मधु: मग काय ? करायचे म्हणता असे ?

वसंत: अगदी काही हरकत नाही, पिलंभटाला पैशाने सहज विकत घेता येईल.

मधु: पण मी त्याला नाही विचारणार. एखादे वेळी तो कबूल न होता, सारे रहस्य उघडकीस आणू लागला तर तोड दाखवायची पंचाईत पडेल मला! तो पुरा आपलासा होईपर्यंत या गोष्टीत माझे अंग आहेसे त्याला कळता कामा नये.
(राग बागेश्री. ताल एकताल)
सहजची तो भेद करील. मार्ग हा बरवा ॥ धृ.॥ अतिलोभी भिक्षुक तो पाडिल फशि मजला ॥1॥

यमुना: मग काय रे दादा, कसे करायचे ? इकडचा स्वभावच असा पडला.

मधु: मी विचारतो त्याला; मग तर झाले ना ? त्याच्याकडे कामे दोन, एक ही घरात उंदीर मेल्याची बातमी पसरवावयाची आणि दुसरे रमाबाईंना घेऊन गुपचिप तुमच्या गावी जायचे. हो. आणखी मी वैरागीवेषाने तुमच्या गावी आलो म्हणजे माधवरावाजवळ,
अण्णासाहेबांजवळ माझी निरनिराळी स्तुती करायची.

मधु: तुमच्या या घरगुती सौभद्रातला गर्गमुनिच म्हणावयाचा! त्या बाळाभाऊ ला हसता हसता तुम्ही सुध्दा त्याच वळणावर जात चालला हळूहळू !

वसंत : खरे म्हणाल तर सौभद्रावरूनच मला ही युक्ती सुचली, त्यातल्या त्यात म्हटले माधवरावही ताळ्यावर आले तर पाहू. रमाबाईची आणि माधवरावांची एकदा गाठ पडली म्हणजे माधवरावांचे वैराग्य खात्रीने लटपटणार

यमुना : खात्रीने बायकांचे बळच असे आहे.
(राग -हमीर ताल एकताल)
अबला आम्ही प्रबला, चकुनि भ्रमुनि अलि येता,
कमलिनि बदचि करि त्याला ॥धृ.॥ प्रेम-पाशबंधन कर गळा पड़ती, सुटका कधी न कुणाला ||1|| पुरुष एकदा का हाती सापडले म्हणजे सुटावयाची आशाच नको.

वसंत: मधुकरांना तर त्याचा अनुभव आहेच म्हणा!

यमुना : आणि तुला कुठे नाहीं ? वन्ससाठीच ना तुझी सारी खटपट ? इकडे सन्यास तर नाही ना घ्यावा लागत माझ्यासाठी ?

मधु : बरे, ठरले ना सारे ?

वसंत : ठरले, पण घरात उंदीर पडल्याबरोबर अण्णासाहेब गावी जायला निघतील ना ?

मधु: अगदी सहकुटुंब सहपरिवारे पहिपाहुण्यासुध्दा घरात पाणीसुध्दा पिऊ देणार नाहीत मग ते कोणाला तडक गावचा रस्ता धरतील.

वसंत : आणि गावी पोहोचताच तुम्ही ते औषध खुबीने त्याच्या पायाला लावायचे म्हणजे आपोआप वळधा येईल.

मधु : काय काय होते बघू या आता ! घोडामैदान जवळच आहे.

वसंत: आपल्याला एखादा चाबकाचा फटका खाण्याची पाळी न येवो म्हणजे झाले. बरे जातो मी आणि करतो सारी व्यवस्था

मधु: ठीक आहे. मला कळवा मात्र ताबडतोब

(जातात.)



प्रवेश तिसरा

(पिलंभट प्रवेश करतो.)

पिलंभट: (स्वगत) एकदा कुठे पार्वती रावणाच्या हवाली केली म्हणून शंकराना लोक भोळा शंकर म्हणतात; पण त्यात काही अर्थ नाही. स्त्रीदानात खरी भोळी दैवते दोन एक विष्णू आणि दुसरे गणपती एकाने लक्ष्मी आणि दुसऱ्याने सरस्वती साऱ्या जगाची मालमत्ता म्हणून मोकळ्या सोडल्या आहेत. चोरापोरांच्या सुध्दा हातात त्या सापडावयाच्या माझीच गोष्ट पाहा ना, आज इतकी वर्षे या इनामदारच्या घरच्या लक्ष्मीशी खुशाल हवी तशी धिंगामस्ती करतो आहे पैसा, पैसा म्हणजे बिशाद काय ? आणखी चार वर्षांत सोन्याची कौले घालीन घरावर. नाही तर आमच्या वडिलांची कारकीर्द घराला सोन्याचांदीचा विटाळ नाही. आम्ही दोन सोन्यासारखी मुले, तो शिंगमोडका सोन्या बैल आणि तो परसदारातला सोनचाफ्याचा खुंट याखेरीज सोने दृष्टीस पडायचे ते दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाचे. याउपर सोन्याचे नाव नाही घरात नाही म्हणायला आमची आजी वारली तेव्हा मात्र कोणी कोणी म्हणाले की, तिचे काय वाईट झाले ? सोने झाले तिचे." मग का ती सोनामुखी फार खात होती म्हणून म्हणाले कुणास ठाऊक. आम्ही लहान गेलो तिसरे दिवशी रक्षा उपसायला पहातो तो भट्टीत हीणकसच फार मूठभर अस्थी मात्र सापडल्या. त्या नेऊ न वाईस पोहोचविण्याच्या भानगडीत, आटलेले सोने सापडण्याऐवजी खर्चाच्या पेवाने चांगली चांदी मात्र आटली! ही बाबांच्या संसाराची कहाणी! तेथे जाता पाहा! ज्योतिष, वैद्यक, देव खेळविणे होय आहे, नाही आहे, निरनिराळ्या मार्गांनी इनामदारांच्या चरातून पैसा येतो आहे ! समुद्राला जसे चहूकडून नद्यांचे ओघ मिळायचे तसा संपत्तीचा ओघ निरनिराळया मार्गांनी आमच्या घराकडे वाहतो आहे. एवढयाने इनामदारांच्या मनमुराद उत्पन्नला तरी काय धक्का बसणार ? काही नाही; दयमे खसखसा भरल्या गाडयाला सुपाचा काय भार? आता या वेणूताईच्या लग्नात बरेच चाचपडायला सापडेलसे वाटते. त्या वसंतरावाचे टिपणामुळे फिसकटले अरे वा! नाव काढल्याबरोबर स्वारी हजर (वसंतराव येतो)
 या वसंतराव !

वसंत: पिलंभटजी, तुमच्याकडेच आलो आहे. थोडे काम आहे माझे.

पिलं: है है ? काम आहे ? मग आंधळ्यापांगळ्यांना बोलवा दानधर्माला आंधळेपांगळे आणि कामाधामाला मात्र पिल भटजी! असे रे का बाबा ? अरे, तुम्हा शिकलेल्या लोकाना लाजा नाहीत लाजा! साहेबलोकाच्या नादाने पूर्व विसरलात! आता काय काम अडले आहे. भटभिक्षुकाशी ? जा, आता जा साहेबांकडे, तेच तुमच्या पाचवीला पुजलेले.

वसंत: केले आहे काय असे त्या साहेबांनी तुमचे ?

पिलं: काय केले आहे? अरे पोथ्या नेल्या, पुस्तके नेली. तुमच्या शेंडया नेल्या. आणखी काय करायचे राहिले आहे त्यांनी ? नाही म्हणायला तेवढा जानव्यांचा कारखाना काही काढला नाही अजून आताशा तर म्हणतात, पापडलोणची सुध्दा येतात विलायतेची डब्यांतून! तेव्हा आता कुठे तुमचे डोळे उघडताहेत! आता भटजीची आठवण होते म्हणे भटजी, माझे थोडेसे काम आहे ! लाज नाही वाटत तुम्हा लोकांना बेशरम कुठले तुम्हा शिकलेल्या लोकांना पाहिले म्हणजे असे वाटते की एक कोरडा घेऊन मारावा फडफड (वसत काही रुपये देऊ लागतो.) तुमच्याबद्दल नाही म्हणत मी. या हुच्च शिकलेल्या लोकाची एक गोष्ट सांगितली! सारेच तसे नसतात! तुम्ही झाला, आमचा मधु झाला, तुमची गोष्ट निराळी तुमच्यासारखे धर्माचे आधार नसते तर ब्राम्हणत्व कधीच गेले असते रसातळाला (पैसे घेतो.)

वसंत: हा आपला नुसता विसार दिला तुम्हाला देणगी अजून पुढेच आहे! आता होईल ना माझे काम ?

पिलं: हे काय विचारणे ? झालेच पाहिजे काम नाही तर तुम्ही यजमान कशाचे आणि आम्ही आश्रित कशाचे? आपल्या जिवावर आमच्या साया उडया. गरिबांचे वाली आपण; आंधळ्या-पांगळ्यांनाही पै-पैसा दिला पाहिजे. आमच्यासारख्याचाही हात भिजला पाहिजे. काम काय ते सांगा म्हणजे झाले. केलेच म्हणून समजा.

वसंत: सांगतो. पण अगोदर यातले एक अक्षर कोठे बोलणार नाही अशी शपथ घ्या पाहू!

पिलं: घेती शपथ-पण-पण-

वसंत: का घुटमळता का असे ? काम वाईंटपैकी असेल असे वाटले की काय ?

पिलं: भलतेच वाईट काम आणि आपल्या हातून, असे कुठे झाले आहे ? तुम्हा शिकलेल्या लोकाच्या हातून वाईट कामे होणे नाहीत. साहेबलोकांच्या विद्येचा हा तर मोठा गुण साहेबलोकासारखे लोक मिळायचे नाहीत कुठे!

वसंत: मग काय अडचण आहे आता?

पिलं: अडचण एवढीच बाकी अडचण कसली ती म्हणा? आपण तेव्हाच तिचा निकाल कराल इतकेच म्हणत होतो जाता ही जी कृपादृष्टी केली आणि पुढच्या देणगीबद्दल जो काही मनात संकल्प केला असेल, हो, आपण कुठले रहायला ? आणि तो संकल्पसुध्दा अव्वाच्या सव्वा असायचा है, तर हे सारे काम करण्याबद्दल झाले! आता ते पुन्हा गुप्त ठेवण्याची जबाबदारी, भिक्षुकाची जीभ अमळ लवचीकच! काम करणे आमच्या मते सोपे पण ते गुप्त ठेवणे मोठे कठीण! तेव्हा म्हटले या दुसऱ्या अवघड कामगिरीबद्दल?

वसंत : ह समजलो ! तुमचे तोड बंद कराण्यासाठी पिशवीचे तोड मोकळे करावे लागणार. (पैसे देत) बरे हे घ्या ! आता झाले ना !

पिलं: आता ही यज्ञोपवीताचीच शपथ या कानाचा शब्द या कानालासुध्दा कळणार नाही. कुणी माझी जीभ तोडली तरी शब्द नाही निघायचा एक सांगा खुशाल आपले काम !

वसंत: करा कान इकडे, आजच्या आज घरात एक मेलेला उंदीर टाकून त्याबद्दल अभ्रा करायचा आणखी दुसरे एक दोन दिवसात रमाबाईंना घेऊन करंजगावी जायचे, त्यांना अगदी गुप्तपणे तुमच्याच इथे ठेवावयाच्या (भट तोंड वाईट करतो.) खर्चाचा योग्य बंदोबस्त आम्ही करू (सुप्रसन्न होतो) पुढे लौकरच मी सन्याशाच्या वेशाने तुमच्या घरी येईन तेव्हा काय करावयाचे ते मधुकर, तुम्ही आम्ही मिळून ठरवू

पिलं: मधुकर आहेत ना या बाबतीत ?

वसंत: तर, तुम्ही वाईटपणाबद्दल शंकासुध्दा आणू नका मनात इनामदाराच्या हितासाठीच ही खटपट आहे सारी है, मेलेल्या उंदराला शिवल्याबद्दल हे घ्या प्रायश्चित्तादाखल! (रुपये देतो) किती वैराग्य तुमचे व्यर्थचि निंदा केली ॥ धृ ॥
नच सौजन्यासि या तिळहि सीमा उरलि,
जागे जन्मा मृत्युसि जो ठेवी भेदा न मुळी ॥1॥

पिलं: (घेत घेत) आता काय बुवा नाही कसे म्हणावे-शब्द कसा मोडावा ?

वसंत: है, लागा आपल्या कामाला या गोष्टीची वाच्यता मात्र अगदी बंद!

पिलं: हे पहा घातले तोंडाला कुलूप !

वसंत: आता ते चांदीच्या किल्लीनेही उघडणार नाही ना नाही तर कराल सारा घोटाळा, चला आता लागा कामाला
 (जातात पडदा पडतो)


प्रवेश चवथा

(नाटक मंडळीच्या घरासमोरील रस्ता, तात्या व रघुनाथ)

तात्या : हे मधुकर म्हणायचे, ते त्या मुलीचे भाऊ आणि ते वसंतराव म्हणायचे, त्यांच्याशी तिचे लग्न व्हायचे आहे! मुलगी आहे. नक्षत्रासारखी आणि तिच्या बापाने तर बाळाभाऊ ला वचन दिले आहे; तो "नाही" म्हणेल तेव्हा पुढची गोष्ट! आणि तो तर असा वेडापीर ! म्हणून ही सारी खटपट करायची नाही तर फुकट पोर बुडते बघ!

रघु: पण तात्या, हे मालकांना पसंत पडेल का ? नाही तर म्हणतील तुला कोणी ही पंचाईत सांगितली होती म्हणून !

तात्या : अरे वेडाच आहे! ते कशाला नको म्हणतात! यात काही वाईट का आहे ? उलट परोपकार आता सोग घेतल्यावर त्याच्याशी कसे काय बोलायचे हे सारे तुला सांगेन मग!

रघु: पण असे कसे बोलायचे बुवा भलतेच !

तात्या : अरे लेका, रोज सोंगे नाही का घेत तुम्ही ? त्यातलेच हे एक सोग. बरे! जा तर आता ! तो पाहा बाळाभऊच येत आहे! तर
सोंगाची तयारी करून ठेव जा.

(तो जातो व बाळाभाऊ येतो. तात्याला न पाहता बाळाभाऊ विचार करतो.)

बाळा: जगायचे की मरायचे ? हा एवढाच प्रश्न आहे ! जगणे मरणे ही दोन्ही सारखीच! अखेर तिने मला केराप्रमाणे झाडून लोटून दिला ना? प्रियेने माझा धिक्कार केल्यानंतर हे काळे तोड कुठे दाखवू? कांचनगडच्या मोहनेतल्या हंबीररावाप्रमाणे माझी दुर्दशा झाली आहे! अरेरे, सुंदर वस्तूची लयलूट का बरे असू नये ? नाही तर दुसऱ्या एखाद्या काय हा पापी विचार हा अधम बाळाभाऊ आता दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करणार! धिक् धिक्, काय करू रे ? मला कोणी प्रतिस्पर्धीही नाही याही बाबतीत मी पुरा दुर्दैवी आहे! परमेश्वरा, सूड घेण्याचे समाधानसुध्दा तू मला देत नाहीस!

तात्या: बाळाभाऊ !

बाळा (दचकून, पण गंभीर आवाजाने) कोणी हाक मारिली मला ? बोला, तुम्ही वेणू आहात का? (पाहून) कोण तात्या, माझा प्रिय मित्र
तात्या! (त्याच्या गळ्याला मिठी मारतो ) मित्रा, प्रिय मित्रा तात्या ! इतका वेळ कुठे रे होतास? माझ्या कपिंजला! या बाळाभाऊ ला- तुझ्या मित्र पुंडलीकाला विरहावस्थेत टाकून तू कुठे रे गेला होतास ? तात्या, प्राणमित्र तात्या ! अरे !
कोण जगी या तुजविण दुसरा मज विश्वासाचा ॥
मित्र जिवाचा कोण तुझ्याविण आश्रय शोधू अन्य कुणाचा ॥ घालुनि पोटी अपराधाते कोण करिल मज बोध हिताचा ॥

तात्या: बाळाभाऊ काय हे धीर धरा धीर धरा गुरू, हे काय ?

बाळा: तात्या, आता कशाचा गुरु तात्या, तुमचा तो आनंदी, रंगेल बाळाभाऊ आता कुठे आहे? आता मी गुरू नाही, कोणी नाही! आता धीर धरणार कशाच्या जीवावर? शून्यचि भासे हे जग सारे नच उत्साह कसा तो ॥ (वगैरे)

तात्या: या बोलण्यात काय अर्थ आहे ? उठा हे शोभते का तुम्हाला ?

बाळा: न शोभेना मला आता त्याच्याशी काय करायचे आहे ? मी आता कोठेतरी जाऊन आत्मघात करणार!

तात्या: काय आत्मघात ? महत्पाप, महत्पाप, महत्पाप !

बाळा: भगवान् नारदमुने नाही, नाही प्रिय मित्रा तात्या, आत्महत्या करू नको तर काय करू? ठेवूनि प्राण करू मी काय ! ऐसा हतभागी ॥

तात्या: पण काय झाले काय ते सांगा आधी माझ्यासारख्या मित्राजवळसुध्दा सांगायचे नाही मग कुणाजवळ सांगणार?

बाळा: ऐक तर मग मधुकर कालपरवा मला बोलविण्यासाठी आला हे माहीत आहे ना?

तात्या: हो, त्याच्या बहिणीला पाहण्यासाठी तुम्हाला बोलावले होते ना त्याने ?

बाळा: हो. पण मी तिला भेटतो तो निराळाच प्रकार ! मी तिचे पाणिग्रहण करताच ती संतापली, तिने माझा धिक्कार केला, मला दुरुतरे बोलली, माझ्या पवित्र प्रेमाला पायाखाली तुडविले !

तात्या: म्हणजे लाथ मारली की काय तुम्हाला ?

बाळा: नाही. माझा फार अपमान केला तिने अखेर मीम रुच्छित पडलो हे पाहून ती राक्षसी बिनदिक्कत मनाने निघून गेली.

तात्या: अरेरे! काय क्रूरपणा हा ! आणि तुम्ही ?

बाळा: मी तिथेच मरुच्छित पडून राहिलो त्या वेळी मला तिथे वारा घालून सावध कोण करणार? पुष्कळ वेळ वाट पाहिली की कोणी येऊन माझ्या हवाय मनाचे समाधान करील यान पणा त्या भयाणा वेळी आणि भयाण अरण्यात

तात्या: अरण्यात ?

बाळा: म्हणजे त्यांच्या त्या बागेत कोण येणार ? मित्रा तू सुध्दा त्या वेळी तिथे नव्हतास !

तात्या: पण अखेरीस उठला की नाही ?

बाळा: अर्थात् नाही तर इथे कसा आलो असतो ? उठलो खरा, पण तो कसा ? त्यांच्या माळयाने येऊ न मला हाकलून दिले; अगदी ।
हाकलून दिले बरे! तेव्हापासून एक तासभर असा भटकत फिरतो आहे !

(तात्या डोळे पुसतात व रडतात.)

बाळा: पण तात्या, हे काय? अरे बोलता बोलता-दृष्टी भरे जलभारे का रे अनिवारे सुहृदा रे ॥ वद कारण मजला सारे ॥

तात्या: हरहर ! इतका वेळ माझे लक्ष गेले नाही । काय दशा झाली आहे ही तुमची ! पंजर झाला अस्थींचा या सुरम्य देहाचा ॥

बाळा: (स्वगत) तर काय, मी रोडसुध्दा झालो आहे! विरहावस्थेची सारी वर्णने अक्षरश: खरी आहेत तर मग ! (प्रकट) काय म्हणता मी रोड झाली आहे ?

तात्या: रोड ! अहो तुमच्या अंगातून तुमचा सदरा कसा गळून पडला नाही याचेच मला नवल वाटते! कोदंड दोन तीन दिवसात रोड झाला, शूरसेनाची "काय ही दशा" व्हायला एक दिवस लागला आणि पुंडलीकाचा वाळून कोळ व्हायला आठ प्रहर लागले; पण या सृष्टचमत्कारावर तुमची ताण आहे ! तुम्ही एका तासातच वाळून कोळ झाला फिक्के तर इतके पडला आहा की हे सारे नायक फिक्के (पडतील तुमच्या दारुण विरहावस्थेपुढे पण गुरु, तुमची टोपी कुठे आहे ?

बाळा: मला माझ्या देहाचीही पर्वा नाही, मग टोपीची काय कथा ? आता मला टोपी काय करायची आहे ?

तात्या: खरेच ती ठेवायची तरी कुठे ? डोके असेल तर ना ठिकाणावर ? (स्वगत) डोके मुळीच नाही, मग त्याचे ठिकाण कसे मिळणार ?

बाळा: (स्वगत) टोपी मुद्दाम टाकून दिली तिचे सार्थक झाले ! विरहावस्थेत नायक नेहमी बोडकाच असावयाचा (प्रकट) तात्या झालेल्या दुदैवी प्रकरणात त्या माळयाने मला हाकलून दिले याचे मला फार वाईट वाटते! गुप्तमंजूषात विलासाला नंदिनीचा बाप मेघनाथ स्वतः हाकलून देतो; अर्जुनाला हाकलणारा बलराम सुभद्रेचा वडील भाऊ तरी होता! पण माझ्या वाटयाला तो भिकारडा माळी, वेणूच्या घरचा गडी यावा ना!

तात्या: मला वाटते तिनेच तुमचा अपमान करण्यासाठी त्याला मुद्दाम पाठविले असावे! 

बाळा: असे तुम्हालाही वाटते ना? मलाही थोडासा असा संशय येतोच !

तात्या: संशय नकोच! एरवी त्याची काय छाती होती तुम्हाला धक्के देण्याची!

बाळा: खरे आहे तुमचे म्हणणे ? (एकदम आवेशाने आता असे करणार

तात्या: कसे ?

बाळा: अंगिकार करुनि हिचा गर्व खडितों ॥ अबलेचा पाड काय सहज जिकितो ॥
श्रेष्ठ नरावीण यास काय भूषण ॥
कुशब्द बोलुन मलाच लावि दुषण ।।
तिच्या बापाने तर आमच्या लग्नाबद्दल वचन दिलेले आहे ना ?

तात्या: (स्वगत) अरेच्या ! हे भलतेच होऊ पाहत आहे. नाही गुरु, या रीतीने जाण्यात मजा नाही माझ्या मते अशा उन्मत्त स्त्रीचा सूड दुसऱ्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करून घ्यावा मानिनी स्त्रियांना यासारखे दुसरे मरण नाही !

बाळा: छे छे! दुसऱ्या स्त्रीवर प्रेम कधी कोणी केले आहे का ? अनुरक्त पुरुषाला त्याच्या प्रणयिनीखेरीज गत्यंतरच नाही!

तात्या: ते का ? सत्यविजयात नाही का सत्यविजयाने पहिली स्त्री टाकून दुसरी केली ती! वाः गुरु विसरू नका असे !

बाळा: हो हो ठीक आहे पण हे जमणार कसे? अशी दुसरी स्त्री कोण मिळणार ? वेणूसारखी योग्य ?

तात्या: भय्या, हा तात्या बोलतो आहे म्हटले! अर्धवट गोष्टी नाहीत आपल्याजवळा तुमच्या योग्य अशी एक सुंदरतरूणी पाहून सुद्वा ठेविली आहे! उगीच नाही! अगदी त्या वेणूपेक्षा सरस !

बाळा: कोण, कोण हो ती ?

तात्या: आपला रघुनाथ आहे ना ? त्याची हुबेहूब प्रतिमा ! रूपाने, गुणाने, वयाने, उंचीने अगदी तशी!

बाळा: खरे ? का थाप आहे झाले !

तात्या: थाप ? दिली आहे का थाप कधी तुम्हाला? शिवाय तुमच्यासारखाच नाटकाचा नाद आहे तिला सारी नाटके पाठ !

बाळा: काय म्हणता? सारे खरे हे ?

तात्या: अक्षरश: खरे! आणि म्हणूनच तर ती एका सकटात आहे.

बाळा: काय संकटातसुध्दा आहे! मग तीच खरी नायिका !

तात्या: संकटात आहे तर तिच्या बापाने एका मनुष्याशी तिचे लग्न ठरविले; पण तिचे त्याच्यावर प्रेम नाही! म्हणून ही लग्नाला कबूल नाही ! एवढ्यासाठी तिच्या बापाने तिला एका खोलीत कोंडून ठेविली आहे! कोणाला तिकडे जाऊ देत नाही, कोणाशी तिला बोलू देत नाही!

बाळा: अरेरे, कोण भयंकर हाल है!

तात्या: आणखी सांगितले तर तुम्हाला खोटे वाटेल, तिचे तुमच्यावर थोडेसे प्रेमही आहे !

बाळा: हैटू थाप आहे सारी !

तात्या : आता काय सांगावे तुम्हाला ? माझा तिचा स्नेह आहे ! तुम्हाला माझ्याबरोबर बरेच वेळा फिरताना पाहून तिने तुमची सर्व हकीकत मला विचारली! पण तिकडे जाणे मोठे कठिण आहे ! मार्गात शत्रू फार एक उपाय आहे फक्त !

बाळा: बोला, कोणता तो. मला संकटाची मुळीच पर्वा नाही. हा मम तदर्थ त्यजीन प्राण ॥ (वगैरे)

तात्या: तिच्या घरी जायचे ते रात्री वेषांतर करून, एका पेटाऱ्यात बसून जावे लागेल म्हणजे पेटारा तिच्या खोलीत पोहोचविण्याची मी व्यवस्था करीन आहे कबूल?

बाळा: कबूल! कबूल पेटारा मात्र बुरुडी करा म्हणजे झाले!

तात्या: हो, म्हणजे वारा खेळता राहील म्हणता!

बाळा: शिवाय शिवाजीमहाराजांचे अल्प अनुकरण केल्यासारखे होईल त्यात. छत्रपती दिल्लीहून पळाले ते बुरुडी पेटाऱ्यातूनच !

तात्या: उत्तम करू तर मग सारी व्यवस्था ?

बाळा: अगदी खुशाल ! पण तिचे नाव नाही सांगितलेत तुम्ही !

तात्या: सरोजिनी !

बाळा: वाहवा ! नावात सुध्दा प्रणय आहे! सरोजिनी !

तात्या: जातो तर मग मी दोनचार दिवसांत तुम्ही मला भेटा!

बाळा: बरे ! (तात्या जातो.)

बाळा: आताच ती रात्र असती तर किती बरे झाले असते प्रत्येक क्षण मला युगासारखा वाटत आहे! प्रिया संकटात, माझ्यावर तिचे प्रेम, मी रात्री तिला चोरून भेटणारा मी वेशांतर करणार! अहाहा, नाटकात यापेक्षा काय जास्त असते ! नाव तरी किती गोड? सरोजिनी ! काव्यमय, प्रेममय, सरोजिनी नाही तर ही गावंढळ नावे यमी, बगडी, गोदी, वेणू ! शी! त्या वेणूचे तर नाव सुध्दा नको! आता एक सरोजिनी आणि बाळाभाऊ ! बाळाभाऊ हे नाव जरासे बावळटच आहे हरकत नाही आपण तर नाव सुध्द बदलणार विक्रांत हेच नाव सांगणार झाले माझ्या भाग्याला तर पार नाही हे छत्रपती शिवाजीराजा, मी आज तुझ्यासारखा बुरुडी पेटाऱ्यात बसून जाणार, तर या कार्यात यश दे बोल शिवाजीमहाराजकी जय!
 (उडी मारून निघून जातो. पडदा पडतो.)


प्रवेश पाचवा

(अण्णासाहेब व यशोदाबाई.),

अण्णा: तुला सत्रा वेळा सांगितले तरी तुझ्या काही ध्यानात राहात नाही औषधाची आबाळ करून माझा प्राण का घेणार आहात तुम्ही ? पहाटेस झोप येत नाही म्हणून ते औषध शास्त्रीबुवांनी मुद्दाम दिले ते काही पहाटेस द्यायची आठवण राहिली नाही !

यशोदा: द्यायचे तरी कसे? पहाटेस आपल्याला लागली होती झोप म्हटले चांगली झोप लागली आहे ती कशाला मोडावी ?

अण्णा: शिकस्त झाली आता झोप येत नाही म्हणून मी औषधे आणितो आणि तुझे म्हणणे मला झोप लागली होती! काय म्हणावे तुम्हाला आता ?

यशोदा: खरेच झोप लागली होती खोटे कशाला सांगू मी ?

अण्णा : भलतेच ! झोप नाही ती ग्लानी असेल ! औषधावाचून आजाऱ्याला झोप येणार कशी ? आली तरी ती खरी झोप नाही, पुन्हा मला अशी झोप लागली तर जागे करून औषध देत जा म्हणजे मी पुन्हा शास्त्रोक्त निजत जाईन! मला असली वेडीवाकडी झोप नको!

यशोदा: बरे, आता नाही विसरायची!

अण्णा: बरे, आता आण

यशोदा: आता कशाला अवेळी ?

अण्णा: अवेळ कशाची? औषध केव्हाही घ्यावे आणि कितीही घ्यावे. जा, आण लोकरा जा! जा! लौकर (यशोदाबाई जातात.)

अण्णा: (स्वगत) काय कटकट करावी लागते पहा! ही पुडी घ्यावी जाता ! (पुडी उलगडून पाहतो) पुरती चिमुट सुध्दा नाही. वैद्यलोक आताशा पैशाकडे फार बारकाईने पाहू लागले; अगदी सोन्यामोत्याच्या भावाने औषधे देतात! (पुडीतील औषध तोंडात टाकतो.) बाकी शास्त्रीबुवाची औषधे रामबाण खरी ! त्यांनी म्हटल्याप्रमाणे खरेच हुशारी आल्यासारखे वाटू लागते! मला वाटते दूसरी पुढी घेतली तर दुप्पट हुशारी येईल! पाहतोच प्रचिती! (दुसरी पुडी घेतो.) अरेच्या हुशारी वाहवा रे औषध शाबास! रात्री खावे तूप आणि सकाळी पहावे रूप ! आपण तिसरीही पुडी घेणार! (तिसरी पुडी घेतो.) वाहवा, वाहवा, नवीन जन्म घेतल्यासारखे वाटते! मला वाटते चोवीस तास या पुडयांचाच खुराक चालू ठेवावा! पण पुडया कुठे आहेत जास्त आता ? (फडके झाडतो. काही पुढया पडतात) अरेच्या ! या पुढया कसल्या? (पुडीवरील अक्षरे वाचतो.) अरे, हुशारीच्या पुडया तर या! मग मी घेतल्या त्या कोणत्या आणि त्यांनी हुशारी आली कशी हा, आले लक्षात! पहाटेस खरी झोप न येता झोपेचा भास झाला! तशीच आता हुशारी आल्याचा सुध्दा हा भासच असावा! मला वाटते माझा रोग फार बळावत चालला ! त्याने असे विलक्षण भास होतात! आता खरे तरी कोणते आणि भास तरी कोणता ? सध्या जे काही दिसते, त्यावर विश्वास ठेवता कामा नये! बरे पण मी खाल्ल्या त्या पुडया तरी कशाच्या ? (त्या पुड्यांवरील अक्षरे वाचतो. बावरून) अरे बाप रे, या तात्यांच्या नेत्रानंदकज्जलाच्या पुडया ! आणि त्यात विष असेल तर ही डोळयांच्या औषधात विष असावयाचेच छे आहेच! हे माझे डोके सुध्दा फिरू लागले ! हे जिकडे तिकडे हिरवेगार दिसू लागले आता कसे करावे? (मोठयाने ओरडून) अहो पिलंभट धावा धावा पिलभट !

अहो घात! घात ! (पिलंभट धावत घाबऱ्या घाबऱ्या येतो.)

पिलं: (स्वगत) उदीर मेल्याची थाप ठोकावी आता (प्रकट) चात, आण्णासाहेब, घात! अहो घात, घात

अण्णा: अहो घात, भयंकर घात, घात!

पिलं: घात भयंकर! घात.

अण्णा: अहो केवढा घात ?

पिलं: अगदी आपण म्हणता एवढा घात, घात.

अण्णा: आता कसे करावे ?
 
 पिलं: आता कसे करावे ? घात अहो! घात!

अण्णा: अहो घात! घात! पण करायचे कसे आता ?

पिलं: करायचे काय दुसरे ? आताच्या आता पळाले पाहिजे इथून !

अण्णा: पळून काय होणार? यमापुढे किती पळणार ?

पिलं: मग दुसरा काय उपाय करणार इथे ?

अण्णा: यावर काही औषध नाही ?

पिलं: काही औषध नाही घटकेचा उशीर केला तर निकाल लागायचा!

अण्णा: (खाली बसतो) माझे हातपायच मोडले! आता पळणार तरी कुठे ? घात औषध नाही ना काही उपयोगी ?

पिलं: नाही पण आपल्याला कसे कळले हे?

अण्णा: अहो माझे मला कसे कळणार नाही ?

पिलं: म्हणजे ? ही गोष्ट प्रथम पाहिली मी !

अण्णा: पण केली मी ना या पहा पुढया हुशारीच्या अन् या मी खाल्लेल्या नेत्रानंदकज्जलाच्या भिनले त्याचे विष !

पिल: अहो हे निराळेच मी म्हणतो ते निराळे अहो, आपल्या घरात मेलेला उंदीर!

अण्णा: (ताडकन उठून मेलेला उंदीर! अहो, कुठे ? पिलंभट कुठे ?

पिलं: अहो आपल्या माजघरात, घात; माजघरात !

अण्णा: माजघरात आहे घात मघाच्याहून मोठा घात!

पिलं: म्हणून तर मी आपल्यापेक्षा मोठयाने ओरडत होतो !

अण्णा: तुम्ही पाहिलात स्वतः ?

पिलं: अगदी या डोळयांनी पाहिला. तो पाहा तिथे आहे, चला.

अण्णा: अहो, नको, मी नाही यायचा त्याच्या जवळ धावा, मधूला बोलवा माधवाला बोलवा आताच्या आता करजगावी चला सारे! धावा आहे धावा म्हणतो ना ? करा तयारी निघण्याची (पिलंभट धावत जातो) अरे मधू, माधवा, उठा बांधा पेटया चला, गाडया आणा, निघा पळा. (यशोदाबाई येतात.) उठा! बाधा पेटया चला, गाडया आणा, पळा (इकडून तिकडे धावतो.)

यशोदा: (घाबरून) अग बाई ? असे काय करायचे हे ? हे काय बोलायचे असे ?

अण्णा: अगं धाव, पेटया बांध ऊठ पळ. अरे, धावा, पळा गाडया आणा.

यशोदा: (मोठयाने) अगं बाई आता काय करू ? इतक्यात कुणी कौटाळ केले वाटते! अहो पिलंभट धावा हो धावा ! घातः अंगारा आणा. अहो पिलंभट, अंगारा अगे बाई आता काय करू ?

अण्णा: (स्वगत) तिकडूनच आली ही वाटते ? झाला घात ताप वायू सुध्दा झाला वाटते! झाली बडबड सुध्दा करायला लागली ! आता काय करावे ? (प्रकट) अहो पिलंभट धावा ! घात ही तिकडून आली. हिला ताप भरून वायुसुध्दा झाला! अहो धावा घात! डागण्या आणा 1 घात! अरे, डागण्या आणा !

यशोदा: घात! सर्वस्वी घात! अहो पिलंभट इकडे बाहेर घात झाला इतक्यात काय ही बडबड! अहो धावा ! अंगारा आणा ! घात;

(अण्णासाहेब वायु, घात, डागण्या" असे ओरडतात व यशोदाबाई "बाहेरवा, घात, अंगारा," असे ओरडतात; मधू, माधव व पिलंभट येतात.)

पिलं: अण्णा, बाई, असे घाबरू नका! कोणाला काही झाले नाही अजून !!

अण्णा : अहो नाही झाले कसे ? मग ही ओरडते का अशी ?

यशोदा: आपण ओरडायचे म्हणून!

अण्णा: अगे, घरात उंदीर पडल्यावर कोण नाही ओरडणार ?

यशोदा: असे मला वाटले आपल्याला बाहेरवा झाला म्हणून मी भिऊ न हाका मारल्या पिलंभटाना,

अण्णा: मला वाटले माजघरातून तू आलीस तेव्हा तुला ताप भरून वायू झाला. है पिलंभट, पाहा कुणाला झाला आहे का ताप आणि करा बांधाबांध लौकर

मधु: अण्णा, अहो आहे काय हे? एखादा उदीर मेला म्हणून झाले काय ?

अण्णा: अरे बाबा, घात या काळात जिवंत सिंहापेक्षा मेलेल्या उदरालाच जास्त भ्यावे लागते, समजलास !

माधव: रास्त आहे. आत्मा म्हटला म्हणजे सर्वांचा सारखाच, सर्वत्र एकच ब्रह्म पसरले आहे मूळ ब्रह्म, तिथून पुढे ओंकारध्वनी निघून पुढे माया-

अण्णा: अरे, पुरे, बाबा ते राहू दे आता. पिलंभट उठा लवकर, धावा, तांगे आणा, पहिलीच गाडी सापडली पाहिजे. जा. मधु, पळ.

मधु: पण अण्णा-

अण्णा : सांगितले ना आता वेळ घालवू नका म्हणून गाडया, बम्या, छकडे, तागे, दमण्या, बंडया, खटारे, एक्के, फैठणी, जे सापडेल ते घेऊन या !

माधव: त्यात भेद तो काय पहावयाचा हा तांगा, हा छकडा, ही बंडी, हा सारा स्थूल दृष्टीस भ्रम आहे. अंतर्दृष्टीला एकाकाराने एकाची शून्यात आणि

अण्णा: याला, मला वाटते झाले आहे काही तरी-

माधव: व्हावयाचे आहे काय ? या साऱ्या उपाधी-

अण्णा: खरी उपाधी आहे बुवा तुझी पिलंभट पळा उगीच वेळ घालवू नका

पिलं: बरे, पण आपण त्या पुढया खाल्लया त्यांचे काय ?

अण्णा : अहो, त्याचे काय! मला तर विषसुध्दा चढेनासे झाले आहे. प्रकृती अगदी अश्शी होऊन बसली आहे! नसता भास होती आहे !

माधव: अहाहा! हीच उन्मनी अवस्था मुमुक्षेची तृष्णा लागण्यापूर्वी मुमुक्षु जनाची हीच अवस्था होते. इथून पुढे तळमळ-पुढे पिपासा पुढे साक्षात्कार पुढे मुक्ति ! अण्णा, धन्य, धन्य तुमची तुर्यावस्था सपून तिच्या पुढची अवस्था तुम्हाला प्राप्त होणार! ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ, विसोबा खेचर-

अण्णा: म्हसोबा गाढव पुरे कर ही यादी आणखी काही वेळ असा घोळ घालून बसलास तर रोगाने माझी खरोखरीच पुढची अवस्था होणार! धन्य आहे तुझी पिलंभट उठा! मधु पळ हे पाहा तात्या आलेच! (तात्या येतात.)

अण्णा: तात्या, चला, घरात उंदीर पडला! आता इथे राहून उपयोगी नाही. तात्या नाही खरे; पण चालायचे कसे घरातून बाहेर पडायचे म्हटले तर पूर्वाभिमुख गमन करावे लागेल आणि हा मुहूर्त तर पूर्वाभिमुख गमनाला विरोधी आहे! या वेळी उत्तराभिमुख गमन लाभेल काय ते !

अण्णा: अहो, आता मुहूर्त पाहावयाला तरी अवकाश कुठे आहे ? हातघाईच्या वेळी सारे मुहूर्त सारखेच !

माधव: हेच खरे ! हरीचिया दासा ॥ शुभकाळ अवघ्या दिशा ||

अण्णा: माझी आई, तुला दहा दिशा मोकळ्या आहेत; पण आता जीभ मोकळी सोडू नकोस ! काय तकलीफ आहे पहा है, तात्या, आता निघालेच पाहिजे!

तात्या: अरे काय म्हणणे हे अण्णा ? हे पहा, (पंचांग दाखवितात.) संकट होय, क्लेश उपजे सुखनाशः मुहूर्ते चालेल तो सुख पावेल.
गोरक्ष पुसे मत्स्येंद्र सांगे; हा केवळ मुहूर्तराज होय सहदेव म्हणे भाडळीशी-

अण्णा : आपली मती हरली बुवा आता हा प्राण जाण्याचा मुहूर्त दिसतो; मग तात्या, आता करायचे तरी कसे ?

तात्या: करायचे काय त्यात ? त्या उत्तरेकडच्या खिडकीतून सारे बाहेर पडा म्हणजे झाले!

यशोदा: त्यापक्षी, मी म्हणते, तेवढे परस्थान-

अण्णा: आता पायावर डोके फोडून घेऊ का एकेकाच्या ! आता परस्थान नको, संस्थान नकोः पिल भट-

यशोदा: असे काय म्हणायचे भलतेच ? परस्थान ठेविल्यावाचून का कुठे निघणे म्हटले आहे ?

पिलंभट: आता असे करू द्या. परस्थान घेऊ न मी त्या उत्तरेकडच्या खिडकीवाटे बाहेर पडतो आणि मग मंडळी येऊ द्या पुढल्या दाराने! म्हणजे साऱ्या अडचणी भागतील!

आण्णा: शाबास असेच करा चला, तात्या, पिलंभट त्या विषाच्या पुड्या खाल्लया त्यांच्यावर उतारा पण आणा बरे का ? मला भलभलता भास होऊ लागला आता!

पिलंभट: (स्वतःशी) न होई तर मग माझी करामत कुठे राहिली? साया पुडया इथून तिथून एक. घरचा वैद्य..

आण्णा: हा निघा आता.







Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
2
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा