shabd-logo

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023

7 पाहिले 7
अंक तिसरा

प्रवेश पहिला

(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)

बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, पहाटेस तुमच्या खोलीत मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू माला! पुढे एक तशाच आवाजाची किंकाळी ऐकू आली आणि नंतर रडण्याचा आवाज बंद झाला! बाई, त्यामुळे दवाखान्याचा अधिकारी या नात्याने मजवर तुमच्या खोलीची झडती घेण्याचा वाईट प्रसंग आला आहे! (शिपायास) हं. पाहा रे नीट खोली तपासून (शिपाई खोली तपासतात) बाई, तुम्ही कोण आहात? कुठल्या राहणा-या? का? बोलत नाही? आज चार दिवस मी येथे नव्हतो, त्यामुळे मला तुमची माहिती मिळाली नाही. नाही तर प्रत्येक रोग्याची मी स्वतः वास्तपूस करीत असतो!

शिपाई : बाई, जरा बिछान्यावरून उठा (दुमन एकदम वळकटीतून मृत बालक काढते).

दुमन देवा! अखेर हे केलेस ना कशाला उठा? बाबासाहेब हे पाहा माझे पाप आणि ही मी

बाबासाहेब कोण द्रुमना राक्षसिणी, हे काय केलेस?

दुमन कोण राक्षसी? मी कशाची राक्षसी? मी या बाळाची आई आहे. बाबासाहेब पण हे अधौर कर्म करायला तुझा हात कसा बहावला!

द्रुमन ते राक्षसी रूढीला विचारा राक्षसी समाजाला विचारा, राक्षसी धर्माला त्या धर्माने पावणा-या तुमच्या राक्षसी देवाला विचाराः बाबासाहेब, मी प्रत्यक्ष याची आई आई आपखुशीने पोटच्या गोळ्याच्या मानेला नख कसे हो देईल? मातृप्रेमाची कल्पना करा! आईच्या आतड्याचा गळफास बाळाच्या गळ्याभोवती कसा हो बसेल? मी पातकी, पतित आणि दुराचारी तर खरीच; पण माझ्या सोनुल्याच्या मानेला नख देताना पाण्याने डबडबलेल्या डोळ्यानी त्याला पुरतामा पाहिला सुध्दा नाही हो! पाहा, पाहा, कोळशाच्या खाणीतून निघाला म्हणून हि-याची चमक कमी होते का? पाहा, अगदी चित्रासारखा नाही का? पण हाय, हाय! एका पटकेपूर्वी सारख्या चमकणा-या या हिरकण्या अगदी चित्राच्या काचेच्या डोळ्यांसारख्या थिजल्या आहेत!

बाबासाहेब अरेरे! दुमन कोणत्या अधमाने-

दुमन नका, नका त्या कपटी विश्वासघातकी राक्षसाचे नाव तोंडावाटे उच्चारण्याचा प्रसंग माझ्यावर आणू नका! मी फसले. बाबासाहेब, पुनर्विवाहाच्या नुसत्या आशेने मी पापाच्या पंकात बुडालो सुखाकाचा मोह मला आवरला नाही ज्या कामजलात वृद्ध तयाचे, पोक्त विचाराने, अनुभवाचे मोठमोठाले महात्मे, तपस्वी तेजस्वी ऋषी प्रत्यक्ष देवदानव सुद्धा दा अडकून पडले त्यातून माझ्यासारखी अबला कशी सुटेल? वापसिंहांना गुरफटून टाकणारे जाळे एखाद्या बालमृगीला कसे तोडिता येईल

बाबासाहेब पोवप भोवतालची सुखाची सृष्टी स्वतःच्या सुखाची पूर्ण निराशा, आणि मानवी स्वभावाचा कुमकुवतपणा, अशा

परिस्थितीत अल्लड विधवेचे पाऊल वाकडे पडले तर त्यात तिला दोष कसा द्यावा? पण दुमन, तू तुझे सकट कोणाला सांगितले असतेस तर

दुमन कोणाला सांगणारा संकटात सापडलेल्या, निस्सहाय, फसलेल्या विधवेचे दुःख कोण ऐकून घेणारा सुखावलेल्या मनुष्याला दुःखीकष्टी माणसाच्या अंतःकरणाची जाणीव कोठून होणारा शास्त्रीमंडळींच्या आरडाओरडीचा पोकळ नगारा वाजत असता विधवेच्या आतड्यांच्या तारांचा करुणारव कोणाला ऐकू येणार? अनाथ गाय चुकून पाय घसरून पापाच्या चिखलात रुतली तर तिच्या भोवती गुप्त कृष्णकर्माच्या काळिमेने काळवंडलेल्या कावळ्यांची कावकाव मात्र सुरू होते. तिच्या दीन दशेचा मोठ्या मनाने विचार करून, तिच्या पापाकडे मनुष्य स्वभावाच्या जाणिवेने पाहून उदार बुध्दीने तिच्यावर आपल्या पंखांची छाया पसरणारा राजहंस कुठे तरी आढळेल का! मनुष्याला परदुःखाची- कल्पना आत्मदुःखासारखी होत असती, तर आज पापाच्या पडद्याआड झाकलेल्या माझ्या या छबकड्याला धुक्याआड झाकलेल्या या चंद्राला, कृष्णमेघाच्या आड लपलेल्या या माझ्या सूर्यनारायणाला मी नाहीसा केला असता का? समाजनिदेच्या भीतीने हृद्याच्या चिंधड्या झाल्या नसत्या तर माझ्या लाडक्याला या हृद्यात सुध्दा लपवून ठेवला असता! पण चहूकडून कोंडमारा झाल्यामुळे केवळ पिंज-यात सापडलेल्या वाघिणीच्या क्रूरपणाने मी या पोटच्या गोळ्याचा घास घेताला! बाळा, जा। देवाच्या पायांजवळ जाऊन त्यांची करूणा भाक, तो दीनांचा दयाळू, अनाथांचा नाथ, पतितांचा पिता, पाण्याचा पाठिराखा, पातक्यांचाही पालनहार, अगदी अधमाधर्माया सुद्धाच्या आधार तुझ्या केविलवाण्या तोंडाकडे पाहून तुझी करुणेची किंकाळी ऐकून द्रवेल, आणि तुझ्या या पातकी भांबावल्या आईलाही लवकर पायाजवळ आणील.

बाबासाहेब : अरेरे! चिक्कार असो अशा या धर्माला, अशा समाजाला आणि अशा रूढीला ! भूतदया हाथ सा-या धर्माचा धर्म भूतदयेला थारा देत नाही, पतितांचे समाधान करीत नाही, दुःखितांचे दुःख जाणत नाही तो धर्म कशाचा? विकारवश मनुष्याच्या अंगी जुलमाच्या टाकीचे घाव घालून असाध्य देवकळा आणण्याच्या नसत्या नादी पडून मनवी मनोवृत्तींना राक्षासी रूप मात्र देण्यापेक्षा मध्यम दर्जाचा मनुष्यपणाच राखिलेला काय वाईट? संसाराचा गाडा मोडून पडल्यावर परलोकचा पल्ला एकदम गाठण्यासाठी विधवेला वैराग्याचे विमान मिळाले तर सर्वोत्तम, यात शंकाच नाही पण त्याला लोकोत्तर विवेकपाशाची बळकटी पाहिजे अल्ल्ड विकारवत, अविचारी, अदूरदृष्टी सुखासक्त किंवा पोरवयाच्या सा-याच विधवाना अशा धोक्यात घातले तर त्याच्या सर्वस्वी नाश होण्याचेच फार भयः तेव्हा त्यांच्यासाठी पुनर्विवाहाची पाऊलवाटच पहायला हवी. द्रुमन, त्यापेक्षा तुझा व पुनर्विवाह झाला असता तर किती चांगले झाले असते! पण लोकलजनला चुकविण्यासाठी या अघोर साहसात पडताना उलट तू कायद्याच्या कैचीत मात्र सापडलीसा

दुसन बाबासाहेब, मी तुमची धर्माची कन्या आहे माझे रक्षण करा आणखी सरकारच्या तावडीत देऊन माझे जगापुढे चिडवडे काढू नका. वणव्यात होरपळणा-या हरिणीवर अश्रूंची वृष्टी करा बाबासाहेब, माझे रक्षण करा, या संकटातून वाचवा, मी भांबावून गेले आहे.

बाबासाहेब ऊठ, दुमन, ऊठ मी मनुष्य आहे. मला अंतःकरण आहे. परमेश्वरा अनाथ प्राण्याच्या रक्षणासाठी एवढे असत्याचरण करितो याची क्षमा कर (शिपायास) अरे या मुलाची व्यवस्था लावा आणि कोणाजवळ याबद्दल बोलू नका,

शिपाई छ। छ रावसाहेब, आम्ही का पांढरपेशे आहोत? का ब्राह्मण आहोत? आमचा दिल अगदी फाटून गेला! मूल जिवंत उपजले पण

थोडया वेळाने आटोपले असे सांगू म्हणजे झाले.

बाबासाहेब दुमन, मी सर्व व्यवस्था नीट करतो. तू घाबरू नकोस. आताच्या गाडीने मला पाच-सहा दिवस करिता परगावी जावे लागणार •आहे. तोपर्यंत तू हुषारीने रहा. चला रे. (जातात)

द्रुमन : (मुलाच्या प्रेताकडे पाहून) बाळ! काय रे तुझ्या जन्माची कथा ही लाडक्या, पुन्हा जन्म घेण्याचा तुझ्यावर प्रसंग आला तर देवाजवळ हट्ट घेऊन बैस आणि एखाद्या हलक्या जातीत जन्म घे! म्हणजे शास्त्राची कोरडी बडबड, उंचपणाचा नीच अभिमान यांचा त्रास चुकून तुला शुद्धद, सरळ, भावड्या मनुष्याच्या प्रेमाचा तरी अनुभव मिळेल. (मनोरमा येते).

मनोरमा : द्रुमनताई, घाबरू नका. तुमची दशा पाहून माझ्या जिवाचे पाणी पाणी झाले आहे. तेव्हा तुम्हाला त्रास मी कशी देईन ? वेड्यावाकड्या प्रसंगात अडलेल्या बाईबापडीच्या पुरुषजात कुटाळक्या करील; पण आम्हा बायकांचे तसे नाही! दुमनताई, असला प्रसंग पाहून एखाद्या मेल्या धोंड्याचे सुद्धा पाणी होईला मग बायकांचे मन कसे विरघळणार नाही? देवा रे देवा, या नाडलेल्या गाईवर काय रे ही वेळ आणलीस?

द्रुमन मनोरमाबाई, पुढच्या प्रसंगाच्या कल्पनेनेच माझ्या काळजाने ठाव सोडला आहे! बायकांनीच बायकांचा कड़ घेतला पाहिजे! तुम्ही नाही ना माझा घात करणार?

मनोरमा: सख्ख्या बहिणीप्रमाणे माझ्यावर भरवसा ठेवून असा! आम्हा बायकांना असले प्रकार पहायला मिळत नाहीत म्हणूनच ही धर्माची दोंगे चालतात. यापेक्षा तुमच्यासारख्यांनी पुन्हा लग्ने केलेली काय वाईट? बरे पण ते राहू द्या तुर्ती तुम्ही येथे कथा आला?

द्रुमन : कशी आले? मनोरमाबाई. ज्या मेल्याने मला पुनर्विवाहाची आशा लावून या पापमार्गाला लावले त्यानेच आलेला हा प्रसंग टाळण्यासाठी आणि पुनर्विवाह लावण्यासाठी मला घरातून बाहेर पडायची बुद्धी दिली. आपल्याबरोबर नेण्याचे आमिष दाखवून मेल्या मांगाने विश्वासघात करून, मला एकटीलाच गाडीत बसवून दिली आणि आपण तोंड काळे करून निघून गेला. अखेर गाडीतच माझ्या पापाची घटका भरत आल्यामुळे नाइलाजाने मी या घटपायथ्याच्या दवाखान्यात आले! पुढचा सारा प्रकार तुम्हाला दिसतोच आहे. पण तुम्ही येथे कशा आला?

मनोरमा : अशाच फसगतीने तिकडच्यांवर रागावून मी जीव द्यायला निघाले तो अशाच एका राक्षसाने मला माहेरी पोचविण्याचे कबूल केले;

रागाच्या भरात मी तशीच कोणाला न कळत त्याच्याबरोबर निघाले; पण गाडी घाटात आल्यावर त्या मेल्याची पापवासना माझ्या लक्षात आली आणि पतिव्रत्याचे रक्षण करण्यासाठी मी एकदम पुलावरून खाली उडी टाकली!

दुमन उडी टाकली! अहाहा! मनोरमाबाई, धन्य तुमची! बरे पुढे?

मनोरमा : पुढे मी पुलावरून खाली न पडता पुलाच्या तारांतच अडकून राहिले. थोड्या वेळाने कामावरचे लोक येऊन त्यांनी मला या दवाखान्यात टाकिले, पण इथे पाहते तो बाबासाहेब मामाजी ! आज चार दिवस ते इथे नव्हते म्हणून वेळ निभावली; पण आता कसे होणार?

दुमन त्याची नका तुम्ही काळजी करून ते आज पुन्हा बाहेरगावी जाणार! त्याची बदली झाल्याचे ठरल्यासारखे आहे तेव्हा ते फारसे पुन्हा इथे राहणार नाहीत. तितक्या वेळात तुम्ही साफ ब-या होऊन आपल्या माहेरी जाला पण हो, तुम्हाला फसविणारा कोण हे नाही सांगितले तुम्ही कोणत्या राक्षसाने-

मनोरमा कमलाकराने!

द्रुमन: कमलाकराने! अरे मांगा मनोरमाबाई, त्यानेच माझा आणखी माझ्या बाळाचा असा गळा कापला हो! मनोरमाबाई, आता माझा संताप अनावर झाला आहे! माझ्या अश्रूची मला मुळीच चाड वाटत नाही. अशी मी जाते आणि त्या मांगाची कसाबकरणी सा-या जगाला कळविते! तुमच्या नावावरचा नसता कलंक तरी उडून जाईल!

मनोरमा : पण त्याचे सारे कृत्य लोकांच्या नजरेस आणल्याखेरीज मी जिवंत आहे असे त्याला कळू देऊ नका, नाही तर तो मेला मांग माझ्या नावाच्या नसत्या कड्या पिकवत बसेला (शिपाई येऊन मूल उचलतात).

दुमन हाय! बाळा, हेच तुझे शेवटचे दर्शन! देवा, माझ्या बालराजाला तुझ्या वरच्या राज्यात तरी सुखी ठेव. (पडदा पडतो).

प्रवेश: दुसरा

(वसंत व वीणा दुर्वास चहा घेऊन प्रवेश करितो).

72

दुर्वास चहा आणला आहे साहेबा

वसत: अगदी हिंदू! दुर्वास कोणत्या वेळी काय आणावयाचे हे तुम्हाला अजून कळत नाही ना! अगदी हिंदू आहात, विलायतेतले खाणावळवाले किती हुषार असतात! दुर्वास, हा माझा आताचा पोषाख चहा पिण्याचा नाही.

दुर्वास मग कोणत्या वेळचा आहे. साहेब!

वसंत हा कॉफी पिण्याच्या वेळचा आहे! विलायतेत या पोषाखाकडे फार लक्ष द्यावे लागते! चहा पिण्याचा पोषाख निराळा, कॉफीचा निराळा, विडी ओढण्याचा निराळा. अहो, काही दिवसानी तर जाभई देण्याचा पोषाख निराळा आणि शिंक देण्याचा पोषाख निराळा, इतकी सुधारणा होईल तिकडे! जा कॉफी आणा. (तो जातो.)

वीणा : अहाहा! इतकी सुधारणा आहे ना तिकडे! नाही तर आमचा समाज !

वसंत : आमचा समाज! छिन हिंदू, अगदी हिंदू। वीणे, या अजागळ समाजात तू किती उत्कृष्ट मनोधैर्य दाखविले आहेस! माझ्याबरोबर पळून येऊन तू प्रीतिविवाहाच्या सुधारणेची साक्षात विजयपताकाच झाली आहेस!

वीणा: प्रिया, द्रुमनताई घरातून निघून गेली एवढ्यावरून बाबांनी काय गहजब केला हो! बाबा सुद्धा अगदीच हिंदू, नाही? ज्या चर्चेच्या नुसत्या सहवासाला ते भीत होते तिचा आता स्वतःच अनुभव घेत असतील! वसंत : वीणे, विलायती सुधारणेची खरी किंमत तिला कळली... प्रणयाचे रहस्य तूच ताडिलेस! अशा हजारो तरुण मुली जेव्हा प्रेमासाठी भडाभड पळत सुटतील तेव्हाच आम्ही इंग्रजी शिकल्याचे चीज

होईल!

वीणा : अहाहा! सा-या कुमारिकाची लग्ने अशी चोरून, आणि सा-या विधवाची लग्ने राजरोस होताहेत असा सोन्याचा दिवस आमच्या अज्ञानी समाजात कधी तरी उगवेल काय?

वसत : लाडके, खात्रीने उगवेल! तुझ्यासारख्या देवी घरोघर पळू लागून मनोधैर्य दाखवू लागल्या तर काय नाही होणार? लवकरच असा दिवस उगवेल की, झाडून सा-या कुमारिका वल्लभाबरोबर पळून जाऊ लागल्यामुळे उपवर मुलींचे बाप बेफिकीर होतील आणि म्हाता-या आजीचा पुनर्विवाह जमविण्यासाठी त्यांचे नातू वरशोधनाच्या फिकिरीत पडतील!

वीणा : त्या वेळी पुढच्या पिढीला आजच्या विधवांची कल्पना होण्याकरिता प्रदर्शनातून विधवाची चित्रे ठेवावी लागतील आणि पोरीच्या

लग्नाबद्दल काळजी करीत असलेल्या नटीसूत्रधारांचा संवाद असंभवनीय ठरेल!

वसंत : अज्ञानाने घोरत पडलेल्या समाजाचे डोळे कधी उघडतील ते उघडोता अजून आमच्या बायकांचे लाजणे सुद्धा पुरे झाले नाही!

वीणा हे काही खोटे नाही! आमची आई आता पोक्त झाली, पण अजून बाबांना लाजते! कधी त्याच्या गळ्यात हात घालते का त्याचे मोकळ्या मनाने चुंबन घेऊन आम्हा पोरीना घडा घालून देते; नाव नाही! विलायतेत असे नसेल, नाही!

बसत छट् तिकडे बायका परक्याची सुद्धा चुंबने घेतात! उगीच सुधारणा झाली आहे इतकी? फुकट नाही राज्य करीत ते आमच्यावर! नाही

तर तुझी आई! अजून लाजतात ना? हिंदू, अगदी हिंदू गचाळ !

वीणा आईवरून आठवण झाली. प्रिया, आता लग्नाचा विचार कधी करायचा?

वसंत करायाचा खरा! मला सुद्धा तुझा असा अपूर्वा सहवास असा वाटतो. पण, सध्या पैशाची टंचाई पडली आहे. त्या विवंचनेत मी

आहे! वकिली करीन तर उघडकीस यावे लागते; उघडकीस यावे म्हटले तर तुझा वियोग होणार,

वीणा तो कसा? मी मुळीच बाबांचे ऐकणार नाही!

वसंत नाही खरी; पण कायदा त्यांच्या बाजूला आहे ना? कायद्याने तू अजून अज्ञान ठरशील काय करावे हेच कळत नाही. (मथुरा येते.)

मथुरा : (स्वगत) ते विचित्र जोडपे कधी पाहिनसे झाले आहे! (पाहून, प्रकट) हा मेल्यांनो, या तर वीणाताई आणि हे वसंतराव

वसंत कोण ही अगदी हिंदू वर्दी दिल्यावाचून कशी आत आलीस? विलायतेत या आगळी- :

वीणा थांबा, असे तिच्यावर रागावू नका! अहो, ही आपल्या गोकुळची मथुरा मथुराताई, तुम्ही इकडे कुणीकडे? आमच्यासारखाच काही प्रकार झाला आहे का?

मथुरा: नाही, नाही तुमच्या अगदीच उलट तुम्ही बापाच्या घरून नव-याकडे पळून आला आणि मी नव-याच्या घरून बापाकडे पळून

-

आले आहे.

वसंत : अस्से, हे दुर्वास तुमचे वडील एकूण!

मथुरा: तर काय! बाबांच्या शांतिसदनाबद्दल मी रोज सांगत नव्हते तुम्हाला! मला माहित नव्हते, तुम्हीच आमच्या खाणावळीत आहा म्हणून! आज चार दिवस बाबा तुमच्या गोष्टी सांगतात, म्हणून म्हटले पहावे तरी असे कोण आहे तो पण तुमची बाबांना ताकीद की कोणाला

आत सोडू नका म्हणून आज अखेर त्यांचा डोळा चुकवून आले आत आणि पहाते तो तुम्ही!

वसंत आम्ही येथे गुप्तपणाने राहिलो आहोत म्हणून आत येऊ देत नाही.

वीणा : आता तुम्ही तरी कोणाजवळ बोलू नका! नाही तर आम्हाला आणखी दुसरा गाव पहावा लागेल..

मथुरा : मी कशाला बोलते! तुम्ही खाणावळ सोडून गेला तर बाबांचे नुकसान नाही का?

वीणा आणि घरी गेल्यावर गोकुळाजवळ सुद्धा बोलू नका!

मथुरा: त्यांच्याजवळ बोलायला मी घरी जाते आहे कशाला! माझा अडला आहे आता खेटर सासरी जायला (हातात एक पत्र घेऊन दुर्वास) येतो.)

दुर्वास : अस्से काय? पाहतो कशी जात नाहीस ती! अग कारटे, इतकी मस्त झालीस काय?

मथुरा इतके रागवायला काय झाले बाबा?

दुर्वास हे बघितलेस तुझ्या नव-याकडून आलेले पत्र त्याचा असा नेहमी पाणउतारा करतेस नाही? नव-यावर तुझा तोरा कारटे, आमच्या

घराण्यात असा प्रकार कोणी केला नाही!

वसंत (स्वगत) खाणावळ काढणा-या बहाद्दराचे घराणे मोठे तर खरेच!

मथुरा: अहो बाबा, खोटे ते सारे! त्यांना काय, काही तरी भरकटले झाले!

दुर्वास: काही तरी भरकटले काय? थोरामोठ्यांच्या सह्या आहेत पत्रावर! काय म्हणे, त्यांनी माझे हाल केले! मला खरे वाटले सारे! पण खरा

प्रकार निराळाचा चल, आताच्या आता आपल्या नव-याच्या घरी जा. त्यांच्या पाया पड, त्यांच्यापुढे नाक घास आणि तेथे राहा!

वसंत अहो दुर्वास, हा जुलूम काय कामाचा मथुराबाईची खुषी नसेल-

दुर्वास माफा करा, साहेब, या बाबतीत माझे मला चांगले कळते आहे.

मथुरा: अहो बाबा, असे बोलू नका, ते विलायतेला जाऊन आले आहेत-

दुर्वास: विलायतेचा काय येथे संबंध मला एवढे कळते, बायकोने नव-याच्या आज्ञेत रहावे, त्याच्या लाथा खाव्या, वाटेल ते करावे, पण

त्याच्या बाहेर जाता कामा नये. नव-याला मुठीत ठेवावयाचा तो गोडीगुलाबीने गरिबाच्या अगी गरिबीच पाहिजे..

वसंत अहो, 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:'

दुर्वास: देवता रमतात पण देव उपाशी मरतात चल, पोरी, कर तयारी, ऊठ
वसंत हिंदू, अगदी हिंदू या हिंदू लोकांच्या अंगात हिंदूपणा कसा अगदी खिळून राहिला आहे! अहो दुर्वास, बापाची मुलीवर किती सत्ता

असते ठाऊक आहे का?

दुर्वास: मी आहे खंबीर त्याचा विचार करायला! आम्हा गरिबांना हे विलायती विचार नकोत! म्हणे हिंदूत हिंदूपणा खिळला आहे! नाही तर

काय विलायती थेर शिरणार? चल, अजून उभीच?

मथुरा: पण बाबा, मी एवढ्या ह्याने घरातून निघाले आणखी आता कशी नाक मुठीत धरून गेले तर लोक काय म्हणतील?

दुर्वास: 1 लोक तारीफ करतील तुझी आणि माझी सुद्धा! तेच तुला जड वाटते आहे पण बायकोच्या जातीला इतका ताठा पाहिजे कशाला? चल

वीणा: मथुराबाई, तिकडे आमच्याबद्दल बोलणार नाही ना? (ती जाऊ लागतात.)

मथुरा: नाही. मुळीच बोलायची नाही तुम्ही बिनघोर रहा! (दुर्वास व मथुरा जातात.)

वसत: अरेरे, अगदी हिंदू जिकडे तिकडे! आणखी हजार वर्षे हिंदुस्थानात सुधारणा होत नाही! चल लाडके, आपणही हा तमाशा पाहू! (जातात. पडदा पडतो).

प्रवेश तिसरा

(भूतमहाल दुमन व कमलाकर)

कमलाकर द्रुमन हे वेड डोक्यातून काढून टाका! नीट दूरवर पाहा,

द्रुमन मला आता काही सुद्धा परवा नाही मी रागाने अगदी आंधळी झाले आहे-

कमलाकर हे मात्र खरैः नाही तर दुस-यादा फसून जाळ्यात सापडली नसतीस, द्रुमन, माझा सुड घेण्याची कल्पना सोडून दे !

द्रुमन: कशाला. दुस-या भोळ्याभाबड्या पोरीचे गळे कापायला? अशी जाऊन सा-या जगात तुझ्या नावाचा डांगोरा पिटते! तुझी प्रतिष्ठा

मातीला मिळते! तुला मरेपर्यंत कैदेत कोडून तुझ्या पापाचे पुरे पुरे प्रायश्चित्त तुला देती

कमलाकर मूर्ख घोरी येथे आल्याबरोबर जर तू प्रथम माझ्या दृष्टीस पडली नसतीस तर मात्र कदाचित हो सारे झाले असते पण तडजोडीच्या गोड गोष्टींनी फसून तू पुन्हा येथे आलीसा आता तू मला कैदेत घालण्याऐवजी मी मात्र तुला कैद केले आहे! द्रुमन, आता मरेपर्यंत तू माझ्या ताब्यात आहेसा

दुमन मेल्या राक्षसा, किती पापे करशील अशी? तुझ्या पापाचा पर्वत उंच होता होता अखेर तुझ्यावरच कोसळून पडेल कर हवा तसा

माझा छळ कर पण माझा प्राण जाईपर्यंत मी तुझ्या नावाने औरडत राहणार कमलाकर वा. अशाने तुझी अबू फारच चावेल! दुमन : माझी नाही तर नाही- जी अबू मूळची खोटी तिची कशाला परवा करू? पण बिचा-या मनोरमेवर आलेला खोटा कलंक तरी दूर करीन!

कमलाकर काय मनोरमेची हकिगत तुला ठाऊक आहे?

दुमन हो, हो! तिने स्वतःच मला हे सारे सांगितले आणि म्हणूनच खवळून मी येथे आले.

कमलाकर अस्स! तर मनोरमेचे कल्याण करणार! दुमन, फळाला टोचणा-या पक्ष्याला अविचाराने दडग मारिला तर त्याने पक्ष्याला तर काही होत नाहीच, पण फळ मात्र उगीच तुटून पडते आणि एखादे वेळी दगड उलटून आपलाच नाश होती कदाचित तुझी मला दया आली

असती, पण आता मनोरमेचा बंदोबस्त करून

दुमन मेल्या, त्याचा कसला बंदोबस्त करणार? ती बिचारी माऊली केव्हाच जग सोडून गेली. तूच तिला मारलीस!

कमलाकर : ती आपल्या हेक्याने मेली!

द्रुमन आणखी माझे बाळ किती गोजिरवाणे आणि किती सुंदर होते! मेल्या, त्याला चांगल्या मार्गाला लावीन, त्याची जोपासना करीन

असे गोड बोलून मला कशी भुरळ पाडलीस, पण राक्षसा, शेवटी तुझ्या कपटामुळे माझ्या हाताने मला त्याची मान मुरगळावी लागली! कमलाकर : (हसत) वा, स्वर्गाच्या मागपेिक्षा आणखी कोणता चागला मार्ग काढावयाचा आपल्या धाडसाला शोभण्याजोगा छावा खरा!

इतरांना आयुष्य किती तरी वर्षे कठीत बसावे लागते! पण त्या हिंमतवान बहाद्दराने क्षणमात्रात आयुष्याच्या एका टोकावरून दुसन्या टोकावर

उडी टाकली! नि छातीचा खरा जगता वाचता तर बापाला सुद्धा बाप न म्हणता

दुमन मेल्या, आणखी हे विष कशाला ओततोस? तुला दया माया काहीच का नाही? त्या पोराचा जीव घेऊन तुझी तृप्ती झाली नाही

म्हणून आता माझा जीव घ्यायला पाहतीसा

कमलाकर मुळीच नाही! तुझा जीव घेण्याचे काय कारण? मनोरमा, तू यांसारख्या माणसाचा मी फार भुकेला आहे.

द्रुमन राक्षसासारखा!

कमलाकर अगदी बरोबर आपल्या छबकडीला पेटीत कोडून फिरणा-या राक्षसासारखा मी सुद्धा तुला या घरात कोंबून ठेवून सुद्धा सौंदर्याची

द्रुमन : मेल्या, तुझी जीभ झडून जातो! कल्पान्तापर्यंत रोखनरकात कुजत पडशीला यमदूत तुझ्यावर आगीची वृष्टी करतील! तुझ्या पापाने भरलेल्या शरीरीचे तुकडे तुकडे

कमलाकर दुमन, वाफेची शक्ती मोठी असली म्हणून तोंडाच्या वाफेने काय होणार? या शिक्षा भयंकर असतील पण त्याच्या वर्णनाने काय होणार? या माझ्या अटीप्रमाणे राहण्याला तू तयार नाहीस?

द्रुमन पंडाळा तुझे शब्द सुद्धा ऐकायला नकोत!

कमलाकर तर मग अन्नपाण्यावाचून या घरात कोंडून पडावे लागेल आणि शेवटी कुत्र्याच्या भीतीने मरावे लागेला

दुमन येथे अशी ओरडून तुझे पाप सा-या जगाला सांगेन

कमलाकर तुझ्या ओरडण्याने काय होणार? या घराच्या भुताटकीबद्दल लोकांत बोलवा आहे, ती तुझ्या आरडाओरडीने दृढ होईल. कोण तुझ्याकडे लक्ष देणार तितक्यातून वेळ आलीच तर यादीच्या किल्लीने कोणाच्या तोंडाला कुलूप बसणार नाही? सोनेरी सलामाने कोण खूप होणार नाही?

द्रुमन मेल्या, मनुष्यांनी माझी हाक ऐकली नाही तर निदान देव कोणाच्या तरी मुखी उभा राहीला सर्व मनुष्याना निर्माण करणारा तो परमेश्वर तर तुझ्या चादी सोन्याला भाळणार नाही ना?

कमलाकर: परमेश्वर दुमन, परमेश्वराने मनुष्य निर्माण केला नाहीः मनुष्यानीच परमेश्वर निर्माण केला आहे. कमी शक्तीच्या पण जास्त बुद्धीच्या तांनी आपल्यापेक्षा जास्त शक्तीच्या पण अज्ञान लोकापासून नये म्हणून त्याना विचकविण्यासाठी एक बुजगावणे करून ठेवले आहे मला ईश्वराची मुळीच भीती वाटत नाही

दुमन तर काय, माझाही तू जीव घेणारा

कमलाकर : अलवा भोवताली पसरलेल्या विवरण मध्य पाहणारा स्वतत्व असतो! तू जर माझ्या अनूवर उटू लागलीस तर तुलाही मनोरमेच्या मागोमाग पाठ काय हरकत आहे? पाहा नीट विचार तरी देवले आहे; पण उद्यापासून तेही मिळणार नाही! असे कुण्याच्या मोतीने मरावे लागेल! राही तर मी सांगेन तथे दूरदेशी रहावयाला तयार हो। उद्या याच वेळी किंवा रात्री येईन तोपर्यंत आपला काय विचार करून ठेवा (दार बंद करून कुलूप लावतो पापडतो)

प्रवेश चवथा

(तात्यासाहेबांचे घर तोड झाकून घेतलेले काही दरोडेखोर)

पहिला दरोडेखोर : तात्यासाहेबांच्या घरात हे दोन घोटाळे झाले नसते तर कमलाकराचा हा बेत यापूर्वीच पार पडला असता. सुशीलेला घरातून पळवून तिला भ्रष्ट करण्यासाठी कमलाकर अगदी फारच उतावीळ झाले आहेता (वरून एक दौर सुटतो) हो पाहा, कमलाकराने दौर तर सोडलाच पण आता पुढे कोण होणार?

दुसरा : कमलाकर आल्याखेरीज वर चढून जाणे धोक्याचे आहे! आतला प्रकार काय आहे हे नीट समजले पाहिजे. घरात कोणी जागे असले

तर पंचाईत व्हावयाची!

तिसरा: पचात कशाची त्यात सुशीलेच्या तोंडात एखादा बोळा कोंबला आणि हातपाय चांगले बांधून टाकिले की तिची धडपड वद झालीचा तिला फुलासारखी उचलून नेऊ! त्यातून दुसरे कोणी आलेच तर त्याचाही समाचार घ्यायला कितीसा वेळ लागणार? (कमलाकर येतो.)

कमलाकर है. लागा आता कामाला अगदी वेळ घालवू नका! दोन दिवस घरात सारख्या भानगडी होत असल्यामुळे सुशीलेने आपल्या खोलीला आतून कडी लावून घेतली आहे! म्हणून तिस-या मजल्यावरून तिच्या खिडकीच्या बाजूने हा दोर सोडावा लागला! आता एकाने

दोराने वर चढून खोलीची कडी काढावी आणि बाकीच्यांनी घरातून वर जाऊन खालीत शिरावे!

दुसरा दरोडेखोर पण वर कोण चढून जाणार? आपली छाती होत नाही! तिसरा दरोडेखोर हट् नामर्दा, हा पाहा मी जातो! चला तुम्ही

आतून! (दौराने चवून जातो.)

कमलाकर शाबास, अगदी आवाज करू नकोसा कड़ी अगदी सावकाश का चला आता बाकीचे माझ्याबरोबर आता किती झटपट आणि चौभाट काम कराल म्हणता याच दाराने परत यायचे (दोर हलवून) दोर ओढून घे! है चला जाता! अगदी भिऊ नका ! (ते सर्व आत शिरतात. शेजारच्या खिडकीतून विद्याघर तोड काढतो )

विद्याधर (स्वगत) काही तरी घोटाळा चालला आहे खास! आता येथे कुजबुजणे ऐकू आले. हा काही झोपेतला भास नाही! काही का असेना आपण सावध असावे हे ठीक अथवा तसेही नको! तात्यासाहेब वगैरे मंडळींना जागे करावे हेच श्रेयस्कर अशा विलक्षण प्रसंगी एकटेच राहणे धोक्याचे आहे! कदाचित सारे लोक आपल्यावर यावयाचे हळूच सर्व मंडळींना जमवून आणावे हेच उत्तम (जातो; इकडून सुशीलेला बांधलेली अशी घेऊन दरोडेखोर येतात.)

पहिला दरोडेखोर चला, चला लवकर चला वेळ घालवू नका! सुशीला भीतीने अगदी बेशुद्ध झाली आहे.

दुसरा दरोडेखोर माझे हातपाय लटपट कापू लागले आहेत!

तिसरा दरोडेखोर भितोस का असा? हा पाहिलास सोटा? चला लौकर

(विद्याधर, तात्यासाहेब वगैरे मंडळी खिडकीजवळ येतात. विद्याधर खिडकीतून उडी टाकून बाहेर येतो)

विद्याधर कोण आहे? हरामखोरांनी थांबा एकदम तेथेचा

तात्यासाहेब ह ह विद्याधर, एकदम पुढे जाऊ नका! (बाहेर येतात. मागाहून कमलाकर, गोकुळ वगैरे येतात )

दुसरा दरोडेखोर अरे बापरे, पळा पळा, टाका तिला

विद्याचर: तिला? कोण आहे ती? गोकुळ, धावा, दिवा आणा लौकरा (गोकुळ जातो. विद्याधर दरोडेखोरावर चालून जातो. त्यांची झटापट होते.)

विद्याधर सोडा, सोडा, तिला नाही तर प्राणाला मुकाला

(सुशीलेला सोडवितो गोकुळ दिवा आणती दरोडेखोर पळू लागतात)

तिसरा दरोडेखोर पण आधी तुझी व्यवस्था करतो! (विद्याचराला सोटा मारती)

विद्याधर (पढ़ता पड़ता) तात्यासाहेब, पाहा कोण आहे ती ?

तात्यासाहेब : (पाहून) कोण? विद्याधर, सुशीलाबाई ही।

विद्याधर : अहाहा! परमेश्वरा, धन्य आहेस तू! तात्यासाहेब, चला लोकर, त्या हरामखोराना का नाही तर ते निसटून जातील!

गोकुळ मला वाटते जाऊ द्यावे त्यांना! कदाचित-

विद्याधर नाही हो चला लौकरा

तात्यासाहेब: नका, नका विद्याधर, तुम्हाला जबर लागले आहे तुम्ही येथे सुशीलेला सांभाळा! आम्ही जाती त्या हरामखोरांच्या मागे (विद्याधर व सुशीलेखेरीज सर्व जातात.)

विद्याधर : (सुशीलेला सावध करून) उठा, सुशीलाबाई, परमेश्वराने तुमचे संकट नाहीसे केले आहे! चला (तिला उठवू लागती. सुशीला एकदम उभी राहते.)

सुशीला नका, नका, विद्याधर तुमच्या हातांचा मला स्पर्श सुद्धा करू नका! मी चांगली सावध आहे! यहा दूस विद्याधर काय? अजून मी दूर होऊ? सुशीले, त्या चांडाळीच्या हातातून ज्या हाताने तुला सोडविले त्या हाताचा स्पर्श नको म्हणतेस? त्या

हातापेक्षा हा हात अधिक पापी आहे काय?

सुशीला त्या हाताचे पाप अज्ञात तरी आहे? पण या हाताचे पाप मला चांगले माहीत झाले आहे।।

विद्याधर वा चांगली कृतज्ञता ही! तुमच्यासाठी आपले प्राणही संकटात घालणाराला या कठोर शब्दांचे बक्षीस!

सुशीला तसा प्रसंग आला तर तुमच्या प्राणासाठी मी माझेही प्राण आनंदाने देईना पण प्राणीच्या मोबदल्यात माझ्या पातिव्रत्याची अपेक्षा करिता? भलत्या बक्षिसाच्या मागणीने तुमचा हा परोपकार नुसता स्वर्थी दिसून येत आहे!

विद्याधर काय? प्राणाच्या मोलाने केलेला हा परोपकार स्वार्थी ?

सुशीला हो, हो! दुष्ट पार्श्वभूमीवर सुंदर चित्र सुद्धा भेसूर दिसते! तुमची मागची वर्तणूक आजच्या परीपकाराची किंमत कवडीमोल

ठरवितो हा निव्वळ स्वार्थ आहे!

विद्याधर: सुशीले, चंद्राच्या शुभ्र बिंबावर एकच कलंक त्याची शोभा वाढवितो; त्याप्रमाणे माझा त्या वेळचा एकच अपराध इतर निष्कलंक 1 वर्तनामुळे चांगलाच का बरे वाटू नये?

सुशीला : तुमचा मागचा अपराध शुभ्र बिबावरचा कलक नाही, पण आताचा परोपकार मात्र काळ्याकुट्ट मेघपटलावरचा विजेचा भयानक चकचकाट आहे. तुमचे काळेकुट्ट अंतःकरण मात्र त्याने चांगले दिसून येते! पण हे बोलत बसण्याची ही वेळ नाही. या आजच्या उपकाराबद्दल योग्य रीतीने उतराई होण्यासाठी, तुमच्या पापवृत्तीची तुम्हास क्षमा करण्याबद्दल मी देवाची विनवणी करीन! परमेश्वर तुमचे मन शुद्ध करो!

नको, मला तुमचे साह्य आता नको आहे. जाते मी.

विद्याधर (स्वगत) शाबास! सुशीले, शाबास! अशा प्रसंगी तू स्वार्थी म्हणालीसा पण अशा अमोल बक्षिसाची हक्काची आशा असल्यावर

यापेक्षाही भयंकर साहस कोण करणार नाही? (जयंत येतो) कोण, जयता बाकीची मंडळी कुठे आहेत?

जयत: विद्याधर, माझ्यासारखा दुर्देवी मीच. सर्व मंडळीची गडबड ऐकून मी जागा झाला आणि त्या चोराचा तपास करण्यासाठी, मंडळीच्या

मागोमाग धावत गेली! पण तेथेही त्या जगनिंदकाने आपला डाव साधला!

विद्याधर कोणी?

जयंत माझी खात्रीची समजूत आहे की, कमलाकराना मला यायला थोडासा वेळ झालेला पाहून त्याने संशयाच्या स्वराने तात्यासाहेबांना विचारले की, सर्व मंडळी तर इथेच दिसतात, मग तो दोर आधी कोणी सोडला असावा? आणि इतके बोलून त्या सापाने आपली विषारी नजर माझ्याकडे फिरविली ! हलक्या कानाच्या तात्यासाहेबानाही-

विद्याधर तसाच संशय आला काय?

जयंत पण त्यांनी तो बोलून दाखविला नाही रागाच्या स्वराने मला तात्यासाहेबांनी मागेच रहायला सांगितले हे काय थोडे झाले? विद्याचर

या कमलाकराने माझ्याबद्दल मामांचे मन जगदी गढूळ केले आहे! करू का एकदा मामांची चांगली कानउघाडणी?

विद्याधर : छे, छे, कानउघाडणीची ही वेळ नव्हे । हलक्या कानांचा मनुष्य एकदा एक बाजूने वाहवू लागला म्हणजे दुस-या बाजूकडे त्याची दृष्टी शुद्ध भावाची राहत नाही काळ हाच अशा प्रसंगी खरा प्रकार कळवितो! आज तुमचे निकराचे बोलणे त्यांना ढोगाचे वाटेल!

जयंत तर काय या निंदकाचे वाग्वाण असेच सहन करीत बसावे?

विद्याधर त्याला उपायच नाही! आपण खवळून आपल्या निंदेचे उत्तर देऊ लागलो तर रागाने निघालेल्या आपल्या शब्दावर जग विश्वास तर

ठेवीत नाहीच; पण त्याचा फायदा त्या निंदकाला मात्र मिळतो. आपल्या रागाच्या भरात आपल्याला आपल्या वर्तनातल्या बारीकसारीक

गोष्टीचे समर्थन करण्याचे भान रहात नाही आणि कदाचित राहिलेच तरी अनेक बाबतीचे एका वेळीच केलेले समर्थन लोकांना

हजरजबाबीपणाचे आणि कादंबरीसारखे वाटते! उलट निदक त्या त्या गोष्टींना योग्य वेळीच आपल्या मनाचा रंग लायीत असतो आणि

त्याच्या शातवृत्तीमुळे लोकांच्या त्या नजरबंदीवर भरवसाही बसतो..

जयंत पण लोकांनी अशा बातम्यांची चौकशी का करू नये?

विद्याधर जो तो आपल्या भानगडीत दंग असल्यामुळे दुस-याची इतकी चौकशी कोण करीत बसतो? तमासगीर जग केवळ टळक गोष्टीकडे चालता चालता पहात असते. आपणच सशयाला जागा न देणे हा एकच सुरक्षित मार्ग आहे.

जयत: अरेरे, तुमच्या या सा-या कडू सत्याचा मला अक्षरशः अनुभव येत आहे! लीलेच्या बातमीने माझ्या दुलौकिकाचा पाया घातला,

मनोरमेने काळे करून त्यावर इमारत उभारली आणि आता ही सुशीलेची बाबत त्यावर कळस चढविणारा! विद्याधर: जयंत लीलेच्या तुमच्या बाबतीत लोकांनी तुमचा संशय का घेऊ नये? अशा बाबतीत शद्ध प्रकारांवर सुद्धा लोक हेतूची स्थापना करितात. मनोरमेबद्दलच्या तुमच्या तिरस्काराने या अफवेला दुजोरा मिळतो! काही कारण दिसत नसताना तुम्हाला मनोरमेचा तिटकारा आला तर लोकाना तो खरा कसा वाटेल!

जयत: विद्याधर त्या तिटका-याचे कारण लोकांपुढे चवाठ्यावर मांडावे कसे? आणि लोकाना ते खरे वाटावे असे? विद्याधर लहानपणापासून स्त्रीबद्दल मी एक मनोरथाचे सुंदर चित्र काढून ठेविले होते! मी मनोवृत्तीचा गुलाम असल्यामुळे म्हणा, किंवा प्रेमसाम्राज्याची काल्पनिक वर्णने वाचल्यामुळे म्हणा, माझ्या कल्पनेतली माझी भावी स्त्री एखाद्या कादंबरीतल्या नायिकेसारखी होती! पण मनीरमेच्या एका क्षणाच्या अनुभवाने त्या सुंदर चित्राचे तुकडे तुकडे केले! तिचे पहिलेच बोलणे माझ्या मनाला विषासारखे वाटून मला तिचा वीट आला! ते बोलणे कशा प्रकारचे होते ते स्त्री-पुरुषांच्या रहस्याच्या किल्ल्यात आहे!

विद्याधर अरेरे! तुमच्यासारख्या आत्यंतिक वृत्तीच्या माणसावर मनोभंगाचा असा भयंकर परिणाम व्हावा हे साहजिक आहे! पण जयंत, लोकमर्यादेसाठी तरी तुम्ही तुमचा तिटकारा झाकून ठेवला पाहिजे होता !

जयंत: विद्याधर, आत एक. बाहेर एक असा मुळीच साधत नाही! एक वेळ जो मनोभग झाला तो झाला! पुढे मनोरमेच्या अफाट बोलण्यामुळे माझा तिरस्कार प्रतिक्षणी वाढत जाऊन तिच्या सौदर्याचीही उत्तरोत्तर मला किळस येऊ लागली! विद्याधर, क्षमा करा! तुम्हाला मी वडील भाऊ समजून मोकळ्या मनाने बोलतो. संसार म्हणजे स्त्रीसुखआवर उभारायचा आणि स्त्रीसुख म्हणजे केवळ पशुवृत्ती नव्हे! लहानपणापासून उराशी बाळगलेली काव्यमय कल्पना ऐन फलप्राप्तीच्या वेळी अशी समूळ नाश पावल्यामुळे मी संसाराविषयी अगदी उदास झालो! वाटेल तशा तोंडाळ स्त्रीला वागवून घेण्याची साधुवृत्ती माझ्यात नाही हे माझे मलाच कळते आहे! आणि या घटकेला तर त्याची इतकी ओकारी आली आहे की, उद्याच्या उद्या मी देशत्याग करणार! नको हा लोकापवाद आता!

विद्याधर : छे, छे, असे काही अविचाराने करु नका! लोकापवाद आपोआप निवळेपर्यंत त्याला धैर्याने पाठ दिलीच पाहिजे! तुम्ही निघून गेलात तर तुमच्या निंदकांना चांगलेच फावेल!

जयंत निदान या घरात राहणे तर शक्यच नाही!

विद्याधर: ठीक आहे उद्या परवा दुसरीकडे कुठे तरी जागा पहा! पण एकदम असे त्रागा करून लोकाच्या संशयाला जागा करून देऊ नका! घर सुद्धा एकदम सोडू नका! मला मात्र उद्याच्या उद्या या घराचा आश्रय सोडिला पाहिजे. घरात एकामागून एक घोटाळे चालत असताना माझ्यासारख्या ति-हाइताने इथे राहणे कोणालाच हितकर व्हायचे नाही. मला कमलाकराने जागा पाहून देण्याचे वचन मागेच दिले आहे!

जयंत तुम्ही सुद्धा जाणार तरी मग मी एकटा या सापाच्या-

विद्याधर: जयत, तुम्ही हा उतावळा स्वभाव हळूहळू सोडीत चला तोच तुमचा नाश करती!

जयंत: आणखी काय नाश करणार आता! एकवार बिचा-या लीलेची भेट घेऊन तिचे शेवटचे समाधान करितो आणि या शहराचा कायमचा निरोप घेतो! पण चला, आपल्याला या बाबतीबद्दल बोलताना कोणी ऐकले तर आणखी तुमची बेअब्रू व्हावयाची!

विद्याधर शाबासा अशीच सावधगिरी प्रत्येक बाबतीत ठेवा म्हणजे झाले.

प्रवेश पाचवा

(भूतमहाल, कमलाकर प्रवेश करतो.)

कमलाकर अहाहा! या वर्षाकालीन संध्यासमयाची किती भीषण रमणीय शोभा ही गगनमार्ग चालण्याच्या श्रमाने उरी फुटल्यामुळे सूर्यानि रक्ताची गुळणी टाकून नुकताच प्राण सोडिला आहे; रक्ताने भरलेल्या या त्याच्या मृत्युशय्येवर हा सोसाट्याचा वारा बगाचा शेणगोळा फिरवित आहे! इकडे मरता मरता सूर्याने मारलेल्या हृदयभेदक भाल्यानी झालेली इंद्रधनुष्याची जखम अजून पुरतीशी भरून आली नाही म्हणून हे कृष्णमेघ थोडे अश्रू गाळीत आहेत. दक्षिणेकडे एकटाच चमकणारा हा अगस्तीचा नारा मृतशखेजवळच्या दक्षिणमुखी समईची साक्ष पटवीत आहे! आणि भिजण्याच्या भीतीने घरट्यांकडे धावणारे हे पक्षी मित्राच्या स्मशानयात्रेनंतर स्नान करून ओलेत्याने त्या दिव्यांचे दर्शन घेऊन घरोघर जात आहेत असे वाटते! रात्री माजणा या पापाच्या च्खलाची हा पायाखालचा चिखल प्रस्तावनाच करीत आहे! अशा वेळी मनुष्याची स्वभावसिद्ध पापवासना अनावर होऊन बाहेर येऊ पाहते यात नवल ते काय? वाहवा झाले! दिवसाची तोंडमिळवणी करताना तात्पुरती आणलेली नीची लाली नाहीशी करून रात्रीने आपले खरे कृष्णस्वरूप दाखवावयास सुरुवात केली आहे! अंधारा भयाण अंधारा या भयाण पार्श्वभूमीवर भयानक मृत्यूचे उग्र चित्रच खेळावयास पाहिजे! या प्रसंगी या भूतमहालाजवळ फिरकण्याची साक्षात भूतांची सुद्धा छाती होणार नाही बिचारी दुमन आत भयाने अगदी मेल्यापेक्षा मेली होऊन गेली असेल! चला, आता आत जावे म्हणजे चित्राबद्दल माझी कल्पना थोडी तरी खरी झालेली पहावयाला मिळेला पण हा चोरकदील काढून मग दरवाजा उघडावा! खवळलेल्या वाघिणीच्या पिंज-यात एकदम उडी घालून उपयोग नाही!

(पोरकंदील काढून त्याच्या प्रकाशात दरवाजाचे कुलूप काढतो व दार उघडतो तोच दरवाज्यात टांगलेले दुमनचे प्रेत दृष्टीस पडते कमलाकर

दारातून त्यावर सारखा प्रकाश पाहून पाहतो.)

कमलाकर (मोठ्याने हसून स्वगत) वाहवा! माझ्या लाडकीने माझी कल्पना अक्षरशः खरी केली म्हणावयाची! द्रुमन, अखेर अशा रीतीने मेलीस ना! किती सुंदर आणि भयानक चित्र है। या भयानक सौदर्याला अलिंगन देण्यासाठी हे चाह कसे पुढे धाव घेतात! पण हिच्या प्रेताच्या आणखी जवळ गेलो तर बिनवारशी गालाच्या चुंबनाचा मोह आवरणार नाही; आणि इतक्यातच अशा रीतीने मृत्यूशी तोंडओळख करून घ्यावयाची माझी तयारी नाही पण असे दूर राहून काय उपयोगा पुढच्या तजविजीचा विचार केलाच पाहिजे (तिच्या तोंडाजवळ दिया नेतो.) चेहे-यावर किती भयकर निराशा पसरली आहे ही है, समजलो! जन्मभर सारखा ज्याचा ध्यास केला तो परमेश्वर खरोखरीच नाही, अशी मरणानंतर खात्री झाल्यामुळे ही आत्म्याची अंतकाळची निराशा तर प्रेतावर पसरली नसेल ना? बोल, दुमन, बोल, खरोखरीच ईश्वर नाही ना? बोल, या भेसून तोंडाने काळ्या पडलेल्या, पथर झालेल्या जिभेने नास्तिकपणाचा एक तरी शब्द बोल का तुझ्या सौदर्याचा अनादर करितो म्हणून रागावलीस? खरेच द्रुमन, गळफासामुळे साकळलेल्या रक्ताने हे एक वेळचे गुलाबी गाल असे काळे पडले नसते तर त्याच्या चुंबनाचा सन्मान मी खात्रीने केला असता! पण हे काय? या तारवटलेल्या डोळयाकडे माझी दृष्टी सारखी का बरे लागत आहे? बोल, द्रुमन, या थिजलेल्या डोळ्यांच्या काचातून, मरताना तुझ्या मस्तकात भिनलेली कृतान्ताच्या कुरतेची चित्रे दाखवून मला काही अमानुष विचार शिकवणार आहेस का? अहाहा! असे असेल तर हा पाहा सारखा तुझ्या डोळ्यांकडे टक लावून पाहतो! (काही वेळ तदस्थ उभा राहतो.) आहे. डोळ्यात राक्षसी जादू आहे खासा हे पाहा. भयकर विचारानी माझ्या डोक्यात थैमान घालविले आहे! बसा, ठरले, असेच करणार या लाकडी प्रेताचे तुकडे तुकडे करून आणि हा तोंडाचा पडदा न ओळखता येण्याजोगा छिन्नविछिन्न करून पेटीत भरतो! ती पेटी तात्यासाहेबांच्या घरी मागल्या बागेतल्या विहिरीजवळ ठेवितो लौलेची शेवटची भेट घेण्यासाठी धडपडणा-या जयताला गफलतीने उद्या रात्री त्याच वेळी नेमका तेथे आणतो आणि देतो जाऊन सरकारी शिपायांना वर्दी म्हणजे झाले! लीलेच्या नावाचे खोटे पत्र जयताला देण्यासाठी गोकुळची योजना केली म्हणजे घोटाळ्याला तोटा नाही, मनोरमेची डब्यात राहिलेली ही पेटी कोणाला पत्ता लागू नये म्हणून येथे आणिली, तिचाच या कामी उपयोग कराचा आणि भरतीला तिचे काही दागिने टाकावे म्हणजे भरपूर पुरावा झाला. याशिवाय जयंताच्या बायकोबद्दल तिटका-याचीही हवी तितकी मदत होईल. मनोरमा मेली हेही कोणाला ठाऊक नाही आणि द्रुमन मेली हेही कोणाला ठाऊक नाही त्यामुळे हा हा म्हणता जयताने मनोरमेला मारिली याबद्दल सर्वांची खात्री होईल! आता या प्रेताचे तुकडे मनोरमेच्या पेटीत भरले की झाले काम विद्याधरावर वार करणारा तो पद्माकराचा दरवडेखोर, अगदी उरफाट्या काळजाचा आहे. त्याचा ही पेटी नेण्यात चांगलाच उपयोग होईल! आज ही व्यवस्था करून उद्याच जयताला लीलेच्या नावाचे एक पत्र पोचवितो. या जगात मुर्खपणाचे मासले असे विलक्षण घडून येतात की, आपल्याला पायापासून उभारणी करीत बसण्याचे कारणच नाही आपोआप घडत जाणा-या गोष्टीच्या परिणामाचा औष आपल्या हिताकडे वळविला म्हणजे झाले! चल दुमन, तुझ्या बर्खपणाचा मी कसा फायदा घेती पाहा? पण हे तुझ्या हातात काय? पत्र कशाचे बुवा हे (वाचून पाहतो) वा मनोरमेची जाणि आपली सारी हकिकत लिहिली आहे यात! शावासा द्रुमन, ही तुझी सावधगिरी अशी जगाच्या दृष्टीआड लपवून टाकितो!

(पत्र पैशाच्या पाकिटात ठेवती दार आतून लावून घेतो.) (पडदा पडतो)

प्रवेश सहावा

70

(विद्याधर व गोकुळ बोलत येतात.)

गोकुळ हे पाहा प्रत्यक्ष बाबासाहेबांचे पत्रा यात त्यांनी लीलाताई आणि सुशीलाताई यांना मनास वाटल्यास खुशाल पुनर्विवाह करण्याची स्पष्ट परवानगी दिलेली आहे. विद्याधर, एका यकश्चित् बालविधवेने आपले पोर मारिले हे पाहून बाबासाहेबासारख्या पोक्त मनुष्याने आपले मत बदलावे ही केवढी नामोशीची गोष्ट आहे.

विद्याधर : मग यात गैर काय झाले? असा ददयद्रावक देखावा पाहून कोणाचे मन बदलणार नाही?

गोकुळ असे म्हणण्यात काही अर्थ नाही! अहो, पूर्वीच्या ऋषींनी अशा प्रकार पाहिला असता तर त्यांनी आपले मत बदलले असते का?

विद्याधर त्याचे मत उलट दूढ झाले असते!

गोकुळ है, तेच मी म्हणती

विद्याधर नाही. तुम्ही भलतेच म्हणत आहा गोकुळ पूर्वीचे ऋषी खरोखरीच पुनर्लग्राला समती देऊन गेले आहेत आपल्या ऋषिप्रणीत आर्यधर्माने विधवांना अशी आडकाठी मुळीच ठेवलेली नव्हती. त्याच्या तेजोमय उदारतेवर ही सारी रुढीची राख्दी जमली आहे. अशा राक्षसी स्वीला मान देणे म्हणजे जुन्या मताचा अस्थानी अभिमान केल्यासारखे होईल. गोकुळ : वा! स्वीला मान द्यावयाचा नाही तर काय एखाद्या चवचाल माणसाच्या लहरीला मान द्यावयाचा? सुधारणा म्हणजे साहेबी चार करण्याचा परवाना! शिकलेल्या पण बहकलेल्या माणसाच्या मोकाट कल्पनेची लहर रूढी समाजाचा जीव आहे!

विद्याचर छे छे. मी तर उलट म्हणतो की, स्त्री म्हणजे समाजाचा निर्जीवपणा आहे। परिस्थिती बदलली की समाजबंधनात सुधारणा ही

झालीच पाहिजे. मनुष्याला पूर्णत्वाचा पल्ला गाठण्यासाठी नेहमी पुढे चाल करीतच गेले पाहिजे. सर्वतोपरी स्वीच्या बंधनांनी चालणारा- चालणारा कसला जखडलेला समाज मृतवतय समजला पाहिजे.

गोकुळ आम्हाला कोणत्याही सुधारणेची गरज नाही मी तर आजकालच्या एकापेक्षा पूर्वीच्या पूज्याची किंमत जास्त समजतो. सुधारणा करण्याचा आव घालणे म्हणजे पूर्वजांना मूर्ख म्हणण्यापलीकडे काही नाही.

विद्याधर: प्रगमनशील पूर्वजांना मूर्ख म्हणण्याइतके पातक दुसरे कोणतेच नाही,

गोकुळ झाले तर मग त्यांनी पाडून दिलेल्या प्रपाताला नावे ठेवणे म्हणजे त्यांना मूर्ख म्हणण्यासारखेच नाही का?.

विद्यार: मुळीच नाही. त्याचे ते प्रघात त्याच्या काळाला अनुरूप होते; पण आपण त्याच्यापुढे जावयाला नको का? प्रतिक्षणी पुढे पाऊल टाकीत आल्यामुळेच आमच्या पूर्वजाना भटक्या राहणीला सोडून, सुस्थिर समाजाची स्थापना करिता आली ना? त्यांना पूर्वज नव्हते का? गोकुळ, अशा सुधारणाप्रिय पूर्वजांचे खरे अनुकरण त्यांच्याप्रमाणे सारखी पुढे चाल करीत गेल्याने होणार, की ठरावीक आणि अयोग्य रुढीने शेकडो वर्षे मिठी मारून बसल्याने होणार?

गोकुळ हे म्हणणे दिसावयाला सयुक्तिक आहे; पण याचे खंडण सहज करता येईल कालय मी हिंदूधर्म आणि सुधारणा' हे पुस्तक वाचले

त्यात स्पष्ट म्हटले आहे की मला आता आठवत नाही आणि ते म्हणणे इथे तितके लागू पण होणार नाही. शिवाय, आपण वादाच्या मुख्य

मुधापासून बरेच घसरलो आहो! मूळ बोलणे कशावरून निघाले बरे? तुम्हाला जाठवतो का?

विद्याधर बाबासाहेबांवरून

गोकुळ हो खरेच आता आठवले सारे काय बरे केले त्यानी?

विद्याधर तात्यासाहेबांना पत्र पाठविले

गोकुळ : खरेच की हो; आणि हे पत्र सुद्धा माझ्या हातात, तरी विसर पडला त्याचा! बाकी हे विसरभोळेपणामुळे नाही झाले! मी आठवीत होतो दोन्ही गोष्टी एकदम त्या पुस्तकातले म्हणणे आणि आपल्या वादाचा विषय! तेव्हा कसे समजणार ते? हो, दोन दोन डोळे असून एका

वेळी माणसाला काही दोन निराळ्या गोष्टी पाहता येत नाहीत; मग एका स्मरणशक्तीने दोन हरपलेल्या गोष्टीचा पाठलाग कसा होणार?

विद्याधर बरे हे पत्र घेऊन चालला होता कुठे त्याची तरी आठवण आहे ना?

गोकुळ वा! म्हणजे काय झाले! इतका मी विसरभोळा आहे वाटते? हे पत्र लीलाताईजवळ नेऊन द्यायला पण नाही मला वाटते हे दुसरे

जयंताचे पत्र लीलाताईंना द्यायचे आणि हे बाबासाहेबांचे पत्र कमलाकरीना- अंहंत सेन नव्हें कमलाकरांचे पत्र जयतांना द्यायचे पण कमलाकरांचे पत्र आहे कुठे आधी हे लीलाताईंनी जयताला लिहिलेले पत्र कमलाकरांनी जयाजवळ देण्यासाठी मजजवळ दिले पण हेच

त्यांनी दिले का तात्यासाहेबाना आलेले हे पत्र लीलाताईंना देण्यासाठी त्यांनी काय बरे?

विद्याधर गोकुळ आता हा विचार राहू द्या जरा डोके स्थिर असताना तुम्हाला एखादी सरळ गोष्ट सुद्धा आठवत नाही आणि आता तर तुमचे डोके या वादाने तापलेले तशातून बाबा काही सरळ नाही. दोन तीन पत्रे आणि पाच सहा नावे एवढ्यांच्या चक्रव्यूहातून तुम्ही कसले बाहेर पडता!

गोकुळ : चला, कमलाकरांनाच भेटून त्याचा निकाल करून घेऊ!

विद्याधर : कमलाकरांनाच विचारावयाचे हे तरी नीट लक्षात ठेवा नाही तर पुन्हा मी दृष्टीस पडलो तर माझ्यावरच चौकशीचा मारा सुरू

कराला

गोकुल : भलतेच इतकी साधी गोष्ट सुद्धा विसरतो की काय? चला (जातात.))

प्रवेश सातवा

(डोक्यावर पेटी घेऊन दरोडेखोर व मागाहून हातात द्रुमनचे डोके घेऊन कमलाकर भीतभीत प्रवेश करतात. तात्यासाहेबांच्या घरामागील बाग)

कमलाकर : हं ठेव ती पेटी विहिरीजवळ! अस्से! आता जाऊन सांगितल्याप्रमाणे शिपायाना कोणाकडून तरी सावध करीवा है, ही घे तुझी मजुरी! एवढ्याशा कामगिरीबद्दल ही शंभर रुपयाची नोट आता ही गोष्ट कोठे फुटणार नाही ना? (पाकिटातून घाईने त्याला कागद देतो.)

दरोडेखोर छे छे रावसाहेबा आपल्यासारख्याच्या जिवावर आमच्या सा-या उडया! ही गोष्ट आता यापुढे माझी मला सुद्धा समजणार नाही.

पण शंभराची नोट आहे ना? नाही तर दहाबिहाची असेल-

कमलाकर:  जा, जा, शंभराचीच आहे. मी दुस-या नोटा बाळगीतच नाही! चल, पळ, आपल्या कामाला लाग (एकीकडून दरवडेखोर जातो. दुसरीकडून जयंत येतो.) सावज तर ठरल्याप्रमाणे आले; आता काही वेळाने हा दगड विहिरीत टाकून आपण दूर व्हावे म्हणजे आपोआप स्वारी इकडे येईल! (पेटीवर द्रुमनचे डोके ठेवितो)

जयंत: (स्वगत) वर मेघांचा गडगडाच चालला आहे: मधून एखादा दुसरा विजेचा चमकारा होतो आहे, क्षणिक उजेडाच्या लकाकीने काळोख दुणावतो आहे; पण या विमनस्क स्थितीत मला या सर्व प्रकारचे काहीच वाटत नाही! लीलेने बोलविल्याप्रमाणे आलो तर खरा! आता एकदा तिचे शेवटचे समाधान करितो आणि घेतो या कंटाळवाण्या संसाराची रजा ! झाला हा संसाराचा अनुभव पुरे झाला! पण अजून लीला का येत नाही? (कमलाकर विहिरीत दगड टाकून निघून जातो; जयंत दचकतो) पावले वाजून कसला बरे विहिरीकडे आवाज झाला? घाईने येताना अधारामुळे लीला चुकून विहिरीत तर पडली नाही ना? (विहिरीजवळ जातो) अंधारामुळे काहीच दिसत नाही; पण ही पेटी कसली? आणि तिच्यावर हे काय? हाताला केस कसले लागताहेत? शिपाई धावा, धावा, रावसाहेबा घरात चोर शिरला आहे! धावा!

जयंत कोण आहे? अरे, मी चोर नाही!

शिपाई :  चोर नाही तर कोण चोराचा बाप (मंडळी आतून पाहतात लीला, सुशीला वगैरे; तोच वीज चमकते.)

जयंत : अरे बापरे! हे काय माझ्या हातात!

शिपाई : अरे बापरे! हा तर खून!

जयंत पण केला कोणी?

शिपाई : तूचा

जयंत:  काय मी? हा दुर्दैवा! (वीज चमकते. पडदा पडतो.)

Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
2
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा