shabd-logo

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023

16 पाहिले 16

प्रवेश पहिला


( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)

यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !

रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !

यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बाई तुमचा! माधव भावोजी आता इकडे मुळीच यायचे नाहीत.

रमा: त्याचा कुणी नेम सांगावा जर येणे झाले तर आणखी संतापायचे होईल! काही नाही तर आज सातआठ वर्षे नाव टाकिले आहे; मग संतापाला कारण मिळाल्यावर तर काय होईल नी काय नाही ? म्हणून म्हणते, अजून चला माघाच्या !

यमुना: काही होत नाही नी जात नाही! मला इकडून अगदी चांगले सांगणे झाले आहे की माधवदादाला बाबांच्या जवळ बसवून ठेवितों, घरातील सारी माणसे तिचेच बसली आहेत, तेव्हा जाता रमावहिनीला नेऊ न सारी जागा दाखीव म्हणून! आता तर झाले ना ? आणखी मी सुध्दा येताना पाहिले तर माधवभावोजी मामजींच्या पायाला तेल चोळीत बसले आहेत! ते काही इतक्यात इकडे येत नाहीत !

रमा: खरेच, मामंजींची तब्बेत एकदोन दिवसात इतकी कशी बरे बिघडली? पुण्यास बरे होते ना अगदी ?

यमुना: अहो, बिघडली कशाची? वसंतदादाची आणि इकडची सारी खटपट वसंतदादाने दिलेले कसलेसे औषध इकडून मामंजींच्या तळपायाला लावायचे झाले त्याचा मामंजीच्या पायात आला बळघा झाले, पिलंभटाने मेलेला उंदीर घरात टाकलाच होता, मामजींना आणखी ते काय हवे ! लागलीच ते घायकूत होऊन बसले! एकदा त्यांच्या मनात संशयाने घर घेतले की, झाले ! इकडचा सूर्य तिकडे होईल पण त्यांचा संशय काही दूर व्हावयाचा नाही!

रमा: पण इतके करून पुढे काय करायचे ते नाहीच सांगितले मुळी!

यमुना: अहो, ते सारे सांगत बसले तर भारत होईल आणि इथे तर कुडालासुध्दा कान फुटायचे! वेणू वन्संनासुध्दा यातले अगदी अवाक्षर माहीत नाही. त्या आहेत हळव्या मनाच्या फटदिशी बोलून जायच्या वसंतदादाच बैरागी होऊन येणार आहे हे सुध्दा त्यांना ठाऊक नाही.

रमा: वसंतरावांचे करणे तरी अघटितच बायकोसाठी बैरागी होणार?

यमुना: आणि बैराग्यासाठी बायको आणणार हे नाही म्हटलेत कुठे बरे, ते राहू दे सध्या आले पायापुढचे पाहिले म्हणजे पुरे झाले. ही पाहा दाराची कडी बाहेरच्या बाजूने या बिजगऱ्या खिळखिळ्या केल्या आहेत. त्या फिरविल्या म्हणजे कोयंडा मोकळा होईल. तो तुटला की कसे बोलायचे हे काही सांगायला नको भिऊबिऊ नका म्हणजे झाले!

रमा: काय होईल ते खरे माझे मन आपले सारखे मागते पाऊ ल घेते..

यमुना: अहो, होणे जाणे दैवाधीन प्रयत्न आपल्या हाती, तेवढा करून पाहावयाचा झाले. चला आता सांगितलेले नीट लक्षात ठेवा,

(जातात.)




प्रवेश दुसरा

(पिलंभट व वैराग्याच्या रूपाने वसंत प्रवेश करितात.)

पिलभट: मग काय, इतक्यातच हा वेड्यांचा बाजार आटोपता घ्यावयाचा म्हणता ?

वसंत: अजून सुध्दा इतक्यातच का ?

पिलंभट: म्हणजे मला जारीची जुळवाजुळव करावी लागणार ?

वसंत: त्याला कसे करायचे ? गरज आपल्याला आहे ना ?

पिलंभट: बरे मग सांगा पाहू काय काय करायचे ते ? या गडबडीत मी पूर्वानुसंधान बरेचसे विसरून गेली आहे. आधी आता काय करायचे

?

वसंत: अधीमधी असे काही नाही. संधी सापडेल तसतसे एक एक काम हातावेगळे करायचे. तो नाटकी बाळाभाऊ आहेना, त्याच्याकडून आता एक दोन दिवसात पत्र येईल की मला काही वेणूशी लग्न करावयाचे नाही म्हणून!

पिलंभट: ते कशावरून आणि का? P

वसंत: त्याचा खुलासा मी सावकाशीने करीन सच्या तुम्ही असे पत्र खात्रीने येणार एवढे धरून चाला आणि हे यशोदाबाईंजवळ देव खेळविताना सांगा; तात्यासाहेबाजवळ भविष्यकथनाच्या नात्याने सांगा; वाटले तर माधवरावाजवळ त्रिकालज्ञानाच्या धोरणाने सांगा.

पिलंभट: आणि एखादे वेळी बाळाभाऊ चे असे पत्र न आले म्हणजे ताडदिशी माझ्या पदरी खोटेपणा यायचा!

वसंत: पिलंभट, तुम्हाला खोटे पाडण्यासाठी का आम्ही या खटपटी करीत आहोत ? अहो, उलट हे तुमचेभविष्य दोन दिवसांनी अचूक खरे ठरले म्हणजे तुमचा या लोकांत बोज मात्र वाढेल! पिलंभट : मग काही हरकत नाही; अशी खात्रीने घडून येणारी भविष्ये मला जरूर सागत चला म्हणजे पहा मी कशी किफायतवार विकतो
ती अशी भविष्ये माझा हातखंडा आहे अगदी !

वसंत: पण ऐन वेळी जिभेला खंड पडू देऊ नका म्हणजे झाले. नाही तर आयत्या वेळी कचराल. र25 कराल आणि सारेच रस्त्यावर आणाल !

पिलंभट: ती धास्तीच सोडून द्या! असा आडरस्त्याने वावरण्यात मी अगदी पटाईत झालो आहे; अहो, आता तुमच्याजवळ म्हणून आपले बोलायचे हा जो द्रव्याचा ओघ माझ्या घराकडे चालला आहे हा का सरधोपट मार्गाने वाहतो आहे वाटते मुळीच नाही; निव्वळ
आडवळणानी.

वसंत: बरे, ते असो. पुढे दुसरी गोष्ट. तात्यांच्या जवळ वेणूची पत्रिका आहे; ती काही ते कोणाच्या नजरेस पडू देत नाहीत. तेव्हा कशा तरी गफलतीने ती पत्रिका तेवढी हस्तगत करून घ्यावयाची निदान तिची नक्कल तरी करून घ्यावयाचीच आणि आपल्या ओळखीच्या एखाद्या ज्योतिषाजवळून तिच्याशी बरोबर जमेल अशी एक पत्रिका माझ्यासाठी या माझ्या संन्याशी नावासाठी करून आणावयाची आले लक्षात ?

पिलंभट: लक्षात आले, पण पटले नाही इतके, आता तुमच्या या कारवाया आणि युक्त्या पाहून मी अगदी सर्द झालो आहे खरा; पण ही युक्ती नाही आवडली मला हे सारे तात्यासाहेबांना तुमची पत्रिका वेणूतार्हच्या पत्रिकेशी जमते एवढेच भासविण्यासाठीच ना ? मग असे केले तर नाही का चालणार ? त्या बाळाभाऊची कुंडली तात्यासाहेबांना पसंत आहेच तिचीच जवळ जवळ नक्कल करून घेतली म्हणजे झाले की नाही?

वसंत: ठीक आहे कसे तरी करून पत्रिका जमवा म्हणजे झाले नाही तरी वैराग्याला मुलगी देतेवेळी पुनः वसंताचेच नशीब आह यावयाचे बरे, हे एक ठरले तसेच मी अण्णासाहेबाना औषध द्यायला उद्यापासून सुरू करणार तेव्हा आधी त्याच्याजवळ माझ्या वैद्यकीच्या ज्ञानाबद्दल स्तुती करा, तात्यासाहेबाभोवती कौतुकाचे जाळे पसरा आणि माधवरावांजवळ माझ्या योगसाधनेची तारीफ करा. मी तुमचा गुरु आहे असे सांगा म्हणजे प्रत्येकाचा तुमच्या सांगण्यावर विश्वास बसेल. घटकाभर मला गुरु माना म्हणजे झाले

पिलंभट: गुरु मानायला कशाला पाहिजे? तुम्ही खरोखरीच माझे गुरू झाला आहा मला हा लप्पन छप्पन करण्याचा थोडासा नाद पहिल्यापासूनच होता. आणि त्याबद्दल मी माझ्या मनात अगदी मग्र असे. पण तुमची व मधुकराची शिकलेली कुलंगडी पाहून मी अगदी चीत झालो आहे. आम्ही दशग्रंथी लिहिलेली माणसे या तुमच्या करामती पुढे कुचकामाची ठरतो. आमच्या दशग्रंथीची सूत्रे ताणून धरली तरी त्यांचे असे सर्वस्वी गुरफटणारे जाळे होणे शक्य नाही. या बाबतीत तुमचा शिकला सवरलेला हात धरण्याची आम्हा दशग्रथ्याची शहामत नाही. तुमचे पायच धरावयाला पाहिजेत. माझ्या गावचे पाणी पाणी होऊन मी कधीपासून आपल्याला गुरुस्थानी मानायला लागली आहे.

वसंत: झाले तर मग या भावनेनेच माझी सर्वांजवळ स्तुती करीत सुटा बाळाभाऊचे पत्र आले म्हणजे आम्हा गुरुशिष्यांच्या जोडीवर बऱ्याच जणांचा विश्वास बसेल; नंतर अण्णासाहेबांचा हा आम्हीच उभारलेला आजार कमी होत चालला की यशोदा बाईंच्या मनात मुलगी देण्याचे भरवून द्या म्हणजे आटोपले बाळाभाऊने वेणूशी लग्न करण्याचे नाकारले म्हणजे वचनमुक्त झालेले अण्णासाहेब माझे वैद्यकज्ञान पाहून माझ्या उपकारातून उतराई होण्यासाठी आपण होऊनच मला मुलगी देऊ करतील तात्यासाहेबांचा बंदोबस्त ठरविलाच आपण आता म्हणजे जमेल की नाही सारे ?

पिलंभट: अगदी चोख! पण, काय हो, माधवरावांची तुम्ही प्रथम योगसाधने बद्दल खात्री कशी करून देणार?

वसंत: त्याचा विचार मी पूर्वीच करून घेतलेला आहे. त्याला घटकाभर ब्रह्मस्थितीचाच अनुभव दिला म्हणजे सहज त्याचा माझ्या 'शक्तीवर विश्वास बसेल.

पिलंभट: पण ती ब्रह्मस्थिती कशी दाखविणार ?

वसंत: हे पहिलेच गुंगी येण्याचे औषध? त्यांना जरा छा छू करून त्याच्या वासाने घटकाभर गुगी आणिली म्हणजे ताबडतोब त्यांची
अक्कल गुग होईल की नाही?

पिलंभट: जरुर या नुसत्या कल्पनेने माझी अक्कल गुंग झाली आहे.

वसंत: है; तुम्ही मात्र अक्कल गुंग होऊ देऊ नका: उलट अगदी आता सावध रहा आणि मी पहिली टाळी वाजविली की रमाबाईंना त्या दाराने माधवरावांच्या खोलीत सोडा राहील सारे नीट लक्षात?

पिलंभट: अगदी, आता माझ्या डोक्यावर एकदा हात ठेवा म्हणजे मला चांगली तरतरी येईल.

वसंत : नको; डोक्यावर माझा हात ठेवण्यापेक्षा तुमच्या हातावर मी गुरु असूनही गुरु दक्षिणा ठेवितो म्हणजे तर खरी तरतरी येईल... हा विवाह जमवून आणून त्याला आता मान्यता मिळवून देणे देवा आता तुझ्या हाती आहे.

(राग काफी ताल त्रिवट ) -
मान्यता मिळो या जगी मद्विवाहा ॥ धृ ॥ 
सात्त्वि शुध्द प्रेमे मम होवो स्वजनाप्रति सुखवावया ॥।
विनवी तुजला मी जगदिशा |
 योग्य पचा लाभावया ॥1॥ ॥
  (त्याला काही रुपये देतो. दोघे जातात.)
(पडदा पडतो)




प्रवेश तिसरा

(अण्णासाहेब, यशोदाबाई, मधुकर, वेणू, माधव अण्णासाहेब आजाऱ्यासारखे उठून बसले आहेत)

अण्णा: (कण्हत ) आई आई, शेवटी प्रकृतीचे मान या थरावर येऊन पोहोचले तरी मी रोज एकेकाच्या कानीकपाळी ओरडत होतो की बाबा रे खाण्यापिण्याचा नीट बंदोबस्त ठेवा, सध्या दिवस बरे नाहीत.

वेणू: अण्णा, , खाण्यापिण्याचा काय संबंध या दुखण्याशी ? हे वाऱ्यासारखे दुखणे !

अण्णा: खुळी पोर कुठली ? खाण्यापिण्याने तर सारे होते वाग्भटानेच रडून ठेवले आहे ना की "सर्वेषामेव रोगाणा निदान कुपिता मला " एरवी माणसाला काही व्हावयाचे नाही ही तुमची पक्वान्ने शेवटी मला मात्र नडली !

वेणू: अशी पक्वान्ने तरी कोणती केली? येऊन जाऊ न कधीमधी सणासुदीला घरात काही गोडधोड झाले असेल ! तेवढेच! पण
तेवढयाने हे दुखणे आले असे कसे म्हणता अण्णा ? या दुखण्याचा आणि खाण्यापिण्याचा काय संबंध ?

मधुकर: आणखी अण्णा, दुखण्याला सुध्दा आता इतके भिण्याचे कारण नाही. कारण एक तर तुम्हाला आज पाच दिवस झाले. ज्या अर्थी या पाच दिवसातही या दुखण्याने उग्र स्वरूप धारण केले नाही, त्या अर्थी हा अगदी माइल्ड टाइपचा एक असला पाहिजे,

माधव: अरेरे, मधु काय बोलतोस है ? अरे रोगातसुध्दा भेद पाडतोस! हा लहान, हा मोठा असे कधी मनातसुध्दा आणू नये. "नोच्चार्थो विफलोऽपि दूषणपदं दूष्यस्तु कामो लघुः !"

यशोदा: माधवा, तू गप्प बैस पाहू राहू दे ते तुझे पुराण मेल्यानो, आजारी माणसाच्या जवळ असे बडबडताना थोडा विचार करावा ! अण्णा अगदी खरे! मला वात झाल्यासारखे वाटत आहे! खूप मोठयांदा ओरडावेसे वाटते आहे. अगं, माधवा, मधु, काय करू? मला भ्रम झाल्यासारखे वाटायला लागले आहे! आ! आ! (अंग टाकून अंथरुणावर पडतो. सर्व घरतात.)

मधु: (स्वगत) तुम्हालाच काय, अण्णा, इथे सर्वांनाच भ्रम झाला आहे !

यशोदा: (पदराचा अंगारा सोडून) अंबाबाई, आता तू आमची पाठराखी आहेस. मला क्षमा कर आई, तुझा गोंधळ या दुखण्यातून उठल्याबरोबर मी घालीन (दुसरी मंडळी तोंडात औषध घालतात.)

अण्णा : (एकदम उसळून) माझी आई, का उगीच गोंधळ घातला आहेस! तुझी अंबाबाई कशाला पाहिजे इथे! हा बघ मी उठून बसलो ! मला काही होत नाही आता! घाल गोंधळ पाहू कसा घालतेस तो उठून बसतात.)

यशोदा: आई अंबाबाई असे म्हणून हातावर अंगारा घेऊ न चोहोकडे फुंकते.)

अण्णा: का गं? घाल की गोंधळ! म्हणे गोधळ घालीन घाल गोधळ!

यशोदा: मधु माधवा, अरे बाबांनो जा रे कुणी तरी त्या पिलभटाला तरी घेऊ न या! मला काही हे चांगले चिन्ह दिसत नाही! हा गोंधळ
गोंधळ बरे हा! तेव्हाच म्हटले मी की दिवसगत लावू नका! पण माझे ऐकते कोण ?

अण्णा: अग, का उगीच गोधळ घालते आहेस ?

यशोदा: पाहिलेस वेणू, आता म्हणत होते की गोंधळ घाल जा बाई देवीपुढचा थोडा अंगारा तरी घेऊ नये

वेणू: अगं आई, अण्णाना आता बरे वाटत आहे !

अण्णा: काय बरे वाटतंय हा गोधळ चालला आहे तो मला बरा वाटतो आहे?

यशोदा: अग पोरी जा. उगीच बोलत उभी राहू नकोस! अरे मधु माधवा तुम्हाला त्या पिलभटाला मी बोलवायला सांगितले आहे ना ? मग असे तोंडाकडे काय पहात उभे राहिला आहात ?

अण्णा : ए. माझ्याकडे पाहा पाहू तू जरा आता ! तू काय चालविले आहेस हे ? तुझ्या या गोंधळाने मात्र माझे डोके असे काही मला वाटत नाही आता तू जर बडबड केलीस किंवा त्या अंबाबाईचे नाव काढलेस तर पाहा । ठिकाणावर राहील

यशोदा: (कपाळाला हात लावून मट्टदिशी बसते.) अग बाई, तरी मला वाटलेच होते. आईचे नाव सुध्दा नकोसे वाटू लागले हे काही ठीक लक्षण नाही! आता काय करु? ए. मधु माधवा, जा (केविलवाणी होते.).

अण्णा: कशाला, ए. मधु माधवा,

यशोदा: (त्याच्या कानात सांगते) बाबांनो तुम्हाला आता माझी शपथ आहे येथे थांबाल तर, अरे त्यांची प्रकृती अशी झालेली आहे, आणि माधवा तू हसतोस काय असा?


माधवा: अग आई, "वादे वादे जायते तत्त्वबोध" अग, हा वाद म्हणजे सर्व विषयांचे मंथन यांतून जे सार निघेल त्याचेच एक तत्त्व तयार होईल आणि पुढे तेच जगाच्या उपयोगी पडेल!

मधु: दादा, तू तरी असा काय गोंधळ चालविला आहेस ? तू त्या पिलभटाकडे जा, मी दुसऱ्या एखाद्या डॉक्टराला घेऊन येतो! तू प्रथमः चल पाहू माझ्याबरोबर! (त्याला आपल्याबरोबर घेऊन जावयाला निघतो. अण्णा मोठमोठयाने मधु माधवा म्हणून ओरडतात, यशोदा त्यांना जा जा म्हणून सांगत असते. असा काही वेळ गोंधळ चालतो. नंतर दोघेही जातात.)

अण्णा: आता काय सांगू तुला ? अग, मला खरोखरीच आता बरे वाटत आहे.

यशोदा: एकदा बरे वाटते आहे म्हणायचे आणि पाचच मिनिटांनी एकदम उसळायचे!

अण्णा: अगे, आता माझी प्रकृती चांगली आहे; पण त्याला कारण तुझी अंबाबाई नसून त्या पिलभटाने आज सकाळी हिमालयातील एका महान भिषग्वर्याचे औषध आणून दिलेन त्याचा हा परिणाम आहे, समजलीस? आणि हेच मी मघापासून सांगणार होतो. पण माझे ऐकते कोण ? इथून तिथून सारा एकच गोंधळ!

यशोदा: कुणाच्या हाताला का होईना यश मिळाले म्हणजे झाले! कुणाच्या रूपाने देवी उभी राहील कुणी सांगावे ? आणि म्हणूनच मी त्या पोरीला अंगारा आणायला पाठविली मी आज सकाळी त्या पिलभटाचा देव खेळविला.

अण्णा: अगं तुझे हे देव खेळविणे पुरे कर पाहू आता असे खेळखंडोबा करून रोग का कुठे बरे व्हायचे असतात हे अंगारे, धुपारे, (वेणू अंगारा आणते.)

यशोदा: (तिच्या हातातून अंगारा घेऊ न त्यांच्या कपाळाला लावते व चोहीकडे फुंकते)

अण्णा: घर म्हणजे एक मोफत वाचनालय तू बनविले असतेस, आणि ताइतांच्या तोडग्यांनी आपल्या या घराला धर्मशाळेची कळा आणली असतीस!

का ग तू देवाला असे पोरासरखे ग का खेळवीत असतेस ? इतकी वर्षे मी आपले रोज ऐकतो आहे, आज अमक्याचा देव खेळविला, उद्या तमक्याचा देव खेळविला, आज अमक्याने अंगारा दिला. उद्या तमक्याने मंतरलेला ताईत दिला अशा एक ना दोन त्या देवाचे हे असे खेळणे करून तू या वयात जो हा पोरखेळ चालविला आहेस, त्या तुला आता काय म्हणावे तेच समजत नाही. बरे, मी नशीब समजतो की तुला लिहावयाला वाचावयाला येत नाही, नाही तर या अलीकडच्या सिध्द मांत्रिकाच्या आणि ताइतांच्या जाहिरातींनी आमचे

यशोदा: वेणू पाहिलास मघाच्या बोलण्याला आणि आताच्या बोलण्याला काही तरी मेळ हा सारा त्या पिलभटाच्या अंगाऱ्याचा प्रभाव बरे! खरेच सांगते असे बोलू नये. त्या पिलभटाचे गुरु आता आले आहेत येथे त्यांनी आज सकाळी हा अंगारा देऊ न मला किती तरी चांगल्या गोष्टी सांगितल्या हो, त्याने आणखी आपल्या गुरुच्या पडताळयाची एक गोष्ट सांगितली आहे; तिचा जर आपल्याला प्रत्यय आला म्हणजे मग तरी आपण माझ्या या देवीवर विश्वास ठेवाल ना ?

अण्णा: म्हणजे त्या पिलंभटाच्या गुरुकडून का आलेला हा अंगारा आहे ? अग, त्याचेच तर औषध मी आज सकाळपासून सुरु केले आहे. । त्यांच्या त्या हिमालयातील वनस्पतीनी तर माझ्या प्रकृतीत हा एकदम आज असा फरक पडला आहे. नाही तर अशा प्लेगसारख्या भयंकर रोगाने पछाडलेला रोगी कधी जगायची आशाच करायला नको!

यशोदा: खरे ना पण हे ! आपला सुध्दा त्याच्यावर विश्वास आहे ना! मग का बरे उगाच मघाशी त्या अंगाऱ्याला आपण नावे ठेविलीत ?

अण्णा: अगं, पण हा गुण त्यांच्या औषधांचा असेल!

यशोदा: त्यांनी पडताळा पहाण्यासाठी आणखी असे सांगितले आहे की तुमच्या मुलीचे पहिले लग्न मोडेल आणखी-

अण्णा: आणखी काय ?

यशोदा: आणखी तिचा एका महाविद्वान पुरुषाशी लग्नाचा योग आहे आणि ही गोष्ट या चार दिवसांत घडून येईल. 8

अण्णा: आश्चर्य आहे! बाकी त्याच्या सांगण्याप्रमाणे तो जरी विद्वान असला आणखी त्याला वैद्यकाची माहिती नसली तर मी पोरीला तिथे मुळीच देणार नाही बरे, तो माधव त्या पिलंभटाला आणायला गेला होता. तो तिकडेच रंगला वाटते.

(माधव येतो.)

माधव: अहाहा, काय ते तेज, काय ती मुखमंडलावरची शोभा अण्णा, काय सांगू तुम्हाला, आज माझा आनंद अनावर झाला !

अण्णा: तुझा आनंद अनावर झाला आहे, पण माझा राग आता अनावर झाला आहे. काय रे हे! अरे तुला त्या पिलभटाला बोलवायला धाडले होते ना ?

माधव: अहाहा ! धन्य तो पिलंभट, धन्य ते त्याचे घर ! आणि त्रिवार धन्य ते त्याचे सद्गुरु अण्णा, तुमचा राग तर माझा आनंद ! केवढा भेद! मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास वा रे वा! कशाला राग, कशाला लोभ !

यशोदा: बाळ, तुला आनंद व्हायला झाले तरी काय ? त्या पिलभटाच्या गुरूने काही चमत्कार केलान का ?

माधव: चमत्कार ! काय सांगू चमत्कार ? मी गेल्यावर पहातो तो त्या योगींद्राची समाधी लागलेली त्या स्थितीतच मी त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले, तो ते एकेक सूत्रवाक्य बोलू लागले खरेच आहे. "परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृतो ! धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगेयुगे काय ती गंभीर वाणी अण्णा, आई, आज तुमचा माधव तुम्हाला निराळा दिसत असेल त्यांनी माझ्या मस्तकावर हात ठेवला, तोडावरून हात फिरविला मात्र, तो एकाएकी मी हे जग सोडून

यशोदा: काय झाले बाळ ?

अण्णा: काय झाले माधव, तू एकाएकी असा गहिवरून का आलास ?

माधव: अहाहा ते चिन्मय स्वरूप, तो आनंद, ते ध्यान, "ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहाते सांभाळी! तेथे कोण देहाते सांभाळी" ज्या वेळी चिकित्सक बुध्दी नष्ट पावून, जिज्ञासा जिथे सपते तिथेच असे उद्गार बाहेर पडतात! "कोण देहाते सांभाळी । तेथे कोण देहाते सांभाळी" (जोराने टाळ्या पिटू लागतो अण्णा गोंधळात पडतात. काही वेळाने अंथरुणावर जाऊन पडतात.)

यशोदा: अगं बाई! पुन्हा असे कशाने झाले ! अरे माधवा, जा बाबा त्या गुरुमहाराजांना तरी इकडे घेऊ न ये! माधव इकडे तिकडे हा भेदच आता राहिला नाही! अहाहा! काय ती मूर्ती, काय ते रूप काय ते चेहेऱ्यावरचे तेज ! अहं ब्रह्मास्मि (ध्यान लावतो.)

यशोदा: अगबाई, आता कस तरी काय? हे इकडे निपचित, याची इकडे समाधी! अग वेणू, यमू, अग, कुणी तरी इकडे या ! (त्या दोघी येतात.) बाई, जा तो अंगारा तरी घेऊन ये. आणि तो मधु कुणीकडे त्या पिलभटाकडे कुणाला तरी धाड पाहू! (पिलंभट येतो.)

पिलभट: धाडता कशाला बाईसाहेब, माझ्या गुरुमहाराजांनी अंतज्ञानाने हे सर्व ताडले आहे. आता इतक्यात ते इकडे येतील. मधुकरही त्यांचेबरोबर आहेत ! श्रीमारुतीला तुम्ही अकरा अभिषेकाचा नवस बोला. इतक्यात गुण !

यशोदा: देवाला नमस्कार करून मनात काही पुटपटते व पुन्हा नमस्कार करते.)

(मधुकर: वैरागी वेषातल्या वसंताला घेऊन येतो.)

वसंत :भजन
भजन बिना एक जल गयो जिवना ॥ धृ ॥
 पर्वत सुन्ना
एक चिरछ सुना, विरछ सुना एक पात बिना ॥1॥

माधव: अहाहा, हे चित्स्वरूप, महन्मंगल मायावतारी-

वसंत: (माधवाचे मस्तकावर हात ठेवून त्यास) सावध हो बाळा, सावध हो. अशी वारंवार समाधी लावून त्या चिरशक्तीला वारंवार त्रास का देतोस? अशाने चारवार दर्शन दुर्लभ होईल. (सर्व मंडळी त्यांच्या पायावर डोके ठेवतात माधव सावध होऊ न त्याचे पाय धरतो )

माधव: गुरुमहाराज-

पिलंभट: माधवराव, थोडे थांबा. अगोदर अण्णासाहेबांच्या प्रकृतीकडे आपल्याला लक्ष पोहोचविले पाहिजे. (त्याला अण्णाच्या पलंगाजवळ नेतात. तो त्यांची नाडी पाहून थोडे दूध आणावयाला सांगतो. दूध घेतल्यावर ते सावध होतात.)

अण्णा: स्वामीमहाराज- (असे म्हणून उठावयाला लागतात, माधव, मधु, पिलंभट भक्तजनांसारखे आ पसरून बसतात.)

वसंत: महाराज, आपल्याला क्षीणता आलेली आहे. आपण ही तसदी घेऊ नका! रोगाचे असे आहे की त्याला नेहमी विश्रांतीची
आवश्यकता असते. त्याला उगीच छेडणे चांगले नाही. बरे, सकाळी दिलेले औषध यांना किती वेळा दिलेत ?

यशोदा: चार वेळ (तो परीक्षेला सुरुवात करतो.)

अण्णा: त्याच्यापासून मला थोडे घेरी आल्यासारखे वाटते!

पिलंभट: योजनाच तशी आहे!

अण्णा: ओकारी होईल असे वाटते!

पिलंभट: योजनाच तशी आहे!

यशोदा: घटकेत घाम येतो तर घटकेत थंडी वाजल्यासारखे होते !

पिलंभट: खरे ना पण ? योजनाच तशी आहे !

यशोदा: मध्येच भ्रम झाल्यासारखे करतात

वसंत: सांग, योजनाच तशी आहे म्हणून !

अण्णा: एकदा खूप मोठयाने ओरडावेसे वाटते!

पिलंभट: योजनाच तशी आहे !

अण्णा: घटकेत अगदी शांत पडावेसे वाटते!

वसंत: योजनाच तशी आहे !

मधुकर: अशी योजना करण्याचे कारण काय गुरुमहाराज ! (हसतो.)

वसंत : त्याचे कारण असे की, उष्ण आणि शीत असे दोन प्रकार नेहमी प्रकृतीत असतात, त्यापैकी एकाला कधी छेडूनये, एकदा याला, एकदा त्याला असे दोघांनाही छेडून प्रकृतीला आपल्या ताब्यात आणायची आणि मग ज्याच्यावर स्वार व्हायचे असेल त्याच्यावर योजना करायची म्हणजे दुसऱ्याचा काही अंमल चालत नाही.

अण्णा: अहाहा, काय हे ज्ञान, काय ही योजना, काय ही चिकित्सा !

वसंत: असे पहा तुम्ही निसर्गाला सोडून नेहमी वर्तन करता. त्यामुळे अशा रोगांना थारा मिळतो दिवस, रात्र, उन्हाळा, थंडी, आग,

पाणी, स्त्री, पुरुष या योजनाच मुळी निसर्गसिध्द आहेत; परंतु तुमचे वर्तन मात्र नेहमी नियमबाह्य आता याच माधवरावांचे उदाहरण पाहा, हा तरुण पुरुष, स्त्रीला सोडून जाऊ द्या एकंदरीत काय की निसर्गाच्या विरुद्ध वर्तन कधी करू नये. निसर्गाला नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे.

(सर्व भक्तिभावाने डोलतात.)

मधुकर: पण गुरुमहाराज, आपण तर आजपर्यंत कडकडीत ब्रह्मचर्याति-

पिलंभट: (मधुकराला दाबतो.) आहे मधुकर

वसंत : अरे बाब पिलंभट, अहो मधुकर, आम्हीही पण काही दिवसांनी या आश्रमाचा त्याग करून तुमच्या आश्रमात येणार आही कारण आम्हाला तशी आज्ञा आहे. ज्याच्या आज्ञेने आमचा जन्म झाला, ज्याच्या आज्ञेन आम्ही आजपर्यंतया ज्ञानपर्वतावर आरूढ झालो, त्याच्याच आज्ञेने या जगाच्या रहाटीकडे लक्ष देऊन आम्हाला वर्तन केले पाहिजे.

माधव: योग्यच आहे. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: "

वसंत: मग तुमचे वर्तन असे का ? राहू द्या आता हा विषय महाराज आज मी आपल्या प्रकृतीचे निदान करून एक वनस्पती देतो. तिचे तीन वेळ पोटात सेवन करा व पायाला लावण्याला एका वेलीचा रस देतो तो लावा. उद्या सकाळी आपली काही तक्रार राहणार नाही. पिलभट, मातोश्रींना तो अंगारा देऊ न तो अष्ट दिशांनी नीट फुंकरायला सांग. (अण्णा मधुकराच्या कानात काही सांगतो. मधुकर तबकातून काही रुपये आणून त्यांच्यापुढे ठेवतो वसंत तिकडे पहातसुध्दा नाही.)

माधव: मी दर्शनासाठी केव्हा येऊ ?

वसंत : तुम्ही खान करून शुचिर्भूत अंतःकरणाने आज सायंकाळी आमचेकडे या म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नाचा आम्ही उलगडा करू. (सर्वजण पायावर डोकी ठेवतात.)

पिलंभट: महाराज, हे (असे म्हणून रुपयाचे ताट त्याच्यापुढे करतो.)

वसंत: (उसळून) अरे, तू इतके दिवस आमच्या संगतीत घालवून पुन्हा आम्हाला या मोहात फसविण्याचा प्रयत्न करतोस ? ते तू घे, नाही तर तिकडे टाकून दे. आम्हाला काय करायचे आहे ? (पिलंभट खूष होतो, जय गुरु महाराज की जय म्हणून सर्वजण ओरडतात वसंत पूर्ववत् भजन करीत जातो.)



Ram Ganesh Gadkari ची आणखी पुस्तके

1

प्रेमसंन्यास: भाग 2

26 May 2023
2
0
0

कमलाकर : लीलावती, ही तुझी केवळ कल्पना आहे! डोगर चढताना आपण एक टप्पा चढून गेल्यावर जर मांगे नजर टाकली तर मागच्या वाटेवर नुसत्या झाडाची कोवळी हिरवळच दिसते तिच्यातून पसार होताना पायाला रुतणारे खडे आणि अं

2

प्रेमसंन्यास: भाग 3

27 May 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(दवाखान्यातील एक खोली दुगन वळकटीवर बसली आहे. जवळ बाबासाहेब व शिपाई उभे आहेत दुगनने तोडावरून पदर घेतला आहे.)बाबासाहेब : बाई. जाता शेजारच्या खोलीतील रोग्यांनी अशी खबर दिली आहे की, प

3

प्रेमसंन्यास : भाग 4

29 May 2023
2
0
0

अंक चवथाप्रवेश पहिला(स्थळ भूतमहाल)विद्याधर : कमलाकराने जागा पाहून दिली, पण ती मावापासून इतकी दूर की एखाद्या निकडीच्या कामासाठी लौकर गावात जाऊन येईन म्हटले तर सोय नाही! आणि या जयताच्या खटल्यामुळे सारखे

4

प्रेमसंन्यास: भाग 5 ( शेवटचा )

30 May 2023
1
0
0

प्रवेश पहिलाफाशीचा देखावा सर्व मंडळी)जयंत जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे. नीले! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?तीला अशी त्या दीनदयाळू परमेश्वराची

5

एकच प्याला - भाग १ (राम गणेश गडकरी)

31 May 2023
1
0
0

अंक पहिलाप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे सुधाकर दूरध्वनिका (टेलिफोन) यत्राजवळ बसला आहे.)सुधाकर : कोण तीनतीनदा घटा देत आहे? कोण? (ऐकून) हो, मी सुधाकर आहे! सुधाकर! पण बोलत आहे कोण? रामलाला (पुन्ह

6

एकच प्याला : भाग 2 (राम गणेश गडकरी)

1 June 2023
0
0
0

अंक दुसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर. पात्रे सिंधू व सुधाकर)सिंधू : वन्सं गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं; म्हणून म्हणते की, अगदी गेलंच पाहिजे काआता बाहेर?सुधाक

7

एकच प्याला : भाग 3 (राम गणेश गडकरी)

2 June 2023
1
0
0

अंक तिसराप्रवेश पहिला(स्थळ: सुधाकराचे घर पात्रे - सिंधू मुलाला गोकर्णाने दूध पाजीत आहे. जवळ शरद )सिंधू : हे काय हे असं? दुधाचीसुध्दा दांडगाई अशी? झालं, लाथाडलंस गोकर्णी धरूका चिमुकला कान एकदा? थांब बा

8

एकच प्याला: भाग 4 ( राम गणेश गडकरी)

4 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(स्थळ: रामलालचा आश्रम पात्रे शरद व रामलाल )शरद् : इतका वेळ बसून भगीरथानी बहुतेक सर्वच सर्ग समजावून दिला; पण या श्लोकावर ते थांबले! मग खरंच काम होतं, का श्लोक अडला म्हणून ते चालते झाले, कुण

9

एकच प्याला: भाग 5 (शेवट)

5 June 2023
1
0
0

प्रवेश पहिला(फाशीचा देखावा. सर्व मंडळी.)जयंत : जगावर शेवटची दृष्टी टाकताना आज त्यातली अपूर्व शोभाच दृष्टीस पडत आहे, लीले ! पुन्हा हा देखावा मला कधीच पहायला मिळणार नाही ना?लीला : अशीच त्या दीनदयाळू परम

10

वेड्यांचा बाजार : भाग 1

6 June 2023
2
0
0

वेड्यांचा बाजारप्रवेश पहिलानमन: अतुल तव कृति अति भ्रमवि मति ईश्वरा ! ॥धु॥वर्षती मेधजल, शातविति भूमितल, सलिल मग त्यजुनि मल जात सुरमंदिरा ॥गोविंद पूर्व-पद- अग्रज स्मरुनि पद, उधळि निज हृत

11

वेड्यांचा बाजार : भाग 2

7 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( भितीवरून उडी मारून बाळाभाऊ येतात)बाळा: काल मधुकराने देणूला पाहायला येण्यासाठी मला बोलाविले; पण अशा राजरोस रीतीने येण्यात काय अर्थ ? कुठल्याही कादंबरीत, नाटकात नायक-नायिकेला त्यांच्या भाव

12

वेड्यांचा बाजार भाग 3 (शेवट)

8 June 2023
0
0
0

प्रवेश पहिला( यमुना व रमा भीत भीत येतात. माधवरावांची खोली)यमुना: है, या आता लोकर आणि घ्या पाहून सारी व्यवस्था !रमाबाई: यमुनाबाई माझ्या किनई उरात धडकीच भरली आहे !यमुना: जाऊ बाई, भारीच भित्रा स्वभाव बा

13

चिमुकली इसापनीती (लेखक राम गणेश गडकरी)

12 June 2023
1
0
0

चिमुकली इसापनीतीप्रस्तावनामुलांसाठी काहीतरी लिहावे हा फार दिवसाचा हेतू चार-सहा महिन्याखाली अगदी लहान मुलांसाठी एकाक्षर शब्दात लिहिलेली रॉबिन्सन क्रूसो, इसापनीती वगैरे इंग्रजी पुस्तके पाहण्यात ये

---

एक पुस्तक वाचा