shabd-logo

११

8 June 2023

11 पाहिले 11
दुसप्या दिवशी दुसरी बोट आली. किनाप्याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. डॉक्टर आहे. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे?

'दुःखी मिरीने मुद्दामच स्वतःला मागे ठेवले.' सुमित्रा म्हणाली.

'मी तिसप्यांदा जात होतो. परंतु बोटीजवळ जाण्यापूर्वीच सारा खेळ संपला होता. मिरीने त्या मुलीचे प्राण वाचविले. मिरी हुतात्मा झाली. थोर मनाची मुलगी. आपण दुर्दैवी, आपण कशाला जगावे असे जणू तिला वाटले.' तो पाहुणा म्हणाला. 'मिरीशिवाय घरी जाणे कसेसेच वाटते. कृपाकाका वरती काय

म्हणतील?' सुमित्रा स्कुंदत म्हणाली.

'तुम्हीच रडू लागल्यात तर आम्ही कसा धीर धरायचा?' तो पाहुणा म्हणाला.

‘ती माझ्या जीवनात किती खोल गेली होती ते तुम्हांस माहीत नाही. ती जगू माझा दूसरा प्राणच बनली होती. बाबांच्या हल्लीच्या नव्या संसारात तिचाच मला आधार होता. काय सांग !' सुमित्रा रडत म्हणाली.

'मला सारे माहीत आहे!"

'सारे माहीत आहे?""

'हो. मिरीने तुमची हकीकत मला सांगितली होती.'

बोटीत आनंद नव्हता. शेवटी मिरीचे, सुमित्राताईचे गाव आले. बंदरावर गर्दी होती. मंडळी उतरली, त्या तरूणीच्या घरची मोटर होती. ती तीत बसली. 'तुम्ही आमच्याकडे चला. तुम्ही प्राणदाते.' सुमित्रा त्या पाहुण्याला म्हणाली.

'परंतु मिरीला मी वाचवू शकलो नाही. मीही दुर्दैवी आहे. जातो मी. वेळ आली तर पुन्हा भेटेन. डॉक्टर ओळख ठेवा. प्रभू तुम्हाला सुखी ठेवो. तुम्ही थोर

माणसे आहात.' असे म्हणून तो पाहुणा गेला. 'कोण आहे हा पाहुणा ?' सुमित्राने विचारले.

'प्रभूने तुमच्या संगतीत रहायला पाठविलेला तो देवदूत आहे.' डॉक्टर

म्हणाले.

'त्याच्या निरपेक्ष प्रेमाने आम्हीच पवित्र झालो.' ती म्हणाली. डॉक्टर नि सुमित्रा कृष्णचंद्रांच्या घरी आली. सुमित्रा अश्रु ढाळीत बंगल्यात शिरली. कृष्णचंद्र बाहेर आले.

'आलात सुखरूप ? मिरी कोठे आहे? का मुरारी नि ती गेली यात्रेला ? त्यांनी विचारले.

'बाबा, मिरी बुडाली, आम्ही वाचलो. तिने आम्हांला वाचविले. स्वतः

मागे राहिली. गेली.' सुमित्रा म्हणाली. 'मुरारीला कळल्यावर तो जीव देईन.' ते म्हणाले.

'त्याचे तिच्यावर प्रेम नाही असे कळले.' ती म्हणाली.

'डॉक्टर, बसा.'

'मी आता जातो. मागून भेटेन.'

डॉक्टर आपल्या घरी गेले. सुमित्रा आपल्या खोलीत शून्य मनाने बसली होती. प्रेमा घरीच होती.

‘सुमित्राताई, मिरी नसेल का वाचली? पिंजप्यात हा पक्षी 'मिरे ये, मुरारी ये' सारख्या हाका मारीत आहे. मिरी जिवंत नसती तर हा जिवंत राहिला नसता असे मला वाटते.' ती म्हणाली.

'सारे प्रभूच्या हाती.'

मुरारीच्या धन्याची मुलगी वाचली होती. आपल्या मुलीचे प्राण वाचविणाप्याचे उतराई व्हावे असे त्याच्या मनात येत होते. त्या व्यापाप्याने जाहिरात दिली. शेवटी एके दिवशी तो अपरिचित पाहुणा त्या व्यापाप्याच्या घरी गेला. त्याची मुलगी झोपाळ्यावर झोके घेत होती. वस्त्रालंकारांनी नटलेली होती, सुखी दिसत होती.

'बाबा, बाबा ते आले.' असे म्हणत ती वर गेली. ती वडिलांना घेऊन आली.

'यांनी माझे प्राण वाचवले.' ती म्हणाली.

'तुम्ही बरे आहात का? आजारी होते ना?' त्या पाहुण्याने विचारले

‘आता बरा आहे. तुमचा मी उतराई कसा होऊ ? माझी एकुलती एक मुलगी. तिच्यावर सारा लोभ. ती जरा दूर गेली तर माझे प्राण कासावीस होतात. ती गेली होती हवापालट करायला. परंतु तिला बोलावून घेतले. ती गोली नि इकडे मला कसे तरी होऊ लागलें. गुदमरल्यासारखे वाटे. ताबडतोब

मुरारीला पाठवले.'

'मुरारी?'

'हो. मुरारी आफ्रिकेतून आला. तो येथे आला. परंतु मी आजारी. त्याला लगेच पिटाळले. त्याला घरीही जाऊ दिले नाही. त्याच्या मिरीलाही भेटू दिले नाही. ‘मिरीला भेटू का?' तो म्हणाला. मी म्हटले, 'नको. आधी जा नि माझ्या मुलीला पाठव.' त्याने मुलीला बोटीत बसविले. तो तिकडेच एकदोन दिवस राहाणार होता. मिरी वगैरे तिकडेच आहेत तिला तो भेटेल. पाच-सहा वर्षात त्यांची भेट नाहीं.'

'मिरी तर यांच्याबरोबर बोटीत होती. त्यांनी तुम्हाला नाही का सांगितले. तुमच्या मुलीला मी नाही वाचवले. सुमित्राताईंना किनाप्यावर पोहचवून मी पुन्हा पोहत बोटीजवळ आलो तो मिरीला नेण्यासाठी. परंतु मिरीने हिल खाली सोडले मिरी समजून तुमच्या मुलीला मी नेले. तीरीवर बघतो तर मिरी नसून दुसरीच हिरी निघाली. मी पुन्हा वेगाने उडी गेतली. परंतु बोट बुडाली होती. तुमच्या मुलीने ही हकीकत तुम्हाला नाही सांगितली?'

'मला त्या मुलीचे नाव माहीत नव्हते. बप्याच वर्षांत मी मिरीला पाहिले नव्हते. शिवाय मी घाबरून गेले होते. मिरीने. तोंडावरून बुरखा घ्यायला मला सांगितले होते. ती मिरी का होती? कोठे आहे?'

'रत्नाकराने ते रत्न स्वतःजवळ घेतले.' तो म्हणाला.

'आपले नाव काय?'

‘मला अज्ञातच राहू दे.’

'तुमचा मी कसा उतराई होऊ ? तुम्हाला काय देऊ?' 'जगावर प्रेम करीत जा. व्यापारी असलेत तर केवळ नफेबाजीकडे पाहू नका. थोर मन ही सर्वांत मोठी दौलत होय. मिरी भिकारी होती, अनाथ होती. परंतु तिच्या हृदयातील श्रीमंतीसमोर कुबेर भिकारी दिसेल. ती अनाथ होती. परंतु दुसप्यांची आधारदेवता झाली. जातो मी.'

असे म्हणून तो अपरिचित गृहस्थ निघून गेला. मिरीच्या दुःखाचे कारण त्याच्या लक्षात आले होते. परंतु मुरारीचे व्यापाप्याच्या मुलीवर प्रेम नाही असे या संवादावरून त्याने ताडले. काही तरी मिरीचा गैरसमज झाला. परंतु कोठे

आहे ती ? असेल का जिवंत? त्याच्या मनात अशांतता होती. तो प्रत्येक दिवशी बंदरावर जाई. मिरी कोठून येते का बघे आणि एके दिवशी एका बोटीतून मिरी खरेच उतरली. स्वप्नात आहोत की जागृतीत आहोत हे त्याला समजेना. होय मिरीच ती.

'मिरे तुला न्यायला आलो आहेण् माझ्या हातातून तू निसटलीस परंतु प्रभूने तुला वाचविले.'

'मी येणार म्हणून तुम्हाला कोणी कळविले?' 'हृदयवेदनांनी.

'देवाने मला वाचविले आणि आश्चर्य म्हणजे मीही वाचण्याची धडपड

केली. एक तुकडा तरंगत होता. त्याच्या आधाराने मी तीर गाठले. दूर-दूरचे तीर. तिकडच्या लोकांनी माझी व्यवस्था केली. मी आले. '

'जा आता घरी.

'तुम्ही नाही येत चला.'

'आता नाही येत योग्य वेळी येईन. '

'तुमचे नाव काय?'

'हळूहळू कळेल तू जा. सुमित्राताई रडत असतात.'

‘तुम्ही त्यांच्याकडे जाता?'

'मला दुरून कळते. जा बेटा. तुझी श्रद्धा ठेव. ज्या अर्थी तुला जगावेसे वाटले, जगावेसे वाटत आहे. त्या अर्थी तुझा हृदयदेवही तुला मिळणार, असे मला वाटते. अशी बघू नकोस. मी सारे जाणतो. जा बाळ.'

तो पाहुणा निघून गेला. मिरी आली. बंगल्यात शिरली.

'मिरी, मिरी.' प्रेमाने टाळ्या वाजविल्या. ती वरून धावतच आली. तिने

मिरीला मिठी मारली.

'मिरे तू आलीस?'

'हो, आले, मृत्युच्या घरून आले.'

'मिरे ये, मुरारी ये.' असे पक्षी सारखा म्हणत असतो. मी त्याची काळजी

घेतली. चल वर. सुमित्राताई खाली येत आहेत. त्या बघ.' मिरी धावत जाऊन सुमित्राताईजवळ उभी राहिली. क्षणभर कोणाला

बोलवेना.

‘मिरी, आम्हांला वाचवून तू निघून जाणार होतीस.. होय ना? मला अंधारात सोडून जाणार होतीस.'

'परंतु देवाने परत आणले. '

'देव दयाळू आहे.'

'तुमच्याप्रमाणे मीही जीवन कंठीन.'

घरात सर्वांना आनंद झाला पण मिरी दुःखीच होती. तो पिंजरा ती जवळ घेऊन ती बसे. तो पक्षी नाचे, बागडे. 'मुरारी ये' म्हणे. 'कोठे आहे मुरारी, राजा?"

ती म्हणायची आणि डोळे पदराने पुसायची.

मुरारी गावात आला होता. एका हॉटेलात उतरला होता. त्याला स्वत:चे घर नव्हते. मुरारी केव्हा येतो या गोष्टीकडे त्या अपरिचित पाहुण्याचे लक्षच होते. तोही त्या हॉटेलमध्ये गेला. मुरारी तेथे एकटाच होता.

'आपणच का मुरारी ?' त्या पाहुण्याने विचारले.

'हो का बरे?'

'आपले नशीब थोर आहे.'

'कशावरून

‘त्या श्रीमंत व्यापाप्याचे आफ्रिकेतील तुम्ही भागीदार. हो ना ?'

'हो'

'एक आनंदाची बातमी एक्ली.

'कोणती?'

'त्या व्यापाप्याचा मुलीबरोबर तुमचे कदाचित लग्नही होईल.'

'माझे लग्न ' ?'

'हो; लोक म्हणतात.'

'बावळट आहेत लोक. '

'लोक व्यवहारी आहेत. त्या व्यापाप्याची एकुलती मुलगी. नि तुमच्यावर त्याच प्रेम आहे.' 'त्यांचे प्रेम असून काय उपयोग?'

'तिचेही असेल तर?'

'परंतु तिच्याशी काय करावयाचे आहे? माझे लग्न कधीचे ठरले आहे. माझ्या आईने ते मनात लावून ठेवले होते. आई जरी जगात नसली, तरी तिची

पवित्र इच्छा का मी मोडू?'

'परंतु आईने जिच्याशी तुमचे लग्न व्हावे असे मनात इच्छिले, तिच्यावर तुमचे प्रेम आहे का? तिचे तुमच्यावर आहे का?'

'आमचे एकमेकांवर प्रेम होते, आहे.'

'त्या मुलीचे नाव काय? ती का श्रीमंताची आहे?'

'गरीब आहे. '

' अशा भिकारणीशी का तुम्ही लग्न करणार? वेडेच आहात तुम्ही तुमच्चा

धन्याची मुलगी तुम्हांला मिळेल. प्रयत्न करा. घरजावई व्हाल. जगात पैसा ही महत्वाची वस्तू आहे. प्रेमाने पोट भरत नाही. चढता संसार चालवता येत नाही. तुमची आई जिवंत नाही ना? प्रश्नच मिटला. '

'तुम्ही कोण आहात? मी पैशाचा पुजारी नाही. मी अशी माणसे पाहिली आहेत की, गरीब असूनही हृदयाने श्रीमंत होती. खरी संपत्ती हृदयाची. मी उदार भावनांची पूजा करायला शिकलो आहे. आणि आज इतकी वर्षेजी माझ्या हृदयात आहे, तिला का टाकू? मला ते शक्यच नाही.'

'तुम्ही तुमच्या हृदयदेवतेकडे अद्याप गेला नाही?' 'जाईन. दिवे लागल्यावर आज जाईन."

'त्या मुलीचे नाव सांगा.'

'मिरी'

तो पाहुणा उठून गेला..

सायंकाळ झाली होती. आकाशात आज ढगा आले होते. पाऊस येणार की काय? पावसाळ्याचे दिवस आलेच होते. वाराही सुटला होता. फिरायला गेलेले लोक भरभर घराला परतत होते. मिरी गॅलरीत उभी होती. तो कोणी तरी अंगणात आले असे तिने पाहिले. ती थरथरली. ती एकदम खाली गेली. तिने दार उघडले मुरारी आत आला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. तेथे एका खुर्चीवर मुरारी बसला. तीही बसली.

'बरी आहेस ?' त्याने विचारले.

'तू बरा आहेस ना?' तिने प्रश्न केला.

मिरी खाली तोंड करून बसली होती. कोणीच बोलेना. बाहेर पाऊस पडत होता. विजाही चमचम करीत होत्या. सुमित्रा वरती खुर्चीत पडूत होती. प्रेमा बाहेर गेली होती. कृष्णचंद्र वाचनालयात गेले होते. आजीबाई घरात स्वयंपाक करीत होत्या. तेथे दिवाणखान्यात मिरी नि मुरारी दोघेच होती. याचे माझ्यावर प्रेम नाही, असे ती मनात म्हणत होती. हिचे माझ्यावर प्रेम नाही, असे तो मनात म्हणत होता.

'जातो मी.' तो म्हणाला. 'बाहेर पाऊस आहे, थांब.' ती म्हणालो.

'थांबून काय कारायचे? गेलेले बरे पाऊस कमी झाला आहे.' म्हणून तो उठला.

'माझी शाल अंगावर घेऊन जा. तू पाठवलेली शाल. थांब, मी आणते. '

ती पट्कन घरात गेली. तिने शाल आणली. ती शाल हातातच घेऊन तो

निघाला.

पांघर, अंगावर घे ती दारातून म्हणाली.

तो काही बोलला नाही. आपली शालही तिने परत केली; जणू आजवरचे प्रेम परत केले असे त्याला वाटले. त्याच्या हातातच शालीची घडी होती. तो तसाच जात होता. हॉटेलमध्ये तो गेला. शून्य मनाने तो अंथरूणावर पडला आणि मिरीही रात्री अंथरूणातच अश्रुमोचन करीत होती. आज सारी लौकरच झोपली. मिरीला झोप नव्हती. पाऊस थांबला होता. आकाशात पुन्हा चंद्र मिरवत होता. समुद्रावर जावे असे मिरीच्या मनात आले. ती उठली. ती दरवाजाजवळ गेली. तो दारावर बाहेरून थाप मारली. तिने दार उघडले.

'डॉक्टर, तुम्ही कुठे? वादळात सापडले होता की काय ? आत येता?' 'मी जातो. त्या अपरिचित पाहुण्याने तुझ्यासाठी पत्र दिले आहे. मी जातो.'

डॉक्टर गेले. मिरी दार लाबून बरती गेली तिने दिवा लावला. ते पत्र तिने फोडले. काय होते त्या पत्रात?

'मिरी, माझ्या मुली, प्राणाहून प्रिय अशा माझ्या कन्यके, तुला काय

लिहू? तू का तुझ्या पित्याचा तिरस्कार करशील?" मी एक हतपतित मनुष्य आहे. तू माझी मुलगी. आज किती वर्षांनी मी तुला पाहतो आहे. त्या वाळेस तू दोन वर्षांची होतीस आणि तुझी माझी ताटातूट झाली आहे. ऐक, तुझ्या दुर्दैवी पित्याची सारी कथा ऐक. ज्या कृष्णचंद्रांकडे तू राहतेस, त्यांची पहिली पत्नी होती. ती विधवा होती. त्या विधवेच्या पूर्व संसारातील मी एक लहान मुलगा होतो. शांताराम माझे नाव. कृष्णचंद्रापासून माझ्या आईला मुलगी झाली. तिचेच नाव सुमित्रा. ती जन्मल्यापासून आईची प्रकृती बिघडली. बरीच वर्षेती अंथरूणाला खिळून होती. सुमित्रा नि मी एकत्र वाढत होतो. शिकत होतो. आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. पुढे आई मरताना आम्हांला म्हणाली, 'एकमेकांस अंतर देवू नका.' ती सुमित्राला म्हणाली, 'शांतारामला कोणी नाही.. तुझ्या पित्याचे त्याच्यावर प्रेम नाही. तू त्याची रक्षणकर्ती देवता हो, प्रकाशदात्री देवता हो.' मरताना आईने आपली अंगठी माझ्या बोटात घातली. माझ्या पित्याने तिला ती दिलेली होती. माझ्या आई-बापांची एकमेव अशी ती आठवण होती. प्राणाहून अधिक मी त्या अंगठीला जपत असे.

सुमित्राचे वडील मला मारहाण करीत. बोलत. परंतु, आई गेल्यावर त्यांनी माझे शिक्षणही थांबविले. त्यांच्या दुकानात मी नोकरी करू लागली. सुमित्रा नि मी एकत्र बसता कामा नये, एकमेकांशी बोलता कामा नये, अशी कितीतरी बंधने त्यांनी घातली. तरी आम्ही चोरून बोलत असू. एके दिवशी टेबलाजवळ आम्ही बोलत होतो. सुमित्राचे वडील आले. त्यांनी काठी उगारली. मी पैशाची अफरातफर केली, असा त्यांनी आरोप केला. मला संताप आला. मी एक बाटली त्यांच्या तोंडावर फेकली. सुमित्रा आडवायला गेली. परंतु ती बाटली अॅसिडची होती. सुमित्राच्या डोळ्यांत अॅसिड गेले. ती ओरडली. एका क्षणातच काय झाले ते माझ्या लक्षात आले. मी दुःख, संताप यांनी वेडा होऊन घरातून पळून गेलो. सुमित्रा आंधळी झाली. तिला मी तोंड कसे दाखविणार ?

एके दिवशी सायंकाळी जरा अंधार पडल्यावर हळूच मागील दाराने मी

घरात जात होतो. तो स्वयंपाकीणबाईंनी मला पाहिले. 'कोठे चाललास चोरा?' ती म्हणाली.

'सुमित्राकडे. शेवटचा निरोप घ्यायला.' मी म्हटले.

'तुमचे तोंडही ती बघणार नाही तिला तुम्ही आधले केलेत

'मी मुद्दाम तिच्या डोळ्यात अॅसिड घातले, फेकले, असे तिलाही वाटते

का?"

'होय, तिलाही वाटते. विचारतोस काय? तिचा बाप तिच्याशी बोलण्याची बंदी करील म्हणून तू असा सूड उगवलास. दुष्ट, हो चालता.' ते शब्द ऐकून मला मेल्याहूनही मेले झाले. मी मुद्दाम अॅसिड फेकले असे सुमित्रेला वाटणार नाही अशी मला श्रद्धा होती. परंतु तिनेही माझ्यावर तसा आरोप केला आहे असे ऐकून मला सारे निस्सार वाटू लागले. मी बाहेर पडलो. परंतु त्या घरात माझी आणखी एक ठेव होती. आईची अंगठी नि काही पैसे एकत्र बांधलेली अशी माझी एक पुरचुंडी त्या घरात होती! मी हळूच त्या घरात शिरलो. माझी ती पुरचुंडी घेऊन मी गेलो. जगात मला माझे असे कुणी नव्हते. मी निराश झालो होतो, मी समुद्रकिनाप्यावर जाऊन बसे.

एके दिवशी एक गलबत कोठे तरी दूर जाणार होते. त्याचा मालक

धाडशी खलाशी होता. 'कुठे जाणार तुमचे गलबत?' मी विचारले.

'लांब लांब. अमूकच ठिकाणी असे नाही. या गलबतातून मी जगाची यात्रा करणार आहे. माझा स्वभाव साहसी आहे. हे खलाशी माझ्याबरोबर येत आहेत. माझी बायकोही माझ्याबरोबर आहे. माझी मुलगी आहे. समुद्र हे आमचे दैवत. '

'मी येऊ तुमच्या गलबतात ? सांगास ते काम करीन. कोणी आजारी पडला तर सेवा करीन.'

'आणि तुफान आले, गलबत फुटले तर?" 'माझ्यासाठी रडायला कोणी नाही.'

'चल तर आमच्याबरोबर. '

'मिरे, त्या गलबतात मी चढलो. एके दिवशी ते गलबत निघाले. किती तरी दिवस समुद्रातून आम्ही जात होतो. परंतु अकस्मात गलबतावर रोगाची साथ पसरली. तो मालक आजारी पडले. त्याची बायको आजारी पडली. दुसरेही पुष्कळ खलाशी आजारी पडले. भराभर माणसे मरू लागली. आम्ही मेलेल्यास समुद्राच्या स्वाधीन करीत होतो. आणि तो खलाशीही मरणार असे वाटले. त्याने मला जवळ बोलावले.

'भल्या माणसा, मी मरणार. माझ्या मुलीचा तू सांभाळ कर. तू तिला आधार दे.'

मी त्याला वचन दिले. तो मेला. त्याची बायकोही मेली. त्याची ती पोरकी मुलगी. ती सारखी रडे. समुद्रात उडी टाकू बघे. मी तिला आवरीत असे. मी तिला प्रेमाने जेवू घाली. ती निजली की नाही बघत असे.

आमचे गलबत शेवटी एका बेटाला लागले. आमची यात्रा आम्ही तेथेच संपविली. त्या मुलीशी मी पुढे लग्न लावले. मी तेथे काम करू लागलो. लहानशी झोपली बांधली, आणि बाळ, एके दिवशी तू जन्माला आलीस. नक्षत्रासारखी तू वाढत होतीस. तू एकदा त्या बेटावर एक व्यापारी आला. तो दुसप्या एका बेटावर राहत होता, त्याला तेथे नवीन वसाहत करायची होती. नवीन लागवड करायची होती. त्याला मजूर हवे होते. आम्हांला तो पुष्कळ सवलती देणार होता. 'मी त्या बेटात जाऊन येतो. तेथे कशी काय परिस्थिती आहे हे पाहून येतो.' तुझ्या आईला मी म्हटले.

'नका तुम्ही जाऊ. येथेच बरे.' ती म्हणाली.

'मी काय फसवीन असे वाटते? आईने दिलेली अंगठी तुझ्या बोटात घालतो. या अंगठीहून प्रिय नि पूज्य मला काही नाही. त्या अंगठीची शपथ घेऊन सांगतो की मी परत येईन. तिकडे चांगले असले हवापाणी, तर तुम्हांला

तिकडे घेऊन जाईन. नाही तर येथेच सुखाने नांदू.'

तुझ्या आईची मी समजूत घातली. तुझा मुका घेतला. तू आपले चिमुकले हात माझ्या गळ्याभोवती घातलेस. शेवटी तुझ्या आईजवळ तुला देऊन मी निघून गेलो.

त्या बेटावर गेलो. चार-सहा महिने तेथे काम केले. तेथील मंडळी बरी वाटली. मी तुम्हांला आणण्यासाठी म्हणून एका गलबतात बसून आलो. तो तुमचे दर्शन नाही. ज्या बेटात तुम्ही राहत होतात, अकस्मात एका रोगाची साथ आली. शेकडो माणसे मेली. तुझी आई मेली असे कळले. तुझा पत्ता लागेना. मी निराश वाटेना. संसार माझ्यासाठी नाही असे वाटले. परंतु मरावे असे वाटेना. मी जगाचा यात्रेकरू झालो. मी जगाचा यात्रेकरू झालो. पैशाची मला इच्छा नव्हती. परंतु लाखो रूपयेही न मागता, न इच्छिता मला मिळाले.

अनेक धंदे केले. अनेक कारखान्यांत काम केले. कधीकधी वाचनायलयात जाऊन वाचीत बसे. कधी शेतकरी प्रयोगात काम केले. या शास्त्राचे ज्ञान, त्या शास्त्राचे मला वेड लागले. ज्ञानाचे वेड, खगोलशास्त्राचा मी अभ्यास केला. आकाशातील तान्यांकडे मी दुर्बिणीतून रात्ररात्र बघत असे. हे मी सारे करीत होतो. परंतु माझा आत्मा कायमचा असा कशातच रमला नाही. सारे क्षणिक खेळ होते. माझ्या दुःखी निराश मनाच्या लहरी होत्या. परंतु मी व्यसनांकडे वळलो नाही. दुर्गुणांकडे वळलो नाही. माझे सारे नाद निरूपद्रवी होते! ज्ञानाचे होते. विज्ञानाचे होते, तारे, वारे फुले यांची मी कोडी उलगडीत होतो. या विश्वात रमू बघत होतो.

असे करता करता एकदा एक महत्वाची घटना घडली. मी एकटाच एका जंगलातून जात होतो. रात्र झाली. जंगलात एक जुनाट देऊळ होते. त्या देवळात मी झोपलो होतो. तो एक चोर माझ्या उशा खालचे गाठोडे सोडीत होता. मी जागा झाली. त्या चोराला मी पकडले. मी माझ्या देहाची काळजी घेत नसे. तरीही मी सशक्त होतो. त्या चोराच्या छातीवर मी बसलो.

'तुला पोलिसांच्या ताब्यात देतो तुला असा धरून मीच नेतो.' मी त्याला

म्हटले.

'मला सोडा. माझ्याजवळचे सारे घ्या. परंतु मला सोडा.'

'काय आहे तुझ्याजवळ?' 'ही एक अंगठी. कोठून आणलीस ती?"

'ती माझ्या आईजवळ होती. माझी आई एका खलाशाची बायको होती. एका बेटावर ती काम करीत असे. एकाकी साथ आली. शेकडो माणसे मेली, माझी आई, दुसप्या एका खलाशाची बायको सारी आजारी होती. त्या दुसप्या खलाशाची बायको, सारी आजारी होती. त्या दुसप्या खलाशाची बायको मेली. तिची लहान मुलगी होती. त्या खलाशाची बायकोच्या हातात अंगठी होती. तिच्याजवळ काही पैसे होते. 'माझ्या मुलीला तुम्ही सांभाळा' असे ती मरताना म्हणाली. तिने तिला ती अंगठी दिली. आईने तिच्चा लहान मुलीचा सांभाळ केला. आईच्या नकळत तिच्या पेटीतील ही अंगठी मी चोरली. ही अंगठी मला आवडते. घ्या ही अंगठी, ह्या अंगठीला इतिहास आहे.'

'ती मुलगी कोठे आहे? तुझी आई कोठे आहे?'

‘मला माहीत नाही. काही वर्षापूर्वी मी घरी गेलो होतो. आईने माझे लग्न केले. मला एक मुलगा झाला. परंतु मी पुन्हा घर सोडले. चोरीचा धंदा मला आवडतो. एके ठिकाणी राहणे मला आवडत नाही. मी पुन्हा एके ठिकाणी लग्न केले. काही दिवस संसार केला. पुन्हा त्या पत्नीला सोडून मी जगाचा यात्रेकरू बनलो. नका, कठोरपणे माझ्याकडे बघू नका.'

'किळसवाणे आहे तुझे जिणे.'

‘काही म्हणा; परंतु मला माझे स्वातंत्र्य द्या."

'तुझ्या आईने ज्या लहान मुलीला वाढवले ती कुठे आहे. ?'

'आमच्या गावातील एका आंधळ्या बाईने तिला आधार दिला. एकदा माझ्या आईने त्या मुलीला मारले. मिरी तिचे नाव. मिरी घरातून निघून गेली. म्युनिनिपालिटीच्या दिवे लावणाप्याने तिला पाळले. पुढे तो मेला. तेव्हा आंधळीने तिला आधार दिला.'

'ती आंधळी आहे का जिवंत?'

'सहा वर्षापूर्वी तरी होती. तिचा म्हणे कोणी प्रियकर होता. त्याचे स्मरण

करीत ती जगते. लोक तिला देवता मानतात. सोडा मला. तुम्ही सारे हे का

विचारता? तुम्ही कोण?'

'मीही एक यात्रेकरू आहे. '

‘माझ्यासारखे?’

'परंतु तुझ्याप्रमाणे चोप्या करणारा नव्हे.' 'प्रामाणिक श्रम करूनही पोट भरत नाही. चोरी करू नये काय करावे ?'

'तू केलेस का कधी श्रम ?'

'आई करी. परंतु घरात नेहमी ददात असे. जाऊ द्या मला.'

'मिरे, त्याला मी जाऊ दिले. ती अंगठी माझ्याजवळ परत आली. माक्मा आईन मरताना मला दिलेली ती अंगठी ' माक्मा आईला माझ्या पित्याने दिलेली अंगठी मी तुझ्या आईला दिलेली ती अंगठी! त्या जंगलात ती अंगठी पुन्हा माझ्याजवळ आली. तू भेटशील अशी आशा वाटली. परंतु आशेचा अंकुर मी मनातून खुडून टाकला. जगच्चालकाची इच्छा नेहमी मानवी इच्छेच्या विरुद्ध असते, असा माझा कटुतम अनुभव होता. म्हणून मी "तुझ्या तपासात न येता पुन्हा जगभर भटकलो. सिंह पाहिले. हत्तींचे कळप पाहिले. उंच मानेचे जिराफ पाहिले. हिप्याच्या खाणी पाहिल्या. परंतु तुला भेटायला यावे असे मधून मधून मनात येतच असे.

एकदा लंकेच्या द्वीपकल्पात एका सुंदर बौद्ध धर्माच्या विहारात मी झोपलो होतो आणि स्वप्नांत सुमित्रा आली. 'तुमची मी वर्षानुवर्षे वाट पहात आहे.' असे ती म्हणाली. मी डोळे उघडले. मी पुन्हा झोपलो. पुन्हा आंधळी सुमित्रा स्वप्नात दिसली. 'शांताराम, का रे येत नाहीस?' ती मला म्हणाली. शेवटी मी तुमचा तपास करीत आलो. त्या पहिल्या गावी परत आलो. मला कोणी ओळखले नाही. जगातील साप्या ठिकाणच्या हवापाण्याच्या माझ्या चर्येवर परिणाम झाला होता. परंतु मी डॉक्टरांकडे गेलो. बोलता बोलता गोष्टी निघाल्या. ते नि तुम्ही हवाफेर करायला जाणार असे ऐकले. ' मी येऊ का बरोबर?' असे त्यांना विचारले. त्यांनी आनंदाने संमती दिली. मी तुमच्या बरोबर आलो आणि तुम्हाला पाहिले. शांत, गंभीर सुमित्रा पाहिली आणि तू, माझे डोळे भरून आले. मी ते इथे कोणाला दाखवले. नाहीत आणि त्या डोंगरावर मी निजलो होतो. झोपेत काही बडबडलो. हा कोणी दुःखी, निराश जीव आहे असे तुला वाटले. तुझ्या डोळ्यांतील अश्रू माझ्या मुखावर पडले. मी जागा झालो. मी नास्तिकासारखे बोलत होतो. तू श्रद्धेचा धर्म मला देत होतीस. अंधारापलिकडचा प्रकाश दाखवित होतीस. ढगापलीकडे असणारा सूर्य दाखवीत होतीस. तुझे बोल ऐकून माझे निराश हृदय फुलले. तुला जवळ घ्यावे असे वाटत होते. परंतु वेळ आली नव्हती. मी तुम्हांला सोडून पुढे गेलो. तुमच्यासाठी ठिकठिकाणी जागा घेऊन ठेवीत असे. तुमच्याबरोबर राहणें मला सहन होईना. सुमित्रा, माझी सुमित्रा ! अंध सुमित्रा ! तिच्या या दुर्दैवाला मी कारण. परंतु तिच्या मनात माझ्याविषयी सदभाव आहे की नाही कोणास ठाऊक? मी पैसे खाल्ले असे तिचेही मत आहे की काय? मी तुमच्यापासून दूर राहत होतो.

परंतु तुला मी डोळ्यांआड करू इच्छित नव्हतो. त्या नंदनवनात तू तुझा मुरारी पाहिलास. त्या आगगाडीच्या रुळाजवळ तू उभी होतीस. मी तुला मागे ओढले. तुझी निराशा मी ओळखली.

मिरे, माझ्या बाळे, निराश नको होऊस. तो तुझा मुरारी तुला मिळेल. मी त्याला भेटलो. त्याचे तर तुझ्यावर प्रेम दिसते. काही तरी घोटाला आहे असे बाटते. तुझा गैरसमज झालेला असावा. तुझा प्रेमचंद्र, तो संपूर्णपणे फुलेल. मिरे, तूही माझा तिरस्कार करशील का? मी माझी सारी कहाणी तुझ्यासमोर ठेवली आहे. आपल्या पित्याला प्रेमाने भेटावे असे वाटत असेल तर धावत ये. मी बाहेर तुमच्या बागेत उभा आहे. डॉक्टर पत्र देऊन जातील. मी बागेतील पुन्नागाच्या झाडाखाली उभा असेन. तू आली नाहीस तर तुलाही माझा तिटकारा वाटतो असे समजून मी निघून जाईन. तू सुखी अस. तुझा प्रियकरही तुला मिळो. तुझे जीवन कृतार्थ होवो. तुझी श्रद्धा न भंगो. तुझ्या बापाचा तुला तिरस्कार वाटला, तरी तुझ्या बापाचे आशीर्वाद तुला मिळत जातील. ज्याची प्रार्थना मी पुन्हा करू लागलो, त्याची तुझ्यासाठी प्रार्थना करीत जाईन. मिरे बाळ! आशेने, अपार भावनांनी उचंबळून तुझा दुर्दैवी पिता तुझी वाट पाहात आहे.

तुझा पिता

शांताराम.

मिरीच्या डोळ्यांतून अश्रूधारा गळत होत्या. पत्रातील 'माझ्या मुली, माझ्या कन्यके-' हे शब्द वाचूनच ती थरारली होती. जणू शरीराचा अणुरेणू कंपायमान झाला. किती तरी कोडी उलगडत होती. स्वतःच्या जीवनाची कथा तिला समजली. अभागी पिता! तिने ते पत्र उशीखाली ठेवले. ती खाली आली. हळूच दार उघडून बागेत आली. आकाशात चंद्र शोभत होता. तिला पुन्नागाच्या झाडाखाली पित्याची मूर्ती दिसली. तिचा पिता! होय मिरीचा पिता. ती धावली. पिता पुढे आला.

'बाबा, बाबा, माझे बाबा-' ती स्फुंदत होती. पित्याने तिला हृदयाशी धरले. त्याच्या डोळ्यांतील अधूंचा तिला अभिषेक होत होता.

'तू माझा तिटकारा नाही करत तर.' त्याने धीराने विचारले. " काय विचारता बाबा? कोणते असे पाप तुमच्या हातून घडले? तुम्ही

पवित्र आहात, थोर आहात.'

'मी आता जातो, बाळ.'

'आता जाऊ नका. घरात चला बनवास संपो सुमित्राताईंना किती आनंद

होईल! तुमच्या स्मरणावर त्या जगत असतात. तुमच्या प्रेमाची करुणकथा त्यांनी मला सांगितली होती.

'तिला मी अंध केले असे नाही तिला वाटत?'

'नाही, नाही, 'मी असे कसे समजेन' असे त्या म्हणाल्या. माझे प्रेम का इतके क्षुद्र होते? असे त्या म्हणाल्या. तुम्ही भेटाल असे त्यांना वाटत होते. बाबा चला ना आत. तुमच्या मांडीवर डोके ठेवून मला निजू द्या. मला झोपवा. खलाशांची गाणी म्हणा. समुद्राचे मला इतके वेड का, ते आज मला कळले. माझी आई खलाशाची मुलगी होती. बाबा, चला ना आत.""

'आज नको. मी उद्या येईन.'

"खरेच!"

'ही बाळ, जा आता तू. मी आज सुखाने झोपेन. तुझ्या श्रद्धेचा विजय असो.'

‘बाबा, आपण येथेच बसू.'

‘नाकी, पाऊस पडलेला आहे. येथे सारे गार आहे, बाळ.' 'मला बाधणार नाही. वाप्यांची, सागरलहरींची मी कन्या आहे. '

'माझे ऐक. हा वारा बाधेल. मुरारीसाठी तरी प्रकृतीला जप.' 'आणि तुमच्यासाठी नको का?" 'मी आता म्हातारा झालो.' 'बाबा, मुरारी काय म्हणाला?'

' म्हणाला, 'सारे त्रिभुवन कोणी मला दिले नि मिरीचा त्याग कर म्हणाले, तरी मी मिरीला जवळ करीन. त्रिभुवन संपदा झुगारीन. सारे मंगल होईल. जा, आनंदाने झोप. उद्याचा सूर्य सुंदर उगवेल. जा आता बाळ.'

त्याने तिच्या केसांवरून हात फिरवला. पुन्हा एकदा त्याने तिला हृदयाशी धरले आणि ती मागे बघत बघत गेली. शांतारामही गेला. मिरी आपल्या खोलीत बसली. ते पत्र तिने पुन्हापुन्हा वाचले. आपली आई कशी बरे असेल, तिचे डोळे माझ्यासारखे मोठे असतील का, असे तिच्या मनात आले. शेवटी आनंदाने ती अंथरूणावर पडली. परंतु मुरारीची मूर्ती डोळ्यांसमोर येऊन पुन्हा ती गंभीर झाली. शेवटी केव्हा तरी तिचा डोळा लागला.

परंतु पहाटेसच ती उठली. बागेत गेली. तिने सुंदर सुगंधी फुले तोडली. का बरे? तिला आठवण आली. यशोदाओईंची आठवण आली. मुरारीच्चा आजोबांची आठवण आली. ती समुद्रावर गेली. सर्वत्रशांत होते. फक्त लाटांचा आवाज दुरुन कामांवर येत होता. ओहोट होता. ज्या ठिकाणी यशोदाआईचा देह अग्रीच्या स्वाधीन करण्यात आला होता, त्या ठिकाणी ती उभी राहिली. तिने प्रणाम केला. त्या ठिकाणावर पुष्पांजली वाहिली. तेथे डोळे मिटून ती जणू क्षणभर ध्यानस्थ बसली. इतक्यात कोणी तरी तिच्या मागे येऊन तिचे डोळे झाकून उभे राहिले. कोण होते? मिरीने डोळे सोडवले. तो तिच्याजवळ तिचा मुरारी उभा होता.

'मिरे, आपण दोघांनी पूजा केली असती. तू एकटी का आलीस?' 'म्हटले तू माझ्याबरोबर येशील की नाही?" 'मिरे, तू का माझा तिरस्कार करतेस?'

'मुरारी, आपण बहीणभाऊ रूपन तरी राह'

'मिरे, का तुझी खरेच अशी इच्छा आहे? तुझ्यावर माझे प्रेम मी लादू इच्छित नाही. किती झाले तरी गरीब यशोदाआईचा मी मुलगा. परंतु तुझ्याकडे माझे सदैव डोळे होते. तू आजोबांची सेवा केलीस; आईची सेवा केलीस. आईने तुझ्यावर प्रेम करायला मरता मरता मला कळविले. आईची शेवटची रक्षा येथेच पडली. या पवित्र स्थानी प्रतिज्ञेवर मी सांगतो की तुझ्याशिवाय मुरारीच्या हृदयात दुसप्या कोणासही कधी स्थान मिळाले नाही.'

‘मुरारी!”

'काय? स्पष्टपणे विचार.'

'तुला तुझ्या धन्याच्या त्या मुलीबरोबर मी पाहिले. '

‘त्या गावी ना? अग, तिचे वडील आजारी होते. त्यांनी मला तिला ताबडतोब आणण्यासाठी पाठवले म्हणून मी तिकडे आलो. तिला त्या उपवनात गाठले. '

'मुरारी, लवकरच येईन.' ती म्हणाली. 'भेट होईल ना?' तिने विचारले. 'तुझ्याशिवाय प्राण जाईल.' वगैरे शब्द मी ऐकले. '

'अग, तिच्या वडिलांना मी लवकर येईन असा निरोप ती देत होती. वडिलांची भेट होईल ना? असे ती दुःखाने विचारीत होती; तुझ्याशिवाय प्राण जाईल हे तिच्या पित्याचे शब्द मी तिला सांगत होतो. वा! मिरे, तुम्ही बायका सुताने स्वर्गास जाणाप्या आहांत. काही तरी अर्धवट ऐकायचे, मागचा पुढचा संदर्भ माहीत नसायचा आणि उगीच आकांत करायचा. काल मी किती आशेने तुझ्याकडे आलो. परंतु तू नाचली नाहीस. आनंदाने उचंबळली नाहीस. जणू सारे प्रेम नष्ट झाले आहे असे वाटले.'

'आणि तू तरी बोललास का? जाताना शाल प्रेमाने दिली, तीही अंगावर घेतली नाहीस? तशीच हातात घेऊन गेलास. खरे की नाही?' 'मला वाटले मी पाठवलेली शाल तू परत करीत आहेस. मला वाईट

वाटले. जणू माझे काही जवळ ठेवायचे नाही असे तू ठरवले असे मला वाटले. ‘तुझा पक्षी परत केला का? तो गालिचा परत केला का ? तुझी पत्रे परत केली का? ती तुझी पत्रे शंभरदा मी वाचीत बसते. ती पत्रे म्हणजे सारा

खजिना. '

'पक्षी जिवंत आहे?'

'हो. मिरे ये, मुरारी ये' असे म्हणतो. परंतु मुरारी कसला मिरीकडे येतो असे वाटले. काल त्या पाखराला जवळ घेऊन मी रडले. मुरारी, खरेच का तू माझा आहेस?

'आईच्या ह्या दहनभूमीवर मी तुझी प्रतारणा करीन का ? मिरी तू माझी

'तू'

मिरी आहेस. तू माझे सर्वस्व आहेस.'

त्या दोघांनी एकमेकाचे हात हातात घेतले. 'माझ्याकडे बघ', ती म्हणाली.

ते कसले अश्रू होते? सुखाचे की दुःखाचे ते अश्रू । अनिर्वचनीय होते. त्या

अश्रूंत एकमेकांचे सारे जीवन होते. ते एकमेकांना मिळत होते.

'मुरारी, काल तुला हॉटेलात कोणी भेटले?'

'हो'

'मुरारी, ते माझे वडील.'

'काय म्हणतेस. मिरे ?"

‘आणि सुमित्राताईंचे ते प्रियकर."

'तू काय काय तरी सांगत आहेस?"

मिरीने मुरारीला ते पत्र वाचायला दिले. त्याने वाचले.

'करुणगंभीर जीवन.'

'चल आता घरी'

‘मी मागून येईन.’

'आता दूर नको राहूस."

'कोण म्हणतो दूर राहायचे ? परंतु मला काम आहे. तिसप्या प्रहरी येईन.' दोघे जात होती. बैगल्याजवळ दोघे आली.

'मुरारी वाटते? कधी आलास कोणी विचारले.

'मिरीचा प्राण आला.' दुसरे कोणी म्हणाले. मिरी बंगल्यात गेली. मुरारी निमून गेला. मिरी सुमित्राताईंकडे आली.

'मिरे, कोठे गेली होतीस?'

'समुद्रावर. मुरारीही भेटला. तो माझाच आहे. उगीच माझा गैरसमज झाला. आणि सुमित्राताई, तुम्हांला एक बातमी सांगू? तुम्ही शांत चित्ताने ऐकाल?"

'सांग बेटा.'

'शांताराम आले आहेत.'

‘शांताराम, माझा शांताराम ?"

'होय, तुमचे शांताराम आणि या मिरीचे तेच जन्मदाते. तुम्ही शांतारामांच्या मुलीचे आजपर्यंत पालनपोषण केलेत.'

'तू माझ्या शांतारामाची मुलगी?' 'ऐका सारे. मी एक पत्र वाचून दाखविते. '

तिने ते पत्र भावनोत्कट वाणीने वाचून दाखविले. दोघीजणी स्तब्ध

होत्या. सुमित्रेच्या डोळ्यांतून शांत अश्रुधारा चालल्या होत्या.

"त्या आजीबाईंच्या शब्दांनी केवढा हा गोंधळ झाला! आणि शांतारामाने त्या शब्दांवर विश्वास ठेवला ! असो, देवाची इच्छा तसे झाले.

मिरे, कोठे आहेत ते?"

'ते आज तिसप्या प्रहरी येणार आहेत. '

मिरी निघून गेली. ती आज अपार आनंदली होती. पिंजप्यात पक्षी नाचत

होता. 'मिरे ये, मुरारी ये,' असे तो म्हणत होता.

'आज येईल हो मुरारी.' ती त्याला सांगत होती.

‘मिरे, आज सारे वातावरण विद्युन्मय दिसत आहे. तुझ्या तोंडावर आज अपार आनंद आहे. त्या आनंदात एक प्रकारची प्रेमळ कोवळीक आहे. काय आहे आज?'

'आज माझा मुरारी मला भेटणार. सुमित्राताईंचा हृदयेश्वर त्यांना भेटणार, माझे वडील मला पोटाशी धरणार. आजचा दिवस त्रिवार धन्य आहे. '

मिरीने प्रेमाला सारी हकीकत सांगितली. मिरीची तहानभूक सारी हरपली होती. तिचे पोट आज भरून आले होते. ती आज सुंदर पातळ नेसली होती. तिने सुंदर फुले केसांत घातली होती. कानांत कर्णफुले घातली होती. ती अती मधुर दिसत होती.

आणि मुरारी आला.

'बाबा मुरारी आला.' तिने कृष्णचंद्रास सांगितले.

कृष्णचंद्र दिवाणखान्यात आले. मुरारीने त्यांना नमस्कार केला.

'बस मुरारी, मिरी तुझ्या वाटेकडे डोळे लावून होती. आता दोघे सुखी व्हा.' ते म्हणाले.

मिरीने सुमित्राताईंना खाली आणले, मुरारीने त्यांना नमस्कार केला.

'मुरारी, तुझी आई आज हवी होती. परंतु या मिरीने त्यांची सेवा केली. वाईट नको वाटून घेऊस. बैस. मिरे, तूही बैस.' ती म्हणाली.

त्यांची आनंदमय बोलणी चालली होती. तो शांताराम आले. कृष्णचंद्र बघतच राहिले.

'सुमित्रेचे बाबा, हा शांताराम तुम्हांला प्रणाम करीत आहे.'

'कोण शांताराम ?' ते चकित होऊन उदगारले.

'होय. मीच तो दुर्दैवी शांताराम.' तो म्हणाला.

सुमित्रा थरथरत उभी राहिली. तिने आपला कृश हात पुढे केला.

शांतारामने तो हातात घेतला.

'सुमित्रा, मी दोषी नाही. मी का जाणूनबुजून तुला अंध केले? नाही हो. प्रभू साक्षी आहे.' ‘शांताराम, मी असे नाही रे कधी मनात आणले. चुकूनही कधी तसे मी

बोलले नाही. मनातच आले नाही, तर बोलेन कसे !'

'स्वयंपाकीणाबाईने तसे सांगितले. '

माझ्यावरच्या प्रेमाने ती तसे बोलली माझ्या हृदयात सदैव तुझीच

प्रेममूर्ती गेली वीस वर्षे आहे.'

'शांताराम, आता कोठे जाऊ नका. सुमित्राची नि तुमची आता ताटातूट नको. येथेच राहा.'

'परंतु मी पैसे खाणारा. '

'ते का अद्याप तुमच्या मनात आहे? दुकानातील दुसप्याच एका कारकुनाची ती लफंगेगिरी होती असे मागून उघडकीस आले. मी तुम्हांला निष्कारण दोष दिला. टाकून बोललो. शांताराम, आता जाऊ नका. सुमित्राला थोडे दिवस तरी खरे समाधान लाभो.'

प्रेमा पक्ष्याचा पिंजरा घेऊन आली. पक्षी नाचत होता. 'मिरे ये, मुरारी ये' म्हणत होता.

' आणि ही माझी मुलगी मिरी.' शांताराम म्हणाला.

'तुमची मुलगी?' कृष्णचंद्रांनी विचारले.

शांतारामाने सारा इतिहास सांगितला. अनेक वर्षांची दुःखे, वेदना अनुभव त्याने सांगितले. सारी मंडळी स्तब्ध होती.

'शेवटी अंधारातून प्रकाश आला.'

एका मंगल दिवशी मिरी नि मुरारी यांचा विवाह लागला. कृष्णचंद्रांनी मोठा सोहळा केला. मुरारीच्या धन्याने त्याला मोठा आहेर दिला. राहायला एक बंगला दिला. आणि ती लठ्ठ बाई! ती लग्नाला आली होती. तिने मिरीला मोत्यांचा हार दिला आणि म्हणाली, 'मुरारी, मी मेल्यावर माझे सारे तुझेच होणार आहे. सदुपयोग कर. जगाच्या उपयोगी पड. दोघे सुखी व्हा. जगाला सुखी करा.'

मिरी नि मुरारी बंगल्यात राहायला गेली. सारे सामान तेथे आले. पिंजराही आला. कृपाकाकांची ती खुर्ची, कंदील, सारे आले. प्रेमाच्या आठवणी! त्या दिवशी रात्री मिरी नि मुरारी बाहेर अंगणात उभी होती. आकाशात तारे चमचम करीत होते.

'मिरी, हल्ली हे म्युनिसिपालिटीचे गॅसचे दिवे आहेत. पुढे विजेचे होतील.

कृपाकाकांच्या वेळेस असे नव्हते. नाही का? काळ बदलत आहे.' ' परंतु हृदये तीच. भावना त्याच. प्रेम तेच. कृपाकाकांनी जो प्रकाश जगाला, मला दिला, तो अनंत आहे. त्यांची सर कशाला तरी येईल का?'

‘नाही येणार, स्वर्गातून प्रेमाचा अभंग कंदील ते या विश्वाला दाखवितच

आहेत. ' मिरी नि मुरारी यांचे असे मंगल बोलणे चालले होते आणि तिकडे एका बंगल्याच्या गच्चीवर सुमित्रा नि शांताराम दोघे बसली होती. हातात हात

घेऊन बसली होती. मुकी होती. शेवटी शांताराम म्हणाला,

'सुमित्रा, तू एकटी, मीही एकटा, आपण एकत्र राहू. पति-पत्नि होऊ.

शेवटची वर्षेतरी एकत्र राहू. मला नाही म्हणू नकोस.' 'शांताराम, सुमित्रेचे दिवस आता फार नाहीत.'

'जे दोन असतील ते तरी एकमेकांची होऊन राहू. आपण एकमेकांची होतो. तारूण्यात आपली हृदये एकरूप होती. आज इतक्या वर्षानंतरही ती तशीच आहेत. '

'मी अशी अशक्त.'

तुझ्या तोंडावर टवटवी येईल. सुमित्रा, मला नाहीं म्हणू नकोस. दैवाने इतकी वर्षे आपणांस अलग ठेवले आज प्रभूने एकत्र आणिले आहे. त्याची इच्छा पूर्ण करू. ये.'

'शांताराम, जशी तुझी इच्छा. तुझे घर ते मी माझे करीन."

आणि एका रम्य ठिकाणी त्यांनी सुंदरशी झोपडी बांधली. आजूबाजूला आमराई होती. त्यांनी फुले फुलविली. पक्षी तेथे किलबिल करीत. सुमित्रा नि शांताराम तेथे शांत आनंद अनुभवीत होती.

एके दिवशी म्हातारी स्वयंपाकीणबाई सुमित्राकडे आली नि म्हणाली,

'मी तुमच्याकडेच राहते. '

'नको आजीबाई. आपण सारीच जर दूर गेलो तर बाबांना कोण बरे ? मी येत जाईन. मिरी, मुरारी येत जातील, तुम्ही तिकडेच राहा.' सुमित्रेने समजावले.

आणि ती आजीबाई पुन्हा कृष्णचंद्रांकडे राहायला गेली. सारी सुखी झाली. प्रेमालाही पुढे अनुरूप वर मिळाला. मिरी-मुरारींनीच तिचे लग्न जमवून आणले. मिरी नि मुरारी, सुमित्रा नि शांताराम यांच्या हृदयात देवाचा प्रकाश आहे, बाहेरचे सूर्यचंद्र मावळतील; परंतु हृदयांतील श्रद्धेचा सूर्य, श्रद्धेचा चंद्रमा कधी मावळत नसतो. तो परमेश्वरी प्रकाश सदैव आहे. तो प्रकाश ज्याला मिळाला तो धन्य होय. तो प्रकाश ज्याला मिळाला तो खरा डोळस; तो प्रकाश ज्याला नाही तो आंधळा
11
Articles
मिरी
0.0
आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमोल वारसेसाठी आदर्श म्हणून स्थानिक झाली आहेत. गेल्या पन्नासहूनही, आणि अनेक वर्षे आणि पीढ्यानुसार, हे ग्रंथ नित्यदिने उभे असलेल्या युवकांच्या हातातून पसरले गेले आहे. ह्या आधुनिक जगातील सांस्कृतिक परिवर्तनांच्या पाठीवरती, या पुस्तकांच्या मूल्याला तेवढीच वाढ पाहून आलेली आहे, ज्यामुळे ह्या ग्रंथांची महत्वाची वैशिष्ट्यं दृष्टी आलेली आहे.
1

7 June 2023
4
1
0

सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आह

2

7 June 2023
2
0
0

मिरी अंथरूणात होती. जवळ एक बाई काही तरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात

3

7 June 2023
1
0
0

मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते. 'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.''ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.' 'येऊ दे बरोबर. तुम्हाला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.' मिरी आली. परकर-प

4

7 June 2023
1
0
0

आज मिरी सुमित्राताईकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामान घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना श

5

7 June 2023
1
0
0

मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने

6

7 June 2023
1
0
0

सायंकाळची वेळ होती. सुमित्रा आरामखुर्चीत शांतपणे बसून होती. समोर आकाशात सुंदर रंग दिसत होते ! परंतु आंधळ्या सुमित्राला सृष्टीचे ते रमणीय भाग्य थोडेच कळणार होते? ती आपल्या विचारसृष्टीत रमून गेली होती.

7

7 June 2023
1
1
0

सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची

8

7 June 2023
1
0
0

मिरी यशोदाआईकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या

9

8 June 2023
1
0
0

मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना. 'सुमित्रा,

10

१०

8 June 2023
1
0
0

निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेत तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनाप्याला आली. स

11

११

8 June 2023
1
0
0

दुसप्या दिवशी दुसरी बोट आली. किनाप्याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. डॉक्टर आहे. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे?'दुःखी मिरीने मुद्दामच स्वतःला मागे ठेवले.' सुम

---

एक पुस्तक वाचा