shabd-logo

7 June 2023

25 पाहिले 25
मिरी अंथरूणात होती. जवळ एक बाई काही तरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात होती. डोळे मिटी; पुन्हा ते उघडून बघे. तिचे ते टपोरे डोळे ! तापातही ते तेजस्वी दिसत होते.

'काय हवे बाळ? थोडे दूध देऊ का?'

'हं. 'थांब हो, कोमट करून आणते. "

ती बाई आत गेली. एका वाटीत ती काही तरी घेऊन आली.

'कर आ. मी चमच्याने घालते. '

'काय आहे हे?'

'आरारूटची लापशी. डॉक्टरांनी ही लापशी द्यायला सांगितले आहे.' 'द्या.'

चमचा चमचा करून तिने ती लापशी घेतली.

'पुरे आता.'

'बरे, मग देईन थोड्या वेळाने, पडून राहा.' त्या बाईने मिरीचे तोंड पुसले. तिच्या अंगावर तिने नीट पांघरूण घातले

आणि ती पुन्हा शिवीत बसली. '

'तुम्ही कोण? कृपाकाका कुठे आहेत?'

‘ते बाहेर गेले आहेत. तुझ्याजवळ बसायला त्यांनी मला सांगितले आहे.' 'तुम्ही शेजारी राहता?"

‘हो. कृपाकाकांचा नि आमचा घरोबा आहे. कृपाकाकांवर सर्वांचे प्रेम. कारण ते नेहमी सर्वांच्या उपयोगी पडतात. त्यांना जगाचा संसार. स्वतःचा संसार आहे कुठे त्यांना? आम्ही त्यांना देवमाणूस म्हणतो.' 'तुम्हीसुध्दा एकट्याच आहात?'

'मी एकटी नाही. माझा मुलगा आहे. माझे वडील माझ्याजवळच राहतात. आम्ही तिघे आहोत.

'तुमच्या मुलाचे नाव काय?'

'मुरारी.'

'आहे चौदा-पंधरा वर्षाचा. तू बोलू नकोस बाळ. दमशील. पडून राहा.'

'तुमचा मुरारी माझ्याशी खेळेल का?'

'हो. तू बरी हो; मग खेळा हं दोघे.'

'हे काय शिवता?'

'अंगातले. '

'कोणाला ?'

'तुला; कृपाकाकांनी हे गरम कापड आणले आहे. तुला पेटी हवी ना?' 'छान आहे कापड !'

'तू आता बोलू नकोस.'

'बरे तर मग, पडून राहू डोळे मिटून?'

'हो.'

मिरी शांतपणे पडून राहिली. थोड्या वेळाने कृपाराम आला.

'कसे आहे यशोदाबाई, मिरीचे?'

'शुद्धीत होती. लापशी दिली तिला. मग ती चांगले बोलत होती आता तिला बरे वाटेल, असे दिसत आहे चिन्ह. '

'तुम्हालाही त्रास.'

'कृपाकाका, तुम्ही त्या मुलीला जवळ घेतलेत. आम्ही का इतकीशी मदतही करू नये तुम्हाला? ही पेटी झालीच शिवून. ती जागी झाली म्हणजे तुम्ही तिला घाला. मी आता जाते हं!'

'जा, तुम्हाला आता घरचे काम आहे. मुरारी शाळेतून अजून आला नाही वाटते? आज शनिवार ना?"

'तो ड्रॉईंगच्या परीक्षेस बसणार आहे. त्यासाठी आणखी थांबावे लागते त्याला.'

'यशोदाबाई, तुम्हाला फार कष्ट पडतात. तुमचा मुरारी केव्हा एकदा मिळवू लागेल ते खरे. '

'कर्तव्य करीत राहायचे. तुमचे उदाहरण आमच्या डोळ्यांसमोर आहे. मी जाते. काही लागले सवरले तर तुम्ही सांगा. रात्री मुरारीही येईल जागायला, पहारा करायला. बरे का? संकोच नका करू. नाही तर तुम्ही आणखी आजारी पडायचेत. दम्याचा झटका यायचा. जाते हं. '

'जा हं.'

यशोदाबाई गेल्या. कृपाकाका मिरीजवळ प्रेमाने बसले. तिच्या केसांवरून ते हात फिरवीत होते. खाली वाकून त्यांनी तिचा एक प्रेमभराने पापा घेतला आणि मिरीने डोळे उघडले, तिने दोन्ही हातांनी कृपाकाकांचे तोंड धरून ठेवले.

'कुठे गेले होतात मला सोडून? आता जाऊ नका हं. नाही तर असे धरून

ठेवीन. पकडून ठेवीन.'

'यशोदाबाई होत्या ना जवळ?'

'हो, त्यांनी लापशी दिली. आणि मला त्या पेटी शिवीत होत्या, छानदार कापडाची. '

'ही बघ पेटी, घाल बरे अंगात. ऊठ हळूच . '

मिरी उठली. कृपाकाकांनी तिला पेटी घातली. 'छान झाली. आता थंडीची बंडी होईल.'

'मिरे, संध्याकाळी जावे लागेल बाहेर. दिवे लावायला नको का जायला? गेले पाहिजे.

'तुम्ही किती दिवस असे काम करणार? तुमचे पाय दमत नाहीत? मी मोठी झाली म्हणजे मी करीन तुमचे काम. घेईन खांद्यावर शिडी आणि सारे दिवे लावीन. लोकांना अंधारात रस्ता दिसेल. नाही कृपाकाका?'

'तू फार बोलू नकोस.'

'पुन्हा यशोदाबाई माझ्याजवळ बसतील?'

'त्यांचा मुरारी बसेल.'

'मुरारी चांगला आहे का?'

'त्याच्याहून चांगला मुलगा मी पाहिला नाही.'

'मिरी कशी आहे?'

'गोड आहे. आता पडून राहा. अजून अंगात ताप आहे. वारा लागता कामा नये. पांघरूण असू दे अंगावर.'

मिरी पडून राहिली. पुन्हा तिला शांत झोप लागली. सायंकाळी शिडी खांद्यावर घेऊन हातात कंदील घेऊन कृपाकाका आपल्या कामाला गेले. आणि मुरारी मिरीजवळ बसला होता. त्याने तिथे दिवा लावला. एक उदबत्ती त्याने तेथे ठेवली लावून. तो तेथे प्रार्थना म्हणत होता. गोड अभंग म्हणत होता आणि शेवटी म्हणाला, ‘देवा, मिरीचा ताप निघू दे. कृपाकाकांना आनंद होऊ दे. त्यांच्या श्रमांना, प्रयत्नांना यश दे.'

'तू का मुरारी ?' मिरीने डोळे उघडून विचारले.

'मुरारी, मला घाम आला आहे.'

'मी पुसतो हं. आधी खिडकी लावून घेतो. वारा नको लागायला.' त्याने खिडकी लावून घेतली. त्याने तिची ती पेटी काढली, तिचा सारा

घाम त्याने नीट पुसला. पुन्हा ती पेटी त्याने तिला घातली. 'पडून राहा हं मिरे. तुला काही गरम हवे का न्यायला? कॉफी हवी?

'कोण करील कॉफी?'

'मी करीन. मला येते करायला.'

'दे मला कॉफी, आत्याबाई स्वतः पीत असे. मला नसे देत.' मुरारीने आपल्या घरून कॉफी करून आणली. मिरीने ती कढत कढत कॉफी घेतली. पांघरूण घेऊन ती पडून राहिली. 'मुरारी, तू माझ्या बरोबर खेळशील?"

'हो.'

'मी तुला आवडेन का?'

'न आवडायला काय झाले? तू का वाईट आहेस?'

'आत्याबाई मला वाईट म्हणायची. माझ्या डोळ्यांना नावे ठेवायची.
म्हणे, केवढाले डोळे!'
‘मला तर असे मोठे डोळे आवडतात. ज्यांचे डोळे किरटे असतात, ती माणसे दुष्ट असतात.'
'आणि मोठ्या डोळ्यांची माणसे?'
'ती प्रेमळ असतात. सुंदर असतात.
'तू शाळेत जातोस ना?"
'मला कोण घालणार शाळेत?'
“बरी झालीस म्हणजे कृपाकाका शाळेत घालतील. मी तुला शिकवीन. शहाणी हो. कृपाकाकांना कामात मदत कर.

'तू मला शिकव. तुझी आई शिकवील.

‘आता फार बोलू नकोस तू.'

'मी डोळे मिटून पडते. तू म्हण गाणे. '

'कोणते गाणे?'

'मघा म्हणत होतास. मी ऐकत होते. आणि देवाला प्रार्थना केलीस; होय

'ना?'

'हो.'

'कुठे असतो हा देव?'

'वर आकाशात.' बोलू नकोस. मी म्हणतो अभंग. आजोबांनी

शिकविलेला अभंग. कृपाकाकांचा आवडता अभंग.

“शुद्ध बीजापोटी

फळे रसाळ गोमटी

मुखी अमृताची वाणी

देह देवाचे कारणी

सर्वांगे निर्मळ

चित्त जैसे गंगाजळ

तुका म्हणे याती

हो का तयाची भलती. "

मुरारी वयाने फार मोठा नव्हता. परंतु किती तन्मयतेने त्याने तो अभंग म्हटला! कृपाकाकांच्या संगतीने त्याच्या बालहदयात भक्तीचे बीज रूजले होते. मुरारी म्हणजे एक रत्न होते.

मिरी झोपली होती. मुरारी अभ्यासाचे पुस्तक आणून तेथे वाचीत बसला होता. काम आटोपून कृपाकाका आले. शिडी ठेवल्याचा आवाज आला. आपला नगरकंदील खुंटीला ठेवून ते आत आले.

'मुरारी, उशीर झाला मला.'

'कृपाकाका, घाम आला होता मिरीला. मी तो नीट पुसला. आणि मी थोडी कढत कॉफी तिला दिली आणून. आता पुन्हा ती झोपली आहे.' 'ताप निघणार आज. तुमची सर्वांची मला किती मदत होते! नाही तर मी एकट्याने काय केले असते?'

'कृपाकाका, तुम्ही एकटे नाही. किती तरी तुमच्यावर प्रेम करतात. तुम्ही जगमित्र आहात! मी जातो हं.'

कृपाकाकांनी बरोबर ब्रेड आणला होता. तोच त्यांनी दुधाबरोबर खाल्ला. मिरी गाढ झोपली होती. तेही आरामखुर्चीत पडले. रात्री मुरारीच्या आईने येऊन विचारले, 'कृपाकाका, रात्री बसू का थोडा वेळ?'

'आज मिरीला झोप लागेल असे दिसते. आज नको जागरण. जरूर

लागली तर हाक मारीन हं!"

'तुम्ही स्वतःच्या प्रकृतीला जपा. '

'सांभाळणारा तो प्रभु.'

सकाळी मिरीला चांगलीच हुशारी वाटली. ताप साफ निघाला होता. सर्वांना आनंद झाला. हळूहळू तिला अधिक बरे वाटू लागले. ती हिंडती- फिरती झाली; हसू-खेळू लागली. शेजारीपाजारी ती जाऊ येऊ लागली. एके दिवशी मुरारीची आई तिला म्हणाली,

'मिरे, तू आता घरात काम केले पाहिजेस.'

'काय काम करू? माझ्या लक्षातच येत नाही.'

'तुमची खोली आधी नीट लावली पाहिजे. कृपाकाकांना ते जमत नाही.

ती पत्नीकडे जमनी राहते. तिला आज मी सांगेन. जमनी फार व्यवस्थित. तिची लहानशी खोली आहे, परंतु सारे कसे जागच्या जागी असते. ' 'परंतु मी काय करू?'

'सकाळी जरा लवकर उठावे. कृपाकाकांना सकाळी चहा लागतो. तू तो तयार करावास. शेगडी पेटवावी. आधण ठेवून द्यावे. रात्रीही काम आटोपून येण्यापूर्वी भाकरी-पोळी करून ठेवावी.'

'मला नीट करता येत नाही.'

'मी शिकवीन सारे. कृपाकाका दिवे लावून येतील तो घरी जेवण तयार.

मिरीच्या हातचे गोड गोड जेवण.'

'तुम्ही मला शिकवा. मी सारे करीत जाईन.'

'भांडी नीट घासून ठेवावी. केर दोनदा काढावा. केरसुणी कोपऱ्यातून वरून खालून नीट मारावी. खिडकीच्या वरून मारावी कोळिष्टके असतात. समजलीस ना? आणि कृपाकाकांचा सदरा साबण लावून धुऊन ठेवीत जा. त्यांना किती आनंद होईल! तू जणू त्यांची मुलगी. तू त्यांची काळजी घेत जा. त्यांनी तुझी किती काळजी घेतली? खरे ना?"

'आणि शाळेत जाऊ ना मी?'

'आणखी दोन महिन्यांनी जा. लवकरच आता उन्हाळ्याची सुट्टी लागेल. घरी आधी शीक. मुरारी शिकवील. तो तुला धडा देईल. आणि आमच्या नानांबरोबर तू एखाद्या वेळी सोबत म्हणून जात जा. ते कामाला जातात; परंतु म्हातारे झाले आहेत.'

'ते कोणते काम करतात?'

‘ते रंगकाम करतात. सुंदर चित्रे काढतात. एका नवीन देवळात हल्ली ते चित्रे काढण्याचे काम करतात. मुरारीलासुद्धा चित्रे काढायला येतात. '

‘मीसुद्धा शिकेन. मग कृपाकाकांच्या खोलीत चित्रे टांगीन. कृपाकाकांचे काढायला हवे एक चित्र. मी मुरारीला सांगेन. त्या चित्राला मग मी फुलांचा हार घालीन. तेथे फुले नाहीत, यशोदाबाई?'

'मुरारी तुला आणून देईल.'

‘त्या दिवशी दुपारी जमनी आली. मिरीची खोली नीट लावण्यात आली. सारे सामान आधी बाहेर काढण्यात आले. कपबश्या ठेवायला एक कपाट भिंतीत ठेवण्यात आले.'

'मिरे, आमच्याकडे एक लहानशी पलंगडी आहे ती आणते हं. तुला

झोपायला ती होईल. कृपाकाकांची खाट अशी ठेवू, तुझी पलंगडी अशी. ' 'छान! आणि ही आरामखुचीं?'

‘तेथे बाहेरच्चा गॅलरीत राहील. आधी मिटून ठेवावी. लागली तर घालावी. या बाजूला कोळशाचे पोते कपडे सारे या दोरीवर नीट ठेवीत जा. नाहीतर पेटीत ठेवीत जा. या खोक्याची नीट पेटी होईल.'

जमनीने त्या मोडक्या खोक्याची पेटी केली. ती पेटी तिने खाटेखाली ठेवली. पेटीत कपडे. एक आरसा होता, तो टांगण्यात आला. इतक्यात मुरारी आला.

'वा! खोली अगदी सुंदर झाली. '

'मुरारी, येथे चित्रे हवीत दोन, नाही?'

'मी आणतो हं!'

'मुरारीने ध्रुव - नारायणांचे एक सुंदर चित्र आणले. ते त्याच्या हातचे

होते.'

'तू काढलेस हे?'

'हो'.

'किती छान ! कृपाकाकांचे काढ एक चित्र.'

'जवळ मिरी बसलेली आहे, असे ना?'

'इश्श ! मी कशाला त्या चित्रात?'

'मिरे, मी आता जाते हं. अशी खोली नीट ठेवीत जा. कृपाकाकांना त्रास नको देऊस. माझा मुलगा मागे आजारी होता. कृपाकाका यायचे त्याला फळे द्यायचे. बसायचे. धीर द्यायचे. कृपाकाका म्हणजे सर्वांचे काका. खरोखर त्यांचे कृपाराम नाव त्यांना शोभते. सर्वांवर कृपा करणारे, दया करणारे ते राम आहेत. गरिबांचे ते देव आहेत.'

असे म्हणून जमनी गेली, मुरारीही गेला. मिरी एकटीच तेथे बसली होती. थोडया वेळाने कृपाराम आले. त्यांनी आपला नगरकंदील घेतला. त्यांनी शिडी उचलली. ते गेले रोजचे काम करायला. आपली कार्यमय सायसंध्या करायला; जगाला प्रकाश द्यायला. मिरीही उठली. तिने शेगडी पेटवली.

आत्याबाईंकडे तिला काम करावे लागतच असे. थोडी फार सवय होती. तिने पोळ्या करायचे ठरविले. तिने कणीक घेतली. भिजवली. तिने शेगडीवर तवा टाकला. परंतु पोळ्यांच्या ऐवजी आरोळ्याच चांगल्या असे तिने ठरविले लहानलहान आरोळ्या ती करू लागली. त्या तव्यावर टाकून मग निखाप्यात त्यांना शेकवी. सुंदर फुगत होत्या त्या.

'काय ग मिरे, काय करतेस? यशोदा आईंनी येऊन विचारले. '

'आरोळ्या करून ठेवते. '

'वा, तुला येते का सारे? कालवण काय करशील?”

'काय करू?'

'या तव्यावर बेसनाचे पीठ कालवून टाक. येथे आहे का डब्यात? हो,

आहे. हे बघ. मी या वाटीत काढून ठेवते. हे बघ. इतके मीठ नि इतके तिखट पुरे. वाटले तर एखादे आमसुल टाक. कालव नि फोडणी करून दे ओतून.' 'मी करीन फोडणी. सारे सामान पाहून ठेवले आहे.'

'कृपाकाकांना आज तुझ्या हातचे जेवण.' 'उद्या सकाळी चहाही मी करून देईन. यांतल्या आरोळ्या राहतील, त्या सकाळी चहाबरोबर होतील.'

'हुशार आहेस तू."

'यशोदा आई गेल्या. मिरी आनंदली होती. आज तिने सारे केले होते. खोली सुंदर व्यवस्थित होती. ते चित्र तेथे होते. व्यवस्थित अंथरुणे. स्वयंपाक तयार. आपत्याला सारे येईल असे तिला वाटले. अभिमानाने ती तेथे बसली होती. तिने खिडकीतून पाहिले. आकाशात तो ठळक तारा ती पहात होती.

परंतु तिला तो आज कोठे दिसेना. इतक्यात मुरारी आला.

'मिरे, मंडईतील गोटीरामने कृपाकाकांना दोन टमाटो दिले आहेत. ठेव. त्यांना आवडतात.'

'गोटीरामने दिले?'

'कृपाकाकांचे सर्वत्र मित्र आहेत. टांगेवाले मित्र, भाजीवाले मित्र, ते खरे कृपाकाका आहेत. आज तू केलेस हे सारे. होय ना मिरे?' 'हो.'

‘आता पुढे लिहायवाचायलाही शीक. तेसुद्धा यायला हवे.'

'तू धडे दे पहिले.'

'देईन अक्षरे काढून. तू पटापटा शिकशील.'

'कशावरून रे?'

'तुझे डोळे मोठे आहेत म्हणून. मोठ्या डोळ्यांत अक्षरे पटकन शिरतील.' 'तुला आवडतात माझे डोळे?"

'हो, फार आवडतात, गाईचे डोळे असे असतात.'

'थट्टा करतोस तू, माझे डोळे म्हणजे म्हशीचे, गाईचे, बैलाचे होय ना?' 'गाई-बैलाचे डोळे सुंदर नसतात? काळेनिळे ते डोळे मला आवडतात. जणू खोल डोह असे ते वाटतात. तुला कोणाचे आवडतात डोळे? हत्तीच्या

डोळ्यांसारखे म्हणू?'

'हत्तीचे तर अगदी बारीक. '

‘तू कधी पाहिलेस ?’

'सर्कस आली होती. तिच्या जाहिराती वाटताना बरोबर हत्ती नसे का?

एवढा मोठा हत्ती, परंतु डोळे अगदी बारीक. ' 'मग हरिणाच्या डोळ्यांसारखे म्हणू?'

'मी हरीण नाही पाहिले. चपळ असते; नाही रे? त्याचे डोळे असतात का पण सुंदर? अरे! शिडी वाजली. कृपाकाका आले.' ती एकदम टाळी वाजवून म्हणाली.

खरेच ते आले. वर खोलीत येऊन ते खाटेवर बसले. त्यांनी सर्वत्र पाहिले. आज सारे नीटनेटके होते.

'मुरारी, चल की जेवायला.' यशोदाआईंनी हाक मारली.

तो गेला. मिरी कृपाकाकांजवळ बसली. त्यांनी प्रेमाने तिला जवळ घेतले. त्यांनी तिचा मुका घेतला.

'तू स्वयंपाक केलास वाटते? तू नुकतीच तापातून उठलीस. कशाला हे

काम ?'

'मला आता बरे वाटते. आज माझ्या हातचे जेवा. रोजच मी करीन. मला सारे करायला येईल भाकरीसुद्धा भाजीन. चांदकी करीन.'

'खोली आज कशी छान दिसते.'

'जमनी आली होती आणि मुरारीने हे चित्र दिले. तो तुमचे चित्र काढणार आहे.'

'आपले चित्र कशाला? देवाचे चित्र पुरे.'

'हे टमाटे गोटीरामाने पाठविले. ' 'एक मुरारीला दे. जा.'

ती धावतच गेली, मुरारी व त्याचे आजोबा भाकरी खायला बसले होते.

'मुरारी, हा एक टमाटो तुम्हाला कापून देऊ का?'

'दे कापून. तो बघ चाकू.'

तिने कापून त्यांना वाढला. एक फोड यशोदाआईस ठेवून ती पळत गेली. ती दोघेही जेवायला बसली. कृपाकाका बेसनाची स्तुती करीत होते. जेवणे झाली.

'मिरे, नीज आता. दमलीस

'मी निजते. तुम्ही बसा जवळ. थोपटा.'

मिरी निजली. कृपाकाका तिला थोपटीत होते. अभंग म्हणत होते. मिरीला झोप लागली. कृपाकाकांनी देवाला प्राथून म्हटले, 'गोड गुणांची मुलगी. तिला सुखी ठेव. मी किती दिवस पुरणार? प्रभो, तूच तिला सदैव सांभाळ.'

11
Articles
मिरी
0.0
आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमोल वारसेसाठी आदर्श म्हणून स्थानिक झाली आहेत. गेल्या पन्नासहूनही, आणि अनेक वर्षे आणि पीढ्यानुसार, हे ग्रंथ नित्यदिने उभे असलेल्या युवकांच्या हातातून पसरले गेले आहे. ह्या आधुनिक जगातील सांस्कृतिक परिवर्तनांच्या पाठीवरती, या पुस्तकांच्या मूल्याला तेवढीच वाढ पाहून आलेली आहे, ज्यामुळे ह्या ग्रंथांची महत्वाची वैशिष्ट्यं दृष्टी आलेली आहे.
1

7 June 2023
4
1
0

सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आह

2

7 June 2023
2
0
0

मिरी अंथरूणात होती. जवळ एक बाई काही तरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात

3

7 June 2023
1
0
0

मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते. 'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.''ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.' 'येऊ दे बरोबर. तुम्हाला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.' मिरी आली. परकर-प

4

7 June 2023
1
0
0

आज मिरी सुमित्राताईकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामान घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना श

5

7 June 2023
1
0
0

मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने

6

7 June 2023
1
0
0

सायंकाळची वेळ होती. सुमित्रा आरामखुर्चीत शांतपणे बसून होती. समोर आकाशात सुंदर रंग दिसत होते ! परंतु आंधळ्या सुमित्राला सृष्टीचे ते रमणीय भाग्य थोडेच कळणार होते? ती आपल्या विचारसृष्टीत रमून गेली होती.

7

7 June 2023
1
1
0

सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची

8

7 June 2023
1
0
0

मिरी यशोदाआईकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या

9

8 June 2023
1
0
0

मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना. 'सुमित्रा,

10

१०

8 June 2023
1
0
0

निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेत तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनाप्याला आली. स

11

११

8 June 2023
1
0
0

दुसप्या दिवशी दुसरी बोट आली. किनाप्याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. डॉक्टर आहे. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे?'दुःखी मिरीने मुद्दामच स्वतःला मागे ठेवले.' सुम

---

एक पुस्तक वाचा