shabd-logo

7 June 2023

11 पाहिले 11
मिरी यशोदाआईकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या. अगदीच एका बाजूला ती नवी जागा होती. जवळपास शेजार कोणाचा नव्हता. त्यांना त्या पूर्वीच्या जागेच्या हजारों आठवणी येत. तेथील आसपासची मंडळी आठवत. यशोदाआई कष्टी दिसत आणि त्यांचे ते ऐंशी वर्षांचे वृध्द वडील? त्यांचा भ्रमिष्टपणा वाढतच चालला.

एके दिवशी मिरी शाळेतून सायंकाळी घरी आली. तो यशोदाआई रडत होत्या.

'काय झाले मुरारीच्या आई?'

‘त्यांचा कोठेच पत्ता नाही. मी धुंडून दमले.' 'मी त्यांना शोधून आणते.'

मिरी लगेच निघाली. तो एके ठिकाणी तिला ते डॉक्टर भेटले.

'काय मिराबेन, इकडे कोठे?'

'हल्ली मी येथेच आहे. यशोदाआईकडे राहते. '

'का बरे?"

'त्यांचे वडील भ्रमिष्ट झाले आहेत नि यशोदाआईंनाही बरे नसते म्हणून आले.

‘आता तिन्हीसांजा धांदलीत कोठे चाललीस तू?"

'मुरारीचे आजोबा कोठे तरी गेले आहेत. त्यांना शोधायला जाते.'

'मी पण तुझ्याबरोबर येतो. परंतु येथे जरा त्या गल्लीत एक रोगी आहे. शेवटची घटका मोजीतच आहेत. बघतो नि येतो. ये माझ्या बरोबर आपण लगेच जाऊ.'

मिरी डॉक्टरांबरोबर या अरुंद गल्लीत गेली. मग घाणेरडा बोळ लागला. अत्यंत गलिच्छ वस्ती तेथे होती आणि एका घराच्या बोळातून दोघे चालली. एक अंधारा जिना लागला. कशी तरी खोली होती. त्या खोलीत कोणीतरी खोकत होते. एक म्हातारी बाई फाटक्या घोंगडीवर पडलेली होती. एक तरूण बाई लहान मुलाला पाजीत होती. डॉक्टर आत शिरले. मिरी बाहेर उभी राहिली.

'मिरे, आत ये.' डॉक्टर म्हणाले.

मिरी आत येऊन बसली. तिने रोग्याकडे पाहिले. ती एकदम दचकून

म्हणाली, 'ही तर माझी आत्या!'

आल्याने वर पाहिले.

'कोण तू?'

'मी मिरी. '

'होय, आत्या.'

"तू कशाला आलीस बाई? मी दुष्ट चांडाळीन आहे. तुला छळले. तू माझा द्वेष करीत असशील, तिरस्कार करीत असशील,' '

'मी द्वेष करणार नाही. मी तुझ्यावरही प्रेमच करीन.

'खरेच का ? तुला जणू देवाने पाठविले. मी आता वाचत नाही. मध्ये आनंदा, माझा मुलगा, किती वर्षांनी घरी आला होता. त्याचे लग्र केले. ही बघ त्याची बायको. हा त्यांचा लहान मुलगा. परंतु पुन्हा तो गेला घरातून. झाडून होते नव्हते ते घेऊन गेला. खानावळ आता नाही. माझ्याने काम होईना. या जागेत येऊन राहिले. काय खायचे कळत नाही. माझे डोळे मिटू देत आता. तू आलीस. क्षमा कर मिरे.'

'तुला मी कढत चहा करून देते हं!'

मिरी उठली. तिने एक भांडे घेतले. रस्त्यावर गेली. तिने दूध, चहा, साखर

सामान आणले. तिने चूल पेटवली. आपल्या हाताने चहा केला. आत्याजवळ जाऊन ती म्हणाली.,

'आत्या, घे कढत कडत घोट, तरतरी वाटेल.'

'दे, तुझ्या हातचा शेवटचा घोट ' डॉक्टर नि मिरी जायला निघाली. मिरीने त्या लहान मुलाच्या हातात एक रुपया दिला.

'त्याच्या खाऊला.' ती म्हणाली.

बाळाच्या आईने डोळ्यांना पदर लावला.

'आम्हाला कोणी नाहीं बाई.' ती म्हणाली.

'देव सर्वांना आहे.' मिरी गंभीरपणाने म्हणाली.

डॉक्टर नि मिरी रस्त्यावर आली. दोघे स्तब्ध होती.

'डॉक्टर, मला त्या खोलीत नेलेत. फार चांगले झाले. माझ्या हृदयातील एक शल्य आज निघाले. द्वेषमत्सरांवर आज विजय मिळाला.

‘मिरे, चल लवकर. आपण समुद्राच्या बाजूने जाऊ. मुरारीची वाट पहात

आजोबा समुद्रावर भटकत असतील. चल; आधीच उशीर झाला आहे.' डॉक्टर उंच होते. झपाझप पावले टाकीत होते. मिरी जणू पळत होती! आणि तो पाहा अथांग समुद्र समोर उसळत आहे. धो धो करीत साच्या जगाला हाका मारीत आहे.

फिरायला गेलेली मंडळी येत होती आणि ही दोघे फिरायला जात होती. कोणी कुतुहलाने त्यांच्याकडे बघत होती. परंतु मिरीचे किवा डॉक्टरांचे एका माणसाकडे सारे लक्ष होते. किनाप्याने दोघे शोधीत गेले तो दूर एका खडकावर एक आकृती दिसली. दोघे धावतच गेले. त्यांनी त्या वृद्धाला धरले. 'आजोबा, येथे काय बसलात? घरी चला.' मिरी म्हणाली.

'मुरारी आज यायचा होता ना?' ‘आज नाही, आजोबा, चला घरी.'

'आणि हे कोण?'

'हे आपले डॉक्टर. '

'मला वर पाठविण्यासाठी आले वाटते. मुरारी आला असता एकदा म्हणजे केली असती तयारी वर जायची. तिकीट कधीच काढून ठेवले आहे. तिकीट मिळण्याची आता पंचाईत नाही.'

'चला ऊठा.'

'मुरारीचीच तू मिरी. ठीक. तो नाही जवळ तर तू तरी आहेस. त्याचीच ना तू होणार? का कोणा श्रीमंतांची राणी होणार?"

'मी मुरारीचीच आहे. तुम्हा सर्वांची काळजी घ्यायला मला ठेवून गेला तो. ऊठा आता.'

म्हातारा उठला. तिघे निघाली. समुद्राच्या लाटा आदळत होत्या. अंधारात त्याचे हसणे दिसत होते. खडकावर लाटा आदळत नि स्वच्छ प्रकाशाचे झोत उडत आहेत की काय असे वाटे.

'डॉक्टर, तुम्ही येता आमच्या झोपडीत ? यशोदाआईंनाही जरा बघून जा. तुम्हाला मुद्याम बोलावले तर त्यांना शंका येईल. सहज वाटेत भेटलो तो फिरत फिरत आलो असे म्हणा आणि त्यांनाही काही औषध वगैरे सांगा.'

'बरे तर. '

यशोदाआई बाहेरच उभ्या होत्या. झोपडीत मिणमिण दिवा होता. 'कुठे

गेला होता बाबा? किती धुंडाळायचे तरी?'

'मी मुरारीला धुंडाळायला गेलो होतो. उंच खडकावर बसून बघत होतो. दिसेना. हा समुद्र आड येतो, त्याच्चा लाटांवर मी माझ्या मुठी उगारीत होतो.'

'आणि हे कोण?'

'मी डॉक्टर. ओळखलेत का?'

'हो. कृपाकाकांच्या आजारात आणि या मिरीच्या लहानपणाच्या आजारात तुम्ही आला होता. किती दोन वर्षे झाली मुरारीला जाऊनच आता तीन वर्षे होऊन गेली. दोन वर्षांनी येईल.'

'तुम्हीही अलीकडे वाळत्यात जरा. काही होते की काय? मिरी एकटी येत होती यांना घेऊन. म्हटले पुन्हा निसटले हातून तर? म्हणून घरापर्यंत आलो. तुम्हीही काही औषध घ्या. आलोच आहे. जरा तपासू का? चला आत.'

म्हातारे बाबा त्यांच्या आरामखुचींत बसले. मुरारीने केलेली ती आरामखुर्ची होती. डॉक्टरांनी यशोदाआईंना तपासले. 'तुम्हाला विश्रांती हवी आहे. मी एक औषध पाठवीन ते घेत जा.'

'फार किमतीचे नाही ना?" 'मुरारी आल्यावर पैसे घेईन, तोवर नकोत.

'तो का लवकर येईल, डॉक्टर?""

'दोन वर्षांनी तर येणार. दिवस भराभर जात असतात. बसा. मी जातो.' डॉक्टर गेले. मिरीने आग्रह करकरून म्हाताप्याला चार घास भरवले. 'हा

मुरारीचा घास, हा या मिरीचा घास.' असे म्हणून ती देत होती. 'मुरारीच्या तान्या बाळाचाही एक देऊन ठेव.' म्हातारा हसत म्हणाला.

'हा घ्या!'

मिरी, यशोदाआईही आता जेवल्या.

काही दिवस गेले. एके दिवशी मिरी आत्याबाईकडे पुन्हा गेली. परंतु

आत्याबाई देवाघरी गेल्या होत्या.

'तुम्ही आला होतात, त्याच्या दुसप्याच दिवशी त्या गेल्या.' सून म्हणाली.

'तुम्हाला आता कोण?' मिरीने विचारले.

‘मी माझ्या मामीकडे जाईन. मोलमजुरी करीन. ते पुन्हा आले तर ठीक.'

'तुला मी काय मदत देऊ?'

'सारे अंभाळच कोसळले, तेथे किती मदत कराल?'

'माझ्याजवळ फक्त पाच रूपये आहेत ते घे. सुखी राहा. बाळाचे नाव काय?'

‘अर्जुन.’

'सुदर नाव.'

बाळाचा पापा घेऊन मिरी निघून गेली. ती घरी आली, तो तिला एक आश्चर्यकारक वस्तू दिली. चिवचिव आवाज ऐकू आला. गोड किलबील. काय होते तेथे? एक सुंदर पिंजरा तेथे होता आणि त्यात एक सुंदर पक्षी होता.

'अय्या, किती छान ! कोणी दिला मुरारीच्या आई?' 'तो आफ्रिकेतून आला आहे. मुरारीने तुला एक भेट पाठवली आहे. आणि ही लोकरीची सुंदर शालही त्याने तुला पाठवली आहे. मुरारी खुशाल आहे. त्या व्यापाप्याच्या घरी या वस्तू आल्या. त्या सुमित्राताईकडे गेल्या. त्यांनी पुन्हा येथे पाठवल्या.

‘सुमित्राताई गेल्या नाहीत वाटते प्रवासाला?'

'नाही. ही त्यांची चिठ्ठी आहे आणि हे मुरारीचे पत्र. मिरीने सुमित्राताईंची चिठ्ठी वाचली. काय होते तिच्यात?

'प्रिय मिरीस सप्रेम आशिर्वाद.'

आमचा सफरीचा बेत आकस्मात थाबला. बाबा जरा आजारी पडले. आता ते बरे आहेत. पुढे युरोपच्या सफरीवर जाऊ असे ते म्हणत आहेत. आज मुरारीकडून आलेल्या भेटीच्या वस्तू तुझ्याकडे पाठवीत आहेत. सुंदर पक्षी ! जणू मुरारीच पक्ष्याचे रूप घेऊन आला आहे. तुझ्या प्रेमाच्या सुंदर पिंजऱ्यात नाचणारा मुरारी! मिरे, तो पक्षी लहानसा आहे. परंतु 'मिरी मिरी' म्हणतो. मुरारीने त्याला एकच शब्द शिकवला आहे असे दिसते. तू त्याला दुसरा शब्द शिकव. आणि शालही किती मऊ मऊ आहे! जणू मुरारीने आपल्या अश्रूंनी ती बनवली आहे. प्रेमळ स्मृती, नाजुक भावना! किती तरी त्या शालीत आहे; नाही?

मुरारीचे आजोबा बरे आहेत ना? आई बरी आहे ना? तू शुश्रूषेची प्रेमदेवता आहेस. मग काय कमी ? आनंदी राहा नि सर्वांना आनंद दे.'

ते पाखरू मला पाहता येईना. परंतु त्याच्या चोचीत पेरूची फोड दिली. शेजारच्या एका मैत्रिणीकडून हे पत्र ही चिठ्ठी लिहवून घेतली.

तुझी-

सुमित्राताई

मिरीने ते पत्र कितीदा वाचले आणि मग मुरारीचे पत्र तिने वाचावयास

'प्रिय मिरीस,

मोठे पत्र लिहायला घेतले, परंतु मी गोंधळून गेलो आहे. लिहू तरी काय? जे जे लिहीन ते तुला आधीच माहीत असणार. आपण का दोन आहोत? एकरूप झालेले दोन जीव एकमेकांस नेहमी लिहिणार तरी काय? म्हणून बन्याच दिवसांत मी पत्र लिहिले नाही. मिरी काय माझ्यापासून लांब आहे पत्र पाठवायला, असे मनात येऊन मी दौत टाक पुन्हा ठेवून देत असे.

आज एक गृहस्थ हिंदुस्थानात यायला निघाले. ते आपल्या तिकडचे आहेत. त्यांच्याबरोबर तुझ्यासाठी एक पक्षी नि एक शाल पाठवीत आहे. आजोबांसाठी एक छोटा गालीचा देत आहे. आणि आईसाठी एक सुरेखशी गरम बंडी. आईला ती अंगात घालायला सांगत जा. आई बरी आहे ना? आजोबांना माझी फार आठवण येते. होय ना? मी आता लवकरच येईन. तीन वर्षेतर गेली. दोन राहिली. हां हां म्हणता जातील. आनंदाने सारी राहा. सर्वांची तू काळजी घे.

मी बरा आहे. तुझे एक स्मृतिचित्र मी काढले होते. एका युरोपियन माणसाला ते फार आवडते. तो माझ्याजवळ ते सारखे मागत होता. शेवटी ते त्याला मी दिले. मी तुझी चित्रे वाटेल तितकी काढीन आणि प्रत्येक वेळचे मागच्या वेळेपेक्षा सरसच येईल. नाही? पाखराच्या पिंजऱ्याजवळ मिरी बसली आहे असे एक चित्र काढणार आहे. तुला फोटोग्राफी शिकायची आहे तर शीक ना! मी येईपर्यंत वाट कशाला बघतेस? मीच तुला शिकवली पाहिजे, हा काय तुझा हट्ट ? तू आधी शीक नि आईचा, आजोबांचा फोटो मला पाठव. सुमित्राताईचाही पाठव.

तू आता मास्तरीण झालीस. कृपाकाकांची फार इच्छा होती. ते म्हणायचे, 'मी साधे दिवे लावतो. साधा प्रकाश देतो. मिरी ज्ञानाचा प्रकाश देईल, ती शिकेल. मुलांना शिकवील. ती मास्तरीण होईल. प्रोफेसरीण होईल.' मिरे, पत्र लिहिता लिहिता मला हसू येत आहे. प्रोफेसरच्या पत्नीलाही प्रोफेसरीणबाई म्हणतात, वकिलाच्या बायकोस वकिलीणबाई म्हणतात. परंतु बायको प्रोफेसर झाली तर तिच्या प्रोफेसर नसणाऱ्या नवऱ्याला काय ग म्हणायचे? नवऱ्याच्या पदवीवरून बायकोला पदवी देतात. परंतु बायकोच्या पदवीवरून नवऱ्याला का मिळू नये? जेथे जेथे परूषांचाच वरचष्मा नाही का? मी व्यापारी. तू शेवटी व्यापारीणबाई होणार का?

मिरे, तुला माझी आठवण येते? आता माझी आठवण आली की

पिंजऱ्याजवळ जात जा. पाखराच्या तोंडात डाळिंबाचे दाणे देत जा, ते मला मिळतील. ते पाखरू तुला हाक मारील. त्या मीच मारीत आहे असे समज. किती लिहू नि काय लिहू? लिहीन तेवढे थोडेच. लवकरच आपण भेटू. सारी सुखी होऊ. आईला, आजोबांना धीर देत जा. माझे पत्र न आले तरी तुझी येऊ देत. मी परमुलखात आहे हे ध्यानात घर.'

तुझा-

मुरारी

'मिरे, खुशाल आहे ना मुरारी ?' यशोदाबाईंनी विचारले.

'खुशाल आहे. मी मग सारे वाचून दाखवीन आणि गरम बंडी घालीत जा

म्हणून तुम्हांला त्याने लिहिले आहे. आजोबा, गालीचा आवडला का?' मिरी आजोबांजवळ जाईन प्रश्र केला.

‘गालीचा चांगला आहे. परंतु पाठवणारा कधी येणार? हा गालीचा गुंडाळून नीट ठेव. मुरारी येईल त्या दिवशी त्यावर बसेन. ' आजोबा म्हणाले. दिवस जात होते. मिरी त्या पाखराला कधी विसंबत नसे. ते आता चांगले बोले. शीळ घाली. ‘मुरारी मुरारी, ये ये' असे म्हणे आणि ते शब्द ऐकून मिरी टाळ्या वाजवी, नाचे. तो लहानसा पिंजरा म्हणजे त्या सर्वांचे सुखधाम होते. कधीकधी त्या पक्ष्याला ती बाहेर काढी आणि हृदयाशी धरी. आपल्या पदराखाली लपवी.

'जा आफ्रिकेत घेऊन ये मुरारीला जातोस?' असे ती त्याला म्हणे. त्याला रोज ताजी फळे देई, ताजे पाणी देई. त्याचा पिंजरा आधी साफ करी. शाळेत जाताना क्षणभर पिंजऱ्याजवळ उभी राही. आणि भावनांनी ओथंबून मग ती जाई.

एके दिवशी ती शाळेतून येत होती. आजोबांसाठी सुंदर फुलांचा सुगंधी गुच्छ घेऊन ती येत होती. ती घराजवळ, त्या झोपडीजवळ आली तो यशोदाबाई रडत होत्या. आजोबा घोंगडीवर होते. ते का झोपले होते?

'मिरे, आधी डॉक्टरांकडे जा. तुझे आजोबा, मुरारीचे आजोबा हालचाल करीत नाहीत; बोलत नाहीत. जा.' यशोदाबाई म्हणाल्या.

तेथे अंथरूणाजवळ फुले ठेवून मिरी गेली पिंजऱ्यातील पाखरू आज नाचले नाही. ‘मिरी, मिरी' त्याने हाक मारली नाही. ते स्तब्ध होते. पिंजऱ्यातील दाणे तसेच होते, फळांच्या फोडी तशाच होत्या. आज का त्याला उपास होता? का त्याला पुढचे दिसत होते? उडून जाणाऱ्या प्राणहंसाचे त्याला अंधुक दर्शन का होत होते? कधीकधी मानवांना कळत नाही ते मानवेतर प्राण्यांना कळते असे म्हणतात. खरे का ते?

मिरी नि डॉक्टर, दोघे एका घोड्याच्या गाडीतून येत होती. बोलत येत

होती.

'डॉक्टर, आता तुम्ही एक मोटर घ्या. रोग्याकडे पटकन् येता येईल.' 'पैसे शिल्लक पडले म्हणजे घेईन. अद्याप आपल्या गावात मोटारींचा सुळसुळाट फार झाला नाही, ते बरे. रस्ते बिनधुळीचे होण्याआधी मोटारी घेणे म्हणजे पाप. धुळीचे लोट उडतात, रोग वाढतात. मी जर आरोग्यमंत्री झालो तर पहिल्याने कायदा करीन की धुळीच्या रस्त्याने मोटीरा जायला बंदी आहे.'

‘डॉक्टर आजोबांची शेवटची घटका असावी. मुरारीला काय वाटेल?' 'आपल्या स्वाधीनच्या का या गोष्टी आहेत?' गाडी दाराशी आली. डॉक्टर आत गेले. त्यांनी उभ्या उभ्याच पाहिले.

'मुरारीच्या आई, आजोबा देवाघरी गेले; किती सुंदर, शांत मरण ! तुम्ही दुःख नका करू. त्यांचे वय झालेच होते. पिकले पान झाले होते ते.' 'मुरारी येईपर्यंत जगते तर बरे नसते का झाले? मिरी-मुरारीच्या डोक्यांवर अक्षता टाकून ते आनंदाने गेले असते. ते म्हणतच असत की, मी तिकीट काढून ठेवले आहे. मुरारीला बघेन को निघेन.

'नेमानेमाच्या गोष्टी. येथे मानवी अक्कल गुंग होते.'

' आणि डॉक्टर, मी आज मुद्याम येताना हा गुच्छ आणला, तो प्राणहंसाचे त्याला अंधुक दर्शन का होत होते? कधीकधी मानवांना कळत नाही ते मानवेतर प्राण्यांना कळते असे म्हणतात. खरे का ते?

मिरी नि डॉक्टर, दोघे एका घोड्याच्या गाडीतून येत होती. बोलत येत

होती.

'डॉक्टर, आता तुम्ही एक मोटर घ्या. रोग्याकडे पटकन् येता येईल.' 'पैसे शिल्लक पडले म्हणजे घेईन. अद्याप आपल्या गावात मोटारींचा सुळसुळाट फार झाला नाही, ते बरे. रस्ते बिनधुळीचे होण्याआधी मोटारी घेणे म्हणजे पाप. धुळीचे लोट उडतात, रोग वाढतात. मी जर आरोग्यमंत्री झालो तर पहिल्याने कायदा करीन की धुळीच्या रस्त्याने मोटीरा जायला बंदी आहे.'

‘डॉक्टर आजोबांची शेवटची घटका असावी. मुरारीला काय वाटेल?' 'आपल्या स्वाधीनच्या का या गोष्टी आहेत?' गाडी दाराशी आली. डॉक्टर आत गेले. त्यांनी उभ्या उभ्याच पाहिले.

'मुरारीच्या आई, आजोबा देवाघरी गेले; किती सुंदर, शांत मरण ! तुम्ही दुःख नका करू. त्यांचे वय झालेच होते. पिकले पान झाले होते ते.' 'मुरारी येईपर्यंत जगते तर बरे नसते का झाले? मिरी-मुरारीच्या डोक्यांवर अक्षता टाकून ते आनंदाने गेले असते. ते म्हणतच असत की, मी तिकीट काढून ठेवले आहे. मुरारीला बघेन को निघेन.

'नेमानेमाच्या गोष्टी. येथे मानवी अक्कल गुंग होते.'

' आणि डॉक्टर, मी आज मुद्याम येताना हा गुच्छ आणला, तो जणू शेवटचा ठरला. शेवटची पूजा.'

'आज या पिंजऱ्यातल्या राजानेही काही खाल्ले नाही.' 

'आज या पिंजऱ्यातल्या राजानेही काही खाल्ले नाही.' जणू

शेवटचा ठरला. शेवटची पूजा.'

डॉक्टरांनी आजोबांची सारी व्यवस्था केली. घर सुनेसुने झाले. दोन दिवस मिरी शाळेत गेली नाही आणि यशोदाआईंनीही अंथरूण धरले. मुलाची नि आपली भेट व्हावयाची नाही असाच त्यांनी ध्यास घेतला. मिरीला वाईट वाटे. ती रडे. तिने रजा घेतली. मुरारीच्या आईची ती सेवा करीत होती. एके दिवशी ती बाजारात गेली होती. तो त्याच वेळेस घरी डॉक्टर आहे होते.

'काय आई कसे आहे?' ते म्हणाले.

'डॉक्टर, माझे वडील गेले. मीही जाणार. मुरारी काही भेटत नाही. डॉक्टर, मी सांगते तसे तुम्हा मुरारीस पत्र लिहा.'

'मिरी लिहील.'

'तुम्ही लिहुन ते मिरीजवळ द्या.'

डॉक्टरांना मरणोन्मुखाची इच्छा मोडवेना. त्यांनी कागद घेतला. 'सांगा, काय लिहूते.' ते म्हणाले.

ती माता सांगू लागली;

'बाळ मुरारीस आशिर्वाद.'

तुझे आजोबा गेले. मीही चालले. तुक्या भेटीकडे डोळे होते. परंतु देवाची इच्छा. काय करायचे? तू उदंड आयुष्याचा हो. मुरारी, तू माझी, तुझ्या आजोबांची नि माझी सेवा केली त्या मिरीला कधी अंतर देऊ नकोस. ती तुझ्या आजोबांना तुझ्या नावाचे घास देऊन भरवी. त्यांना थोपटून झोपवी. त्यांना शोधून घरी घेऊन येई. तिचेच फक्त ते ऐकत. जणू तुझा नि तिचा एकजीव झालेला त्यांना दिसे. ते तुझी सारखी आठवण करीत. पण गेले ते. आता मीही शेवटचे क्षण मोजीत आहे. मिरीने आम्हा दोघांचे सारे केले. सुमित्राताईंकडचे सुखाचे जीवन सोडून ती येथे येऊन राहिली. येथे नोकरी करी. मिळवी ते सारे तुझ्या आईसाठी, आजोबांसाठी खर्च करी आणि तुझ्या पाखराला किती जपते! मुरारी बाळ, अशी देवता कुठे मिळणार नाही हो! तुम्ही दोघे ऐकमेकांचे व्हा. मिरीला सुखी कर. तुमचा संसार सुखाचा होवो. त्या सुखाच्या संसारात आम्हांला अधूनमधून आठवा, कृपाराम काकांना आठवा, देवाला विसरू नका. जवळ असेल ते सर्वांना द्या. अभिमान नको. आईचे तुला, मिरीला शेवटचे आशिर्वाद. उदंड आशिर्वाद.

देवाघरी जाणारी तुझी

आई

इतक्यात मिरी आली. यशोदाआई क्षीण स्वरात म्हणाल्या, 'मिरे, तू मुरारीला पत्र लिहशील त्यात हे पत्रही घाल. माझी शेवटची इच्छा त्यात आहे ही बाळ. '

डॉक्टर तेथे बसले होते. मिरी मुकेपणाने बसली होती.

'आई, थोडा रस देऊ मोसंब्याचा?' तिने विचारले.

'चमचाभर शेवटचा दे.'

तिने गोड रस चमचाभर दिला. आई शांतपणे पडून होती. मधून डोळे उघडून मिरीकडे ती पाही. मिरीच्या डोळ्यांतून अश्रू घळघळू लागले. 'डॉक्टर, मी दुर्दैवी आहे. दुर्दैवी.' त्यांच्या गळ्याला मिठी मारून ती

म्हणाली. 'उगी बेटा. शांत राहा. प्रभूची इच्छा प्रमाण.' ते तिला जवळ घेऊन म्हणाले.

पिंजऱ्यातील पाखराने 'मिरी ये, मिरी ये' अशी हाक मारली. आईने डोळे उघडले. ती मिराली खुणेने जवळ ये म्हणाली. मिरी जवळ गेली. तिने तिच्या डोक्यावर हात ठेवला. ती ओढल्या आवाजात म्हणाली,

'मुरारी तू एक. सुखी व्हा. राम.' शेवटचे ते शब्द संपले. यशोदाआईंचे जीवन संपले. पित्यापाठोपाठ पुत्रीही गेली. भ्रमिष्ट पित्याचे स्वर्गात कसे होईल याची जणू तिला चिंता वाटली. मिरीमुरारीचे मनात लग्न लावून ती माऊली गेली. यशोदाआईचीही पुढील सारी व्यवस्था डॉक्टरांनी केली.

एके दिवशी समुद्रतीरावर उजाडत मिरी गेली. ज्या जागांवर आजोबांचे, मुरारीच्या आईचे दहन झाले त्या जागी तिने फुले वाहिली. समुद्राच्या हजारो लाटांनी त्यांची राख, त्यांचे शेवटचे अवशेष आधीच नेले होते. अंदाजाने त्या ठिकाणी तिने फुले वाहिली. ती तेथे रडत बसली. 'मुरारीला मी काय लिहू? महिन्यात दोघे निघून गेली. मी त्यांची काळजी घेतली नाही असे त्याला नाही ना वाटणार? प्रभू साक्षी आहे. सागरा तुझ्या लाटा आफ्रिकेकडे जाऊ देत नि मुला माझ्या अश्रूंचा अर्थ सांगू देत. वाऱ्यांनो, जा आणि मुरारीला मी कशी सेवा केली ते सांगा.' ती तेथे अशी दुःखमग्न बसली असताना तेथे डॉक्टर येऊन उभे होते. त्यांनी शांतपणे हाक मारली.

'मिरे.....'

'कोण, डॉक्टर ? केव्हा आलेत बसा. '

'तू झोपडीत नव्हतीस तेव्हा तर्क केला की बहुधा येथे आली असशील.'

'येथे पुष्पांजली आणि अश्रूंची अंजली वाहिली.' 'समुद्राच्या लाटा येथे स्वच्छ फेसांची फुले उधळतात रात्रंदिवस गीते गातात. भव्य गीते.'

'डॉक्टर, त्या झोपडीत आता मला राहावत नाही. मी शाळेच्या वसतीगृहात राहायला जावे म्हणते. मुलींमध्ये राहीन. त्यांना वळण लावीन. वेळ जाईल.'

'मी तुला माझ्याकडे ये म्हणणार होतो. तू मला मुलीसारखीच आहेस. मी तुला थोडीथोडी वैद्यकी शिकवीन, तुझ्या सेवामय जीवनात ती विद्या तुला उपयोगी पडेल. येतेस माझ्याकडे?'

'नको डॉक्टर; सुमित्राताईंचे वडील म्हणतील की पुन्हा कोणाच्या तरी आधारावरच राहिली. तुमच्या प्रेमाची मी आभारी आहे. मला अशीच तुमची मुलगी माना. परंतु वसतीगृहात राहू द्या. मुलीही मला आग्रह करताहेत. ' 'जशी तुझी इच्छा. केव्हाही माझ्याकडे येत जा. तुझेच घर समज.'

'तुमचे घर तर विश्वासाचे आहे. तुम्ही एकटे, परंतु सान्या जगाचे झाला आहात. धन्य तुमचे परोपकारी जीवन. प्रेमळ सेवामय जीवन निरहंकारी, निःस्वार्थ जीवन. तुम्ही, सुमित्राताई, कृपाकाका म्हणजेच देवाची रूपे. या जगाला थोडी गोडी, मधुरता तुम्हासारख्यांमुळे येते. या संसाराला शोभा, रमणीयता, तुमच्या सारख्यांमुळे आहे. या संसारवनातील तुम्ही कल्पवृक्ष, या मरुभूमोतील तुम्ही अखंड झरे डॉक्टर तुमचे पाय धरावे असे नेहमी मनात येते. गरिबांकडे तुम्ही आधी जाता. कोणत्या बोळात, कोणत्या अंधान्या खोलीत, कोण अनाथ आजारी आहे, याची तुम्हाला माहिती. तिकडे तुमची पावले आधी वळतात. तुमचे पाय थकत नाहीत. तुम्हाला मोटर लागत नाही आणि घरात वेळ मिळेल तेव्हा ब्रेड नि दूध घेता. हा तुमचा आहार. धन्य तुम्ही !

'मिरे, चल आता जाऊ.'

दोघे निघाली. डॉक्टर दवाखान्यात गेले. मिरी झोपडीत आली. तिने सामानाची आवराआवर केली काही वस्तू प्रेमस्मृती म्हणून तिने ट्रंकेत भरल्या. पुष्कळसे सामान तिने गरीबांना दिले आणि शेवटी पिंजऱ्याजवळ येऊन उभी राहीली.

'राजा, चला आता येपून.' ती त्याला म्हणाली. परंतु राजा आज रडवेला होता. तो नाचला नाही. तो शांत, स्तब्ध होता. जणू ध्यानस्थ मुनी.

मिरी वसतिगृहात राहायला आली. मुली तिच्याभोवती गोळा झाल्या. जणू नवप्रकाश आला, नवजीवन आले, असे त्या लहान मोठचा मुलींना वाटले. श्रीमंतांच्या मुलींनी कपाळाला आठचा पाडल्या. एक दोन डोळे मिचकावीत गेल्या. चालायचेच असे. बहुरत्ना वसुंधरा !

मिरी त्या मुलींमध्ये मिसळली, एकरूप झाली. ती कोणाचे केस विंचरी, कोणा लहान मुलीच्या केसांत फुले घाली. ती त्यांच्यात हसे, खेळे, उड्या मारी. ती त्यांना सुंदर पुस्तके वाचायला देई. आडलेले सांगे, कोणी मुलगी आजारी पडली तर तीची शुश्रूषा करायला ती पुढे असे. प्रार्थनेच्या वेळी ती कधी प्रार्थना सांगे. कधी मुलींना समुद्रावर पोहायला नेई. तेथले सारे जीवनच नवे बनले.

परंतु मिरीचे वास्तव्य तेथे फार दिवस व्हायचे नव्हते. सुमित्राताई पुन्हा आजारी पडल्याचे पत्र आले. त्यात त्यांनी लिहीले होते 'तुझे तिकडचे कर्तव्य संपले. आता माझ्याजवळ ये मला बरे वाटत नाही.' ते पत्र हातात घेऊन मिरी बसली होती तो तिला भेटायला डॉक्टर आले.

'मिरे, गंभीरशी ?'

'सुमित्राताई आजारी आहेत.'

'हो, मी दोन दिवसांपूर्वी त्यांच्या त्या खेड्यात जाऊन आलो. कृष्णचंद्र मला म्हणाले, 'मिरीला पाठवा.' मी त्यांना सांगितले की, 'ती येणार नाही. तुम्ही तिला वाक्बाण मारले आहेत. ती आपले स्वतंत्र, स्वावलंबी जीवन सोडून तुमच्याकडे परत कशी येईल?' आणि मिरे, त्यांनी बोलावले तरी जाऊ नकोस, करारीपणा माणसात थोडा तरी हवाच.' तू

'डॉक्टर, मला जायला हवे. सुमित्राताईंचे पत्र आले आहे. पत्रावरून त्या

सुखी नाहीत असे दिसते. आता जाणे हेच कर्तव्य. '

'तुला का स्वाभिमान नाही ? जाऊ नकोस. कृष्णचंद्र आहेत तो तेथे पाऊल ठेवू नकोस. वाटेल ते तुला बोलले.'

'डॉक्टर, परंतु सुमित्राताईंकडे पाहायला नको का? सुमित्राताई म्हणजे माझे दैवत त्यांनी मला जीवनाचा खरा अर्थ शिकवला. त्यांच्यासाठी सारा अभिमान मी गुंडाळून ठेवला पाहिजे.'

'तू हे स्वतंत्र जीवन सोडून जाणार? या सुरेख नोकरीचा त्याग करणार?

कशासाठी हा सारा त्याग करायचा?" 'डॉक्टर, सुमित्राताईंसाठी जे काही करीन त्याला त्याग हा शब्द लावू नका. त्यांच्यासाठी सर्व काही करण्यात मला परम आनंद आहे. त्यात मला

कष्ट नाहीत, डॉक्टर. '

'होय मिरे, सत्कर्म करणे हाच खरा आनंद थोर आहेस तू. स्वाभिमानी असूनही तू निरहंकारी आहेस. जा बेटा. सुमित्राताईंकडे जा. त्यांच्या जीवनात आनंद आण. त्यांना बरे वाटेल की युरोपच्या यात्रेला कृष्णचंद्र जाऊ म्हणत आहेत. तूही जाशीलच. विशाल जग पाहून ये. पाश्चिमात्य संस्कृती पाहून ये. स्वच्छता, नीटनेटकेपणा, नियमितपणा, संशोधक वृत्ती, सार्वजनिक सेवेची आवड, स्वातंत्र्यप्रेम, किती तरी गोष्टी त्यांच्यापासून आपण घेतल्या पाहिजेत. विज्ञानाचा डोला त्यांच्यापासून आपण प्यायला हवा.'

'आणि सर्व अद्वैत पाहण्याचा ज्ञानाचा दुसरा डोळा आपण त्याना द्यायला हवा.'

'मिरे, अद्वैताचा डोळा तरी आपणांजवळ कोठे आहे? आपल्याकडे तर भेदांचा बुजबुजाट आहे. आपल्याजवळ ना ज्ञानाचा डोळा, ना विज्ञानाचा. आपण दोन्ही डोळ्यांनी आंधळे आहोत. म्हणून तर आपला राष्ट्रीय संसार सारा भिकार झाला आहे. निस्तेज निरानंद झाला आहे.' 'डॉक्टर, मी उद्याच जाईन म्हणते.'

'तुला एकदम नोकरी सोडता येईल का?"

'मी त्यांना सारे समजावून सांगेन. नाही तर रजा घेऊन जाईन. मारन

राजीनामा पाठवीन 'जा बेटी. पुन्हा या शहरात राहायला कधी येणार?'

‘युरोपातून आलो म्हणजें.'

डॉक्टर गेले. मिरी जाणार ही बातमी सर्व वसतिगृहात क्षणात पसरली मुलींना वाईट वाटले. मिरीने त्यांची समजूत घातली. दुपारी तिने चालकांना सारी परिस्थिती निवेदली. तिला रजा देण्यात आली. मागून वाटले तर राजीनामा पाठवावा असे सांगण्यात आले.

आज तिचा या शाळेतील तास शेवटचा होता. पुन्हा शाळेत ती शिक्षक म्हणून थोडीच येणार होती? आज तिने हसतखेळत तास दवडला. शेवटी घंटा झाली. साश्रू नयनांनी मुलींचा निरोप घेऊन मिरी वर्गाबाहेर पडली. इतर शिक्षकभगीनींचा तिने प्रेमाने निरोप घेतला.

ती वसतिगृहात आली. मुलींबरोबर खेळली. जेवणे झाली. प्रार्थना झाली. प्रार्थनेनंतर मुलींनी मिरीला मानपत्र दिले. मिरीचे हृदय भरून आले. किती थोड्या दिवसांचे येथील राहणे; परंतु मुलींचे प्रेम पाहून ती सद्गदित झाली. तिला उत्तर देववेना.

आणि सकाळी एका गाडीत बसून मिरी निघाली. तो एक लहान मुलगी मिरीला सोडीना. शेवटी मोठ्या कष्टाने तिला दूर नेण्यात आले. मिरीच्चा गळ्यात फुलांचे हार घालण्यात आले. कोणी तिला पुष्पगुच्छ दिले. शेवटी निघाली ती बैलगाडी. मुली बराच वेळ उभ्या होत्या. शेवटी त्या गेल्या. मिरी एकटीच निघाली; परंतु हदयात अनेकांच्या स्मृती होत्या. तिला सारे पवित्र आठवले. देवाघरी गेलेली दुष्ट आत्या आठवली आणि आपण तिला शेवटी प्रेमाने चहा दिला हे मनात येऊन क्षणभर पावन असे स्मित तिच्या ओठांवर चमकले. पुन्हा ती गंभीर झाली. कृपारामकाका, यशोदाआई, मुरारीचे आजोबा, सारी प्रेमळ माणसे डोळ्यांसमोर येत होती. आणि परमुलुखातला एकाकी मुरारी! आईची भेट त्याला लाभली नाही. दुर्दैवी मुरारी आणि ही दुर्दैवी मिरी! पिंजऱ्यातील पक्षी मुका होता. तिने तो पिंजरा हातात घेतला.

'राजा...' तिने हाक मारली.

'मिरे ये, मुरारी ये' तो म्हणाला.

तिने त्या पिंजऱ्यावर आपले तोंड ठेवले.
11
Articles
मिरी
0.0
आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमोल वारसेसाठी आदर्श म्हणून स्थानिक झाली आहेत. गेल्या पन्नासहूनही, आणि अनेक वर्षे आणि पीढ्यानुसार, हे ग्रंथ नित्यदिने उभे असलेल्या युवकांच्या हातातून पसरले गेले आहे. ह्या आधुनिक जगातील सांस्कृतिक परिवर्तनांच्या पाठीवरती, या पुस्तकांच्या मूल्याला तेवढीच वाढ पाहून आलेली आहे, ज्यामुळे ह्या ग्रंथांची महत्वाची वैशिष्ट्यं दृष्टी आलेली आहे.
1

7 June 2023
4
1
0

सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आह

2

7 June 2023
2
0
0

मिरी अंथरूणात होती. जवळ एक बाई काही तरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात

3

7 June 2023
1
0
0

मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते. 'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.''ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.' 'येऊ दे बरोबर. तुम्हाला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.' मिरी आली. परकर-प

4

7 June 2023
1
0
0

आज मिरी सुमित्राताईकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामान घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना श

5

7 June 2023
1
0
0

मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने

6

7 June 2023
1
0
0

सायंकाळची वेळ होती. सुमित्रा आरामखुर्चीत शांतपणे बसून होती. समोर आकाशात सुंदर रंग दिसत होते ! परंतु आंधळ्या सुमित्राला सृष्टीचे ते रमणीय भाग्य थोडेच कळणार होते? ती आपल्या विचारसृष्टीत रमून गेली होती.

7

7 June 2023
1
1
0

सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची

8

7 June 2023
1
0
0

मिरी यशोदाआईकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या

9

8 June 2023
1
0
0

मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना. 'सुमित्रा,

10

१०

8 June 2023
1
0
0

निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेत तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनाप्याला आली. स

11

११

8 June 2023
1
0
0

दुसप्या दिवशी दुसरी बोट आली. किनाप्याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. डॉक्टर आहे. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे?'दुःखी मिरीने मुद्दामच स्वतःला मागे ठेवले.' सुम

---

एक पुस्तक वाचा