shabd-logo

7 June 2023

6 पाहिले 6
मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने त्याला भेटीला बोलावले होते. घरात तो काहीच बोलला नाही. नीटनेटका पोशाख करून तो त्या व्यापाऱ्याकडे गेला. प्रश्रोत्तरे झाली.

'पुढे-मागे परदेशात जाल का? चारपाच वर्षेसुध्दा तिकडे राहावे

लागेल.'

'मी घरी आईला विचारून कळवितो.'

'तुम्ही जावे असे मला वाटते. तुमच्याविषयी माझा फार चांगला ग्रह

झाला आहे.'

'तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला?'

'तुम्ही एका बाईला रस्त्यात मदत केली होतीत?'

'हो.'

'त्याच बाईंनी तुमचे नाव सहज सुचवले नि पत्ताही दिला.' 'मी जाऊ?'

'मग उद्यापासून कामाला याच. परदेशात जायचे की नाही ते मागावून

ठरवू.'

'येतो तर. प्रणाम.

मुरारी घरी आला. त्याने आईला सारी हकीगत सांगितली.

'आई, तुम्हाला सोडून जाणे जीवावर येते. '

'अरे, चार-पाच वर्षे हां हां म्हणता जातील. तुझ्या पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने विचार नको का करायला? मी आणि नाना येथे दोघे जपून राहू. तू माझे ऐक. आलेली संधी दवडू नकोस. आधीच गरिबांना संधी मिळत नाही. खरे ना? तुझ्या गुणांमुळे तुझ्यावर तो व्यापारी प्रसन्न झाला आहे. '

'आई, पुढे-मागे त्याच्या धंद्यात तो थोडी भागीदारीसुद्धा मला देईल. अशा अर्थाचे तो थोडे काही बोलला. परंतु मी आधी काही कर्तबगारी

दाखवायला हवी.' 'त्याचे म्हणणे खरे आहे. तुझी हुशारी दिसली तर तो भागीदारी देईलही. बाळ, तू जा. आमच्या मोहात पडू नकोस.'

'आई, सेवेसाठी राहणे हा का मोह? आणि परदेशात जायचे मनात येत असले तरी ते तुझ्यासाठीच. तू माझ्यासाठीच आजपर्यंत किती कष्ट केलेस! तुला विश्रांती मिळाली नाही. नेहमी राब राब राबावे लागले.'

'मुरारी, आईला मुलासाठी कष्ट करण्यातच कठीण नाही वाटत. तू मोठा हो, चांगला हो, हीच माझी आशा. सर्वांनी तुला भले म्हणावे, तू कर्तबगारी करून पुढे यावेस असे मला वाटत असते. म्हणून बाळ, ही संधी दवडू निकोस.'

काही दिवस गेले. मुरारी त्या व्यापाऱ्याकडे नोकरी करू लागला होता. हळूहळू त्याच्यावर धन्याचा अधिकाधिक लोभ बसू लागला. परदेशात मुरारीने जावे म्हणून तो आग्रह करू लागला. एके दिवशी रात्री मिरी नि मुरारी समुद्रतीरी बसली होती. त्या वेळेस सारे शांत होते. जरा बाजूला जाऊन दोघे बसली होती. समुद्र बराच आत गेला होता.

'मिरे, मी आफ्रिकेत जायचे ठरवीत आहे. आईची चिंता वाटते. पाच वर्षेतरी मी येणार नाही. लांबचा प्रवास; एकदम थोडेच येता येणार आहे? आजोबा तर थकल्यासारखे दिसतात. परंतु तेही मला म्हणाले की, जा, आपण भेटू. मी काही मरणार नाही. तू येईपर्यंत मी जिवंत राहीन. काय करू ते सांगा.

'मुरारी, तुझ्या आईने जरी आपण होऊन तुला आग्रहपूर्वक जायला सांगितले, तरी मनात तिला दुःखच होत असेल. तू तिच्या जिवाचे जीवन आहेस. तू तिच्या जीवनाचा आधार आहेस. तिच्या साया आशाआकांक्षा तुझ्यापाशी केंद्रित झालेल्या आहेत. तिला तुझा अभिमान वाटतो. तिला तुझा विश्वास वाटतो. तू कीर्तिमान व्हावेसे, मोठे व्हावेसे असे तिला साहजिकच वाटते. आपल्या मुलाचे नाव सर्वांच्या ओठांवर नाचावे याहून मातेला दुसरा थोर आनंद कोणता आहे? परंतु तू गेलास तर ती माऊली तुझ्या वाटेकडेच डोळे लावून असणार यात शंका नाही. मी काय सांगू? मी एवढेच सांगते तुला की, तू गेलास तर तुझ्या आईची, तुझ्या आजोबांची मी शक्य ती काळजी घेईन. तुझ्या ठायी मी त्यांना होईन. नाही तरी मी का आता तुम्हांला परकी आहे? एक निराधार मुलगी होते मी. कृपाकाकांनी हे पंखहीन पिलू उचलून आणले. तू, तुझी आई, दोघांनी मला प्रेम दिले आहे. मी का ते विसरेन मुरारी? मला किती तरी वाटते तुम्हा सर्वांविषयी. ते बोलून तरी दाखवता येईल का?'

'मिरे, मी आफ्रिकेत जायला धजत आहे तो कोणाच्या जोरावर? आईला, आजोबांना मी सोडून गेलो असतो का? परंतु तू आहेस म्हणूनच मी जायचे ठरवीत आहे. मिरे, तूच नेहमी पत्र पाठवीत जा. आईला, आजोबांना लिहिता थोडेच येते? माझी आलेली पत्रे तूच त्यांना वाचून दाखवीत जा. त्यांना आनंद देत जा. त्यांचे दुखले खुपले पाहात जा. माझी सारी भिस्त तुझ्या या प्रेमळ, प्रामाणिक, टपोऱ्या डोळ्यांवर. मिरे, मी का अधिक सांगायला पाहिजे? आपण दोघे एकरूप आहोत. तू माझी नि मी तुझा. नाही का? पाच वर्षे. केवढा काळ ! परंतु हा काळ जाईल. आपण पुढे एकमेकांचे होऊ; लग्र करू; सुखाचा संसार करू; आईला, आजोबांना सुख देऊ. तू धीराने राहशील ना?' 'मुरारी, तू माझ्या हृदयात आहेस. माझ्या जीवनाचा तू धनी, तू स्वामी.

तू माझ्या जीवनाचा तू राजा, तू नाथ माझ्या त्या पहिल्या आजारीपणात तू

माझी शुश्रूषा केलीस. मला कॉफी पाजलीस. मला ते सारे आठवते. तू

लिहायला शिकवलेस; नीट वागायला शिकवलेस; देवाची भक्ती दिलीस. तू आणि सुमित्राताई यांचे किती उपकार?' 'परंतु आम्हांला तरी हा दिवा कोणी दाखवला? कृपाकाका हे आपणा सर्वांचे गुरू! त्यांचे जीवन म्हणजे एक मार्गदर्शक दीपस्तंभ होता.' 'म्युनिसिपालिटीचे दिवे लावणारे कृपाकाका! परंतु सर्वांच्चा जीवनात माणुसकीचे दिवे लावणारे ते थोर सद्गुरु होते.'

'दिलमां दीवो करो' असे म्हणतात ते खरे. जीवनात प्रेमस्नेहाचा, व्यापक सहानुभूतीचा, मंगलतेचा, श्रद्धेचा, विश्वासाचा दिवा नसेल तर हे जीवन किती नीरस, भयाण वाटेल; नाही? मुरारी, कृपाकाकांचा तो कंदील माझ्या खोलीत आहे. मी तो रोज पुसून ठेवते. जणू माझ्या देवाची तीच मूर्ती.'

'मिरे, आपण आता परत जाऊ चल. भरती सुरू झाली वाटते."

'माझ्या हृदयातही प्रेमाच्या लाटा उचंबळत आहेत. '

‘माझ्याही.’

'मुरारी, परदेशात मला विसरू नकोस. या गरीब मिरीचा तूच आधार आहेस. सुमित्रादेवी आहेतच; परंतु जीवनव्यापी संपूर्ण आधार तूच आहेस.'

‘मिरे, तुझ्यावरचे प्रेम मला परदेशात तारील. मी तुला विसरेन का ? अशी

शंका तरी तुला कशी येते?'

‘तसे नाही रे मुरारी. एखाद्या वेळेस माझे सारे दुर्दैवी जीवन डोळ्यांसमोर येते नि वाटते की काही वाईट न होवो; अमंगल न होवो. मिळालेले आधार न तुटोत तू सुखी राहा तुझ्यासाठी मी प्रार्थना करीत जाईन. इकडची काळजी करू नकोस. तू मोठा हो, कीर्तिमान हो.'

'तुझ्या नि आईच्या प्रेमाला नि विश्वासाला प्रभू पात्र करो हीच त्याला माझी प्रार्थना. दोघे परत आली. आज मिरी यशोदाआईकडेच झोपली. आणि एके दिवशी मुरारी आफ्रिकेला निघून गेला.

11
Articles
मिरी
0.0
आता वर्णनकारांनी गुरूजींना विविध प्रकारचे लिखाण केले, त्यांच्या आयुष्यातील अनन्य साहित्याचे जीवन आणले. त्यांनी त्यांच्या संपूर्ण उम्रदरम्यानही लहान मुलांसाठी प्रेरणादायक गोष्टी लिहिली आहेत, ज्यामुळे ही पुस्तके आपल्या सांस्कृतिक नेतृत्वाने आपल्या अनमोल वारसेसाठी आदर्श म्हणून स्थानिक झाली आहेत. गेल्या पन्नासहूनही, आणि अनेक वर्षे आणि पीढ्यानुसार, हे ग्रंथ नित्यदिने उभे असलेल्या युवकांच्या हातातून पसरले गेले आहे. ह्या आधुनिक जगातील सांस्कृतिक परिवर्तनांच्या पाठीवरती, या पुस्तकांच्या मूल्याला तेवढीच वाढ पाहून आलेली आहे, ज्यामुळे ह्या ग्रंथांची महत्वाची वैशिष्ट्यं दृष्टी आलेली आहे.
1

7 June 2023
4
1
0

सायंकाळची वेळ होती. सहा वाजले असतील. लवकरच घरीदारी दिवे लागतील. वरती आकाशात दिवे लागतील. ती पहा एक लहान मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. तिच्या हातात भांडे आहे. कोठे जायचे आहे तिला ? तेथे ती का उभी आह

2

7 June 2023
2
0
0

मिरी अंथरूणात होती. जवळ एक बाई काही तरी शिवीत होती. तिची मुद्रा चिंतातूर होती. मधूनमधून ती मिरीकडे पाहात असे. तिच्या अंगाला हात लावून बघत असे. पुन्हा शिवीत बसे. काही वेळाने मिरीने डोळे उघडले. ती पाहात

3

7 June 2023
1
0
0

मुरारीचे आजोबा त्या मंदिरात चित्र काढण्यासाठी जात होते. 'नाना, थांबा. मिरी येईल बरोबर.''ती नको माझ्याबरोबर यायला. मी एकटा जाईन.' 'येऊ दे बरोबर. तुम्हाला पोचवील नि परत येईल. ऐका माझे.' मिरी आली. परकर-प

4

7 June 2023
1
0
0

आज मिरी सुमित्राताईकडे राहायला जाणार होती. तिने सारे सामान घेतले. कृपाकाकांच्या वस्तू तिला पूज्य वाटत. तो कंदील, ती काठी, ती जुनी आरामखुर्ची, त्यांची टोपी. सारे तिने प्रेमाने बरोबर घेतले. यशोदाआईंना श

5

7 June 2023
1
0
0

मुरारीची ती नोकरी सुटली. तो आता घरीच असे. निरनिराळी पुस्तके नेई, वाची. परंतु एके दिवशी त्याला पत्र आले. कोणाचे पत्र ? एका मोठ्या व्यापाऱ्याकडून त्याला ते पत्र आले होते. त्याला आनंद झाला. व्यापाऱ्याने

6

7 June 2023
1
0
0

सायंकाळची वेळ होती. सुमित्रा आरामखुर्चीत शांतपणे बसून होती. समोर आकाशात सुंदर रंग दिसत होते ! परंतु आंधळ्या सुमित्राला सृष्टीचे ते रमणीय भाग्य थोडेच कळणार होते? ती आपल्या विचारसृष्टीत रमून गेली होती.

7

7 June 2023
1
1
0

सुमित्राताईंचा आजार हटला होता. त्यांची प्रकृती सुधारावी, शक्ती यावी म्हणून कृष्णचंद्र एका सुंदर हवेच्या ठिकाणी राहायला गेले होते. एक बंगला भाड्याने घेण्यात आला होता. शांत असे वातावरण तेथे होते. मिरीची

8

7 June 2023
1
0
0

मिरी यशोदाआईकडे राहायला आली. ती शाळेत शिकवी. घरी आजोबांना सांभाळी. तो म्हातारा काय असेल ते असो, फक्त मिरीचेच ऐके. परंतु एके दिवशी ती जुनी जागा यशोदाआईंना सोडावी लागली. त्या आता दुसरीकडे राहायला गेल्या

9

8 June 2023
1
0
0

मिरी पुन्हा सुमित्राताईकडे आली. गंगा-यमुनांची पुन्हा भेट झाली, कृष्णा-कोयनांचा पुन्हा स्नेहसंगम झाला. सुमित्राताईंना सुखी करण्यासाठी मिरी झटे. परंतु त्यांची प्रकृती अद्याप चांगली सुधारेना. 'सुमित्रा,

10

१०

8 June 2023
1
0
0

निसर्गसुंदर असे ते स्थान होते. लाँच तेथे थांबत असे. एका होडीत आमचे उतारू उतरले. डॉक्टर, तो अपरिचित गृहस्थ, मिरी नि सुमित्रा चौघेत तेथे उतरणारी होती. लाँच पुढे निघून गेली. हळूहळू होडी किनाप्याला आली. स

11

११

8 June 2023
1
0
0

दुसप्या दिवशी दुसरी बोट आली. किनाप्याला लागलेली माणसे जी जिवंत होती, ती बोटीत चढली. ती तरुणी आहे. डॉक्टर आहे. तो अपरिचित गृहस्थ आहे. परंतु मिरी कोठे आहे?'दुःखी मिरीने मुद्दामच स्वतःला मागे ठेवले.' सुम

---

एक पुस्तक वाचा