प्रश्नकर्ता हे जे कमांचे फळ येते, जसे उदाहरणार्थ आपण एखाद्याच्या विवाहात विघ्न आणले. तर मग पुन्हा असेच फळ आपल्याला पुढील जन्मी मिळते का? आपला विवाह होत असताना तोच मनुष्य विघ्न निर्माण करेल का? अशा प्रकारे कर्माचे फळ असते का? अशाच प्रकारे आणि तेवढ्याच डिग्रीचे?
दादाश्री : नाही, ह्याच जन्मात मिळते. विवाहात विघ्न आणता, हे तर प्रत्यक्षासारखेच म्हटले जाईल आणि प्रत्यक्षाचे फळ इथेच मिळते. प्रश्नकर्ता: आपण एखाद्याच्या विवाहात विघ्न आणले, त्या अगोदरच आपला विवाह झालेला असेल, तर मग कुठून फळ मिळेल?
दादाश्री नाही, हे असेच अशाच प्रकारचे फळ मिळेल, असे नाही. तुम्ही त्याचे जे मन दुखवले, तसेच तुमचे मन दुखवण्याचा मार्ग मिळेल. हे तर कोणाला मुली नसतील तर त्याला कशा प्रकारे फळ मिळेल? लोकांच्या मुलींच्या विवाहात अडचणी आणेल आणि स्वत:ला मुली नसतील तरी ह्या जन्मातच कर्माचे फळ मिळते. ह्या जन्मातच फळ मिळाल्या शिवाय राहत नाही. असे आहे ना, परोक्ष कर्माचे फळ पुढील जन्मात मिळते आणि प्रत्यक्ष कर्माचे फळ ह्या जन्मातच मिळते.
प्रश्नकर्ता: परोक्ष शब्दाचा अर्थ काय?
दादाश्री : ज्याची आपल्याला जाणीव होत नाही असे कर्म.
प्रश्नकर्ता: एखाद्या माणसाचे दहा लाख रूपयांचे नुकसान करण्याचा मी भाव केला असेल तर माझे पुन्हा असेच नुकसान होणार का?
दादाश्री: नाही, नुकसान नाही. ते तर दुसऱ्या रूपात तुम्हाला तेवढेच दुःख होईल, जेवढे दुःख तुम्ही त्याला दिले तेवढेच दुःख तुम्हाला मिळेल. मग मुलगा पैसे खर्च करून तुम्हाला दुःखी करेल किंवा अश्या कोणत्याही प्रकारे तेवढेच दुःख तुम्हाला होईल. तो सर्व हा हिशोब नाही, आहेरचा हिशोब नाही. म्हणून येथे हे सर्व भिकारी बोलतात ना, रस्त्यात एक भिकारी बोलत होता, 'हे जे आम्ही भीक मागत आहोत, ते तर आम्ही जे तुम्हाला दिलेले तेच तुम्ही आम्हाला परत करत आहात.' तो तर असे उघडपणे बोलतो, 'तुम्ही जे देतात ते आम्ही दिलेले आहे तेच देतात आणि नाही तर आम्ही तुम्हाला देऊ.' असे बोलतात. दोघांपैकी एक तर होईल नाही, असे नाही. तुम्ही कोणाच्या हृदयाला गारवा पोहोचवला असेल, तर तुमचे हृदयही गार होईल. तुम्ही जर त्याला दुखवले तर तुम्ही सुद्धा दुखावले जाणार, बस एवढेच. हे सर्व कर्म शेवटी राग-द्वेषात जातात. राग-द्वेषाचे फळ मिळते. रागाचे (मोह-आसक्तीचे) फळ सुख आणि द्वेषाचे फळ दुःख मिळेल. प्रश्नकर्ता : हे जे आपण सांगितले की रागाचे फळ सुख आणि द्वेषाचे
फळ दुःख तर ही परोक्ष फळाची गोष्ट आहे की प्रत्यक्ष फळाची ?
दादाश्री : निव्वळ प्रत्यक्ष. असे आहे की, रागाने पुण्य बांधले जाते आणि पुण्याने लक्ष्मी मिळाली. आता लक्ष्मी मिळाली परंतु वापरताना पुन्हा दुःख देऊन जाते. म्हणजे हे सगळे सुख जे तुम्ही उपभोगता, हे लोन वर घेतलेले सुख आहे. म्हणून जर परत पेमेन्ट करणार असाल तरच हे सुख घ्या. हो, तरच ह्या सुखाचा स्वाद घ्या नाहीतर स्वाद घेऊ नका. आता तुमची फेडण्याची, पुन्हा पेमेन्ट करण्याची शक्ती नाही म्हणून स्वाद घेणे बंद करून टाका. हे तर सर्व लोनने घेतलेले सुख आहे. कोणत्याही प्रकारचे सुख हे लोनवर घेतलेले सुख आहे.
पुण्याचे फळ सुख, पण सुखही लोनवरचे आणि पापाचे फळ दु:ख, दु:खही लोनवरचे अर्थात् हे सर्व लोनवरील आहे. म्हणून सौदा करायचा नसेल तर करू नका. म्हणून तर पाप आणि पुण्य हेय अर्थात (त्याग करण्या योग्य) मानले आहे.
प्रश्नकर्ता: ह्या अगोदर दिलेले आहे आणि आता परत घेतले, म्हणजे
हिशोब चुकता झाला. म्हणून त्याला तर लोनवर घेतलेले असे म्हटले जाणार
नाही ना?
दादाश्री आता जे सुख उपभोगत आहात, ते सर्व परत आलेले नाहीत, तरीही उपभोगत आहात, तर पेमेन्ट करावे लागेल. आता पेमेन्ट कशाप्रकारे करावे लागेल? आंब्यांचा छान रस खाल्ला त्या दिवशी आपल्याला आनंद झाला आणि सुख उत्पन्न झाले. दिवस आनंदात गेला. पण दुसऱ्या वेळी आंबा खराब निघाला, तर तेव्हा तेवढेच दु:ख होईल. पण जर यात सुख घेतले नाही, तर ते दुःख येणार नाही.
प्रश्नकर्ता : यात मूर्छा नसेल तर?
दादाश्री : तर मग आंबा खाण्यात हरकत नाही.