म्हणून अखा भगत म्हणतात की,
जो तू जीव तो कर्ता हरी;
जो तु शीव तो वस्तु खरी !
अर्थात जर 'तु शुद्धात्मा आहेस' तर गोष्ट खरी आहे. आणि जर 'तु जीव आहे; ' तर वर कर्ता हरी आहे. आणि जर तु शीव आहेस' तर वस्तु खरी आहे. वर हरी नावाचा कोणी आहेच नाही. अर्थात जीव शीव हा भेद गेला तर परमात्मा होण्याची तयारी सुरु झाली. हे सगळे भगवंताला भजतात, हा जीवा-शीवाचा भेद आहे. आणि आपल्या येथे ज्ञान मिळाल्या नंतर जीवा शीवाचा भेद मिटून जातो.
कर्ता छूटे तो छूटे कर्म; ए छे, महाभजननो मर्म !
चार्ज (नवीन कर्म बांधणे) केव्हा होते की 'मी चंदुभाऊ आहे आणि
हे मी केले.' म्हणजे जी उलट मान्यता आहे, त्यामुळे कर्म बांधले गेले. आता जर आत्म्याचे ज्ञान मिळाले तर 'तुम्ही' चंदुभाऊ नाही. चंदुभाऊ तर व्यवहाराने आहात, निश्चयाने नाही. आणि हे 'मी केले' ते व्यवहाराने अर्थात् कर्तापण मिटले तर मग कर्म सुटून जाते. नवे कर्म बांधले जात नाहीत.
'मी कर्ता नाही' हे भान झाले, ही श्रद्धा बसली, तेव्हापासून कर्म सुटले. कर्म बांधायचे थांबले. म्हणजेच चार्ज होणे बंद झाले. हे आहे महाभजनाचे मर्म महाभजन कशास म्हणतात ? सर्व शास्त्रांचे सार त्यास महाभजन म्हणतात. हे महाभजनाचेही सार आहे.