प्रश्नकर्ता: स्थूळकर्म आणि सूक्ष्मकर्माचे कर्ता वेगवेगळे आहेत का?
दादाश्री : दोन्हीचे कर्ता वेगळे आहेत. हे जे स्थूळकर्म आहेत, ते डिस्चार्ज कर्म आहे. ह्या बॅटऱ्या असतात त्यांना चार्ज केल्यानंतर त्या डिस्चार्ज होत राहतात ना? आपल्याला डिस्चार्ज करायचे नसले तरी सुद्धा डिस्चार्ज होतच राहते ना?
प्रश्नकर्ता: होय.
दादाश्री : अश्याच प्रकारे हे स्थूळकर्म पण डिस्चार्ज कर्म आहे आणि आत जे नवीन चार्ज होत आहे ते सुक्ष्मकर्म आहे. ह्या जन्मात जे चार्ज होत आहे ते पुढच्या जन्मी डिस्चार्ज होत राहतील आणि ह्या जन्मात मागच्या जन्माची बॅटरी डिस्चार्ज होत राहिली आहे, एक मनाची बॅटरी, एक वाणीची बॅटरी आणि एक देहाची बॅटरी. या तिन्ही बॅटऱ्या आता डिस्चार्ज होतच राहिल्या आहेत आणि आत नवीन तीन बॅटल्या भरल्या जात आहेत. हे बोलतो आहे, ते तुला असे वाटेल की, 'मी' च बोलत आहे. पण नाही, ही तर रेकॉर्ड बोलत आहे. ही वाणीची बॅटरी डिस्चार्ज होत राहिली आहे. मी बोलतच नाही आणि संपूर्ण जगातील लोक काय म्हणतील की, 'मी कशी गोष्ट केली, मी कसे बोललो!' हे सगळे कल्पित भाव आहेत, इगोइझम (अहंकार) आहे, फक्त हा इगोइझम गेला तर मग दुसरे काय उरले? हा इगोइझम हीच अज्ञानता आहे आणि हीच भगवंताची माया आहे. कारण की करतो दुसरा कोणीतरी आणि स्वत:ला असे एडजस्टमेंट होते (वाटते) की 'मीच करत आहे. '
हे सुक्ष्मकर्म जे आत चार्ज होतात, ते नंतर कॉम्प्युटर मध्ये जातात. एक व्यष्टि कॉम्प्युटर आहे आणि दुसरे समष्टि कॉम्प्युटर आहे. सुक्ष्मकर्म प्रथम व्यष्टि कॉम्प्युटरमध्ये जातात आणि तेथून मग समष्टि कॉम्प्युटर मध्ये जातात. नंतर समष्टि काम करत राहते. रियली स्पिकॉंग, म्हणजे खरोखर 'मी चन्दुभाऊ आहे' असे बोलणे त्यानेच कर्म बांधली जातात. 'मी कोण 'आहे' एवढेच जरी समजले तर तेव्हापासूनच सर्व कर्मातून सुटला. अर्थात हे विज्ञान सरळ आणि सोपे ठेवले आहे, नाहीतर करोडो उपायांनी सुद्धा एब्सोल्युट होता येइल असे नाही. आणि हे तर पुर्णपणे एब्सोल्युट थियरम आहे.