प्रश्नकर्ता : मागच्या जन्मी चार्ज झालेली जी कर्म आहेत, ते या जन्मी
डिस्चार्जरूपे येतात. तर या जन्माची जी कर्म आहे, ते या जन्मीच डिस्चार्जरूपाने येतात की नाही?
दादाश्री : नाही.
प्रश्नकर्ता: तर केव्हा येतात?
दादाश्री : मागच्या जन्मातील जे कॉझीझ आहेत ना ते ह्या जन्माचा इफेक्ट आहे. या जन्माचे कॉझीझ पुढील जन्माचे इफेक्ट आहेत.
प्रश्नकर्ता: पण कित्येक कर्म असेही असतात ना की, जे इथल्या इथे भोगावे लागतात. एक वेळा, आपण असे सांगितले होते.
दादाश्री हे तर या जगातील लोकांना असे वाटते. जगातील : लोकांना काय वाटते? 'हं... बघ, हॉटेलमध्ये खूप खात होता ना त्यामुळे पोटात मुरड पडली.' हॉटेलात नेहमी खात होता, म्हणून त्याने हे कर्म बांधले. त्यामुळे ही पोटात मुरड पडली, असे म्हणतात. तेव्हा 'ज्ञानी' काय सांगतात की तो हॉटेलमध्ये का खात होता? त्याला असे हॉटेलमध्ये खायचे कोणी शिकवले? हे कसे घडले? संयोग उभे झाले. पूर्वी जी योजना केली होती त्या योजनेचा आता परिणाम आला म्हणून तो हॉटेलमध्ये गेला. हॉटेलात जाण्याचे सर्व संयोग एकत्र होतात. त्यामुळे आता सुटायचे असेल तरी सुटू शकत नाही. त्याच्या मनात येते की, अरे! असं का बरं होत असेल?
तेव्हा येथील भ्रांतिवाल्यांना असे वाटते की, हे काम केले म्हणून हे झाले. भ्रांतिवाले असे समजतात की इथेच कर्म बांधतो आणि इथेच भोगतो. ते असे समजतात. पण ह्याचा शोध घेतला नाही की, त्याला जायचे नसूनही तो कसे बरे जातो? त्याला तर जायचे नसते तरी कोणत्या नियमानुसार तो जातो. तो तर हिशोब आहे.
तर आम्ही अजून अधिक शिकवतो की विनाकारण ह्या मुलांना सारखे मारू नका, ती मुले पुन्हा तसे भाव करणार नाहीत, असे करा. पुन्हा योजना आखणार नाही असे करा. चोरी करणे वाईट आहे... हॉटेलात खाणे हे वाईट आहे... असे ज्ञान त्याला उत्पन्न होईल असे करा. म्हणजे पुढच्या जन्मात पुन्हा असे होणार नाही. हे तर मुलांना मारत च राहतात आणि मुलांना सांगतात, 'बघ हं! तुला जायचे नाही तेव्हा त्याचे मन उलटे फिरते की, त्यांना बोलू दे, पण मी तर जाणारच, बस. उलट तो हट्टाला पेटतो आणि त्यामुळेच तर ही उलटी कर्म बांधली जातात ना! आई-वडीलच उलटे करायला भाग पाडतात.
प्रश्नकर्ता: पूर्वी भाव केले होते म्हणून तो हॉटेलात गेला, आता हॉटेलात गेला, मग तेथे खाल्ले आणि नंतर पोटात मुरड पडली, हे सर्व 'डिस्चार्ज आहे?
दादाश्री : तो हॉटेलात गेला हे डिस्चार्ज आहे आणि पोटात मुरड पडली तेही डिस्चार्ज आहे. डिस्चार्ज स्वत:च्या ताब्यात राहत नाही, कंट्रोल राहत नाही. आऊट ऑफ कंट्रोल होते.
एक्झेक्ट कर्माची थिअरी कशाला म्हणतात हे जर समजले, तर तो माणूस पुरूषार्थ धर्माला समजू शकेल. जगातील लोक ज्याला कर्म म्हणतात, त्यास कर्माची थिअरी, कर्मफळ असे म्हणतात. हॉटेलमध्ये खाण्याचा भाव होतो. मागील जन्मी कर्म बांधले होते, त्या आधारावर खातो. म्हणजे तिथे त्यास कर्म म्हटले जाते. त्या कर्माच्या आधारे या जन्मात हॉटेलमध्ये खा- खा करतो. त्यास कर्मफळ आले असे म्हटले जाईल. आणि ही पोटात मुरड पडली, त्यास जगातील लोक कर्मफळ आले असे मानतात. परंतु कर्माची थियरी काय म्हणते की जी पोटात मुरड पडली हा कर्मफळाचा परिणाम आला.
वेदांतच्या भाषेत हॉटेलमध्ये खाण्यासाठी आकर्षित होतो ते मागील बांधलेल्या संचित कर्माच्या आधारे आहे. आज हॉटेलात जाण्याची अजिबात इच्छा नाही तरीही हॉटेलात जाऊन खाऊन येतो ते प्रारब्ध कर्म आणि त्याचा पुन्हा या जन्मातच परिणाम येतो आणि पोटात मुरड पड़ते है क्रियमाण कर्म.
हॉटेलात खाताना मजा येते त्यावेळीही बीज टाकतो आणि पोटात मुरड पडते तेव्हा ते भोगताना सुद्धा पुन्हा बीज टाकतो. अर्थात कर्मफळाच्या वेळी आणि कर्मफळ परिणामाच्यावेळी, अश्या प्रकारे दोन बीज टाकतो.