प्रश्नकर्ता: तर हे सर्व कोण चालवतो?
दादाश्री : कर्माचा नियम असा आहे की, तुम्ही जे कर्म करता त्याचा परिणाम आपोआप नैसर्गिक रित्या येतो. प्रश्नकर्ता: हे कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते. ते कोण
नक्की करतो? कोण भोगायला लावतो?
दादाश्री नक्की करण्याची गरजच नाही कर्म 'इटसेल्फ' (स्वत:च ) करत राहतात. आपोआपच होत असते.
प्रश्नकर्ता: तर मग कर्माच्या नियमाला कोण चालवतो? दादाश्री 2H आणि एकत्र झाल्यामुळे पाऊस पडतो, हा कर्माचा नियम
प्रश्नकर्ता: परंतु कोणीतरी बनविला असेल ना, तो नियम?
दादाश्री : नियम कोणी बनवत नाही. बनविला तर मग तो मालक ठरेल. कुणालाही बनविण्याची गरज नाही. इटसेल्फ पझल झालेले आहे आणि ते विज्ञानाच्या नियमाने होते. त्याला आम्ही 'ओन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स' ने हे जग चालते असे म्हणतो. त्यास आम्ही गुजराती मध्ये म्हटले आहे, 'व्यवस्थित शक्ति' जी जगाला चालवते,