आचार्य महाराज प्रतिक्रमण करतात, सामायिक करतात, व्याख्यान देतात, प्रवचन करतात, पण तो तर त्यांचा आचार आहे, हे स्थूळकर्म आहे. पण आत काय चालू आहे ते पहायचे आहे. आत जे चार्ज होते, ते 'तिथे 'उपयोगी पडेल. आता जे आचार पालन करतात, ते डिस्चार्ज आहे. संपूर्ण बाह्याचार (बाह्य आचरण) डिस्चार्ज स्वरूपच आहे. तेथे हे लोक म्हणतात की 'मी सामायिक केले, ध्यान केले, दान केले. ' तर त्याचे यश तुला इथेच मिळेल. त्यात पुढील जन्माचे काय घेणे-देणे? भगवंत अशी काही कच्ची माया नाही की तुझ्या अश्या घोटाळ्याला चालवून घेतील. बाहेर सामायिक करत असेल आणि आत काहीतरी भलतेच करत असेल.
एक शेठ सामायिक करण्यासाठी बसले होते, तेव्हा बाहेर कोणीतरी दरवाजा ठोठावला. शेठाणीने जाऊन दरवाजा उघडला. तर एक भाऊ आला होता. त्याने शोठाणीला विचारले 'शेठ कुठे गेले आहेत?" तेव्हा शेठाणीने उत्तर दिले 'उकिरड्यावर.' आत बसलेल्या त्या शेठने ते ऐकले व त्यांनी तपास केला तर खरोखर मनाने शेठजी उकिरड्यावरच गेलेले होते! मनात तर खराब विचारच चालू होते, ते सुक्ष्मकर्म आणि बाहेर सामायिक करत होते ते स्थूळकर्म. भगवंत अशा घोटाळ्यांना खपवून घेत नाहीत. आत सामायिक रहात असेल आणि बाहेर सामायिक होत नसेलही तरी, त्याच्या 'तिथे' चालेल. हे बाहेरचे देखावे 'तिथे' चालतील असे नाही.