प्रश्नकर्ता : आत्मा आणि कर्म यांच्यात काय संबंध आहे?
दादाश्री दोघांच्या मध्ये कर्तारुपी कडी नसेल तर दोन्ही वेगळे : होतात. आत्मा, आत्म्याच्या जागेवर आणि कर्म कर्माच्या जागेवर वेगळे होऊन जातात.
प्रश्नकर्ता: समजले नाही बरोबर.
दादाश्री : कर्ता बनला नाही तर कर्म नाही. कर्ता आहे म्हणून कर्म आहे. तुम्ही कार्य करीत असाल, पण जर तुम्ही त्याचे कर्ता झाले नाहीत तर तुम्हाला कर्म बंधन होणार नाही. हे तर तुम्हाला 'मी केले' असे कर्तापद आहे, त्यामुळे कर्म बंधन आहे.
प्रश्नकर्ता: तर कर्मच कर्ता आहे?
दादाश्री : कर्ता हा कर्ता आहे. 'कर्म' हा कर्ता नाही. तुम्ही 'मी केले'' म्हणता की 'कर्माने केले' म्हणता?
प्रश्नकर्ता: 'मी करत आहे' असे तर आत वाटतच असते ना! मौ केले' असेच म्हणतो. दादाश्री हो, तो 'कर्ता, 'मी करत आहे' असे म्हणता, म्हणून तुम्ही कर्ता बनता. बाकी 'कर्म' कर्ता नाही. 'आत्मा' पण कर्ता नाही.
प्रश्नकर्ता: कर्म एकीकडे आहे आणि आत्मा एकीकडे आहे, तर ह्या दोघांना वेगळे कसे करायचे?
दादाश्री : ही कडी निघाली ना तर, दोन्ही वेगळेच आहेत. पण ही तर कर्तापदाची कडीच आहे. ह्या कडीमुळे बांधलेले आहोत असे वाटते. कर्तापद गेले, कर्तापद करणारा गेला. 'मी केले' असे म्हणणारा गेला तर झाले, संपले. मग तर दोन्ही वेगळेच आहेत.