प्रश्नकर्ता तर मग आता कर्मबंधन कोणाला होते. आत्म्याला की देहाला ?
दादाश्री : हा देह तर स्वतःच कर्म आहे. मग दुसरे बंधन त्याला कुठून होणार? हे तर ज्याला बंधन वाटत असेल, जो जेलमध्ये बसला असेल त्याला बंधन आहे. जेलला बंधन असते की जो जेलमध्ये बसला असेल त्याला बंधन असते? अर्थात हा देह जेल आहे आणि त्याच्या आत जो बसला आहे त्याला बंधन आहे. 'मी बांधलेला आहे, मी देह आहे, मी
चंदुभाऊ आहे' असे मानतो, त्याला बंधन आहे. प्रश्नकर्ता म्हणजे आपल्याला असे म्हणायचे आहे की आत्मा :
देहाच्या माध्यमातून कर्म बांधतो, आणि देहाच्या माध्यमातून कर्म सोडतो ?
दादाश्री : नाही, असे नाही. आत्मा तर ह्यात हात घालतच नाही. खरे तर आत्मा भिन्नच आहे, स्वतंत्र आहे. विशेषभावानेच हा अहंकार उत्पन्न झाला आहे आणि तोच कर्म बांधतो आणि तोच कर्म भोगतो. 'तुम्ही शुद्धात्मा आहात' पण बोलता की मी 'चंदुभाऊ आहे. ' जिथे स्वतः नाही, तिथे आरोप करणे की 'मी आहे' त्यास अहंकार म्हणतात. परक्याच्या स्थानाला स्वतःचे स्थान मानता, हा ईगोइझम (अहंकार) आहे. हा अहंकार सुटला तर स्वतःच्या स्थानावर येऊ शकता. तेथे बंधन नाहीच.