प्रश्नकर्ता: सर्व इथल्या इथे भोगायचे आहे असे म्हणतात, ते काय खोटे आहे का?
दादाश्री: भोगायचे इथल्या इथेच आहे पण ते या जगाच्या भाषेत. : अलौकिक भाषेत याचा अर्थ काय होतो?
मागील जन्मात कर्म अहंकाराचे, मानाचे बांधलेले असेल, म्हणून या जन्मात त्याच्या सर्व बिल्डिंग बांधल्या जात असतील, तर त्यामुळे तो मानी बनतो. कशामुळे मानी बनतो? कर्माच्या हिशोबाने तो मानी बनतो. आता तो मानी झाला म्हणून त्याला जगातील लोक काय म्हणतात की, हा जो एवढा मान करतो आहे ना त्यामुळे कर्म बांधतो आहे. जगाचे लोक यास कर्म म्हणतात. परंतु भगवंताच्या भाषेत तर हे कर्माचे फळ आले आहे. फळ म्हणजे मान करायचा नसेल तरीही करावाच लागतो, होतोच.
आणि जगातील लोक ज्याला म्हणतात की हा क्रोध करतो, मान करतो, अहंकार करतो, तेव्हा त्याचे फळ इथल्या इथेच भोगावे लागते. मान केल्याचे फळ इथल्या इथे कसे येते की, अपकिर्ती पसरते, अपयश येते, ते इथेच भोगावे लागते. मान करत असताना जर मनात असे वाटत असेल की, हे चुकीचे घडते आहे, असे होऊ नये. आपल्याला मान विलय करायची गरज आहे, असे भाव येत असतील तर ते नवीन कर्म बांधतो आहे. त्यामुळे पुढील जन्मात मग मान कमी होतो.
कर्माची थियरी अशी आहे. चुकीचे करत असताना जर आतील भाव बदलले गेले तर नवीन कर्म नवीन भावाप्रमाणे बांधले जाते. पण जर चुकीचे करून उलट वरून आत खुश होत असेल की, 'असे करण्यासारखेच आहे' तर मग नवीन कर्म मजबूत होते, निकाचित होते. ते मग भोगल्या नंतरच सुटका!
संपूर्ण सायन्सच समजून घेण्यासारखे आहे. वीतरागांचे विज्ञान खूप गुह्य आहे.