प्रश्नकर्ता : मुख्य तर आपलीच कर्म नडतात ?
दादाश्री : तर मग दुसरे कोण? दुसरा कोणी करणारा नाही. बाहेरचे कोणी करणारे नाहीत. तुमचीच कर्म तुम्हाला त्रास देतात. शहाणी बायको करून आणली आणि नंतर ती वेडी झाली. तर ते कोणी केले? ते तर पतीच्याच कर्माच्या उदयाने वेडी होते. म्हणून आपण मनात असे समजून जायचे की माझेच भोग आहेत, माझाच हिशोब आहे आणि मला तो हिशोब फेडून टाकायचा आहे, फसलो रे बाबा फसलो।
स्वतः भोगल्याशिवाय सुटका नाही. प्रारब्ध तर आम्हाला सुद्धा भोगावे लागतेच, सर्वांनाच, महावीर प्रभू सुद्धा भोगत होते. भगवान महावीरांना तर देवलोक त्रास द्यायचे, तेही भोगत होते. मोठ-मोठे देवलोक डेकूण टाकत होते.
प्रश्नकर्ता: ते त्यांना प्रारब्ध भोगावे लागले ना?
दादाश्री सुटकाच नाही ना! ते स्वतः समजायचे की जरी हे देवलोक करत असले तरी प्रारब्ध तर माझेच आहे.