प्रश्नकर्ता: दादा, मागील जन्मात जी कर्म केली ती या जन्मात भोगावी लागतात, तर मागील जन्मात ज्या देहाने भोगले तो देह तर लाकडात जळून गेला, आत्मा तर निर्विकार स्वरूप आहे, तो आत्मा दुसरा देह घेऊन येतो, पण ह्या देहाला मागील देहाने केलेले कर्म कशासाठी भोगायचे?
दादाश्री त्या देहाने केलेली कर्म तर तो देह भोगून झाल्यानंतरच संपतो.
प्रश्नकर्ता तर?
दादाश्री: हे तर (मनात) रेखाटलेले, ते मानसिक कर्म, सूक्ष्म कर्म.
म्हणजे ज्याला आपण कॉझल बॉडी म्हणतो ना, कॉझीझ. प्रश्नकर्ता: बरोबर आहे, पण त्या देहाने भाव केलेले ना? दादाश्री : देहाने भाव केलेले नाहीत.
प्रश्नकर्ता: तर?
दादाश्री देहाने तर त्याचे स्वतःचे फळ भोगले ना! दोन थोबाडीत मारल्या म्हणजे देहाला फळ मिळूनच जाते. पण जे त्याच्या योजनेत होते तेच आता रूपकमध्ये आले.
प्रश्नकर्ता: हो, पण योजना कोणी केली? त्या देहाने योजना केली ना?
दादाश्री : देहाला तर काही घेणे-देणे नाही! बस, फक्त अहंकारच करतो हे सर्व.