प्रश्नकर्ता: कर्माची व्याख्या काय?
दादाश्री : कोणतेही कार्य करताना त्यास 'मी करतो' असा आधार देणे, ही कर्माची व्याख्या आहे.. 'मी करतो' असा आधार देतो, याला कर्म बांधणे असे म्हणतात. 'मी करत नाही' आणि 'कोण करत आहे' हे जाणून घेतल्यावर कर्माला निराधार करतो, तेव्हा ती कर्म गळून पडतात. (संपतात)
प्रश्नकर्ता: कर्माचा सिद्धांत म्हणजे काय?
दादाश्री : तु विहीरीत उतरुन म्हणलास की 'तु चोर आहेस' तर विहीर काय म्हणेल?
प्रश्नकर्ता 'तु चोर आहेस' असे आपण बोललो की तसाच प्रतिध्वनी ऐकू येतो.
दादाश्री : बस, बस. हे जर तुला आवडत नसेल, तर तु म्हणायचे की 'तु बादशाह आहेस.' म्हणजे तो तुला 'बादशाह' म्हणेल. तुला आवडत असेल तर बोल, हा आहे कर्माचा सिद्धांत ! तुला वकीली आवडत असेल तर वकीली कर. डॉक्टरकी आवडत असेल तर डॉक्टरकी कर. कर्म म्हणजे अॅक्शन रिअॅक्शन म्हणजे काय? तर तो प्रतिध्वनी आहे. रिअॅक्शन प्रतिध्वनीवाले आहे. त्याचे फळ आल्याशिवाय रहात नाही.
ती विहीर काय म्हणेल? हे सर्व जग आपलेच प्रोजेक्ट (योजना, प्रकल्प) आहे. तुम्ही ज्याला कर्म म्हणत होता ना, ते आपलेच प्रोजेक्ट आहे.
प्रश्नकर्ता: कर्माचा सिद्धांत आहे की नाही?
दादाश्री : संपूर्ण जग कर्माचा सिद्धांतच आहे. बाकी दुसरे काहीच नाही. आणि तुमच्याच जोखिमदारीमुळे बंधन आहे. हे सर्व प्रोजेक्शन तुमचेच आहे. हा देह सुद्धा तुम्हीच घडविला आहे. तुम्हाला जे जे मिळाले ते सर्व तुम्हीच घडविलेले आहे. यात दुसऱ्या कोणाचाही हात नाही. होल अॅन्ड सोल रिस्पॉन्सिबिलिटी तुमचीच आहे सगळी, अनंत जन्मापासूनची.