प्रश्नकर्ता : मनुष्यला कर्म लागू पडत असतील की नाही.
दादाश्री निरंतर कर्म बांधतच असतो. दुसरे काहीच करत नाही. मनुष्याचा अहंकार असा आहे की तो खात नाही, पीत नाही, संसार करत नाही, व्यापार करत नाही तरीही मात्र अहमकारच करत असतो की 'मी करतो.' त्यामुळेच सर्व कर्म बांधत असतो. हे पण एक आश्चर्य आहे ना? प्रूव्ह (सिद्ध) होऊ शकेल असे आहे खात नाही, पीत नाही, हे सिद्ध होऊ शकेल असे आहे. तरीही कर्म करत असतो हे पण सिद्ध होऊ शकते. आणि फक्त मनुष्यच कर्म बांधत असतात.
प्रश्नकर्ता: शरीरासाठी खात-पीत असेल, तरी सुद्धा स्वतः कर्म बांधत नसेलही ना!
दादाश्री : असे आहे ना, कोणतीही व्यक्ति जेव्हा कर्म करत असते तेव्हा डोळयांनी दिसत नाही. दिसते का तुम्हाला? हे जे डोळयांनी दिसते ना त्यास आपल्या जगातील लोक कर्म म्हणतात. त्यांनी हे केले, ह्यांनी हे केले, ह्याने ह्याला मारले, असे कर्म बांधले. जगातील लोक असेच म्हणतात ना?
प्रश्नकर्ता हो, जसे दिसत असते तसेच म्हणतात. :
दादाश्री : कर्म म्हणजे त्यांची हालचाल (प्रवृत्ति) काय झाली, त्याला शिवी दिली तरीही कर्म बांधले, त्याला मारले तरीही कर्म बांधले, खाल्ले तरीही कर्म बांधले. झोपून गेलो, तरीही कर्म बांधले. कृती काय करतो, त्याला आपले लोक कर्म म्हणतात. पण वास्तविकतेत जे दिसते ते कर्मफळ आहे, ते कर्म नाही.
कर्म बांधले जाते तेव्हा अंतरदाह ( आतील आग) जळत राहतो.
लहान मुलाला कडू औषध पाजले तेव्हा काय करतो? तोंड बिघडवतो ना! आणि गोड खायला दिले तर? खुश होतो. या जगात जीवमात्र राग-द्वेष करतात, हे सर्व कॉझ (कारणे) आहे, यातून हे कर्म उत्पन्न झाले आहे. जे स्वतःला आवडते ते व जे स्वतःला आवडत नाही ते, ही दोन्ही प्रकारची कर्म येतात. न आवडणारे कर्म चावून जातात, म्हणजे दुःख देऊन जातात. आणि आवडणारे कर्म सुख देऊन जातात. म्हणजे कॉझीझ मागच्या जन्मात झालेले आहे, ते या जन्मात फळ देतात..