प्रश्नकर्ता: जाणून-बुजून केलेल्या गुन्ह्यांचा दोष किती लागतो? आणि अजाणतेपणी केलेल्या चूकांचा दोष किती लागत असेल? अजाणतेपणी केलेल्या चूकांना माफी मिळते ना?
दादाश्री : कोणी असा वेडा नाही की जो असेच माफ करून टाकेल. तुमच्या अजाणतेपणी एखादा व्यक्ति मारला गेला तर कोणी काही रिकामा बसलेला नाही की जो माफ करण्यास येईल, अजाणतेपणी जर विस्तवावर हात पडला तर काय होईल?
प्रश्नकर्ता: जळून जाईल.
दादाश्री ताबडतोब फळ, अजाणतेपणी करा किंवा जाणून बुजून :
करा.
प्रश्नकर्ता: अजाणतेपणी केलेल्या दोषांना अशाप्रकारे भोगावे लागते, तर जाणून-बुजून केल्यानंतर किती भोगावे लागेल?
दादाश्री हो, म्हणून हेच मी तुम्हाला समजवू इच्छितो की, अजाणतेपणी केलेले कर्म ते कशाप्रकारे भोगायचे? तेव्हा म्हणे, एका माणसाने खूप पुण्यकर्म केले असतील. राजा बनण्याचे पुण्य कर्म केले असतील, पण ते अजाणतेपणी केले होते, समजपूर्वक केलेले नव्हते. लोकांचे पाहून पाहून त्याने सुद्धा असे कर्म केले. त्यामुळे तो समजल्या शिवाय राजा बनेल, असे कर्म बांधतो. आता तो पाच वर्षाच्या वयात राजगादीवर बसतो. वडील वारले म्हणून, आणि वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत, म्हणजे सहा वर्षांपर्यंत त्याला राज्य करायचे होते, म्हणून वयाच्या ११ व्या वर्षी तो गादीवरून उतरला. आणि दुसरा माणूस जो वयाच्या २८ व्या वर्षी राजा बनला आणि वयाच्या ३४ व्या वर्षी राज्य सुटले. त्यांच्यापैकी कुणी अधिक सुख उपभोगले? सहा वर्ष दोघांनी राज्य केले.
प्रश्नकर्ता :जो वयाच्या २८ व्या वर्षी आला आणि ३४ व्या वर्षी : गेला त्यानेत्याने.
दादाश्री त्याने जाणतेपणी पुण्य बांधले होते, त्यामुळे ते जाणतेपणी भोगले. आणि त्या मुलाने अजाणतेपणी पुण्य बांधले होते त्यामुळे आजाणतेपणी भोगले. अर्थात, अजाणतेपणी पाप बांधले गेले, तर अजाणतेपणाने भोगले जाते. आणि अजाणतेपणी पुण्य केले तर अजाणतेपणी भोगले जाते. त्यात मजा येत नाही. हे लक्षात येत आहे ना?
अजाणतेपणी केलेल्या पापा बद्दल मी तुम्हाला समजावतो. या बाजूने दोन झुरळे जात होती, मोठी-मोठी झुरळं आणि ह्या बाजूने दोन मित्र जात होते. तेव्हा त्यातील एका मित्राचा पाय झुरळावर पडला, आणि त्यात ते झुरळ चिरडले गेले आणि दुसऱ्या मित्राने झुरळाला पाहताच त्याला ठेवून ठेवून मारले. दोघांनी काय काम केले?
प्रश्नकर्ता: झुरळांना मारले.
दादाश्री : निसर्गाच्या नियमाप्रमाणे दोघे खुनी मानले जाणार. त्या झुरळांच्या कुटूंबियांनी तक्रार केली की आमच्या दोघांच्या पतींना ह्या मुलांनी मारून टाकले. दोघांचा गुन्हा सारखाच आहे. दोघेही गुन्हेगार खूनी म्हणूनच पकडले गेले. खून करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पण आता ह्या दोघांना याचे फळ काय मिळते? तेव्हा काय, तर त्या दोघांना दोन थोबाडीत आणि चार शिव्या, अशी सजा झाली. आता ज्याच्याकडून हे सर्व अजाणतेपणी घडले होते, तो माणूस दुसऱ्या जन्मी मजूर बनला होता, आणि त्याला कोणीतरी दोन थोबाडीत मारल्या व चार शिव्या दिल्या. तर त्याने थोडे पुढे जाऊन झटकून दिले. आणि तो दुसरा माणूस पुढील जन्मात गावाचा सरपंच बनला होता, खूप मोठा, अत्यंत चांगला माणूस. त्याला कोणीतरी दोन थोबाडीत मारल्या व चार शिव्या दिल्या, ज्यामुळे तो कितीतरी दिवसांपर्यंत झोपू शकला नाही. किती दिवस भोगले! ह्याने तर जाणून- बुजून मारले होते, आणि मजुराने अजाणतेपणी मारले होते. अर्थात हे सर्व समजून करा. जे पण कराल ना, ती जबाबदारी स्वत:चीच आहे. यू आर् होल एन्ड सोल रिस्पॉन्सिबल. गॉड इज नॉट रिस्पॉन्सिबल एट ऑल. (तुम्हीच संपूर्णपणे जबाबदार आहात, भगवंत यत्किंचितही जबाबदार नाही).