प्रश्नकर्ता: कर्माचे फळ जर कोणी दुसऱ्याने दिले तर मग ते कर्मच
झाले ना?
दादाश्री : कर्माचे फळ दुसरा कोणी देतच नाही. कर्माचे फळ देणारा कोणी जन्माला आलाच नाही. इथे फक्त टेकून मारण्याचे औषध प्यायले तर मरूनच जाणार, त्यात फळ देण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही गरज लागत नाही.
फळ देणारा कोणी असता तर खूप मोठे ऑफीस बनवावे लागले असते. हे तर सायन्टिफिक पद्धतीने चालते. त्यात कोणाची गरजच नाही! त्याचे कर्म जेव्हा परिपक्व होते तेव्हा फळ येवून उभे राहतेच. स्वत:हून, आपोआप. जसे ह्या कच्च्या कन्या स्वत:हूनच पिकतात ना! पिकतात की नाही?
प्रश्नकर्ता हो, हो. :
दादाश्री आंब्याच्या झाडावर पिकत नाही का? ती जशी पिकते ना, : तशाच प्रकारे हे कर्म परिपक्व होते. त्याची वेळ येते ना तेव्हा परिपक्व होऊन फळ देण्यास लायक बनते.
प्रश्नकर्ता: मागच्या जन्मी आम्ही जी कर्म बांधली त्याचे ह्या जन्मात फळ आले, तर कर्माचा हा सगळा हिशोब कोण ठेवतो? त्याची बहीखाते कोण ठेवतो?
दादाश्री : थंडी पडते तेव्हा पाईपच्या आत जे पाणी असते त्याचा बर्फ कोण बनवतो? ते तर थंड वातावरण झाले म्हणून. ओन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स हे सर्व कर्म-विर्म करतात, त्याचे फळ येते तेही एविडन्स आहे. तुला भूक कशामुळे लागते? सर्व सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स आहे. त्याच्यामुळे हे सर्व चालते!