एका शेठने पन्नास हजार रूपयांचे दान दिले. तेव्हा त्याच्या मित्राने शेठजींना विचारले, 'एवढे पैसे देऊन टाकलेत?' तेव्हा शेठ म्हणाले, 'मी तर एक पैसाही देईल असा नाही. हे तर त्या मेवरच्या दबावामुळे द्यावे लागले.' तर हयाचे फळ तिथे काय मिळेल? पन्नास हजार दान दिले ते स्थूळकर्म. त्याचे फळ त्याला इथल्या इथे मिळून जाते. ते म्हणजे लोक त्या शेठची 'वाह वाह' करून स्तुती करतात. किर्तीचे गुणगान गातात. परंतु शेठने आत, सूक्ष्मकर्मात काय चार्ज केले? तर, 'एक पैसाही देईल असा मी नाही.' त्याचे फळ त्याला पुढील जन्मात मिळेल, तेव्हा पुढील जन्मात शेठ एका पैशाचेही दान देऊ शकणार नाही. आता एवढी सुक्ष्म गोष्ट कोणाला समजेल?
त्या ठिकाणी दुसरा कोणी गरीब असेल, त्याच्याकडे सुद्धा हेच लोक दान मागण्यास गेले असतील, तेव्हा तो गरीब माणूस काय म्हणतो की, 'माझ्या जवळ आता पाचच रूपये आहेत ते सगळेच तुम्ही घ्या. पण आता जर माझ्या जवळ पाच लाख रूपये असते तर ते सर्वच दिले असते. ' असे तो हृदयापासून सांगतो. आता या गरीबाने पाचच रूपये दान दिले. ते डिस्चार्जमध्ये कर्मफळ आले. पण आत सुक्ष्मात काय चार्ज केले? पाच लाख रूपये देण्याचे, म्हणून तो पुढील जन्मात पाच लाख देऊ शकेल, कर्म डिस्चार्ज होईल तेव्हा.
एक माणूस नेहमी दान देत असेल, धर्माची भक्ति करत असेल, मंदिरात पैसे देत असेल, संपूर्ण दिवस धर्म करत असेल, त्याला जगातील लोक काय म्हणतील की, हा धर्मिष्ठ आहे. आता त्या माणसाच्या मनात काय विचार येत असतात की, कशाप्रकारे (पैसा) जमा करू व कशाप्रकारे उपभोग " घेऊ! त्याच्या मनात मात्र बिनहक्काची लक्ष्मी लुटण्याची खुप इच्छा होत असते. बिनहक्काचे विषय विकार भोगून घेण्यासाठी सुद्धा तो तयारच असतो!
म्हणून भगवंत त्याचा एकही पैसा जमा करीत नाहीत. त्याचे काय कारण आहे? त्याचे कारण हेच की, दान-धर्म- क्रिया ही सर्व स्थूळकर्म आहेत. ह्या स्थूळकर्माचे फळ इथल्या इथेच मिळत असते. लोक तर या स्थूळकर्यांनाच पुढील जन्माचे कर्म मानतात. पण त्याचे फळ तर इथल्या इथेच मिळत असते परंतु सुक्ष्मकर्म जे आतमध्ये बांधले जात आहे, त्याची तर लोकांना खबरच नसते. त्याचे फळ पुढील जन्मात मिळते.
आज एखाद्या माणसाने चोरी केली, चोरी केली हे स्थूळकर्म आहे. त्याचे फळ त्याला ह्या जन्मातच मिळते. जसे की, त्याला अपयश मिळते, 7 पोलीसवाला मारतो वगैरे, ते सर्व फळ त्याला इथल्या इथेच मिळणार....
म्हणजे आज जे स्थूळकर्म दिसतात, स्थूळ आचार दिसतात ते 'तिथे' कामी येणार नाही... 'तिथे' तर सुक्ष्मभाव काय आहे? सुक्ष्मकर्म काय आहेत? एवढेच 'तिथे' उपयोगी पडते. आज हे जग संपूर्ण स्थूळकर्मावरच
एडजस्ट झालेले आहे.
हे साधु-संन्यासी सर्वजण त्याग करतात, तप करतात, जप करतात, परंतू ही सर्व तर स्थूळकर्म आहेत. त्यात सुक्ष्मकर्म कुठे आहे? हे जे दिसते त्यात पुढील जन्मासाठी सुक्ष्मकर्म नाहीत. ते जे स्थूळकर्म करतात, त्याचे यश त्यांना इथेच मिळून जाते.