प्रश्नकर्ता : तर काय ह्या जन्मात केलेल्या कर्माचे फळ पुढील
जन्मात मिळू शकते?
दादाश्री हो, ह्या जन्मात मिळत नाही.
प्रश्नकर्ता: तर आता ह्या जन्मात आम्ही जे भोगत आहोत ते मागील जन्माचे फळ आहे का?
दादाश्री होय, ते मागील जन्माचे आहे आणि त्याच्या सोबत नवे कर्म पुढील जन्मासाठी बांधले जात आहे. म्हणून तुम्ही नवे कर्म चांगले करायला हवे. हे तर आता बिघडलेले आहे पण पुढील बिघडू नये त्यासाठी जागृत रहायला हवे.
प्रश्नकर्ता : आता कलियुग चालू आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे सध्याचा मनुष्य चांगले कर्म तर करू शकत नाही. दादाश्री : चांगल्या कमांची गरज नाही.
दादाश्री : हा, ह्या जन्मात मिळत नाही.
प्रश्नकर्ता: तर आता ह्या जन्मात आम्ही जे भोगत आहोत ते मागील जन्माचे फळ आहे का?
दादाश्री : होय, ते मागील जन्माचे आहे आणि त्याच्या सोबत नवे कर्म पुढील जन्मासाठी बांधले जात आहे. म्हणून तुम्ही नवे कर्म चांगले करायला हवे. हे तर आता बिघडलेले आहे पण पुढील बिघडू नये त्यासाठी जागृत रहायला हवे.
प्रश्नकर्ता : आता कलियुग चालू आहे. कलियुगाच्या प्रभावामुळे
सध्याचा मनुष्य चांगले कर्म तर करू शकत नाही.
दादाश्री : चांगल्या कमांची गरज नाही.
प्रश्नकर्ता: तर कशाची गरज आहे?
दादाश्री :आत सद्भावनेची गरज आहे. चांगले कर्म तर जर प्रारब्ध चांगले असेल तर होऊ शकेल. नाही तर नाही होऊ शकणार. पण चांगली भावना तर होऊ शकते, जरी प्रारब्ध चांगले नसेल तरीही.