आता घरात बायको असेल, लग्न केलेले असेल आणि मोक्षाला जायचे असेल, तर मनात येत राहते की मी लग्न केलेले आहे, तर आता मी मोक्षाला कसे काय जाऊ शकेल? अरे बाबा, बायको नडत नाही, तुझी सुक्ष्मकर्म नडतात. हे तुझे स्थूळकर्म जरा सुद्धा नडत नाही. हे मी उघड करून दिले आहे आणि हे विज्ञान खुले केले नसते, तर आत भीती, भीती आणि भीतीच वाटत राहिली असती. आत सतत अजंपो (बेचैनी, अशांती) राहते, ते साधू म्हणतात की आम्ही मोक्षाला जाऊ अरे, तुम्ही मोक्षाला कसे काय जाणार आहात? काय सोडले पाहिजे, ते तर तुम्हाला माहित नाही. तुम्ही तर स्थूळ सोडले. डोळ्यांनी दिसते, कानांना ऐकू येते ते सोडले. त्याचे फळ तर या जन्मातच मिळेल. हे विज्ञान नवीनच प्रकारचे आहे, हे तर अक्रम विज्ञान आहे, ज्यामुळे या लोकांना सर्व प्रकारची फेसीलिटी (सुविधा) झाली आहे. बायकोला सोडून पळून जाता येते का? अरे बायकोला सोडून पळून जायचे आणि आपला मोक्ष होणार, हे शक्य आहे का? कोणाला दुःख देऊन आपला मोक्ष होणार, हे शक्य आहे का?
म्हणून बायको-मुलांच्या प्रति असलेली सर्वच कर्तव्ये पूर्ण करावी आणि पत्नी जे जेवण वाढेल, ते निवांतपणे जेवा ते सर्व स्थूळ आहे. हे समजून घ्या. स्थूळच्या मागे तुमचा अभिप्राय असा असायला नको की ज्यामुळे सुक्ष्ममध्ये चार्ज होईल. त्यासाठी मी तुम्हाला आज्ञारूपी पाच वाक्ये दिली आहेत. आतमध्ये असा अभिप्राय रहायला नको की हे करेक्ट आहे. मी जे करतो, जे उपभोगतो, ते करेक्ट आहे. आत असा अभिप्राय असायला नको. बस एवढाच तुमचा अभिप्राय बदलला की सर्वच बदलून गेले.