प्रश्नकर्ता: आपण सत्संगला येत असतो तेव्हा एखादा माणूस अडचण उभी करतो. तर ती अडचण आपल्या कर्मामुळे आहे का?
दादाश्री होय, तुमची चुक नसेल तर कोणी तुमचे नाव घेणार नाही. तुमच्या चूकांचाच परिणाम आहे. स्वतःनेच बांधलेले अंतराय कर्म आहेत. केलेल्या कर्मांचे सर्व हिशोब भोगायचे आहेत.
प्रश्नकर्ता हो चुक आपण मागच्या जन्मी केली होती का? दादाश्री होय, मागच्या जन्मात.
प्रश्नकर्ता : आताचे माझे वर्तन त्यांच्यासोबत चांगले आहे. तरीही ते
म्हणतात की, माझे वर्तन खराब आहे, तर हे मागील जन्माचे आहे का?
दादाश्री : मागील जन्माचे कर्म म्हणजे काय ? योजना रूपी केलेले असते. म्हणजे मनाच्या विचाराने कर्म केलेले असते. ते आता रूपकमध्ये येते आणि आपल्याला ते कार्य करावे लागते. करायचे नसेल तरीही करावे लागते. आपली सुटकाच होऊ शकत नाही. असे कार्य करावे लागते ते मागील योजनाच्या आधारावर करत असतो आणि मग त्याचे फळ पुन्हा भोगावे लागते.