प्रश्नकर्ता : कोणत्या ऑडर (क्रम) मध्ये कर्माचे फळ येते? ज्या ऑडरमध्ये ते बांधले गेले असेल, त्याच ऑडरप्रमाणे त्याचे फळ येते? म्हणजे पहिले हे कर्म बांधले गेले, त्यानंतर हे कर्म बांधले गेले, नंतर हे कर्म बांधले गेले. पहिल्या नंबर वर हे कर्म बांधले गेले तर त्याचा डिस्चार्ज पण पहिल्या नंबरवरच येणार. नंतर दुसऱ्या नंबर वर हे कर्म बांधले गेले, तर त्याचा डिस्चार्ज, दुसऱ्या नंबरवरच येणार, असे आहे?
दादाश्री नाही, असे नाही. प्रश्नकर्ता तर मग कसे आहे? हे जरा समजावून सांगा.
दादाश्री : नाही, असे नाही. ते सर्व त्याच्या स्वभावाप्रमाणे सेट (मांडणी) होऊन जाते की हे दिवसा भोगण्याचे कर्म हे रात्री भोगण्याचे कर्म, असे हे सर्व ... सेट होऊन जाते. हे दुःखात भोगण्याचे कर्म, हे सुखात भोगण्याचे कर्म, असे सेट होते. अश्या प्रकारे त्याची सर्व मांडणी होते.
प्रश्नकर्ता ही मांडणी कोणत्या आधारावर होते?
दादाश्री : स्वभावाच्या आधारावर. हे जे आपण सर्व एकत्र जमतो, ते तर सर्वांचे स्वभाव मिळते-जुळते असल्यामुळेच एकत्र जमतो, नाही तर जमणार नाही.