shabd-logo

अठरा

20 June 2023

2 पाहिले 2
नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंडाला अत्यानंद झाला. जनमेजयासमोर हे दोन बंडखोर केव्हा उभे करीन असे त्याला झाले होते.

हस्तिनापुराला या दोन राजबंदीसह रात्रीच्या वेळी ते आले. नागानंद व वत्सला यांना एका कोठडीत ठेवण्यात आले. शेजारच्या कोठड्यांतून शेकडो नाग स्थानबद्ध करून ठेवण्यात आलेले होते. आणखी अभागी जीवन आले असे वाटून त्यांना वाईट वाटत होते. परंतु पहारेवाल्यांकडून वत्सला व नागानंद, दोघे आली आहेत, असे कळताच सर्व राजबंदींनी 'वत्सलानागानंदकी जय' अशा गर्जना केल्या. परंतु वत्सला व नागानंद यांना पहारेकऱ्यांबरोबर निरोप पाठविला. “जयजयकार आमचा नका करू. जयजयकार आस्तिकांचा करा. त्या महर्षीचा करा. जयजयकार प्रेमधर्माचा करा. ऐक्यधर्माचा करा. "

सर्व राजबंदींनी “भगवान आस्तिकांचा विजय असो. प्रेमधर्माचा विजय असो.” अशा गर्जना केल्या. त्या गर्जना जनमेजयाच्या कानी गेल्या. आज का या गर्जना, हे त्याच्या लक्षात येईना. इतक्यात वक्रतुंड आला.

“आणले दोघांस पकडून." तो ऐटीने म्हणाला.

“ त्यामुळेच का ह्या जयगर्जना ! त्यांना पाहून इतर बंदी गर्जना करीत आहेत वाटते. " जनमेजयाने विचारले.

"बेट्यांना मरण जवळ आहे ते दिसत नाही. आता गर्जत आहेत, मग ओरडतील रडतील.” वक्रतुंड म्हणाला.

“गर्जना करणाऱ्या मेघाला शेवटी वीज जाळते व मेघ रडू लागतो.” जनमेजय म्हणाला.

“या वाळवंटासही अग्नीच्या ज्वाळा जाळतील. रडत-ओरडत मरतील.” वक्रतुंड म्हणाला.

“उद्या सर्व राजबंदींना स्थानबद्ध स्त्रीपुरुषांना बाहेर काढावे. शृंखलांसह बाहेर काढावे. त्यांच्यादेखत नागानंद वत्सला यांची पहिली संयुक्त आहुती द्यावी. दांपत्याची संयुक्त आहुती ! अशा संयुक्त आहुत्या किती देता येतील? किती आहेत असे जोड?” जनमेजयाने विचारले.

“दोन हजारांवर आहेत. अजून येत आहेत. " वक्रतुंड म्हणाला.

प्रभात झाली. आज लाल लाल सूर्य उगवला होता. तो का संतप्त झाला होता? संसाराचे स्मशान करणाऱ्या मानवांचा का त्याला तिटकारा वाटत होता? आपण या मानवजातीसाठी रात्रंदिवस तापतो. परंतु ही मानवजात शेवटी पैकिंमतीची ठरली म्हणून का त्याला संताप आला होता? आपणच द्वादश नेत्र उघडावे व भस्म करावे सारे जगत् असे का त्याला वाटत होते? नाही. देवाला असे वाटत नाही. तो आशेने आहे. शेवटी सारे गोड होईल, आंबट आंबा पिकेल ही अमर आशा त्याला आहे.

प्रचंड होमकुंडे धडधड पेटू लागली. सर्वत्र सैन्याचे थवे ठायी सज्ज होते. कारागृहातून स्त्रीपुरुष नागबंदी बाहेर काढण्यात आले. त्यांना दोरीने बांधून उभे करण्यात आले. नागानंद व वत्सला यांनाही आणण्यात आले. एका बाजूला त्यांना उभे करण्यात आले.

राजधानीतील स्त्रीपुरुषाचे थवे लोटले. सर्वांचे डोळे भरून आले. ही निरपराध माणसे का आगीत फेकली जाणार? यासाठी का ही होमकुंडे धडधडत आहेत? अरेरे! त्या ज्वाळा ध्येयाकडे जाणाऱ्या जीवांच्या धडपडणाऱ्या आत्म्यांप्रमाणे दिसत होत्या. मानवात प्रेम नांदावे, बंधुभाव नांदावा यासाठी धडपडणाऱ्या जीवांना भेटून पवित्र होण्यासाठी त्या ज्वाळा तडफडत होत्या. ध्येयार्थी व्यक्तींना ध्येयाचा मार्ग विचारण्यासाठी त्या ज्वाळा उसळत होत्या. त्या तेजस्वी सूर्यनारायणाच्या चरणांशी आम्ही कसे जावे हे त्या ज्वाळांना विचारावयाचे होते. सूर्य त्यांचे ध्येय. तेजाच्या समुद्रात बुडण्यासाठी त्या वर जाऊ पाहत होत्या. प्रेमसमुद्रात, चित्सिंधूंत डुंबणारा मानवच आपणास मार्ग दाखवील असे त्या ज्वाळांना वाटत होते. ज्वाळांनो, वर वर जाणाऱ्या ज्वाळांनो! खाली केले तरीवर उफाळणाऱ्या अदम्य बाळांनो चालू द्या तुमची धडपड, उत्तरोत्तर, उच्चतर जाण्याची धडपड !

जनमेजय आला. वक्रतुंड आला. इतर मोठे मोठे राजपुरुष आले. तेथे एका सिंहासनावर महाराजाधिराज जनमेजय बसला. त्याच्या नावाने ललकारी झाली. परंतु सर्व नागबंदीनी “प्रेमधर्माचा विजय असो ! ऐक्याचा विजय असो !" अशी गर्जना केली.

“छाटून टाकू जिभा.” अधिकारी म्हणाला.

“आमची जाळून राख केलीत तरी त्या राखेतूनही प्रेमधर्माचा विजय असो हीच गर्जना होईल. ती गर्जना तुमच्या कानात शिरेल. तुमच्या हृदयात उठेल. ती गर्जना, तो मंत्र तुम्हाला ऐकण्याशिवाय गत्यंतर नाही. " नागानंद म्हणाला.

वक्रतुंड भेसूर हसला. जनमेजयाने तिरक्या वक्रदृष्टीने पाहिले. “ आणा त्या दोघांना पुढे. " जनमेजयाने आज्ञापिले. वत्सला व नागानंद यास पुढे आणण्यात आले.

“तुम्ही आर्य दिसता. अनार्याजवळ का केलेत लग्न ? कस्तुरीने मातीच्या दिपळाशी मिळावे हे आश्चर्य आहे. पतीला सोडून देण्यास तयार असाल तर तुम्हाला मी सोडतो. आर्यांची हत्या माझ्या हातून शक्य तो होऊ नये अशी माझी इच्छा आहे. बोला, तुम्ही आहात तयार ? आर्यधर्माची सेवा करावयास आहात तयार? आर्यधर्म निर्मळ ठेवावयास आहात तयार ?” जनमेजयाने वत्सलेस विचारले.

“मी जगू इच्छित नाही, मी मरू इच्छिते. आर्यपुरुषांप्रमाणे मी उल्लू नाही, मी आर्यस्त्री आहे. आर्यपुरुषांनी खुशाल नागस्त्रिया भोगिल्या व त्याचा त्यागही केला. असला आर्यधर्म माझा नाही. तुम्ही आर्यपुरुष स्त्रियांना कचरा मानीत असाल. परंतु आम्ही आर्यस्त्रिया पुरुषांना कचरा मानीत नाहीत. तुमच्या अर्जुनाने उलूपी, चित्रांगी यांना रडत ठेविले. हा तुमचा आर्यधर्म वाटते? आर्यपुरुषांचा हा धर्म असेल, आर्यस्त्रियांचा निराळा धर्म आहे. मी नागानंदांना सोडणार नाही. पत्नीला सोडून पती जात असेल, परंतु पतीला सोडून पत्नी जाणार नाही. 'आपल्या पतीचा त्याग कर' असे तुला सांगवते तरी कसे? सावित्रीची कथा कधी ऐकली आहेस का? नदी समुद्राकडेच जाणार, ती का मागे वळेल? राजा, अधर्म करायला मला कसे सांगतोस? ही का तुझी संस्कृती? तुम्ही पुरुष संस्कृती बुडवायला निघालात; तरी आम्ही स्त्रिया ती बुडू देणार नाही आणि नागजात का वाईट? काय आहे त्यांच्यात वाईट? टाकून जाणाऱ्या आर्यांचे प्रेमस्मरण करीत पतिव्रता राहणाऱ्या त्या नागस्त्रिया, त्यांच्या चरणांचे तीर्थ घे व पवित्र हो. काय आहे तुझ्यात अधिक? कशाला आर्यांनी तोरा मिरवावा?' तिने तेजस्वी वाणीने विचारले.

“आम्ही आर्य क्रूर सर्पांची पूजा करून द्वेषी होत नाही. नाग द्वेषी असतात. माझ्या पित्याला कसे मनात दंश ठेवून त्या एका नागाने मारले तुम्हाला माहीत नाही? अशी ही जात, आर्यलोक सूर्याची उपासना करतात. परब्रह्माची प्राप्ती करून घेऊ पाहतात.” जनमेजय म्हणाला.

“नागांच्या ऋषींची तुझ्या पित्याने विटंबना केली. त्याने साप मारून ऋषीच्या गळ्यात अडकविले. म्हणून त्या नागतरुणाने त्याची हत्या केली. परंतु समजू या की, तो तरुण द्वेषी होता. आणि तू रे? त्या एका हत्येची हजारो नागांना जाळून बदला घेणारा तू, तू किती द्वेषी ? नागांची पूजा करून नागलोक द्वेषी नाहीत होत. ते तुमच्यापेक्षा अधिक उदार आहेत. नागांची पूजा नागांप्रमाणे क्रूर होण्यासाठी ते नाहीत करीत. क्रूर अशा नागातही ते परब्रह्म पाहून त्यांची उपासना करतात. सूर्य तेजस्वी आहे, मंगल आहे.

त्याच्या ठिकाणी पूज्य भाव धरणे सुलभ आहे. परंतु वाकड्या विषारी सापाचे ठिकाणीही मांगल्य पाहणे ही मोठी दृष्टी आहे. तुमच्या आर्यांच्या दृष्टीपेक्षा ही विशाल दृष्टी आहे. अशा सर्पाची पूजा करून नागलोक उदारचरित बनले आहेत. आमच्या गावात मी बुडत असता एक नागतरुणच धावला. त्या तरुणाच्या चरणी मी प्रेम नको वाहू तर का आर्यदगडांच्या वाहू! मी नागांविषयी सहानुभूती दाखवीत असे म्हणून माझ्या गावातील आर्य काही मला पाण्यातून काढण्यासाठी धावले नाहीत. हा ऐका आर्यधर्म? हा तर अकारण द्वेषधर्म आहे. राजा, आमच्या गावी वाघांचा उपद्रव होत असता या माझ्या नागानंदांनीच तो उपद्रव दूर केला. यांनीच आपले प्राण संकटात घातले असे हे नाग आहेत. तुम्ही आर्यच क्रूर आहात. तुमच्या पूर्वजांनी आपल्या भाऊबंदकीसाठी सर्व भरतखंडातील क्षत्रियांचा विनाकारण संहार केला. माझे आजोबा तुमच्या पूर्वजांच्या लढाईतच मरण पावले. तुम्ही आर्यांनी तुमच्या क्षुद्र भांडणासाठी लाखो स्त्रियांना रडविले. आणि आता आज तूही स्वतःच्या मनातील द्वेषासाठी लाखो निरपराधी नागांचे हनन व हवन करीत आहेत. तुमचा धर्म हेच का सांगतो? तुमचा धर्म का वधिक- धर्म आहे? तुमची संस्कृती अशी अनुदार व नृशंस असेल तर कोणाला वाटेल तिजविषयी अभिमान? तुमचा धर्म वधिकाचा असेल तर कोण त्या धर्माला हृदयाशी धरील? अशा संस्कृतीसमोर मान वाकविण्यापेक्षा मेलेले काय वाईट? अशा पापांत सहकारी होण्यापेक्षा अग्निकाष्ठे भक्षिलेली बरी. राजा, टाक, जाळून टाक. सत्याला, प्रेमाला तपश्चर्येला, सतित्वाला, पावित्र्याला, निरपराधीपणाला जाळून टाक. आयांना मुलांसह जाळ. पतींना पत्नीसह जाळ. मित्रांना मित्रांसह जाळ. आर्यधर्माची ही द्वेषध्वजा फडकव. सूर्याची उपासना करणारे तुम्ही आर्य! सूर्याप्रमाणे सर्वांची जीवने समृद्ध करणे, ती प्रकाशमान करणे, ती आनंदमय करणे हा वास्तविक सूर्योपासकांचा धर्म ! तुम्ही विष्णूची पूजा करणारे. सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या त्या तेजोमयाला पाहणारे. सर्वांच्या ठायी प्रकाश पाहणे, पावित्र्य पाहणे, मांगल्य पाहणे म्हणजेच परब्रह्मप्राप्ती! राजा, द्वेषाने नाही रे देवदर्शन. अशी खाली का मान घालतोस? तुझ्या द्वेषाग्नीला शांत करण्यासाठी आम्ही भगिनी येथे उभ्या आहोत. प्रथम आम्हा दोघांची आहुती दे. प्रेमपूर्ण जीवनाची आहुती!”

होमकुंडे धडधडत होती. राजा का फेकणार नागानंद व वत्सला यांना? जनमेजय का जाळणार त्या हजारो स्त्री-पुरुषांना? एकेक क्षण म्हणजे मरणाचा जात होता.

“राजा, यांना करू अर्पण?" वक्रतुंडांने विचारले. राजा बोलेना. खाली मान घालून तो बसला होता.

“राजा, काय आहे आज्ञा ?” वक्रतुंडाने पुन्हा विचारले.

*आज या सर्वांना घेऊन जा. विचार करायची त्यांना संधी देऊ या. वत्सले, आणखी विचार कर. तुला अवधी देतो, किती अवधी ते आज सांगत नाही. जा या सर्वांना घेऊन, " जनमेजयाने आज्ञापिले.

सर्वांना हायसे वाटले. बलिदानार्थ काढलेल्या त्या सर्वांनी प्रभूला मनात धन्यवाद दिले. त्यांचे डोळे भरून आले होते.

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा