shabd-logo

बारा

13 June 2023

3 पाहिले 3
“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतु

शेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आर्य आहेत म्हणून?" वत्सलेने विचारले.

“सुश्रुता आजीच म्हणत होत्या. एका आर्यापासूनच त्याची उत्पत्ती आहे. त्याची आई होती नाग, परंतु पिता होता आर्य. 'ज्या जातीचा पिता, त्या जातीची मुले' असे आर्य म्हणतात. आई कोणी का असेना ? म्हणून नागानंद आर्यच आहेत.” तो पुन्हा म्हणाला.

"कार्तिक, नागानंदांवर माझे प्रेम आहे. ते आर्य आहेत की नाग आहेत ह्याच्याशी मला काहीएक करावयाचे नाही. ते माझे आहेत, माझ्यासाठी जन्मलेले आहेत, असे मला वाटले म्हणून मी त्यांची झाले. प्रेमाला जात नाही, गोत नाही. प्रेम परिपूर्ण करणारे असते, अपूर्णाला पूर्णता देणारे असते. नागानंद स्वतःला नाग समजतात. नागांची बाजू घेतात. एखादा नाग स्वार्थासाठी काही दुष्ट आर्यांच्या नादी लागून जर नागांचाच द्वेष करू लागला तर तो का नाग? शेवटी आपली जात कोणती, धर्म कोणता? आपण कोणाचे? ज्याच्यासाठी आपण मरतो त्याचे आपण. नागानंद नागांसाठी तडफडतात म्हणून ते नागंचे आहेत, प्रतिज्ञेचा अर्थ पाहावयाचा असतो, अक्षरे नाही." ती म्हणाली.

“तू रागावलीस? तू रागावत तरी जा माझ्यावर. मला प्रेम नसशील देत, तर क्रोध तरी दे. काहीतरी तुझे दे. तू माझी अगदीच आपेक्षा नको करू." कार्तिक म्हणाला. “ कार्तिक, अलीकडे तू सारखे सूत कातीत का बसतोस?" तिने विचारले. “तुला विवाहाची देणगी देण्यासाठी. तुला कोणता रंग आवडतो ?

पांढऱ्या वस्त्रातच तू सुंदर दिसतेस.” तो म्हणाला.

" परंतु त्यांना आवडतो हिरवा रंग." ती म्हणाली. “ त्यांना आवडेल तेच नेस. मी हिरव्या रंगाचे वस्त्र तुला देईन. ते नेसशील ? मला तेवढेच समाधान. मी माझ्याजवळ नाही येऊ शकत, तुझ्या हृदयाजवळ नाही येऊ शकत. परंतु मी विणलेले वस्त्र तरी येऊ दे. करशील एवढी दया? त्याने विचारले.

“ करीन. परंतु तू बभ्रा नाही करता कामा. गुपचूप सारे केले पाहिजे.

नाहीतर गावभर सांगत सुटशील." ती म्हणाली. “वत्सले, तुझ्या शेतावरच्या झोपडीत आता मी राहिलो तर? नागानंद काही नाही राहात तेथे. जेथे नागानंद राहिले तेथे मी राहीन. म्हणजे पुढील जन्मी तरी मी तुला आवडेन." तो म्हणाला.

“कसला रे पुढील जन्म? पुठील जन्माच्या कल्पना दुबळेपणा देतात. 'करीन काय तश याच जन्मी करीन.” असे मनुष्याने म्हणावे. पुनर्जन्म न मानणारे अधिक निश्चयी, अधिक तेजस्वी अधिक प्रयत्नवादी असतात. त्यांच्या जीवनास एक प्रकारची धार असते. मला नाही पुनर्जन्मवाद आवडत. नागानंद त्याच मताचे आहेत. ह्या कार्यातच पुनर्जन्मवाद बोकाळला आहे. तू मारीत बस मिटक्या? त्यात तुला समाधान असेल तर ते तू घे. कल्पनेचे समाधान! भ्रामक दुबळे समाधान!" ती म्हणाली.

“ वत्सले, तसे पाहिले तर सारे काल्पनिकच आहे. आपल्या कल्पनेनेच आपण सारे उभे करतो. तू अधिक खोल जाशील तर ते तुला मान्य करावे लागेल." तो म्हणाला.

“पाण्यात तळाशी जाऊ तर चिखल मिळायचा, वरवरच खेळू.” ती म्हणाली.

“परंतु मोती समुद्राच्या तळाशी असतात." तो म्हणाल.

“एखादे मोती, परंतु खंडीभर माती." ती म्हणाली.

“म्हणून तर त्या मोत्याला मोल. नागानंदांसारखे सारे असते तर तू त्यांना मानतीस ना, हृदयाशी धरतीस ना. ते हजारात, लाखात एक आहेत, असे तुला वाटते म्हणून तू त्यांना किंमत देतेस." तो म्हणाला.

“ मी त्यांची किंमत नाही कधी केली. माझे हृदय त्यांच्याकडे गेले, मी त्यांच्या चरणी जीवन वाहिले. तराजूत घालून मी त्यांना तोलले नव्हते. ते सद्गुणी की दुर्गुणी, पराक्रमी का दुबळे, इकडे माझे लक्ष नव्हते. ते प्रेम वजनमाप नाही बसत. प्रेम प्रियवस्तूंचा विक्रय नाही मांडीत." ती म्हणाली.

“मग राहू का तुझ्या शेतावरच्या झोपडीत? कामही करीन. तुला फुले आणून देईन, दूध आणून दईन. घरी निरुद्योगी किती दिवस राहू?” त्याने विचारले.

“परंतु तुला भीती वाटेल. वाघ येतील, साप येतील, मग कसे करशील?" तिने विचारले.

“वाघाने यावे व मला खावे; सापाने यावे व मला दंश करावा, म्हणून तर मी तेथे राहू इच्छितो. तुझ्या शेतावर मरण येईल. तुझ्या केसांना शोभवणारी फुले जेथे फुलतात त्या मळ्यात मरणेही भाग्य. " तो म्हणाला. “ मी आईला विचारीन." ती म्हणाली.

कार्तिकी निघून गेला. तो जाऊन सूत कातीत बसला. सारखे सूत कातीत बसे. तो आपल्या डोळ्यांना म्हणे, 'हात वत्सलेसाठी सारखे कातीत आहेत. मन सारखे तिचे चिंतन करीत आहे. तुम्ही अश्रूंची माळ गुंफा. परंतु वस्त्र नेऊन देता येईल. अश्रूंची माळ कशी गुंफू, कशी नेऊन देऊ?” शेवटी हिरवे पातळ तयार झाले. त्या दिवशी वत्सला शेतावर गेली होती. पाणी घालीत होती, तो कार्तिकी ते वस्त्र घेऊन आला.

“वत्सले, हे घे हिरवे पातळ. त्या हिरव्या झाडाखाली जाऊन नेस. डोहाळे लागले म्हणजे हिरवे पातळ नेसावे, असे म्हणतात ना?" तो म्हणाला. “डाळींबी पातळ, अंजिरी पातळ नेसावे व हिरवी कंचुकी घालावी. कार्तिक, तू जा. तू माझ्यावर प्रेम करतोस. मला तुझी कीव येते. परंतु आता जा. जपून बोलत जा, जपून जा, नाहीतर तुला जवळ येऊ देणार नाही. तुजजवळ कधी बोलणार नाही." ती रागाने म्हणाली.

“ क्षमा कर. मी जातो.” त्याच्या डोळ्यांत पाणी आले. तो निघून गेला.

वत्सलेकडे त्याने वळूनही पाहिले नाही.

वत्सला झाडाखाली गेला. ते हिरवे हिरवे वस्त्र ती नेसली. नागानंद आले व चकित झाले.

“ आलीस लाल पातळात, दिसतेस हिरव्या पातळात. " तो म्हणाला. “तुम्हाला हिरवे आवडते म्हणून सारे हिरवेच

दिसते. हे हिरवे नाही

पातळ, हे लालच आहे. नीट बघा." ती हसून म्हणाली.

“कोणी दिले हे?" त्याने विचारले.

“माहेरची भेट आली." त्याने विचारले.

“कोठे तुझे माहेर? त्याने विचारले. “सर्वत्र." ती म्हणाली.

“ वत्सले, तुला काय इच्छा आहे? तुला काय पाहिजे, ते सारे सांग. तुझे डोहाळे पुरवले पाहिजेत. सांग." तो प्रेमाने म्हणाला.

“काय सांगू? आर्य व नाग यांच्यात प्रेम उत्पन्न करण्यासाठी मरावे असे मला वाटते. आपण केव्हा जायचे प्रचार करायला ? सर्वत्र प्रेमाची पताका नेऊ." ती म्हणाली.

“आता कुठे जावयाचे? तुला आता भराभर चालवतही नाही. कशाला आलीस लांब? आणि पाणी ना घालीत होतीस? अति श्रम बरा नव्हे." तो म्हणाला.

“ थोडाफार श्रम करीन तरच सारे नीट होईल. बसेन तर फसेन. आज वारा

नाही अगदी. उकडते आहे." ती म्हणाली.

" वारा घालू ?” त्याने विचारले.

“आणा तोडून पल्लव व घाला वारा." ती हसून म्हणाली. ती तेथे पाय लांब करून बसली होती. तो तिला वारा घालीत होता.

सायंकाळ होत आली. पतीचा हात धरून वत्सला घरी आली. ती थकून गेली होती. शांत झाली होती.

काही दिवसांनी वत्सला प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. सुश्रुतेला आनंद झाला. तिला पणतू झाला. कोणते ठेवावे नाव? चर्चा झाली. शेवटी शशांक हे नाव ठेवण्यात आले. सुंदर होता मुलगा. तो गोरागोरा होता रंग आईचा होता. नाकडोळे बापाचे होते.

“माझ्या रंगाचा आहे माझा बाळ." वत्सला म्हणे

“परंतु दृष्टी माझी आहे. रंग महत्त्वाचा की दृष्टी महत्त्वाची? जशी दृष्टी तशी सृष्टी. जशी दृष्टी तसा रंग. जगात दृष्टी महत्वाची आहे, रंग नाही.” नागानंद म्हणे “बरे, भांडण नको." ती हसून म्हणे.

शशांक वाढू लागला आठ महिन्यांचाच तो चालू लागला. बडबड करू लागला. आठ महिन्यांचे बारा झाले. वर्षांची दोन वर्षे झाली. शशांक बाहेर हिंडू फिरू लागला त्याला पाय फुटले. पंख फुटले. तो दूध सांडी, फुले कुस्करी, सुश्रुता खोटे खोटे त्याला रागे भरे, मग त्याच्या डोळ्यांत पाणी येई. त्याचे तोंड गोरेमोरे होई. पणजी बाई मग त्याला पटकतन उचलून त्याचे पटापट मुके घई.

आईबापांच्या व पणजीच्या प्रेमळ सहवासात शसांक वाढत होता. कधी त्याला शेतावर नेत. तेथे तो वासरांशी खेळे. गाईच्या अंगाला हात लावी. लहानसे भांडे घेऊन झाडांना पाणी घाली. सृष्टीच्या हसवासात बाळ शशांक मोठी दृष्टी घेता होता. उंच झाडांकडे बघून उंच होत होता. चपळ हरणांशी खेळून चपळ होत होता. मोरांना बघून सुंदर होत होता. तो शेजारच्या मुलांत खेळवयास जाई. तीही त्याच्याशी खेळत. परंतु एके दिवशी एक प्रकार घडला.

" त्या शशांकला नको रे खेळायला घेत जाऊ. त्याच्याशी नाही खेळायचे. जा रे, शशांका. येथे येत जाऊ नकोस. तू आर्यजातीचा नाहीस. तू नीच जातीचा आहेस. जा येथून." एका मुलाचा बाप येऊन म्हणाल.

ती मुले बात राहिली. शशांक रडू लागला. त्याला काही कळेना. कालपर्यंत ती मुले एकत्र खेळली. आजच का नको ?

“आम्ही खेळू त्याच्याबरोबर! ये रे, शशांक आमचा मित्र आहे." एक लहान मुलगा म्हणाला.

“बाप शिक्षा करील तेव्हा समजेल." तो शिष्ट म्हणाला.

“मी आपला जातो. माझ्यासाठी तुम्ही कोणाला नको मार.” असे म्हणून शशांक घरी आला. तो रडत रडत आला. एकदम जाऊन पणजीला त्याने मिठी मारली. सुश्रुतेने त्याला जवळ घेतले.

“काय झाले राजा? पडलास का? मारले का कोणी? बोलले का कोणी माझ्या लेकराला ? " ती विचारू लागली.

“तू हीन आहेस, नीच आहेस' असे का गं मला म्हणतात 'आमच्या मुलांत खेळायला नको येऊ' असे म्हणतात. मी का वाईट दिसतो? का मला बोलतात?" शशांक विचारू लागला.

“तू आपला घरीच खेळत जा. ते दुष्ट आहेत लोक. नको जाऊ त्यांच्यात. मारतीलसुद्धा. घरात खेळावे.” ती म्हणाली.

“घरात गं कुणाजवळ खेळणार? त्याने रडत विचारले. “माझ्याजवळ खेळ. मी खेळेन तुझ्याशी. मला नाही कंटाळा येणार. मी छपेन, त? मला शोध. तू छप, मी तुला शोधीन. मी तुला अंगणात पकडीन. तू मला पकड. 'चिमणुली बाय तुझ्या घरात येऊ' तो खेळ खेळू रडू नको.” सुश्रुता समजावीत म्हणाली.

“ मला नाही मोठ्या माणसांबरोबर खेळायला आवडत. मला तुझ्याजवळ निजायला आवडते, परंतु खेळायला नाही आवडत. मुलांबरोबर खेळण्यात गंमत असते. मला आणखी भाऊ का गं नाहीत? लहान नाही, मोठा नाही. मी आपला एकटा. इतर मुलांचे भाऊ आहेत, बहिणी आहेत. हसतेस तू. मी बोलतच नाही." असे म्हणून शशांक रुसून बसला.

“तू आपला शेतावर जा. तेथे गाईची वासरे आहेत. शेजारच्या जंगलात मोर आहेत. वानर आहेत. हरणेसुद्धा आहेत. जा तेथे त्यांच्याबरोबर खेळ. गाईची वासरे तरी लहान आहेत ना? ती नाहीत तुला नावे ठेवणार.” सुश्रुता म्हणाली.

" त्यांना मी नीच नाही वाटणार? हीन नाही वाटणार? मोर तर श्रीमंत असतो. तरीही मला हसणार नाही? माणसापेक्षा का गाय, मोर, हरणे चांगली असतात?” शशांकाने विचारले.

“मोर हसत नाही. उलट मुलांना आपली पिसे देतो. कितीतरी मोराची पिसे मजजवळ आहेत. तुला मी त्यांचा मुकुट करणार आहे. तुला तो छान दिसेल. मग तुला पाहून मोर अधिकच नाचेल.” सुश्रुता म्हणाली.

"आकाशात ढग आले म्हणजे मोर नाचतात. त्या दिवशी मी आईबरोबर गेलो होतो शेतावर गडगडले वरती. मला भीती वाटली. मी आईला मिठी मारली. परंतु मोर तर नाचू लागले. त्यांना का ढंग आवडतात? ते गडगडणे आवडते? आई म्हणाली, वरती देवाची आई दळीत आहे. खरे का गं?" शशांकाने शंका विचारली.

“देवाला नको का जेवायला?” सुश्रुता म्हणाली.

“परंतु गडगडले म्हणजे पाऊस पडतो, पीठ नाही पडत.” शशांक म्हणाला.

“मोराला पाऊस फार आवडतो.” सुश्रुता म्हणाली.

“मलासुद्धा. परंतु आई जाऊ देत नाही. त्या दिवशी आईने मला पटकन उचलून घेतले व डोक्यावर पदर घातला. मला नाही आवडत असे. पाऊस डोक्यावर पडला म्हणून काय झाले?” त्याने विचारले.

“आपल्याला पाऊस बाधतो. मोराला नाही बाधत. मेघ मोरांचे मित्र आहेत.” सुश्रुतेने सांगितले.

“माझेसुद्धा ते मित्र आहेत. मी त्यांच्याकडे बघत बसतो. तें घोड्यासारखे दिसतात, तर एकदम हत्तीसारखे दिसू लागतात आणि रंग सुद्धा छान दिसतात त्यांचे. त्या डोंगरावर चढले की हात लागले त्यांच्या अंगाला. त्यांचे अंग ओले असेल का गं?" शशांकाने सुश्रुतेची मान हलवून विचारले.

“अरे दुखेल माझी मान.” ती म्हणाली.

“मी जाऊ खेळायला, का शेतावर जाऊ? शेतावरच जातो. झाडाच्या आडून निरनिराळे आवाज काढीन, मोरासारखा, कोकिळेसारखा.” शशांक म्हणाला.

“जा शेतावर.” सुश्रुता म्हणाली.

“जातोच.” असे म्हणून आपली रंगीत काठी घेऊन तो निघाला. वत्सला व नागानंद शेतात काम करीत होती. सूर्यास्ताची वेळ होत आली होती. एका बाजूला फारच सुंदर इंद्रधनुष्य पडले होते. आकाश रमणीय परंतु जरा गंभीर असे दिसत होते.

“पाहा तरी शोभा ? अगदी सबंध दिसत आहे इंद्रधनुष्य. देवांच्या राज्यातील कमानी. परमेश्वर का कोणाचे स्वागत करीत आहे? कोणासाठी उभारली आहे ही कमान ? आणि तिकडे पाहा सोने उधळले आहे जणू! का सोन्यासारख्या वस्त्रांच्या बैठकी आहेत? कोण बसणार त्या भरजरी बैठकांवरून? देवाच्या घरी किती वैभव असेल, कशी सुंदरता असेल.” वत्सला बघत म्हणाली.

“जगातील दुःखी लोकांना हसवण्यासाठी, आनंदविण्यासाठी परमेश्वर अशी प्रदर्शने मांडतो. प्रातःकाळची उषा पाहून कोणाला प्रसन्न वाटणार नाही? सायंकाळचे हे रंग पाहून कोणाचे हृदय रंगणार नाही ? रात्रीच्या तारा पाहून कोणाचा ताप दूर होणार नाही? हिरवी झाडे पाहून कोणाचे डोळे निवणार नाहीत? प्रसन्न नद्या पाहून कोणाचे मन निर्मळ होणार नाही? आणि ती फुले, नाना रंगाची व गंधांची, त्यांना पाहून तर सारी चिंता पळते, सारे दुरावते. चिमुकली फुले, परंतु अनंत आनंद त्यांच्या पाकळीपाकळीत असतो. दुःख कशी गोड हसतात, वाऱ्यावर डोलतात! देवाने हे आनंद दिसत नाहीत!" नागानंद म्हणाला.

“तुम्ही किती सुंदर सांगता? खरेच का तुम्ही आश्रमात होतात? तिने विचारले.

“ मागे नव्हते का सांगितले होतो म्हणून? महान गुरू, थोर आचार्य ! ते मला म्हणत, 'नागानंद, ही सृष्टी हाच खरा गुरू. हिच्याजवळ शीक. ही सृष्टी सारे तुला शिकवील !” त्यांचे शब्द मी विसरणार नाही. हे हिरवे हिरवे गवत! पाहा तरी यांच्याकडे, याच्या मुकेपणात किती आहे अर्थ! भूमातेचे हे काव्य आहे. भूमातेच्या पोटातील हे वात्सल्य बाहेर पडले आहे. भूमातेची सरलता, निर्मलता, निर्मलता व सुंदरता जणू बाहेर पडली आहे. का पर्जन्याचे प्रेमळ हात लागताच तिच्या अंगावर हे हिरवे रोमांच उठले? मौज आहे." तो म्हणाला.

“तुम्ही कवीसारखे बोलता. तुम्ही वाल्मिकीप्रमाणे लिहा रामायण.” वत्सला म्हणाली.

"माझे जीवन हेच माझे रामायण. आपले जीवन हेच सर्वोत्कृष्ट काव्य. मी हे शेत पिकवितो, मी बासरी वाजवितो, हे माझे काव्य. मी फुले फुलवितो, गाई चारतो हे माझे काव्य." तो म्हणाला.

“दुसऱ्यासाठी नदीत उडी घेता, वाघाशी झुंजता, हे तुमचे काव्य.” ती म्हणाली.

“तू सुद्धा त्या रात्री केवढे थोर काव्य रचिलेस! प्रेमाची लाल पौर्णिमा फुलविलीस, शृंगार-वीर- करुण रसांचे महान काव्य निर्मिलेस. नाही?” त्याने प्रेमाणे तिचा हात धरीत म्हटले.

“आपल्या शशांकलाही आश्रमात पाठवावे. तुम्हाला काय वाटते!” तिने विचारले.

“एवढ्यात नको. आणखी एकदोन वर्षांनी पाठवू.” तो म्हणाला. “माझ्या खरोखर मनात येते की आपण दोघे हिंडू. शशांक राहील आश्रमात. कार्तिक राहील तेथे शेतावर तो आजीला होईल आधार. आणि आपण दोघे जाऊ. गावोगाव जाऊ. प्रेमधर्माचा प्रचार करू. नाग व आर्य यांच्यात स्नेहसंबंध निर्मू. हे खरे महाकाव्य. असे करताना आपणावर संकटे येतील. मरणही येईल कदाचित! परंतु जीवनाच्या महाकाव्यातील ते शेवटचे अमर असे गीत होईल. माझ्या मनात येत असते. लहानपणी मी आजीला म्हणत असे 'आजी, मी परब्रह्माला वाढवणार आहे. वत्सला परब्रह्माची माता होईल. मला होऊ दे परब्रह्माची माता.” प्रेम हेच परब्रह्म. आर्य व नाग जात यांचे प्रेम सर्वातील सुंदरता व मंगलता पाहण्याचे प्रेम वत्सला मनातील म्हणाली.

इतक्यात सारखा 'कुऊ' आवाज येऊ लागला.

'आता कोठली कोकिळ?" नागानंद म्हणाला.

" सारखी ओरडत आहे. छे, कोकिळा नाही ही.” वत्सला म्हणाली.

“आता मोराचा आवाज. शशांक तर नाही आला? मोराचे आवाज तोच

असे काढतो." नागानंद म्हणाला.

वत्सला धावत गेली. तो झाडाआड लहानगा शशांक!

" अरे लबाडा!" ती म्हणाली.

* कसे आईला आणले ओदून!" तो म्हणाला.

“इतक्या उशिरा कशाला आलास?" तिने विचारले.

“तुम्ही इतका उशीर झाला तरी येथे का? तुम्हाला नाही ना उशीर,

मग मलाही नाही. काळोख पडला तरी चालेल. मी उचलून घ्यायला नाही सांगणार." तो म्हणाला.

“बाबा, दूध काढलेत ?” त्याने विचारले. “नाही. आता काढतो.” पिता म्हणाला.

“ मला येथेच द्या प्यायला." शशांक म्हणाला.

“तुला मी येथे द्रोणात दूध दिले होते ते आठवते?” नागानंदाने वत्सलेस विचारले.

“आणि बासरी वाजवून पागल केलेत." ती म्हणाली.

“बाबा, मला शिकवा ना बासरी वाजवायला." बाळ म्हणाला.

“मी दुसऱ्याजवळ नाही शिकलो, स्वतः शिकलो." पिता म्हणाला. “तुम्ही मोठे आहात. मी लहान आहे. आई अजून माझे बोट धरते. तुमचे नाही धरावे लागत. मोठ्यांना सारे येते. शिकवाल ना?" त्याने विचारले,

" आश्रमात शिकवतील तुला. तू जाशील ना आश्रमात ? मातेने विचारले.

“ तेथे बासरी शिकवतील? तेथे माझ्याबरोबर पुष्कळ मुले येतील खेळायला? ‘तू नाग आहेस, नीच जातीचा आहेस' असे नाही ना कोणी म्हणणार? आज मुले माझ्याजवळ खेळत होती. तो ते एक लठ्ठ आले व महणाले, 'त्याला नका रे खेळायला घेऊ. तो नाग आहे. तो नीच आहे. आर्याहून हीन आहे.' आई, का गं असे म्हणतात? तू कोण, बाबा कोण?” त्याने विचारले.

" आश्रमात नाही हो असे चालणार. तेथे आर्य असो, नाग असो. सारे एकत्र खेळतात, एकत्र शिकतात. तेथेच तू जा." वत्सला म्हणाली.

"तूसुद्धा येशील? आजी, बाबासुद्धा येतील? मला आजीजवळ निजायला आवडते. मला एकटे नाही निजायला आवडत आई, मी एकटा का गं मला लहानमोठा भाऊ नाही, बहीण नाही. का गं मी एकटा? तू एकटीच आहेस? बाबा एकटेच आहेत?" त्याने विचारले.

"होय, राजा मी एकटीच होते. हेही एकटेच." ती म्हणाली.

"म्हणून मी पण एकटा ? तुमच्यासारखा मी?" तो म्हणाला.

“माझ्यासारखा कोठे आहेस? मी आहे काळा, तू आहेस गोरा. " नागानंद दूध आणून म्हणाला.

“खरंच. परंतु मी दोघांसारखा आहे. त्या दिवशी आई मला म्हणे, 'त्यांच्यासारखे आहेत तुझे डोळे, त्यांच्यासारखे आहे नाक. " त्यांच्यासारखे

म्हणजे तुमच्यासारखे ना हो, बाबा?” त्याने विचारले. "बरे, हे दूध पी. उशीर झाला. वाघबीघ यायचा. " नागानंद म्हणाला

"मग मी मारीन. मी मांजराला मारतो, पण ते मला चावत नाही. वाघालाही मारीन थप्पड. " शशांक म्हणाला.

" आणि वाघ चावला तर?” आईने विचारले. "चावला तर? मग त्याला सातआठ देईन थपडा मी भिणार नाही. मी धी आहे. मी पुढे जाऊ एकटा काळोखातून!" तो म्हणाला.

“आपण सारीच जाऊ काळोखातून बरोबर.” नागानंद म्हणाला.

“काळोखातून प्रकाशाकडे.” वत्सला म्हणाली.

“घरचा दिवा दुरून दिसेल.” शशांक म्हणाला.
21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा