shabd-logo

एक

12 June 2023

21 पाहिले 21
परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम आशा वाटत होती. ज्यासाठी हा सुंदर भारत देश आपण निर्मिला ते ध्येय नीट रुजेल, चांगले अंकुरेल, दृढ मुळे घरील असे वाटत होते. मला समाधान वाटत होते. सर्व सौंदर्य ह्या देशाच्या निर्मितीत आपण ओतले. ह्याच्या पायापासून डोक्यापर्यंत अनंतता पसरून ठेवली. डोक्याशी गगनाला भेटू पाहणारा हिमधवल नगाधिराज उभा केला व तिन्ही बाजूंना उचंबळणारा, सर्व प्रवाहांना पोटात घेणारा, सर्व प्राणिमात्रांस आश्रय देणारा रत्नाकर पसरून ठेवला. पायांशी व हातांशी समुद्र, डोक्याशी स्थिर असा पर्वत! हात व पाय नाना प्रकारच्या उद्योगात श्रमू देत, धडपडू देत; प्रयोग करू देत. परंतु त्या प्रयोगाचे धोरण निश्चित असू दे. डोक्यात एकच ध्येय असू दे. डोक्यात चंचलता नको. एकाच ध्येयाला भेटण्यासाठी सारे उद्योग असू देत. भारतवासीयांस शिकविण्यासाठी दोन महान वस्तू आपण त्यांच्याजवळ अक्षय ठेवून दिल्या. देवा, हा देश निर्मिताना सारी कुशलता व सुंदरता आपण ओतली. सर्व प्रकारची हवा येथे खेळती ठेवली. सर्व प्रकारच्या वनस्पती येथे लावून ठेवल्या. अनंत प्रकारची फुले व फळे यांनी या देशाला समृद्ध करून ठेवले. विविध रंगांचे व विविध आकारांचे पशुपक्षी येथे निर्मिले. सकाळी व विशेषतः संध्याकाळी निळ्या निळ्या आकाशात अनंत रंगांचे वैभव आपण दाखवतो. स्वच्छ सूर्यप्रकाश व स्वच्छ चंद्रप्रकाश ह्या भूमीला आपण दिला. धुक्याचा धूसरपणा येथे क्वचितच आपण निर्मितो. येथे ही विविधता व स्वच्छता निर्मिण्यास, देवा, आपला हेतू होता.

देवा, तू मानवप्राणी निर्माण करून दशदिशांत पसरिलास. निरनिराळ्या तू ठिकाणी याची निरनिराळ्या रीतींनी वाढ झाली. त्या सर्वांना एकत्र पाहण्याची तुझी इच्छा आहे. निरनिराळ्या फुलांचा हार सुंदर दिसतो. त्याप्रमाणे भिन्न भिन्न देशांत भिन्न भिन्न परिस्थितीत वाढलेले मानवप्रवाह थोडेथोडे एकत्र कोठेतरी आणून त्या सर्वांचे मनोहर ऐक्य पाहावे असे, हे देवदेवा! तुझ्या मनात होते, तो प्रयोग ज्या ठिकाणी करावयाचा ते ठिकाण तू अनुपम रीतीने सजवून ठेवलेस. भारताची विविध रंगांनी नटलेली ही भूमी तू आपली रंगभूमी ठरविलीस.

परंतु, देवदेवा, प्रयोग बरा होऊ लागला. बीजाला अंकुर फुटू लागले. कालांतराने ह्या बीजाचा महान वैभवशाली वृक्ष होईल, अशी सुखस्वप्ने मी व माझे सहकारी मनामध्ये खेळवू लागलो. परंतु एकाएकी महान विघ्न येत आहे. ह्या देशात आर्य व नाग यांना एकत्र आणले. येथील नागजातीच्या मानवप्रवाहात जोरदार आर्यजातींचा प्रवाह वरून आणला. प्रथम विरोध झाला. हा प्रवाह त्याला लोटीत होता, तो त्याला प्रवाह प्रवाहात मिळेना. परंतु विरोधातही आशा दिसत होती. गढूळपणा खाली बसत होता. मोठमोठी माणसे भांडत होती, परंतु मिठ्याही मारीत होती. एकमेकांशी लढत होती, परंतु त्यातूनच प्रेमाची नातीही जडत होती. परंतु, देवा, आज सारी क्षुद्रांची सृष्टी दिसत आहे. महान विभूती अस्तास गेल्या. पामरांचा पसारा झाला. भव्य भावनांचा स्पर्श ज्यांच्या जीवनास होत नाही असे क्षुद्र जीव ह्या भारतात आज दिसत आहेत. ज्याप्रमाणे अनंत आकाशातील उंचावरची स्वच्छ व निर्मळ हवा क्षुद्र पाखरांना मानवत नाही, ती पाखरे घाणीने भरलेली, धुळीने धूसर झालेली खालची मलिन हवाच पसंत करतात, त्याप्रमाणे ह्या भारतातील मानवांना निःस्वार्थी व उच्च ध्येयवादाची हवा आज मानवेनाशी झाली आहे. ध्येयवादाची ते टर उडवीत आहेत. क्षुद्र भेदभावात मौज मानीत आहेत. आर्य व नागजातीचे तरुण ठायी ठायी एकमेकांचा समूळ उच्छेद करण्यासाठी संघटित होत आहेत. त्यांच्या त्यांच्या जातीतील ऋषीही आज द्वेषधर्माचे पुरस्कर्ते होत आहे. इतरांना पथदर्शन ज्यांनी करावे, ध्येयदर्शन ज्यांनी करावे, तेच रस्खलितमती व ध्येयच्युत झाले आहेत. देवा, पुढे काय होणार? हे द्वेषाचे वणवे एकदा पेटले म्हणजे काय होणार? आपली आशा नष्ट होणार, प्रयोग फसणार! दोन मानवप्रवाह एकत्र नांदवता न आले तर शेकडो प्रवाह पुढे कसे नांदवता येतील?

प्रभो, 'ह्या पवित्र प्रयोगाकडे लक्ष दे' म्हणून तू मला सांगितलेस. मी काळजीपूर्वक आरंभ केला आहे, परंतु मला धीर नाही निघत. मी तुला उठविले. क्षमा कर, देवा, परंतु पुढे कसे करू ते सांग."

प्रयोगपतीचे म्हणणे प्रभू शांतपणे ऐकून घेत होता. त्याने त्याला पोटाशी धरले. प्रसन्न दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या पाठीवरून व डोक्यावरून मंगल हात फिरविला. प्रभूचा स्पर्श होताच प्रयोगपतीचे नैराश्य जणू जातो. निरस्त झाले. सूर्य येताच धुके जाते, पाऊस पडताच रखरखीतपणा प्रभू म्हणाला, “वत्सा, भिऊ नको. तू प्रयोग सुरू ठेव. ज्या वेळेस प्रयोग फसणार फसणार असे वाटते त्याच वेळेस तो सफल होणार असे समजावे. अत्यंत उन्हाळा होऊ लागताच पावसाळा जवळ आला असे समजावे. अत्यंत हिवाळा होऊ लागला की, उन्हाळा जवळ आहे असे समजावे. अमावास्येचा काळाकुट्ट अंधार भरला म्हणजे विजेची चंद्रकोर लवकरच दिसणार असे समजावे. अत्यंत वेदना होऊ लागल्या की, मातेला नवीन सुंदर बाळ मिळणार असे समजावे. अत्यंत विरोधाच्या पोटातून विकास बाहेर पडत असतो.”

“खरेच, देवदेवा, लहान मुलांना नवीन चिमणे दात येत असतात त्या वेळेस त्याला ताप येतो, त्याला वांत्या होतात. अननुभवी माता घाबरते, परंतु घरातील अनुभवी वृद्ध आजीबाई सांगते, “घाबरू नकोस, सूनबाई, त्याला दात येत आहेत.' मुलाचा विकास व्हायचा असतो. त्या विकासाच्या आधी त्या वेदना होतात. काळेकभिन्न मेघ आले की त्यातूनच स्वच्छ अशा रजतधारा जगाला मिळणार यात संशय नाही. त्या काळेपणातून जगाला जीवन मिळते. "

“होय समजलास तू आता. तुला नाग व आर्य यांच्यात द्वेषाचे वणवे पेटणार असे दिसत आहे. परंतु हे द्वेष जातील. पोटातील विष बाहेर पडलेले बरे. होऊ दे एकदा द्वेषाची वांती ! परंतु ह्या द्वेषाच्या प्रदर्शनाबरोबर परस्पर प्रेमाचे संबंध उत्पन्न व्हावेत म्हणून बहुजनसमाजाला तहान लागली आहे. सामान्य आर्य जनता व सामान्य नाग जनता गुण्यागोविंदाने नांदत आहे. परंतु सामान्य जनता एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. सामान्य जनतेच्या या आशाआकांक्षातून महान तेज उत्पन्न होईल, महान शक्ती उत्पन्न होईल. द्वेषाची शक्ती फार नसते. अनंत अंधाराला एक प्रकाशकिरण येतो व मुकेपणाने दूर करतो. अनंत द्वेषाला निर्मळ प्रेमसूर्याचा एक प्रभावी किरण येईल व नष्ट करील. घाबरू नकोस तू. ज्या वेळेस अत्यंत निराशा वाटेल त्याच वेळेस श्रद्धेने आशा राख, आपल्या थोर हेतूंबद्दलची जी श्रद्धा, तिची अशा वेळेसच फार जरुरी असते. विरोधाच्या वेळी, तीव्र विरोधाच्या वेळीही जो आपल्या मंगलमय प्रयोगातच गढून राहतो व क्षण नि क्षण त्याला देतो, तोच खरा श्रद्धावान ध्येय जितके मोठे तितका पथ लांबचा व बिकट.

मी पुन्हा चिंतनात बुडी मारतो. प्रयोगाची ही पहिली अवस्था यशस्वी झाली की मला हाक मार. यश येईलच येईल. माझ्या दृष्टीला यश दिसत आहे. पहिलीच पायरी चढणे कठीण, पहिलेच पाऊल टाकणे कठीण! एकदा मूल दोन पावले चालू लागले की समजावे पुढे हे शकडो कोस सहज चालून जाईल! हिमालय चढून आकाशाला हात लावील! समजले ना? मारू चिंतनसिंधूत बुडी ? " प्रभूने प्रेमाने विचारले.

“मारा, देवा, चिंतनात रमून जा. मी करतो हा महान प्रयोग आता नाही एवढ्यातेवढ्याने घाबरणार. आर्य व नाग जात यांचा मधुर संगम झाला, यांचे मधुर मिलन झाले की उठवीन हळूच तुला. बीजाला फुटलेले पहिले सुंदर अंकुर, प्रयोगाला आलेले पहिले थोडे यश तुला दाखवून तुझे नवे आशीर्वाद घेऊन मग आणखी पुढे प्रयोग करू, एक दिवस असा मग येईल की, ह्या भव्य भारतभूमीत, सागराच्या सान्निध्यात, हिमालयाच्या छायेखाली, विविध प्रकारच्या वृक्ष-वनस्पतींच्या जवळ, स्वच्छ आकाशातील सुंदर प्रकाशात संस्कृतीतील मानव प्रेमाने एकत्र नांदत आहेत !” प्रयोगपती अमर आशेने म्हणाला.

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा