shabd-logo

नऊ

13 June 2023

1 पाहिले 1
वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.

कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” 
 “हा नागानंद या गावात आला म्हणून हे संकट आले.” एकजण म्हणाला.

"त्याचे वत्सलेवर प्रेम आहे, तिचे त्याच्यावर आहे. हे पाप देवाला बघवत नाही. म्हणून तो करतो आहे शिक्षा." दुसरा म्हणाला.

“हाकलून लावा दोघांना या गावातून." तिसरा म्हणाला.

"परंतु त्यांना हाकलू तर आपल्या मुलीही बंड करतील. मोठे कठीण झाले आहे काम ! " चौथा म्हणाला.

“ त्यांना कशाला हाकलता ? वाघ वाघीण मारा ना? देवाला का नावे, दुसऱ्याला का नावे? स्वतःच्या दुबळेपणाला नावे ठेवा." एक आर्यकन्या येऊन म्हणाली.

“ही त्या वत्सलेची मैत्रीण. मोठी धृष्ट आहे पोरगी.” एकजण म्हणाला.

“वत्सलेची मैत्रीण होणे काही पाप नाही. तिने काय केले वाईट? तिचे प्राण वाचवायला कोणी तरी झालात का पुढे?” ज्याने तिचे प्राण वाचवले त्याच्या चरणी तिने प्रेमपुष्प का वाहू नये?" तिने विचारले.

“तो तरुण एवढा आहे पुरुषार्थशाली, तर या वाघांचा उपद्रव का नाही दूर करीत ? खरे पौरुष स्वस्थ नसते बसले." दुसरा कोणी म्हणाला. “आज रात्री मारणार आहेत ते वाघ. केला आहे त्यांनी निश्चय " असे म्हणून ती निघून गेली.

“मेला तर परस्पर पीडा टळेल.” कार्तिकचे वडील तेथे येऊन म्हणाले.

“कोण मेला तर? वाघ की तो नाग?” एकाने विचारले. “दोघे मरोत.” आणखी कोणीतरी म्हटले.

वाघाने एक गाय मारून रानात टाकिली होती. तेथे रात्री वाघ येईल अशी नागानंदाला खात्री वाटत होती. त्याने वाघाला मारण्याचे निश्चित केले. तिसरे प्रहरी वत्सला शेतावर आली. नागानंद भाल्याचे पाते घाशीत होता. त्याला धार लावीत होता.

" तुम्ही का एकटे जाणार वाघाच्या शिकारीला ?” तिने विचारले.

"हो." त्याने उत्तर दिले.

"मी येऊ बरोबर?" तिने विचारले.

“नको." तो म्हणाला.

"का?" तिने कंपित स्वरात विचारले.

“दुसऱ्याच्या मदतीने, एका स्त्रीच्या साहाय्याने, मी वाघ मारला अशी माझी निंदा करतील. माझ्या यशाला कलंक नको, नागानंदाच्या नावाला काळिमा लागावा असे तुला वाटते?” त्याने प्रश्न केला.

“मी का दुसरी, मी का परकी?" तिने डोळ्यात पाणी आणून विचारले. “परंतु तू माझ्या हृदयात आहेस, माझ्या जीवनात आहेस, म्हणूनच

येऊ नकोस. तुझी शक्ती माझ्या हातात येऊन बसेल. आपण निराळी नाही, म्हणूनच येण्याची जरुरी नाही." तो म्हणाला.

"बरेवाईट झाले तर?" तिने विचारले.

“तू माझी आठवण नाही ठेवणार?" तो म्हणाला. ती अधिक काही बोलली नाही. ती निघाली. तो तिला थोडे पोचवायला गेला.

“जा तुम्ही माघारे. अंधार होईल तुम्हाला परत जायला.” ती म्हणाली.

“आज अंधार नाही. आज पौर्णिमा आहे." तो म्हणाला.

“मला सदैव अमावास्याच आहे." ती म्हणाली.

“ वत्सले, ही घे फुले. ही सायंकाळी फुलतात, कोमल व सुगंधी आहेत. ही फुले लवकर कोमेजत नाहीत. कोमेजली तरी वास त्यांचा जात नाही. त्यांच्या सुकलेल्या पाकळ्यांनाच अधिक वास येतो. जरा त्यांचेवर पाणी शिंपडावे की लगेच सर्वत्र पसरतो वास घे, घे ना." तो म्हणाला.

ती घेईना. हात पुढे करीना.

“तुझ्या चरणांवर ठेवू, तुझ्या मस्तकावर वाहू?" त्याने सद्गदित होऊन विचारले. तिने हात पुढे केला. त्याने तिच्या हाती ती फुले दिली. तिने ती हृदयाशी घरली.

“वास घेऊन बघ." तो म्हणाला.

“या फुलांचा केवळ नाकाने नसतो वास घ्यायचा. या फुलांचा रोमारोमाने वास घ्यायचा असतो." ती म्हणाली.

“जा आता." तो म्हणाला.

“जा तुम्ही.” ती म्हणाली.

“वत्सले, काय नेतेस बरोबर ?” त्याने दुरून विचारले.

“तुमचे अमर निर्मळ प्रेम, तुमची सुगंधी मूर्ती.” ती वळून म्हणाली.

“तुम्ही काय नेता बरोबर?" तिने दुरून विचारले. “ते मोठ्याने सांगू नये.”" तो दुरून म्हणाला.

रात्रीची वेळ झाली. दीड प्रहर रात्र होऊन गेली. चंद्र चांगलाच वर आला होता. पौर्णिमेचा चंद्र. दुधासारख्या प्रकाशात पृथ्वी न्हाऊन निघाली होती. नागानंद हातात भाला व तलवार घेऊन छपून बसला होता. ती पहा वाघाची भयंकर डुरकाळी ऐकू आली. गावातील गाईगुरे हंबरू लागली, थरथरू लागली, नागानंद सावध होऊन बसला.

शेपटी आपटीत आपटीत तो पाहा येत आहे वाघ! त्याचे ते पिवळे धमक सोन्यासारखे रसरशीत अंग व त्यावर ते पट्टे! तो पाहा त्याचा मृत्यूप्रमाणे जबडा! ते पाहा आगीसारखे डोळे! भेसूर सौंदर्य! ती त्याची तीक्ष्ण नखे ! हुंगीत हुंगीत येतो आहे. कसला घेत आहे वास? त्याला का माणसाचा वास आहे? छे: भ्रम झाला त्याला बहुधा. तो समोरच्या भक्ष्यावर तुटून पडला. मोहाला बळी पडला. समोरची मेजवानी पाहून भुलला व जवळ छपलेले मरण त्याला कळले नाही!

पंजांनी तो गाईला फाडफाडून खात होता. मध्येच डुरकाळी मारी. प्रेमळ काळी. तो का राणीला बोलवीत होता? वाघिणीला हाक मारीत होता ? खा, पोटभर मास, खा. हे काय? अस्वस्थ का झाला वाघ? काय बघतो आहे? काय हुंगतो आहे? सभोवती हिंडतो आहे. पुन्हा लागला ताव मारायला. खा, खा, , पोटभर मांस. पुढची चिंता पशूंनी करू नये!

तो पाहा लांब भाला जोराने घुसला त्याच्या अंगात! वाघाने उडी मारली. चवताळला तो ! खवळला तो ! प्रचंड गर्जना केली त्याने. त्या मृत गाईच्या देहातील अणुरेणूही त्या गर्जनेने जिवंत झाले असतील. त्या डुरकाळीने मढी खडबडून उठली असती, जिवंतांची मढी झाली असती. वाघाच्या अंगात तो भाला घुसला होता. त्या भाल्यासकट तो उसळला, नागानंदाच्या कीर्तीचा व पराक्रमाचा झेंडाच जणू वाघ नाचवीत होता, फडकवीत होता. वाघाने नागानंदावर झेप घेतली, परंतु ती त्याने चुकविली. त्याने तलवार मारली, परंतु ती त्या भाल्यावर आपटली, भाला तुटला, पुन्हा आला वाघ, बों, बों करून आला. नागानंदाने त्या वेळेस तलवारीचा असा वार केला की, वाघाचे मुंडके तुटले. वाघ मरून पडला. परंतु ही कोणाची आरोळी? अरे ही वाघीण आली! ती चवताळली. नागानंद उभा राहिला. पावित्र्यात उभा राहिला. ती रक्तरंजित तलवार त्याच्या हातात होती. वाघीण फार क्रूर दिसत होती. परंतु वाघिणीच्या पाठीत कोणी मारली तलवार? वाघीण मागे मुरडली. कोण होते तेथे ? नागानंद एकदम थांबला. त्याने वाघिणीवर वार केला. वाघिणीने कोणाला धरले होते? कोणाला मारला पंजा? पुन्हा ती वळली, पुन्हा नागानंदाचा वार ! पडली मरून. वाघ वाघीण तेथे मरून पडली. परंतु, नागानंदाच्या मदतीला कोण आले होते धावून! नागानंद व वत्सला एकमेकांस बिलगून बसली होती. ते दोन जीव समोर

मरून पडले होते. रानांतील राजाराणी तेथे मरून पडली होती. “तुला लागले का?" नागानंदाने हळूच विचारले. “हो.” ती म्हणाली.

“कोठे?” त्याने भीतीने व प्रेमाने पाहून विचारले.

“येथे.” ती नागानंदाच्या छातीवर हात ठेवून म्हणाली. नागानंदाच्या छातीतून रक्त येत होते. पंजा तेथे लागला होता. त्याची तंगडीही रक्तबंबाळ झाली होती. वत्सलेने पदर फाडला व नागानंदाच्या घावावर तिने पट्टी बांधली. छातीवर हात धरून ठेवला.

“ असा हात किती वेळ धरणार? थांब, येथे मी पाला बघतो. रक्त

थांबवणारा पाला. तो त्यावर बांधतो." तो म्हणाला. त्याने ती वनस्पती शोधली. चांदण्यात त्याला सापडली. पाला काढून तो चोळून छातीवर बांधण्यात आला. रक्त जरा थांबले.

“ वत्सले, तुला नाही ना लागले?” त्याने पुन्हा विचारले.

“नाही. तेवढे माझे भाग्य नाही. तुम्हाला मदत करताना आज वाघाने

मला मारावे असे मनात येत होते. तुमचे प्राण वाचवण्यात मला मरण मिळाले

असते तर मी कृतार्थं झाले असते.” ती म्हणाली.

“मग वाघिणीच्या पुढे का नाही उभी राहिलीस? तू तिच्यावर वार का केलास? तुलाही जगायची इच्छा आहे. नाही म्हणू नकोस. सांग, जगायची इच्छा आहे की नाही?” त्याने विचारले.

"जर तुम्ही जवळ असाल तर !” ती म्हणाली.

" वत्सले, तू आपले प्राण संकटात का घातलेस?” त्याने विचारले.

“ तुम्ही मागे माझ्यासाठी का घातले होतेत?" तिने विचारले.

“तू उपकार फेडायला आली होतीस. होय ना? शेवटी मी परकाच आहे. माझे देणे देण्यासाठी आलीस. मी माझे प्राण तुझ्यासाठी पाण्यात फेकले. ते ऋण परत करण्यासाठी आलीस! देणेघेणे हेच ना तुझे माझे नाते ? अरेरे.” तो खिन्नतेने म्हणाला.

“नागानंद, खिन्न नका होऊ. मी प्रत्युपकारासाठी नाही आले बरे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी प्रेमामुळे आले. तुमचे शरीर आता तुमचे नाही. ते माझे आहे. ते माझे नसते तर त्या दिवशी ते वाचले नसते. हे माझे शरीरच वाचवण्यासाठी मी आले. नागानंद, आपण दोघे का वाचलो ? खरोखर का वाचलो? का त्या प्रक्षुब्ध प्रवाहात आपली जीवने एकत्र आली? पाण्यात दोन काष्ठे एकत्र येतात व पुन्हा हेलकाव्याबरोबर दूर जातात. परंतु आपण का यासाठी एकत्र आलो? पुन्हा दूर होण्यासाठी एकत्र आलो? नाही. नाही.. आपण एकमेकांची आहोत. तुम्ही माझे व मी तुमची. आपली कोणीही ताटातूट करू शकणार नाही. वाघ येवो की मृत्यू येवो.” असे म्हणून तिने नागानंदाच्या गळ्याला मिठी मारली. त्याने तिला हृदयाशी धरून ठेवले.

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा