shabd-logo

दहा

13 June 2023

0 पाहिले 0
त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.

“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का नाही जेवायला येत? तुम्ही जेवायला आलात तर तीही पोटभर जेवेल. वत्सला हसते, आनंदी दिसते. परंतु कसली तरी चिंता तिला आहे. कीड कळीला आतून खात आहे. तुम्ही का नाही करीत दया?” सुश्रुतेने विचारले.

"मी का येथे येऊन राहू. येथे जेवायला येऊ?” नको, आजी, नको. मला मिंधेपणा नको. स्वावलंबन बरे. तुमची सहानुभूती आहे तेवढी पुरे. मला ना आई ना बाप. मी तुमच्याकडे एखादे वेळेस असा का येतो, माहीत आहे? आईची होणारी आठवण विसरण्यासाठी. कोणाशी मनातले सांगावे, बोलावे?" तो म्हणाला.

“नागानंद, तुमचे वडील काय करीत, कोठे राहत! " तिने प्रश्न केला..

“मला माहीत नाही. माझे वडील मी पाहिले नाहीत. पाहिले असले तरी आठवत नाही. कोणातरी आर्याने माझ्या आईची फसवणूक केली होती. त्याचे नाव तिने आम्हाला सांगितले नाही. ती म्हणे, 'त्याचे नाव जगाला सांगेन तर जग ते अनादरील. ते माझ्या मनातच राहू दे." माझी आई त्यांची मानसपूजा करी. जेवायला बसली तर शेजारी एक पान मांडी. त्या पानाचा नैवेद्य दाखवी. मी आईला विचारी, 'हे कोणाचे पान?' ती म्हणे, 'तुझ्या पित्याचे, तुझ्या जन्मदात्याचे.' शेवटी ती त्या पानातील एक घास खाई व मग ऊठे. एखादे वेळेस आई डोळे मिटून बसे. मी म्हणे, 'आई, डोळे मिटून कोणाला बघतेस?' ती म्हणे, 'माझ्या हृदयातील देवाला, तुझ्या जन्मदात्याला.' अशी माझी आई होती. अशी ती सती होती. तुच्छ मानल्या जाणाऱ्या नागांत अशा देवता जन्मतात. अहंकारी आर्यांना ते दिसत नाही. माझी आई! ती पावित्र्याची, प्रेमाची मूर्ती होती." नागानंद म्हणाला.

“तुम्हाला भावंडे नाहीत?” तिने विचारले. “आम्ही जुळी होतो. बहीण व भाऊ. माझी बीण गोरी गोरी पान होती. मी काळासावळा. परंतु माझ्या बहिणीचीही मला आठवण नाही. ती देवाकडे लहानपणी गेली. नागलोकी गेली. परंतु आई सांगत असे सारे. ती मला म्हणायची, 'तुझा रंग माझ्यासारखा आहे. परंतु तिचा त्यांच्यासारखा होता. " आम्ही दोनतीन वर्षांची झालो होतो. एके दिवशी आम्हा दोघांना निजवून आई कामाला गेली होती. तो इकडे आग लागली. आमची वसाहत भस्म झाली. आर्यांनीच लाविली ती आग. गावची मंडळी शेतात होती. ती धावत आली. माझी आई धाय मोकलून रडू लागली. आमचे घर पेटले होते. आम्ही आत जळून मरणार या कल्पनेनेच ती मूर्च्छित झाली. परंतु एका उदार आर्याने आगीत शिरून आम्हाला वाचविले. तोही बराच भाजला. तो घरी गेला. त्याचे पुढे काही कळले नाही. आई आम्हा दोघा लेकरांना घेऊन दुसरीकडे गेली. पुढे धाकटी बहीण मेली. मग आईला माझाच आधार. परंतु एका मातेचा निरोप घेऊन जात असता वीज अंगावर पडून ती मला सोडून गेली. ती कहाणी मी मागे सांगितली होती. " नागानंद म्हणाला.

“नागानंद!” सुश्रुतेने भावपूर्ण शब्दाने हाक मारली. "काय, आजी?” त्याने विचारले.

“अरे, माझा मुलगा, या वत्सलेचा पिता, तो तर मग तुम्हालाच वाचवण्याच्या कामात मेला. अंग भाजून तो घरी आला. नाही झाला बरा. तो मेला. त्याच्याबरोबर वत्सलेची आई सती गेली. तेव्हा वत्सला वर्षाचीही नव्हती. ती पोरकी झाली. तो आजारीपणात म्हणत असे, 'कशी होती अवळी जावळी मुले. एक गोरे, एक काळेसावळे, जणू दिवस व रात्रच जन्माला आली.' नागानंद! आणि वाचलेले तुम्ही वत्सलेला वाचवायला आलात! योगायोगाच्या गोष्टी. त्याने रत्नाकराने तुला आगीतून वाचवले. तू वत्सलेला पाण्यातून वाचवलेस. नागानंद, रडू नको. झाले गेले. नको रडू बाळ. ” सुश्रुता त्याला जवळ घेऊन म्हणाली.

“आजी, आम्ही अभागी. मी अभागी. मी वत्सलेला पोरके केले. मला वाचवण्यासाठी तिचे वडील न येते तर ते राहते. मग वत्सलेची आईही राहती. अरेरे, माझ्यामुळे हे सारे! माझ्यामुळे हे सारे! दुर्दैवी, कपाळकरंटा मी.” असे म्हणून तो डोक्यावर धडाधड हात मारून घेऊ लागला. सुश्रुतेने त्याला शांत केले. मुलासारखा तेथे तो बसला. सुश्रुतेच्या मांडीवर तो झोपला.

वत्सला गात गात बाहेरून आली. वनदेवतेप्रमाणे नटून आली. केसांत फुले घालून आली. कानात फुले घालून आली. गळ्यात फुलांच्या माळा घालून आली. नाना रंगांची वनफुले. नाना गंधांची वनफुले. वत्सला आली तो तिला शांत व गंभीर असे दृश्य दिसले.

“ वत्सले, गडगडब नको करू." आजी म्हणाली.

“यांना पाहायला यांच्या झोपडीत गेलो आम्ही. तो तेथे कोणी नाही. यांची बासरी आम्ही वाजविली. परंतु नीट वाजवता कोणालाच येईना. केव्हा आले हे? झोपलेतसे, आजी? यांना का बरे नाही वाटत? ही बघ यांच्या पायावरची ती जखमेची खूण. माझ्या पदराची पट्टी बांधली होती तेथे. का गं हे निजलेत? उठवते मी त्यांना गुदगुल्या करू? कानात फुलाचा देठ घालू ?" वत्सला हळूहळू आजीचा हात ओढीत विचारीत होती.

“वत्सले, आज एक महत्त्वाची गोष्ट कळली. सहज त्यांच्या बोलण्यातून प्रकट झाली. तुझ्या पित्याने जळणाऱ्या घरातून जी दोन मुले काढली त्यातील एक हे नागानंद! ते तुझे वडील असे कळल्यामुळे यांना दुःख झाले. माझ्यामुळे वत्सलेचे आईबाप गेले असे कळून नागानंद रडू लागले. डोके फोडून घेऊ लागले. मी त्यांना शांत केले. आता निजले आहेत मुलासारखे.” आजीने सांगितले.

“माझ्या बाबांनी यांना वाचविले. यांनी मला ! काय आहे योगायोग? आजी, काय आहे हे सारे?" तिने आजीला विचारले.

वत्सला आनंदून आली होती. परंतु गंभीर झली. ती तेथे बसली. तीही निजली. दमून आली होती. आजीच्या दुसऱ्या मांडीवर ती निजली. सुश्रुता त्यांच्याकडे पाहत होती. दोघांच्या डोक्यावरून तिने हात फिरवले. झोपेत नागानंदाचा एक हात वत्सलेच्या हाताजवळ आला. ते दोन्ही हात मिळाले. एकत्र मिळाले.

नागानंद जागा झाला. कोणाचा हात होता त्याच्या हातात? त्याने पाहिले. तो तो गोरा हात. त्याने आपला हात दूर घेतला. तो वत्सला जागी झाली. तिने त्याच्याकडे पाहिले.

“घ्या हो दोघे हातात हात! मी तुमचे हात एकमेकांच्या हातात देते. करा पाणिग्रहण. आजीच्या मांडीवर बसून पाणिग्रहण. तुम्ही परस्परांसाठी जन्मलेली आहात. तुम्ही एकमेकांपासून दूर राहू शकणार नाही. जवळ याल तर सुखाने नांदाल. वत्सले, बस. तुझ्या गळ्यातील ह्या माळांपैकी एक नागानंदाच्या हातात दे व एक तू आपल्या हातात घे. घाला परस्परांस खरेच खाली काय पाहता? मी सांगते. " आजी प्रेमाने म्हणाली.

वत्सलेने गळ्यातील एक माळ काढली व नागानंदाच्या हाती दिली. तिने एक माळ आपल्या हाती घेतली. उभयतांनी एकमेकांस घातल्या माळा. दोघे सुश्रुता आजीच्या पाया पडली. वृद्धेचे डोळे भरून आले. शतस्मृतींनी भरून आले. तिने त्यांना शुभ आशीर्वाद दिले! वत्सला व नागानंद यांचा विवाह झाला.

21
Articles
आस्तिक
0.0
राजा परीक्षित (अभिमन्यूचा मुलगा आणि अर्जुनचा नातू) याने ध्यानस्थ ऋषींना मेलेल्या सापाने हार कसा घातला याची पौराणिक कथा सर्वांनाच ठाऊक आहे. साप तक्षक (तक्षक) चावल्याने त्याचा मृत्यू कसा झाला? सर्व सावधगिरी असूनही, शाप कसा खरा ठरला. परीक्षितच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय (जनमेजय) याने सर्पसत्र (सर्पसत्र) नावाच्या विश्वातील सर्व नागांना (नाग) जाळण्यासाठी आग लावली. देवांचा राजा इंद्र याने तक्षकाला संरक्षणाचे वचन कसे दिले आणि आस्तिक ऋषींनी जनमेजयमध्ये कसे अर्थपूर्ण बोलून वेडेपणा थांबवला. साने गुरुजींनी ही कथा यथार्थपणे सांगितली आहे. ते खरोखरच घडले असावे अशा पद्धतीने तो कथन करतो. लेखकाने याला समाजवादी दृष्टीकोन देऊन समाजाच्या भल्यासाठी उपदेश केला आहे. कथा कशी घडते? वत्सला आणि नागानंदची पात्रे काय योगदान देतात? महाभारतासारखे दुसरे युद्ध आता संपणार आहे का? आस्तिक ऋषी (आस्तिक) काय उपदेश करतात? तो खरच वेडेपणा कायमचा थांबवू शकतो का? या कथेत साप नाहीत. नागा (नाग) ही आदिवासींची जात आहे. नागा आणि आर्य (आर्य) यांच्यात सामाजिक विभागणी आहे. त्यांच्यातील विवाह असामान्य नाहीत परंतु त्यांना प्रोत्साहनही दिले जात नाही. सर्पसत्र हे खरे तर आर्यांकडून नागांचे वांशिक शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न आहे. कथा छान सांगितली आहे. समाजवादी दृष्टीकोन कथेला एक वेगळा कोन देतो आणि वाचकांना वाटते की असे खरोखरच घडले असावे. ही कथा वास्तववादाशी खरी आहे कारण येथे चर्चा केलेल्या समस्या आजच्या जगात जवळजवळ सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेसह अस्तित्वात आहेत. या पुस्तकात वापरलेली मराठी भाषा अतिशय बोलकी आणि जड आहे. काही प्रासंगिक वाचकांना यामुळे स्वारस्य राहणार नाही. साने गुरुजींनी कथेला संदेश देण्यापेक्षा कथेतून समाजवादाचा संदेश देणे पसंत केले आहे. पुस्तकात भरपूर तात्विक प्रवचने आहेत. कथा आणखी रंजक बनवण्यासाठी लेखकाची कल्पनाशक्ती मोकळी करून देणे शक्य होते, परंतु लेखकाने संदेशाप्रत खरे राहून तसे करणे टाळले आहे. ती कादंबरी म्हणून वाचू नका, कथेतून समाज सुधारण्याचा प्रयत्न म्हणून वाचा. बदलासाठी ते वाचा.
1

एक

12 June 2023
1
0
0

परमेश्वर अनंत चिंतनात तन्मय झाला होता. विश्वाच्या विकासाचा तो विचार करीत होता. एकाएकी त्याला प्रयोगपतीने जागे केले: “भगवन देवदेव, मला भीती वाटते. प्रयोगाचा आरंभ झाला नाही तोच तो फसणार असे वाटते. प्रथम

2

दोन

12 June 2023
0
0
0

वृद्ध सुश्रुता एकटीच घरात बसली होती. ती सचिंत होती. तिच्या मुद्रेवर अपंरपार मानसिक यातना भोगल्याची चिन्हे दिसत होती. मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा तेथे उमटले

3

तीन

12 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती चित्रशाळेत बसला होता. फार सुंदर होती ती चित्रशाळा. ती त्याने स्वतः तयार करविली होती. वेचक प्रसंगांची चित्रे त्याने नामांकित चित्रकारांकडून तेथे काढवून घेतली होती. कौरव-पांडवांची सैन्ये

4

चार

12 June 2023
0
0
0

“वत्सले, ऊठ. आज नदीवर स्नानाला येणार आहेस ना? ऊठ, बाळ. दिवस कितीतरी वर आला. गाई केव्हाच रानात गेल्या. पाखरे केव्हाच हिंडू- फिरू लागली. पहाटेची दळणे केव्हाच थांबली. सडासंमार्जने होऊन गेली. ऊठ, बाळ, उठत

5

पाच

12 June 2023
0
0
0

महर्षी आस्तिक महान वटवृक्षाखाली शिलाखंडावर बसले होते. तो वटवृक्षही जणू पुरातन तपोधनाप्रमाणे दिसत होता. त्याच्या पारंब्या सर्वत्र लोंबत होत्या. कोठे कोठे त्या जमिनीत शिरून त्यांचे पुन्हा वृक्ष बनत होते

6

सहा

12 June 2023
0
0
0

“आजी, नागानंद केव्हा गं येतील ? येतील का ते परत? का ते वाऱ्याप्रमाणे फिरतच राहतील? कशाला पाण्यातून त्यांनी मला काढले? आज माशाप्रमाणे मी तडफडत आहे. खरेच का नाग दुष्ट असतात? त्यांना दयामाया नसते? परंतु

7

सात

12 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात आज गडबड होती. सर्व आश्रम श्रृंगारला होता. लतापल्लव व फुले यांची सुंदर तोरणे बांधली होती. फुलांच्या माळा जिकडे तिकडे बांधल्या होत्या. सुंदर ध्वज उभारले होते. पाण्याचा सर्वत्र सडा घ

8

आठ

13 June 2023
0
0
0

नागानंद वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने तेथे जणू वनसृष्टी निर्मिली होती. एक सुंदर विहीर त्याने खणली. तिला पाणीही भरपूर लागले. विहिरीवर पायरहाट बसविला. शेतात साधी पण मनोहर अशी झोपडी त्याने बांधली

9

नऊ

13 June 2023
0
0
0

वत्सलेच्या गावाला एका वाघाचा फार त्रास होऊ लागला होता.कोणी म्हणत, 'वाघ व वाघीण दोघे आहेत.' गाई मरू लागल्या. कोण मारणार त्या वाघाला, कोण मारणार त्या वाघिणीला ?” “हा नागानंद या गावात आला म्हण

10

दहा

13 June 2023
0
0
0

त्या दिवशी वत्सला मैत्रिणीबरोबर वनविहाराला गेली होती. सुश्रुता आजी घरी एकटीच बसली होती. थोड्या वेळाने नागानंद आला. दोघे बोलत बसली.“नागानंद, तुम्ही रानात राहता, हाताने स्वयंपाक करता. तुम्ही येथेच का ना

11

अकरा

13 June 2023
0
0
0

राजा परीक्षिती कधी कधी फार उच्च विचारात रमे तर कधी फारच खाली येई. त्याच्या जीवनात चंचलता होती. तो आज काय करील, उद्या काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळा स्वतःचा निर्णय त्याला कधी घेता येत नसे. अशा माणस

12

बारा

13 June 2023
0
0
0

“वत्सले, तू नागाजवळ विवाह करण्याची प्रतिज्ञा केली होतीस. परंतुशेवटी नागाला साडून आर्यालाच माळ घातलीस.” कार्तिकी म्हणाला. “नागानंद नागजातीचेच आहेत. ते स्वतःला नागच म्हणवितात. कोणी सांगितले तुला की ते आ

13

तेरा

15 June 2023
0
0
0

आस्तिक आश्रमात होते. सर्व मुले एका यात्रेला गेली होती. नागदेवीची यात्रा. ती यात्रा फार मोठी भरत असे. एक नागजातीचा शेतकरी होता. एकदा तो खनित्राने खणीत होता. तेथे एका नागिणीची पिले होती. त्यांच्यावर पडल

14

चौदा

15 June 2023
0
0
0

जनमेजय साम्राज्याचा अधिपती झाला होता. त्याचे राज्य दूरवर पसरलेले होते. ठिकठिकाणचे लहानलहान राजे त्याला कारभार पाठवीत असत. लहानपणापासून जनमेजयाच्या मनात नागांचा द्वेष होता. वक्रतुंडाने तो वाढीस लावला ह

15

पंधरा

15 June 2023
0
0
0

कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्याने आपले घर सोडले होते. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजीस तो फुलेफळे, भाजीपाला, दूध सारे नेऊन देई. तो काम करताना म्हणे, “देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको यु

16

सोळा

15 June 2023
0
0
0

वत्सला स्त्रियांचे शांतिपथक घेऊन निघाली. गावोगाव प्रचार होऊ लागला. शांतीचे व प्रेमधर्माचे उपनिषद गात त्या जात होत्या. स्त्रियांची शक्ती अपूर्व आहे. तिला एकदा जागृत केले की महान कार्ये होतील. स्त्रियां

17

सतरा

20 June 2023
0
0
0

आस्तिकांच्या आश्रमात बाळ शशांक आजारी होता. तापाने फणफणत होता. आस्तिक त्याच्या अंथरुणाशी बसलेले होते. नागानंद व वत्सला शांतिधर्माचा प्रचार करीत होती. त्यांना निरोप पाठविण्यात आला होता, परंतु तो केव्हा

18

अठरा

20 June 2023
0
0
0

नागानंद व वत्सला यांच्या पाळतीवरच वक्रतुंड होता. आस्तिकांच्या आश्रमात दोघे गेली आहे. हे त्याला कळले होते. ससैन्य दबा धरून तो वाटेत बसला होता. त्याने एकदम दोघांना पकडले. त्यांना बांधण्यात आले. वक्रतुंड

19

एकोणीस

20 June 2023
0
0
0

आश्रमातील महत्त्वाची अशी ती बैठक होती. वातावरण गंभीर होते. अनेक ऋषिमुनी आले होते. सर्व विद्यार्थी अर्धवर्तुळाकार बसले होते. आश्रमांतील माजी विद्यार्थीही आले होते. त्यागी तरुणांचा एक अदम्य असा मेळावा त

20

वीस

20 June 2023
0
0
0

“जनमेजय रागाने जळफळत होता. त्याची सर्वत्र छीथू होत होती. तो दातओठ खात होता. त्याने आज पुन्हा सारे कैदी बाहेर काढले. दोरीने बांधून उभे केले. पती जवळ पत्न्या उभ्या करणाऱ्या आल्या. कोणाच्याजवळ मुलेही होत

21

एकवीस

20 June 2023
0
0
0

प्रयोगपती अत्यंत आनंदला होता. झाड जो लावतो, त्यालाच ते जगण्याचा आनंद, इतरांना त्याच्या आनंदाची काय कल्पना? आर्य व नाग यांच्या ऐक्याचा प्रयोग कितपत यशस्वी होतो ही चिंता होती. नाव तीरास लागणार की तुफान

---

एक पुस्तक वाचा