shabd-logo

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023

19 पाहिले 19

प्रकरण १

३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,

चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पनाही नाही करता येणार एवढा मोठ्ठा प्रचंड गदारोळ त्या चौकात झाला असता.

*३५७... ३५६.....३५५..... ३५४..... ३५३..... 'इतके केविलवाणे आकडे बघून गाड्याही जांभया देत बसल्या होत्या एव्हाना गारेगार झालेल्या अलिशान फोर्डमध्ये ड्रायव्हर निवांतपणे पेपर वाचत बसला होता. फटफटी, होंडा, करिझ्मा, पल्सर, दुरदुरी.... पिरपिरी...... किरकिरी..... सगळ्या सगळ्या गाड्या चक्क स्टैंड लावून रस्त्यावर दिवस कंठत बसल्या होत्या..

३४३......३४२......३४१...... ३४०.....३३९..... एरवी सिग्नलच काय पण सिग्रलचा खांबही तोडून जाण्यात सरावलेल्या या गाड्या आज मात्र पेट्रोल गिळूनही गप्प बसल्या होत्या. खरंतर रस्त्यावर म्हणावी तितकी गर्दी नव्हतीच मुळी, पण तरीही स्वतः घामाने आंघोळ करीत आपल्या लाडक्या गाड्यांना भाजक्या उन्हात कडकडीत वाळवण्यापलीकडे एकाही वाहनचालकाला पर्याय नव्हता.

३३५....३३४......३३१.......' इतक्या रटाळ रस्त्यावर बहुदा सिग्रलच काय तो तेवढा अँक्टिव्ह उरला होता.पण अस नेमक काय झाल होत बरं?

एक रस्ता कात्रजकडे घेऊन जाणारा तो चौक होता. चौकातल्या तिन्ही रस्त्यांवर वाहन खोळंबली होती. कारण सफेद कपडे घातलेल्या एका प्रचंड मोठ्या जमावाचा कसलासा मूक मोर्चा ऐन चौकात येऊन थडकला होता. अत्यंत शांतपणे आणि धीमी पावले टाकत मोर्चा मंद गतीने पुढे सरकत होता. ना कसल्या घोषणा ना निषेध! त्यामुळे बघ्यांच्या नजरांना किंचीतही विरंगुळा उरला नव्हता उलट सारा वाहता चौकच पेंगुळला होता.

समोरच्या बाजूच्या वाहनांच्या थोड्याफार चुळबुळीमुळे अताशा वन-वे चा टू-वे होऊ पहात होता. पण छे! एका आडदांड ट्रैफिक पोलीसाने चांगला सज्जड दम भरून त्यातली हवाच काढून घेतली. झाल, मूक मोर्चामुळे आख्खा चौक दुखवटा पाळत तळमळत होता.

'३१०.....३०९. ३०८....३०७ ३०६.....

ढेपाळलेल्या गाडयांना धक्काबुक्की करीत एक देखणी गाडी भर चौकात अगदी पुढे येऊन दाखल झाली. तशा त्रासलेल्या वाहनचालकाच्या भुवया किंचितशा ताणल्या गेल्या होतीच तशी ती गाडी !

"We don't

Drive fasssst..

We Fly slow!

गारद वाचणारा सपशेल गारद मडगार्डवरच्या दोनच ओळीत अशी काही खणखणीत धमकी होती ना, की वाचणारा दोन चौक मागेच उडून पडेल. म्हणजे तोंडही न उघडता एकदम्म.... च्यामारी! फटक्क च्यायला भेंडी!" त्या देखण्या बाईकहूनही देखणी दिसणारी तिची मालकीण दिमाखातच तणतणली.

"वैजू, सांगत होते ना मी तुला, की नको एवढी घाई करूस म्हणून बघ, काय फायदा झाला का त्याचा?" तिच्या मागे बसलेली एक नाजूक पोरगी आपल्या मैत्रिणीला समजावत म्हणाली.
"मयू, खाली उतर गाडी चालवणाऱ्या वैजून मयूला फर्मावल

"अगं, पण का?" बहुदा मयूला वैजूचा पूर्ण अंदाज आला होता. आणि म्हणूनच ती गोंधळली, पण बिचारी खाली मात्र उतरली. त्यासरशी वैजूने गाडी स्टँडला लावली आणि मयूला सांगितलं.

"जरा घट्ट घर गाडी." आणि पुढल्याच क्षणी ती बिलंदर वैजू त्या देखण्या बाईकवर चढून उभीदेखील राहिली...

ऐवढया वेळ ढेपाळलेला आख्खा चौक माना वळवून वळवून टू-व्हिलरवर ऐटीत उभ्या राहिलेल्या वैजूकडे बघतच बसला. फक्त एक स्टैडवर लावलेल्या एन्टायसरवर उभं राहिलेल ते बिलंदर ध्यान मान उंच करून, टाचा उचलून आणि एक हात कमरेवर ठेवून, संथपणे चाललेला तो मोर्चा नक्की किती दूरपर्यंत आहे याचाच ती अंदाज लावत होती. पण छे! कितीही दूरदूरवर पाहिलं तरी लांबच लांब पसरलेल्या त्या जमावाचा शेवट काही नजरेत मावेना. शेवटी मनाशी काहीतरी ठरवून बैजूने हातातली चावी गरगर फिरविली.

"मयू, यांचा मोर्चा पुढे जायची वाट बघत बसण्यापेक्षा सरळ आमरण उपोषणाला बसाव "

"म्हणजे?.. वैजू, तू आधी खाली उत्तर नंतर बघू उपोषणाचं." एक उडी डिव्हायडरवर मारून केली वैजू खाली उतरली आणि चटकन् तिने गाडी चालुकेली. तिच्यामागे गाडीवर बसत मयूने विचारल,

"वैजू, मग करायचं काय आता?"

"इथे दिवसभर बसून रहाण्यापेक्षा फक्त दोन मिनीट मला घट्ट धरून बस " वैजूने गियर टाकला आणि काही समजायच्या आतच गाडी जोरात पिटाळली.

"वैजू, वैजू, अगं काय करतेस?" चौकातले तीन-तीन ट्रैफिक पोलीस, रस्ताभर पसरलेल्या गाड्या आणि मघापासून वैजूवरच रोखलेल्या त्या

सगळ्यांच्या नजरा.....

परिस्थिती लक्षात घेऊन मयू वैजूला रोखण्याच्या प्रयत्नात जवळपास किंचाळलीच.

पण वैजूने मात्र आपल्या खट्याळ नजरेने सारा वैतागलेला चौक फक्त एकवार न्याहाळला. सोयीस्कररित्या सगळ्यांकडे कानाडोळा करीत आपली एन्टायसर बाईक त्या वन-वे च्या डाव्या कोपऱ्यापर्यंत उधळली आणि मागे बसलेल्या मयूला जोरात ओरडून सांगितलं,

"मयू, आरडाओरडा करू नकोस, गप्प डोळे मीट आणि मला घट्ट धरून बस "

काय होतय ते समजायच्या आतच मयूच्या डोळ्यांसमोर अंधार गुप्य! त्यांचं धाडस पाहून रस्त्यावरचा प्रत्येक गाडीवाला अवाक ट्रैफिक पोलीसांच्या डोक्यात तर मुग्याच आल्या. एवढंच काय, मूक मोर्चातही कुजबूज वाढली. अस केल तरी काय त्या जोडगोळीन?

पादचारी भूयारी मार्ग गाडीवर चढून मोर्चाचा अंदाज घेताना बैजूने भूयारी मार्गाचा फलक वाचला. डाव्या बाजूच्या वन-वे पासून पलीकडे उजव्या बाजूच्या रस्त्यावर मोर्चा पार करून तो भूयारी रस्ता उघडत होता. दिवसभर रस्त्यावर तात्कळत बसण्यापेक्षा थोडी रिस्क घेतली तर कुठे बिघडलं? आणि म्हणूनच वैजूच्या सुपीक डोक्याने विचार पक्का करून थेट भूयारी मार्गात सूर मारला होता.

१९२.....१९१.....१९०.....१८९.....१८८.....

"पॉम्म्म्म Ssss पॉम्म्म्मssss" वैजूने हेडलाईट लावून हॉर्न वाजवत गाडी जपून चालवण्यास सुरुवात केली. "जरा हळू वाजव ना हानं इथे आवाज घुम्न कानठळ्या बसताहेत. घाबरलेल्या मयुने आत्ताशी डोळे किलकिले केले. "बाजूला हो ग." भूयारी मार्गात कोणीतरी किंचाळतच वैजूच्या मार्गातून आपला जीव वाचवत पळाले.

"आता गं बया, आता हिथं बी फटफटी!" अंधारातच एक उद्गार

वैजू तोल सांभाळत गुळगुळीत पायऱ्यांवरून गाडीची कसरत करत होती..

"वैजू, जरा हळू हाक ना या पायऱ्यांमुळे पाठीचे मणके मोडायची वेळ आलीये " धक्क्यांनी मेटाकुटीला आली होती बिचारी मयू "अजून हळू चालवली ना तर बंद पडेल ती इथेच आणि एकदा बंद पडली ना तर आपल्या दोघींना डोक्यावर उचलूनच बाहेर आणाव लागेल तिला."वैजूला त्या काळोखातही विनोद सुचत होते.

"मयू, एकदम्म घट्ट घर, आता मी एकदम्म ताणून घेणारे" समोरचा अंधुकसा उजेड आणि भूयारी मार्गाचा अखेरचा चढ लक्षात घेऊन वैथूनेकमालीचा वेग वाढवला. पायऱ्यांच्या चढाने कशीबशी गाडी चढून वर आली चढून कसली उडूनच रस्त्यावर आली म्हणा ना.

१६६....१६५....२६४....२६३....१६२....

कोण बघणार त्या सिग्नलकडे रस्त्यावरची एकूण एक नजर त्या काट्यावरच फिदा होती. मध्ये मूक मोर्चा असला तरी लोक माना उंचावून, टाचा उचलून तर कोणी डिव्हायडरवर चढून चढून त्या जोडगोळीलाच आश्चर्याने बघत होते.

"We don't

Drive asssst.

We Fly slow!"

कोणी हेवा करीत तर कोणी आश्चर्याने आणि खरंतर कौतुकानेच जो तो ते वाक्य वाचत राहिला, जणु मागे वळून बघणं वैजूला ठाऊकच नव्हतं, पण मधूने मात्र अत्यानंदाने आपले दोन्ही हात हवेत उंचावून सगळ्या बघ्यांच्या नजरांना खिळवून तेवढे ठेवले,

१५२....१५१......१५०.....१४९.....

बापडया सिग्नलकडे बघण्याने भान कोणाला उरले ?




Prajkta Gavhane ची आणखी पुस्तके

1

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023
3
0
0

प्रकरण १३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पना

2

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023
1
0
0

प्रकरण २'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली त

3

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ३

8 June 2023
0
0
0

अताशा उन्हाचा कडाका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने मोबाईलवर बोलत जावे तसे आपल्याच धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास केलेल्या या जोडग

4

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 4

8 June 2023
0
0
0

"गाडी नाही काढू देत म्हणजे काय ? पर्किंगसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत का ?" मयू हॉटेलच्या वॉचमनला विचारत होती..."देखो मैडम, मैं कुछ नहीं बता सकता! लेकीन मेमसाहब ने इस गाड़ी को बाहर भेजना म

5

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023
0
0
0

प्रकरण ५गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शू

6

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 6

13 June 2023
0
0
0

प्रकरण ६नानघरच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना

7

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 7

13 June 2023
0
0
0

प्रकरण ७पहाटे मयूला जाग आली तीच पायाशी काहीतरी थरथरल्याने अंग मुडपून रडत रडत डोळा लागलेल्या तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे काळोख होता. फक्त पहाऱ्यासाठीच्या दोन महिला पोलीस शिपाई जवळपास दिसत होत

8

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023
0
0
0

प्रकरण ८सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्

9

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ९

14 June 2023
0
0
0

प्रकरण ९सकाळी सकाळी मयूरीची आत्त्या वकीलाला सोबत घेऊन फैजलपूर पोलीस स्टेशनवर हजर इन्स्पेक्टर चारूशीला मोरे अजून ड्युटीवर आल्या नव्हत्या. जाधवबाईंनी आत्त्यांना सुचवलं आणि ASI चित्राच्या परवानगीने त्यां

10

एकदम्म बिन्धास्त प्रकरण १०

14 June 2023
0
0
0

प्रकरण १०.घड्याळात सकाळचे आठ वाजले होते. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आपल्या ड्युटीवर रुजू झाल्या. आपल्या खुर्चीवर बसत त्यांनी डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर काढून ठेवली. समोर उभ्या असलेल्या फौजदार नाईक बा

11

एकदम्म बिंधास्त प्रकरण 11

16 June 2023
0
0
0

प्रकरण ११जाग आल्याबरोबर वैजू उठून बसली खाली अंथरलेल्या मळक्या गोधडीकडे तिने आश्चर्याने पाहिले. झाडाच्या दाट सावलीने तिला उन्हाच्या झळापासून वाचविले होते खरे पण तरीही वातावरणातील गरम झळा कडक उन्हामुळे

12

एकदम्म बिंधास्त प्रकरण १२

16 June 2023
0
0
0

प्रकरण १२वेळ सायंकाळची फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. केस स्टडीत व्यत्यय आल्याने थोड्याशा अनिच्छिनेच इन्स्पेक्टरचारुशीला मोरेंनी फोन उचलला. पलीकडून कोणीतरी बोलू लागले,'हॅलो, फैजलपूर पोलीस स्टेश

13

एकदम्म बिंधास्त प्रकरण १३

16 June 2023
0
0
0

प्रकरण १३मयू भानावर आली. ते फोनच्या खणखणाटाने !"हॅलो, फौजलपूर पोलीस स्टेशन हिअर इज ASI चित्रा स्पिकिंग" चित्राने उगीचच आवाजात चढउतार करीत समोरच्यावर छाप मारण्याचाप्रयत्न चालविला."अग, एचित्रे, मी काय स

14

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023
0
0
0

प्रकरण १४समद फुलल व्हतं, परशेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली."ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्य

15

एकदम्म बिंधास्त प्रकरण 15

16 June 2023
0
0
0

प्रकरण १५सकाळी सकाळीच पेपर वाचून मयूच्या आत्याचा पारा चढला होता. 'सोमदत्त ढवळे खून प्रकरण: फरार गुन्हेगार वैजयतीने १२०५ फूट उंच 2wv लाईट टॉवरवरून धावत्या ट्रकवर उडी मारली आणि पुन्हा एकदा पोलीसांना गुं

16

एकदम्म बिंधास्त प्रकरण १६

19 June 2023
0
0
0

प्रकरण १६इकडे फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर चारूशीला मोरे हात चोळत बसल्या होत्या टारगट बैजू तर कधीच फरार झाली होती आणि तिच्याविरुद्ध साक्ष देणारा एकमेव 'गाडीवाला पैलवान ही सापडल्याची खबर आत्ता

17

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023
0
0
0

प्रकरण १७वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार क

18

एकदम्म बिंधास्त प्रकरण १८

20 June 2023
0
0
0

प्रकरण १८एव्हाना आत्याची मोटार नानघरच्या अलीकडच्या फाट्यावर येऊन पोहोचली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला."हॅलो, ""हॅलो अत्त्या, मी वैजू बोलतीये.""कोण ? वैजू !" आत्त्या पार उडालीच. लगेचच तिने साठेबाईं

19

एकदम्म बिंधास्त प्रकरण १९

20 June 2023
0
0
0

प्रकरण १९“मॅडम, तुमचं म्हणण खरय त्या मेसेजमधून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. " चित्रा मैसेज डिटेल्स इन्स्पेक्टर मोऱ्यासमोर ठेवतम्हणाली."कोणती माहिती ?" इन्स्पेक्टर मोरे."त्या मुलाचे - सौरभचे मेसे

20

एकदम्म बिंधास्त प्रकरण २०

20 June 2023
0
0
0

प्रकरण २०पिठीने दिलेल्या खास रुबाबदार 'मोगऱ्या' घोड्यावरून बैजूने गोवा हाय वे धरला. 'टग्-डग-टग्-डग्' घोड्याच्या टापांचा आवाज होत होता. थोड्याशा सरावान वैजूला भलत्याच वेगाने घोडा दामटता येऊ लागला.• च्य

21

एकदम्म बिंधास्त प्रकरण २१

20 June 2023
0
0
0

प्रकरण २१फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील आता मोठी रंगत येणार होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी कलिंगूट पार्टी डीटेल्स ऐकून मयूकडे धाव घेतली. जवळपास झडपच घातली तिच्यावर मयू मात्र आत्त्यापासून वैजूला

22

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023
0
0
0

प्रकरण २२"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या माल

23

एकदम्म बिंधास्त प्रकरण २३

20 June 2023
0
0
0

प्रकरण २३आत्ताशी कुठे पोलीसांची जीप गोवा हायवे ला लागली. पण अं हं! जीपवर 'महाराष्ट्र पोलीस' हा बोर्ड नव्हताच मुळी निघण्यापूर्वीच इन्सपेक्टर चारुशीला मोरनी तो काढून ठेवला होता. आणखी एक गोष्ट डोळ्यांना

24

एकदम्म बिंधास्त प्रकरण २४

22 June 2023
1
0
0

"श्शी! या कार्टीन खरंचच मोबाईलमधल कार्ड फेकून दिलेल दिसतय तशी महाईविस आहे ती आता हिला कशी शोधू मी? गोवा हायवे म्हणजे काय तिला तिच्या साताऱ्यातली लंबुळकी गल्ली वाटली की काय ?" वैजूच्या नावाने आत्त्या ख

25

एकदम्म बिंधास्त प्रकरण २५

22 June 2023
0
0
0

पाठलाग करणाऱ्या वैजूला चकवा देण्यासाठी ट्रकवाल्याने आता आपला ट्रक संकेश्वर मार्गाला वळवला होता. पण रस्त्यावरच्या एकसारख्या वर्दळीतूनही वैजूची नजर मात्र त्याच्यावरच पक्की होती. 'GA D४ EX ८०४६' ही नंबर

26

एकदम्म बिंधास्त प्रकरण २६

22 June 2023
0
0
0

"देवा, कुठल्या जन्मीच उरलं सुरलं पुण्य होत रे, तेव्हा पिठीच्या रुपाने ते माझ्या पदरात घातलंस." बैजू काळ्याकुट्ट आकाशात पातुरक्या-पिंजक्या ढगाकडे पहात म्हणाली."मैडम, घोडा," दूरवरून ऐकू आलेल्या आवाजाने

27

एकदम्म बिंधास्त प्रकरण २७

22 June 2023
0
0
0

इकडे पोलीसांची जीप कलिंगूटवर येऊन पोहोचली. मयूच्या काळजात मात्र कालवाकालव झाली. तिच्या आल्याने सांगितल्याप्रमाणे ती w. इथपर्यंत येऊन पोहोचली खरी, पण आता कसे शोधणार इथे वैजूला ? रस्त्यात ना दिसला तो ट्

28

एकदम्म बिंधास्त प्रकरण २८

22 June 2023
0
0
0

लांबवर कुठेतरी म्युझिक ढणढणत होत पण नक्की कुठे याचा काही अंदाज घेता येत नव्हता ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला, तो खूनी ट्रकड्राइव्हरही वैजूला बांधून केव्हाच फरार झाला होता. हात-पाय दोरीने घट्ट

29

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023
1
0
0

सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच

---

एक पुस्तक वाचा