shabd-logo

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023

9 पाहिले 9


प्रकरण २


'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली तसतसे डोळे विस्फारतच गेली. संपूर्ण मेसेज वाचून झाल्यावर ती ओरडलीच,

"थांब, वैजू, प्लीज थांब"

"एवढं किंचाळायला काय झालय ?" त्रासून वैजूने गाडी रस्त्याच्या कडेला घेतली.

"सौऱ्याचा मेसेज आहे." मयूच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच इतका संताप उठून दिसत होता...

"अगं, मग तेवढ्यासाठी गाडी कशाला थांबवायची? तू पण ना मयू..." मयू वैजूच्या पाठीमागे बसल्याने वैजूला अजून कसलीच कल्पना

आली नव्हती. उलट टॉप गियरवरन थेट बाईक थॉबवल्याने तिचा हिरमोडच झाला होता.

"वैजू, अग आता पुढे जाण्यात काहीच पॉईंट नाहीये."

"का? काय झालं ?" चमकून वैजूने मागे पाहिलं..

तशी मयू खाली उतरली आणि भलतीच तणतणू लागली,

"काय नाही झालं ते विचार त्या सौऱ्याने पुन्हा एक लोच्या केलाय.'

"लोच्या ? आता काय केलंय त्या चंपूने ?" चुकून जरी तो सौऱ्या समोर आला असता ना तर त्याला फाडूनच काढलं असतं आता वजूने

"त्याचा मेसेज आलाय, की म्हणे त्याचे नवे मित्र त्याला जबरदस्तीने ट्रिपला घेऊन चाललेत. तेव्हा तुम्ही दोघी आत्ता नका येऊ. आणखी दोन दिवसांनी या" मयूने खुलासा केला.

च्यामारी, भेंडी!" इति वैजू

"आता अर्ध्या रस्त्यात आल्यावर सांगतात का हे बरं ? सकाळपासून काय झोपला होता का हा ?-" मयू.

"मी सांगते तुला मयू, हा ही त्याचा एक प्लॅन असेल बघ."

"मला नाही वाटत तसं एकदम्म चपू आहे साला. एखाद्या टोळक्यानं चांगलच गडवल असेल त्याला बर ते जाऊ दे. आता आपण काय करायचं ?” निरागस मयूच्या चेहऱ्यावर केवदूतरी मोठ्ठे प्रश्नचिन्ह उमटले.

वैजू मात्र निवांतपणे गाडीवर टेकली. मागच्या सीटवर एका बाजूने बसत दोन्ही पाय रस्त्यावरच्या मैलाच्या दगडावर ताणून देत तिने

भलत्याच खुशीत आपला आवडता शेर सुनावला,

"मेरी मौत पे कफन लाए हो..........लेकीन,

मेरी लाश को ये सरजमी ही काफी है........

मैं सदियाँ नहीं चाहती जिने के लिए,

कुछ लमहों की जिंदगी ही काफी है...

"म्हणजे? वैजू तुझा इरादा तरी काय आहे आता ?" वैजूकडे बारीक डोळ्यांनी बघत मयू तिचा अंदाज घेऊ लागली.

"मयू, मला सांग बरं, परत पुण्याला जायचं म्हटलं तर रहाणार कुठे ? चुकून जरी पुन्हा त्या शीलीच्या होस्टेलच्या बाजूला आपण फिरकलो ना तर तिच्या होस्टेलच्या बाई आपल सामानसुद्धा आपल्या तोंडावर फेकून मारतील. त्यामुळे त्या ऑप्शनवर फुली मार."

"मग आता कुठे रहायचं ?" पुन्हा मयू गोंधळलेलीच.

"पुण्यातल्या हॉटेल्सपेक्षा इथल्या एखाद्या साध्या लॉजचं भाडं नक्कीच परवडेबल आहे. तेव्हा आता.... 'वैजूला मध्येच अडवत मयू पुढे

म्हणाली,

"पण आता चांगलं हॉटेल शोधायचं कुठे ? आणि दोन दिवस काय तिथे नुसत बसून रहायच, की त्यांची भांडी घासायची ?"- मयू "डोन्ट वरी यार 'प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अशी वेळ यावी, स्वतःतून बाहेर पडण्याची तेव्हातरी फुरसत मिळावी!"-वैजू

"सो?" वैजूचा प्लॅन आजमावत मयूने डोळे मिचकावले...

"सो जस्ट से टू सौऱ्या- थैंक्स अलॉट" वैजू

"पुन्हा त्या मुर्खाचे नाव काढू नकोस."

मयू

"मयू, सोड ना आता ते सगळं. हॉटेल-बीटेलच रात्री बघू विचार कर आपल्या हातात आख्खे दोन दिवस रिकामटेकडे आहेत. भरपूर मजा

करू या दोन दिवसात ओके !" गाडीवर टांग टाकत वैजूने गाडी सुरु केली... "इन!" आनंदाने वैजूमागे बसत मयूने तिला होकार दिला.

"या 555555 हू ! आत्ताशी कुठे जरा मोकळ मोकळ वाटतय. नाहीतर मला वाटत होत, की कोणीतरी शिक्षा केल्याप्रमाणेच आपण एवढ्या लांब ट्रिपला निघालोय. पण आता मस्त वाटतंय दोन दिवस नो टेन्शन फुल टू धम्माल करूयात." मयू अगदी मनापासून बोलून गेली.

भलत्याच मूडमध्ये येऊन वैजूने गाडी फुल्ल स्पीडमध्ये सोडली.

गाडीचा वेग आता ८० च्या सुमारास होता. सूर्यही जरासा पश्चिमेकडे कलला होता. आत्तापर्यंत ऊबदार वाटणारा वारा हळूहळू गरम झळा देऊ लागला होता. वैजू तुफान वेगाने गाडी चालवत होती. तिच्या पोटात मात्र कावळे ओरडत होते. कमरेभोवती मयूच्या हाताचा विळखा जरासा सैल झाल्यासारखा तिला जाणवला. तिच्या खांद्यावर डोक टेकवून भुर्रर वाऱ्यासोबत मयूरी मात्र डुलक्या घेत होती.

"च्यायला, २०-२० किमी कापल तरी साधी टेकायला मोकळी जागा नाही इथं फिर हॉटेल तो किस झाड की पत्ती की मिट्टी !" वैतागून स्वतःशीच वैजू म्हणाली. .... सारी, किस जमीन

"जरा हळू बोल ना तुझ्या पाठीवर कान लावल्याने मला सगळे लाऊडस्पीकरमधून ऐकल्यासारखं वाटतंय " जरासाही डोळा न उघडता मयूची झोपेतच तक्रार

जिकडे पहावं तिकडे नुसती झाडीच झाडी जीवघेण्या कडक उन्हाचा जरासाही परिणाम त्या झाडीच्या हिरव्या गर्द ताग्यावर झाला नव्हता. झाडी इतकी घनदाट होती, की रस्त्याच्या कडेला एक माणूसभर लांबी-रुंदीचीही रिकामी जागा वैजूला सापडेना.

अवघड नागमोडी वळण घेत गाडी आता उताराला लागली, आणि वैजूच्या नजरेत अखेर एक मोक्याची जागा भरली. भल्यामोठ्या डेरेदार वडाखाली सावली अंथरून ती जागा जणु या जोडगोळीचीच वाट पहात होती. त्या जागेजवळ येताच अत्यानंदाने तिने करकचून ब्रेक दाबले. वैजूच्या या अचानक ब्रेक दाबन्याने मयूचा थोडासा तोल गेला आणि ती झोपेतून दचकून जागी झाली.

"कोणाला ठोकलंस?" मयूचा डोळे किलकिले करीत प्रश्न.

"छान. तू तर त्याचीच वाट पहा." वैजू गॉगल काढत म्हणाली.

"ए वैजू, झोपू दे ना गं. मस्त स्वप्न पडले होते आणि तू...

वैजूच्या मानेभोवती हात घट्ट लपेटून ती पुन्हा झोपू लागली.

"मयू, जरा डोळे उघडून तर बघ. आपण एखाद्या रंगीत स्वप्नातच उतरल्यासारखं वाटेल तुला" वैजू स्वतःवर जाम खुश होत म्हणाली. 

इकडे मयू मात्र वाऱ्यासोबत पसार झाली होती.

"कम्मीन मयु, ऊठ." वैजूने तिच्या मानेभोवतीचे मयूचे हात सोडवले.

"ए अंग, वैजू काये....." डोळे चोळत उठणारी मयूरी समोरचे अतिरम्य दृश्य डोळे फाडफाडून बघू लागली.

डेरेदार वडाच्या जमीन झाडणाऱ्या पारंब्या, वडापासून जस जसे मागे उताराला जावं तस तशी दूरदूरवर पसरलेली लालसर-काळ्या टपोऱ्या करवंदाची ती दाटच दाट जाळी नजरेत मावत नव्हती. जिकडे पहावं तिकडे नुसती करवंदच करवंद ! एके ठिकाणी जाळी जराशी विरळ झाली होती मात्र दुपारी साडेतीनच्या कडक उन्हातही कुठूनशी वाऱ्याची गारेगार झुळूक अंगावर येत होती. जरा दोन पावलं पुढे जाऊन डोकावलं अन् त्या दोघीच्या आनंदाला पारावारच उरला नाही. करवंदीच्या उतारातून माग काढत शे-दीडशे हातांवर निळ्याशार पाण्याचा मुरमात सापडलेला भलामोठठा तलाव त्यांच्या दृष्टीस पडला.

या ऽऽऽ हू । वैजू, यू आर सिम्पली ग्रेट" मयूने वैजूसोबत जल्लोश करीत पारंब्यांशी झोका घेतला

वैजूने सपाटीची जागा बघून बाईक पार्क केली जेवणाच्या डब्याची सॅक पाठीवर अडकवून त्या दोघी करवंदी जाळीवर तुटून पडल्या लाल-काळी पिकलेली, टपोरी करवंद पटापट तोडून चोखू लागल्या.

“छ्या! कित्ती चीक चोपडलाय याला." खाताना वैजूने तोंड वेंगाडले.

"जरा शिस्तीत तोड ना." वैजूची हालत पाहून मयूला हसू आवरेना.

"थाय तुझ्या जकीनच्या खिशातच ठेवते. वैजू चिकट चिकट करवंद घेऊन मयू मागे धावली.

कुठे धावाधाव कर, कधी लपंडाव कर, कधी एकमेकीना चिडव तर तुफान मस्ती करत अखेर त्या दोघींनी तळ्याकाठी सोबत आणलेले

पार्सल फस्त केले. ताजी ताजी डबाभर करवंदं पाण्यात खळखळून घुतली. एकमेकींच्या अंगावर पाणी उडवून, यथेच्छ मस्ती करून अखेरीस

तळ्यात पाय सोडून, एकमेकींच्या गळ्यात गळे घालून त्या करवंद चोखू लागल्या.

तेवढ्यात मयूचा मोबाईल वाजला.

भेंडी! जरा दोन क्षण निवांत मिळाले तर..... ." वैजूचे वाक्य तोडत मयूरी आनंदाने ओरडली,

"वैजू, आत्याचा फोन आहे.""

"हॅलो, आतु बोल ग." मयूरी मोबाईलवर बोलूही लागली.

"बेटा, तू कशी आहेस ?" आल्या.

डोन्ट वरी आत्तु. मी एकदम्म झक्कास आहे. तू फोन सहजच केलास नं ?"

फ्लॅट बघायला." आत्याने

"हो सहजच म्हटल एक आठवडा लोटला ना तुला नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊन. जरा येऊन जाते नवा खुलासा केला.

क्काय ?" मथुरी जवळजवळ किंचाळलीच.

"एवढं आश्चर्य वाटायला काय झाल ? मी उद्याच येते बघ पुण्याला "
उद्या ?" मयूला काय बोलावे ते सुचेचना.

"आतु जरा होल्ड कर है" मयूरी जरा गोंधळली.

"वैजु, आता काय करायचं? आत्तु उद्या पुण्याला येतीये तिला आपला नवा फ्लॅट बघायचाय आता तो कुठून आणायचा ?"

परिस्थिती वैजूच्या चटकन लक्षात आली.

"फोन दे माझ्याकडे" अस म्हणत वैजूने आत्याशी बोलायला सुरुवात केली.

"नमस्कार आत्या." वैजू, आहे की 

"ह, बोल बेटा बैजू, कशी आहेस ?"

"मला काय धाड भरली आहे! एकदम्म मजेत आहे बघा.'

"अगं, उद्या तुमच्या नवीन फ्लॅटवर यायचं म्हणतीये" आत्त्या

"हो, समजल.. मयू सांगत होती, पण ssss" वैजूने मनातल्या मनात जुळवाजुळव सुरू केली.

"पण. पण काय ?" आत्या कोड्यात पडली.

"पण उद्या नको नं आत्त्या" वैजूने काहीतरी मनाशी ठरवत म्हटले.

का? उद्या काय ठरलय का तुमच?" आत्त्याचा प्रश्न

"हो ना. उद्यापासून आम्ही दोघी नेत्रदान जनजागर शिबिरात स्वयंसेवक म्हणून दाखल होत आहोत." वैजूने मयूकडे पहात डोळे मिचकावत थाप मारली.

"अग, आता हे काय नवीन ? आणि मयूरी नाही बोलली याबद्दल मघाशी आत्या जरा खोलात जाऊ लागली.

"किती दिवस आहे ते शिविर ?" आत्त्याचा पुन्हा प्रश्न.

"हो ना. उद्यापासून आम्ही दोघी नेत्रदान जनजागर शिबिरात स्वयंसेवक म्हणून दाखल होत आहोत." वैजूने मयूकडे पहात डोळे मिचकावत

थाप मारली.

"अग, आता हे काय नवीन? आणि मयूरी नाही बोलली याबद्दल मघाशी" आत्त्या जरा खोलात जाऊ लागली. "किती दिवस आहे ते शिबिर ?" आल्याचा पुन्हा प्रश्न

फार नाही, फक्त चार दिवस." बैजूने ही थापही एका दमात मारली.

"अग बाई, चाsssर दिवस त्यापेक्षा काहीतरी देणगी नाही का देऊन टाकायची त्यांना जाऊ दे. आता ठरवलच तर जा. पण खूप दमू नका. जास्ती धावपळ करू नका...

आत्त्याचा नेहमीचा पाढा सुरू झाला, त्याबरोब्बर वैजूने फोन मयूकडे कटवला..

"आत्त्या, थांबा है, मयूला बोलायचंय तुमच्याशी.”

"हॅलो आतु, रागावलीस का गं?" मयूने लाडीकपणे विचारले,

"छे गं बेटा. फक्त जरा तिकडे यायचं मनात होत बघ."आत्त्या.

"आत्त्या, नंतर ये ना तू इकडे मयूरी,

"बघू, अगं दोन दिवस फॅक्टरीच्या कामातून जरा उसत मिळाली होती. म्हटलं तुला एकदा भेटून याव खूप आठवण येते ग. तशी सवय आहेच मला एकटेपणाची! पण शेवटी मन ओढा घेतच गं तुझ्याकडे. या जगात एकमेकींशिवाय नात्याचं असं आहेच कोण गं आपल्याला ?” आत्त्या हळवी होत गेली. पण मध्येच स्वतःला सावरलं तिने इकडची तिकडची चौकशी करून मग त्यांचं संभाषण थांबलं.

"वैजू, आपण आत्तुशी खोट नव्हतं बोलायला पाहिजे" वैजूला अस सांगतानाही मयूचे डोळे पाणावले होते..

"मग काय सांगायचं होतं का, की निघालो दोघीच गोव्याला आणि तेही बाईकवर ?" बैजू

"तसं नाही गं, पण..

पण मला नाही आवडत आत्तुशी खोट बोलायला" मयू जराशी नाराज झाली.

"ट्राय टू अन्डरस्टैंड यार. समजा उद्या आत्त्या खरंचच पुण्यात आल्या असत्या तर कोणता फ्लॅट दाखवणार होतो आपण ? घर

मिळवण्यासाठी तर चाललीये ना आपली एवढी वणवण. नाहीतरी असं विंचवाच बिन्हाड पाठीवर घेऊन फिरायला मला तरी कुठे हौस आहे "

"हं, तेही खरंच आहे म्हणा त्या मूर्ख सौन्यावर भरवसा केला म्हणून तर....

"ते इब्लिस समोर तर येऊ देत त्याला अश्शी एकच लावून द्यायची आहे ना मला " वैजूचा हातच जणु तिचा सारा राग ओकत होता.

बरं, ते जाऊ दे बैजू, पण बघ ना काय गंमत आहे नाही, कधी वाटल तरी होत का, की आपल्यावर कधी अशी वेळ येईल ते."

"हो ना, इकडे आड तिकडे विहीरा रोज मिजाशीत राहून सौऱ्याची गाडी उडवत फिरणाऱ्या आपण दोघी, आज पर... रस्त्यावर भटकत बसलोय ना रहायला घर ना रहाणार गाडी.

माना के जिंदगी, तेरे काबील नहीं है हम,

ना तेरे नजरोंमे कुछ कभी थे हम | -

मगर ए जिंदगी, जरा उनसे तो पुछे सही,

जिन्हें हासील नहीं है हम |'

त्या गारेगार पाण्याच्या तलावात एक टिपरी भिरकावत त्या दोघीजणी उठल्या आणि गाडीकडे चालू लागल्या बऱ्याचवेळ कोणीच कोणाशी काही बोललं नाही गाडी वेगातच धावत होती पण त्यांच मन मात्र अजूनही जुन्या आठवणीतच रेंगाळलं होतं.

Prajkta Gavhane ची आणखी पुस्तके

1

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023
3
0
0

प्रकरण १३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पना

2

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023
1
0
0

प्रकरण २'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली त

3

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ३

8 June 2023
0
0
0

अताशा उन्हाचा कडाका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने मोबाईलवर बोलत जावे तसे आपल्याच धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास केलेल्या या जोडग

4

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 4

8 June 2023
0
0
0

"गाडी नाही काढू देत म्हणजे काय ? पर्किंगसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत का ?" मयू हॉटेलच्या वॉचमनला विचारत होती..."देखो मैडम, मैं कुछ नहीं बता सकता! लेकीन मेमसाहब ने इस गाड़ी को बाहर भेजना म

5

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023
0
0
0

प्रकरण ५गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शू

6

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 6

13 June 2023
0
0
0

प्रकरण ६नानघरच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना

7

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 7

13 June 2023
0
0
0

प्रकरण ७पहाटे मयूला जाग आली तीच पायाशी काहीतरी थरथरल्याने अंग मुडपून रडत रडत डोळा लागलेल्या तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे काळोख होता. फक्त पहाऱ्यासाठीच्या दोन महिला पोलीस शिपाई जवळपास दिसत होत

8

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023
0
0
0

प्रकरण ८सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्

9

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ९

14 June 2023
0
0
0

प्रकरण ९सकाळी सकाळी मयूरीची आत्त्या वकीलाला सोबत घेऊन फैजलपूर पोलीस स्टेशनवर हजर इन्स्पेक्टर चारूशीला मोरे अजून ड्युटीवर आल्या नव्हत्या. जाधवबाईंनी आत्त्यांना सुचवलं आणि ASI चित्राच्या परवानगीने त्यां

10

एकदम्म बिन्धास्त प्रकरण १०

14 June 2023
0
0
0

प्रकरण १०.घड्याळात सकाळचे आठ वाजले होते. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आपल्या ड्युटीवर रुजू झाल्या. आपल्या खुर्चीवर बसत त्यांनी डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर काढून ठेवली. समोर उभ्या असलेल्या फौजदार नाईक बा

11

एकदम्म बिंधास्त प्रकरण 11

16 June 2023
0
0
0

प्रकरण ११जाग आल्याबरोबर वैजू उठून बसली खाली अंथरलेल्या मळक्या गोधडीकडे तिने आश्चर्याने पाहिले. झाडाच्या दाट सावलीने तिला उन्हाच्या झळापासून वाचविले होते खरे पण तरीही वातावरणातील गरम झळा कडक उन्हामुळे

12

एकदम्म बिंधास्त प्रकरण १२

16 June 2023
0
0
0

प्रकरण १२वेळ सायंकाळची फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. केस स्टडीत व्यत्यय आल्याने थोड्याशा अनिच्छिनेच इन्स्पेक्टरचारुशीला मोरेंनी फोन उचलला. पलीकडून कोणीतरी बोलू लागले,'हॅलो, फैजलपूर पोलीस स्टेश

13

एकदम्म बिंधास्त प्रकरण १३

16 June 2023
0
0
0

प्रकरण १३मयू भानावर आली. ते फोनच्या खणखणाटाने !"हॅलो, फौजलपूर पोलीस स्टेशन हिअर इज ASI चित्रा स्पिकिंग" चित्राने उगीचच आवाजात चढउतार करीत समोरच्यावर छाप मारण्याचाप्रयत्न चालविला."अग, एचित्रे, मी काय स

14

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023
0
0
0

प्रकरण १४समद फुलल व्हतं, परशेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली."ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्य

15

एकदम्म बिंधास्त प्रकरण 15

16 June 2023
0
0
0

प्रकरण १५सकाळी सकाळीच पेपर वाचून मयूच्या आत्याचा पारा चढला होता. 'सोमदत्त ढवळे खून प्रकरण: फरार गुन्हेगार वैजयतीने १२०५ फूट उंच 2wv लाईट टॉवरवरून धावत्या ट्रकवर उडी मारली आणि पुन्हा एकदा पोलीसांना गुं

16

एकदम्म बिंधास्त प्रकरण १६

19 June 2023
0
0
0

प्रकरण १६इकडे फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर चारूशीला मोरे हात चोळत बसल्या होत्या टारगट बैजू तर कधीच फरार झाली होती आणि तिच्याविरुद्ध साक्ष देणारा एकमेव 'गाडीवाला पैलवान ही सापडल्याची खबर आत्ता

17

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023
0
0
0

प्रकरण १७वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार क

18

एकदम्म बिंधास्त प्रकरण १८

20 June 2023
0
0
0

प्रकरण १८एव्हाना आत्याची मोटार नानघरच्या अलीकडच्या फाट्यावर येऊन पोहोचली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला."हॅलो, ""हॅलो अत्त्या, मी वैजू बोलतीये.""कोण ? वैजू !" आत्त्या पार उडालीच. लगेचच तिने साठेबाईं

19

एकदम्म बिंधास्त प्रकरण १९

20 June 2023
0
0
0

प्रकरण १९“मॅडम, तुमचं म्हणण खरय त्या मेसेजमधून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. " चित्रा मैसेज डिटेल्स इन्स्पेक्टर मोऱ्यासमोर ठेवतम्हणाली."कोणती माहिती ?" इन्स्पेक्टर मोरे."त्या मुलाचे - सौरभचे मेसे

20

एकदम्म बिंधास्त प्रकरण २०

20 June 2023
0
0
0

प्रकरण २०पिठीने दिलेल्या खास रुबाबदार 'मोगऱ्या' घोड्यावरून बैजूने गोवा हाय वे धरला. 'टग्-डग-टग्-डग्' घोड्याच्या टापांचा आवाज होत होता. थोड्याशा सरावान वैजूला भलत्याच वेगाने घोडा दामटता येऊ लागला.• च्य

21

एकदम्म बिंधास्त प्रकरण २१

20 June 2023
0
0
0

प्रकरण २१फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील आता मोठी रंगत येणार होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी कलिंगूट पार्टी डीटेल्स ऐकून मयूकडे धाव घेतली. जवळपास झडपच घातली तिच्यावर मयू मात्र आत्त्यापासून वैजूला

22

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023
0
0
0

प्रकरण २२"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या माल

23

एकदम्म बिंधास्त प्रकरण २३

20 June 2023
0
0
0

प्रकरण २३आत्ताशी कुठे पोलीसांची जीप गोवा हायवे ला लागली. पण अं हं! जीपवर 'महाराष्ट्र पोलीस' हा बोर्ड नव्हताच मुळी निघण्यापूर्वीच इन्सपेक्टर चारुशीला मोरनी तो काढून ठेवला होता. आणखी एक गोष्ट डोळ्यांना

24

एकदम्म बिंधास्त प्रकरण २४

22 June 2023
1
0
0

"श्शी! या कार्टीन खरंचच मोबाईलमधल कार्ड फेकून दिलेल दिसतय तशी महाईविस आहे ती आता हिला कशी शोधू मी? गोवा हायवे म्हणजे काय तिला तिच्या साताऱ्यातली लंबुळकी गल्ली वाटली की काय ?" वैजूच्या नावाने आत्त्या ख

25

एकदम्म बिंधास्त प्रकरण २५

22 June 2023
0
0
0

पाठलाग करणाऱ्या वैजूला चकवा देण्यासाठी ट्रकवाल्याने आता आपला ट्रक संकेश्वर मार्गाला वळवला होता. पण रस्त्यावरच्या एकसारख्या वर्दळीतूनही वैजूची नजर मात्र त्याच्यावरच पक्की होती. 'GA D४ EX ८०४६' ही नंबर

26

एकदम्म बिंधास्त प्रकरण २६

22 June 2023
0
0
0

"देवा, कुठल्या जन्मीच उरलं सुरलं पुण्य होत रे, तेव्हा पिठीच्या रुपाने ते माझ्या पदरात घातलंस." बैजू काळ्याकुट्ट आकाशात पातुरक्या-पिंजक्या ढगाकडे पहात म्हणाली."मैडम, घोडा," दूरवरून ऐकू आलेल्या आवाजाने

27

एकदम्म बिंधास्त प्रकरण २७

22 June 2023
0
0
0

इकडे पोलीसांची जीप कलिंगूटवर येऊन पोहोचली. मयूच्या काळजात मात्र कालवाकालव झाली. तिच्या आल्याने सांगितल्याप्रमाणे ती w. इथपर्यंत येऊन पोहोचली खरी, पण आता कसे शोधणार इथे वैजूला ? रस्त्यात ना दिसला तो ट्

28

एकदम्म बिंधास्त प्रकरण २८

22 June 2023
0
0
0

लांबवर कुठेतरी म्युझिक ढणढणत होत पण नक्की कुठे याचा काही अंदाज घेता येत नव्हता ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला, तो खूनी ट्रकड्राइव्हरही वैजूला बांधून केव्हाच फरार झाला होता. हात-पाय दोरीने घट्ट

29

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023
1
0
0

सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच

---

एक पुस्तक वाचा