shabd-logo

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023

1 पाहिले 1

प्रकरण ५

गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शून्यात नजर हरवून बसली होती.

"चल, उतर गाडीतून " दरडावण्याने ती भानावर आली निमुटपणे उतरून ती वैजूशेजारी थांबली. वैजूने तिचा हात आपल्या हातात घट्ट

दाबला आणि डोळ्यात विश्वासाने पाहिले तेवढ्यात त्या दोघींना हाताला धरून जवळजवळ ओढतच चौकीत नेले गेले.

इन्स्पेक्टर चारूशीला मोरे चौकीत शिरताच आतमध्ये एकच धावाधाव सुरू झाली. कोणी आपला टेबल आवरे तर कुणी गणवेश नीट करे. एका महिला पोलीसाने तर चक्क गजऱ्याची पुडी पट्टिशी मुठीत दाबत ड्रॉवरमध्ये भिरकावली. कोपऱ्यातील दोघींनी मिसळ-पावाच्या दोन भरल्या डीश लपवताना बरीच धावपळ केली. कदाचित् ही नित्याची करमणूक असावी म्हणून इन्स्पेक्टर मोऱ्यांनी सर्व प्रकाराकडे कानाडोळा केला. पण वैजूच्या चाणाक्ष नजरेतून मात्र यातील एकही गोष्ट सुटली नाही. आपण पोलीस चौकीत आहोत. या कल्पनेनेच मयूला कापर भरलं.

इन्स्पेक्टर चारूशीला मोरे डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर ठेवत समोरच्या फाईल्सकडे नजर टाकून खुर्चीत बसल्या. वैजू आणि

खसकन ओढत आणून त्यांच्या समोर बसवले गेले. या ओढाताणीने वैतागलेल्या वैजूने त्या पोलीस बाईंवर एक जळजळीत कटाक्ष टाकला.

तशी ती पोलीस सहकारी जरा चपापली तेवढ्यात इन्स्पेक्टर चारूशीला मोऱ्यांनी दोघींना विचारले,

"तुमच्यापैकी गाडी कोण चालवत ?*

दोन क्षण दोघीही गप्प बसल्या नंतर मयूकडे पहात तिला डोळ्यांनी खुणावत वैजू इन्स्पेक्टर मोयना म्हाणाली,

"फक्त मी चालवते."

"या 'फक्त' चा अर्थ नक्कीच दोघीही गाडी चालवता असाच आहे ना मयूरी ?" मयूकडे क्रोधित नजरेने पहात इन्स्पेक्टर मोत्यांनी आवाज

चढवला.

"हो." त्यांच्या या अनपेक्षित हल्ल्याने भेदरलेली मयू उत्तरली.

"MH-12..

म्हणजे पुण्याच्या आहात ना तुम्ही ?" क्षणभर विचार करून इन्स्पेक्टर चारूशीलांचा पुढचा प्रश्न

"मला वाटतं, 'MH-12' म्हणजे गाडी पुण्याची आहे एवढाच अर्थ होतो, नाही का इन्स्पेक्टर ?" वैजूचा प्रतिप्रश्न

"व्वा ! सावज स्वतःच बंदुकीच्या टप्प्यात येऊन बसतय म्हटल्यावर माझी कशाला हरकत असेल ?" इन्स्पेक्टर मोरे मयूकडे पहात कोड्यात

बोलल्या.

काहीही न समजल्याने भांबावून गेलेली मयू आणखीनच बुजली.

"बरं, मग सांगा तुमच्या गावाला 'MH... किती लिहितात ते ?" मयूकडे रोखून बघत इन्स्पेक्टर मोत्यांनी तिला विचारले.

"अ! म्हणजे ?" मयू पुरती गोंधळली.

एकसारखा मयूवर दबाव आणण्याचा इन्स्पेक्टर चारूशीला मोत्यांचा प्रयत्न पाहून वैजूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. अस्वस्थपणे खुर्चीच्या हातावर तिच्या बोटांची चळवळ चालू होती. मनात बंड ! मयूच्या भोळेपणाचा चारूशीला मोरेंनी गैरफायदा घेऊ नये असं तिला मनोमन वाटत होतं. पण करणार काय ? नजर जमीनीवर स्थिर ठेवून तिचे कान मात्र या दोघींच्या संवादातच सामील झाले होते....

हतबल वैजू आणि फिरकी घेणाऱ्या इन्स्पेक्टर चारूशीला मोरेंना पाहून मयू पुरती चक्रावली. तिच्या साध्या भाबड्या स्वभावाला हे सारे

नाट्य अजिबात उमजत नव्हतं, तिचं डोकं गरगरायला लागलं होत. कोमेजल्या चेहऱ्यावर नुकत्याच वाहून गेलेल्या अश्रूच्या धारा समोरच्याचे हृदय हेलावून सोडत होत्या. परंतु इन्स्पेक्टर मोऱ्यांनी याच साधेपणाला 'टार्गेट' करत तिला फैलावर घेतले होते. मयूच्या पाणावल्या डोळ्यांतून निरागसता ऊतू जाऊ लागली. आपल्या दोन्ही हातांनी डोळे पुसत मयू बोलू लागली,

"इन्स्पेक्टर, प्लीऽऽऽज तुम्ही अस कोड्यात बोलू नका. खूप गोंधळायला झालंय. ही असली प्रश्नांची सरबत्ती नाही झेपत मला विश्वास ठेवा, मी तुम्हला घडला प्रकार जस्साच्या तरसा सांगते." प्रसंगाला ठामपणे सामोर जाण्याइतपत विश्वास तिच्या डोळ्यांत आता दिसू लागला होता.

"देशमुख, कबुलीजबाब लिहून घ्यायला या. जाधवबाई, जरा एक ग्लास पाणी आणा" इन्स्पेक्टर चारूशीलांनी फर्मान सोडले.

'अखेर मयूने तोंड उघडलेच आता नको तेच घडणार तिने विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. 'या विचाराने चुळबुळणारी वैजू अधिकच खवळली. मयूकडे आश्चर्याने पहात

"मयू!" नकारार्थी मान हलवत वैजू म्हणाली,

पण मयूरीला बोलती करण्यामागचं महत्त्व जाणून इन्स्पेक्टर मोर्यानीं वैजूला हटकले.

मयूरीचं झाल की मग तुझही ऐकून घेऊयात है." इंन्स्पेक्टर मोऱ्यांच्या या शालजोडीतून मिळालेल्या चापराकेने वैजु निराश होऊन खिडकीबाहेर पहात राहिली.

हृदय हेलावून सोडत होत्या, परंतु इन्स्पेक्टर मान्यानी याच साधेपणाला टागेट करत तिला फैलावर घेतले होते. मयूच्या पाणावल्या

डोळ्यातून निरागसता ऊतू जाऊ लागली आपल्या दोन्ही हातांनी डोळे पुसत नयू बोलू लागली,

"इन्स्पेक्टर, प्लीsssज तुम्ही असं कोड्यात बोलू नका. खूप गोंधळायला झालंय, ही असली प्रश्नांची सरबत्ती नाही झेपत मला विश्वास ठेवा,

मी तुम्हला घडला प्रकार जस्साच्या तस्सा सांगते." प्रसंगाला ठामपणे सामोरं जाण्याइतपत विश्वास तिच्या डोळ्यांत आता दिसू लागला होता.

"देशमुख, कबुलीजबाब लिहून घ्यायला या, जाधवबाई, जरा एक ग्लास पाणी आणा. " इन्स्पेक्टर चारूशीलांनी फर्मान सोडले.

'अखेर मयूने तोंड उघडलेच. आता नको तेच घडणार तिने विरोध दर्शविण्याचा प्रयत्न केला. 'या विचाराने चुळबुळणारी वैजू अधिकच खवळली. मयूकडे आश्चर्याने पहात

"मयू !" नकारार्थी मान हलवत वैजू म्हणाली.

पण मयूरीला बोलती करण्यामागचं महत्त्व जाणून इन्स्पेक्टर मोत्यांनी वैजूला हटकले. "मयूरीचं झाल की मग तुझंही ऐकून घेऊयात है." इन्स्पेक्टर मोर्यांच्या या शालजोडीतून मिळालेल्या चपराकेने वैजू निराश होऊन

खिडकीबाहेर पहात राहिली. आपण सांगत आहोत ते योग्य की अयोग्य ? या विचाराने बावचळलेल्या मयूने क्षणभर मौनाचा आश्रय घेतला. शेवटी मनाशी काहीतरी

पक्कं करून निर्धाराने ती बोलू लागली,

"इन्स्पेक्टर, आम्ही दोघी पुण्यात MBA करतो मी वाईवरून आले आहे आणि वैजू मूळची साताऱ्याची. पुण्यात आम्ही एका कुटुंबात पेईंग गेस्ट म्हणून रहातो.. सॉरी राहायचो." अधिक स्पष्टीकरणासाठी इन्स्पेक्टर मोऱ्यानीं फक्त भुवया ताणल्या.

"राहायची म्हणजे सध्याही आमचं सामान पुण्यातच एका मैत्रीणीकडे ठेवलंय." मयू

"मग सध्या कुठे रहाता ?" जबाब लिहून घेणाऱ्या देशमुखबाईंनी विचारले. -

"सध्या आम्हाला घरच नाही. आणि म्हणूनच घराच्या शोधात आहोत"

"जुनं घर का सोडलं ?" इन्स्पेक्टर मोरे,

"घरमालकांनी घर विकलं आणि पुणं सोडून गोव्याला कायमचं वास्तव्य केलंय, म्हणून मग आमची गैरसोय झाली मयूचा खुलासा.

"मग नवीन घर मिळायला काही अडचण? नाही. म्हटलं घर शोधायचं सोडून तुम्ही इकडे भटकताय म्हणून विचारलं इन्स्पेक्टर

-

"नवीन फ्लॅटसाठी पैसे नाहीयेत"मयूने तोंड पाडलं.

"पुण्यात फ्लॅट विकत घेणार आहात का ? देशमुखबाई

"नाही, भाड्यानेच मयू

"डिपॉझिट वगैरे जास्त आहे का ?" देशमुखबाई

"देशमुऽऽख भलत्या चौकश्या कशाला ? केस राहिली एकीकडे....

इन्स्पेक्टर मोरेंनी खडसावले.

"खरंच डिपॉझिटचाच प्रॉब्लेम आहे. आधीच्या घरमालकांनी आम्हाला डिपॉझिटच परत दिल नाही." मयू केविलवाणी होत म्हणाली.

"का बरं?" इन्स्पेक्टर मोरेंनीही जाता रस घेतला

"का..... कारण आम्ही सौऱ्याची. " बोलता बोलता मयू अचानक गप्प झाली. एवढ्यावेळ शांत बसलेल्या वैजूकडे तिने नजर

फिरविली. वैजूच्या मनातील चरफड, इन्स्पेक्टर मोऱ्यांना तिने दिलेली उडवाउडवीची उत्तरं या सगळ्याचं गमक तिला आत्ता कुठे कळून चुकलं. पुन्हा टच्कन तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं, 'वैजूचं ऐकून गप्पच बसणं योग्य होतं' हे तिला आत्ताशी मनोमन पटले.

"सौन्या ? कोण सौन्या ? त्याचं काय ?" इन्स्पेक्टरांनी पुन्हा मयूला घरले मात्र मान खाली घालून मयू गप्प बसून राहिली.

"मयूरी, कोण सौन्या ? मी काय विचारतेय ? मला उत्तर हवंय मयूरी " इन्स्पेक्टर मोरे पुन्हा मयूला बोलती करण्याचा प्रयत्न करीत होत्या...

पण व्यर्थ! मूकपणे ती अश्रू ढाळत होती, जणु वैजूच्या बोलण्याचीच वाट पहात होती.

दरवेळीप्रमाणे याही वेळी हरत जालेला डाव वैजूच्या हाती सोपवून आता मयू बाजूला झाली. सवयीनं जिंकण्याच्या साऱ्या चाली जणु वैजूला ठाऊक झाल्या होत्या. अखेर आता वैजूला डाव हाती घ्यायची वेळ आली.

एवढ्यावेळ गप्प बसलेल्या वैजूने हतबल होऊन रडणाऱ्या आपल्या प्रिय मैत्रिणीकडे पाहिले. शांतपणे मनाशी विचार केला. सगळ्या महिला पोलिसांच्या नजरा तिच्याकडेच वळल्या होत्या. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्याच्या नजरेला तिने एकवार नजर भिडवली. मग पुन्हा एकदा खिडकीबाहेर पाहिले. नंतर अचानक ती स्वतःशीच हसू लागली. तिच्या या चमत्कारिक हास्याने वातावरण आणखीनच तणावपूर्ण झाले. गोधळलेल्या इन्स्पेक्टर मोरेकडे पहात तिने सरळ त्यांनाच सवाल केला.

“इन्स्पेक्टर, असल्या खाजगी फाटकळ-फुटकळ वादांना 'वाचा फोडण्याच काम' कशाला करता ? हा आमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, आम्ही आणि सौऱ्या मिळून तो सोडवू." बैजूच्या या उद्धट उत्तराने इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांचा पारा चढला. चवताळून त्यांनी बैजूला फैलावर धरले.

"काय गं, तुला काय हा खाजगी मामला वाटतोय? तुमच्याविरुद्ध ठसठशीत पुराव्यासकट आख्खी केस उभी राहिलीये..

. आणि काय

गए. तू मला 'माझं काम काय ? ते शिकवतेस काय ? थाब, तुला या केसमधून कोण सोडवतय तेच मी बघते, याद राख, इथून पुढे तोड वर

करून एक जरी शब्द बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यानी वैजूला चांगलीच तंबी दिली.

इन्स्पेक्टर चारुशीला मोरेंच्या या अचानक झालेल्या हल्ल्याने मयूचा तर धीरच चेपला ती मनात विचार करू लागली,

"या सगळ्याला मीच जबाबदार आहे. माझ्याचमुळे बिच्चाऱ्या वैजूला एवढा ओरडा खावा लागला. जाऊ दे. काय होईल ते होवो. बस्स,

आता सगळ सांगूनच टाकते."

पुन्हा एकदा मौन सोडून मधूने सांगायला सुरुवात केली, तशा देशमुखबाई जबाब पुढे लिहू लागल्या.

"आमचा अगदी सरळ साधा सौदा होता. आमच्या दोघीचा सौरभशी ठरलेला सौरभ सौरभ राजाध्यक्ष आमच्या घरमालकाचा मुलगा आम्ही दोघी राजाध्यक्षांकडेच पेईंग गेस्ट म्हणून रहात असल्याने रोज त्याच्याशी गाठ पडे सौऱ्या तसा एकदम चपू !" मयूचे वाक्य तोडत. जबाब लिहून घेणाऱ्या देशमुखबाई नकळत म्हणाल्या,

"चपू ?"

त्याच्या या अनपेक्षित विनोदाने वातावरण जरा निवळले. इन्स्पेक्टर मोरेनी मात्र वातावरणाचे गांभीर्य आपल्या घसा खाकरण्याने कायम ठेवले.

"अहो 'चपू' म्हणजे बावळट हो." मयूने खुलासा केला. ती पुढे सांगू लागली.

"तर त्या चंपू सौन्याला साधी गाडीसुद्धा चालवला येत नाही. आपल्या एकुलत्या एका मुलासाठी राजाध्यक्ष काका-काकूनी साऱ्या सुखसोयी करून ठेवल्या आहेत. पण हा एकदमच नेभळट निघाला तीन वर्ष झालीयेत त्याला गाडी घेऊन पण हा चालवेल तर शपथ! वर, आम्ही गेल्यावर्षीपासून रहातो त्यांच्याकडे, तेव्हापासूनच आमचं त्यांच्याशी सूत जुळलंय. दोघेही आम्हाला मुलीच मानतात, त्यामुळे तो सौऱ्या खूप जळफळतो. त्यातच काका-काकू आम्हाला म्हणाले, 'आमच्या सौरभसाठी घेतलेली गाडी घरीच पडून रहाण्यापेक्षा तुम्ही वापरत जा तेव्हापासून ही एन्टायसर आमच्याचकडे आहे. सौऱ्याचा तर पार तिळपापड झालाय. पण बिच्चारा करणार काय ? त्याला कुठे ती चालवता येत होती! मग तेव्हापासून आम्हा दोघींची आणि त्याची बरीच फाटकळ-फुटकळ भांडणं होत होती. पण सगळ्यात शेवटी त्याने हंगा दाखवलाच काकाची कायमस्वरूपी गोव्याला बदली झाली, म्हणून ते सगळेजण नुकतेच गोव्याला शिफ्ट झालेत. पुण्यातील घर त्यांनी विकल्याने आम्हाला ते सोडावच लागलं. या सगळ्या शिफ्टिंगच्या, पोस्टिंगच्या घादलीत काकानी सगळ्या व्यवहाराची जबाबदारी सौऱ्यावर सोपवली. मग काय, त्याने डाव साधलाच, डिपॉझिट आत्ता देतो, मग देतो करत करत गोव्याला पोहोचला अर्थात गाडी आमच्याकडे ठेवूनच मग गोव्याला पोहोचल्यावर म्हणाला, की 'डिपॉझिट नक्की परत देतो पण आधी गाडी परत द्या.'

आता तुम्हीच सांगा, आम्ही काय त्याची गाडी घेऊन कुठे पळून जाणार होतो काय ? पण नाही तो ऐकतच नाही. तेवढ्यासाठी आमच डिपॉझिट खोळंबल काका-काकूची मदत घ्यावी म्हटल तर ते दोघेही ट्रेनिंगसाठी मारिशसला गेले आहेत. तेवढ्यावेळ थाबण आम्हाला शक्य नाही डिपॉझिटसाठी आमच्या घरीहून आर्थिक मदत घेण्यात काहीच अडचण नाही. पण शेवटी केव्हातरी त्याला ती गाडी तिकडे गोव्याला नेऊन द्यावीच लागणार. आणि म्हणूनच एखादी झक्कास अॅडव्हेंचरस ट्रिपही होईल या उद्देशाने गोव्याला गाडीवर निघालोय." एवढं सांगून

मयूने निश्वास टाकला.

" आणि त्यातच रात्री हा अक्सिडेंट झाला." इन्स्पेक्टर मोऱ्यांनी दोघींकडे बघत सांगितले.

मघापासून मूग गिळून गप्प बसलेल्या वैजूने चमकून इन्स्पेक्टर मोऱ्यांकडे पाहिले काहीही न उमजून दोघीही आश्चर्याने म्हणाल्या,

"अक्सिडेंट ? कोणता अक्सिडेंट ?"

"उगीच भोळेभाबडे चेहरे करून मला फसवण्याने काहीही होणार नाही. जरा नीट आठवून बघा आठवतोय ना काल नानघरच्या पुलावर झालेला अक्सिडेंट ? तुमच्या गाडीमुळे अपघातात मरण पावलेल्या इसमालाही तिथेच रस्त्यावर सोडून निघून गेलात. आठवत नाहीये का काहीच ?" इन्स्पेक्टरांनी आवाज चढवून विचारलं,

"इन्स्पेक्टर, हे जरा अती होतय है. एकतर बिनकामाचा आमचा एवढा वेळ खाल्ला, दमदाटी करून गप्प काय बसवलत आणि आता है। असले बिनबुडाचे आरोपही करताय " वैजू चिडून म्हणाली.

"मिस्स वैजयंती, तोड साभाळून बोल. मी, इन्स्पेक्टर चारुशीला मोरे कधीही कोणावरही पुराव्यांविना आरोप करत नाही. काल रात्री नानघरच्या पुलावर अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाजवळ तुमच्या गाडीची ही नंबर प्लेट सापडली. मृतदेहाचा पोस्टमॉर्टम चालू आहे. पण प्राथमिक अहवालानुसार कोणत्यातरी अज्ञात वाहनाच्या जबरदस्त धडकेने अपघातात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पुढचे निष्कर्ष येतीलच पण जवळ सापडलेल्या नंबर प्लेटनुसार जवळपासच्या परिसरात चौकशी केली असता तुमच्याच गाडीची पुढची नंबर प्लेट आणि मागची नंबर प्लेट (जी अपघातस्थळी सापडली) या एकमेकींशी जुळल्या, म्हणून तुम्हाला आरोपी म्हणून अटक करण माझे कर्तव्यच आहे. नाही का ?"

"इन्स्पेक्टर, तुमचा काही तरी गैरसमज होतोय. आमच्या हातून असा कोणताही अपघात झालेला नाही." मयू काकुळतीला येऊन म्हणाली.

काहीतरी आठवल्यासारखं झालं म्हणून वैजू म्हणाली,

"एक मिनीट, है आठवल. काल रात्री दिवसभराच्या थकव्यानंतर आम्ही नानघरच्या पुलावर गाडी पार्क करून खाली पाण्याच्या प्रवाहात फ्रेश होण्यासाठी गेलो होतो. तेव्हाच पुलावर कसलासा जोरदार आवाज झाला खूप मोठ्ठा होता तो आवाज ऐकता क्षणीच आम्ही धावतच चढण चढून पुलावर गेलो तर तिथे अंधारात कसलीशी हालचाल चालू होती...

कोण आहे ?' म्हणून मी आवाज देताच कोणीतरी पट्कन कुठेतरी वर चढल्याचे पुसटशा अंधारात मला जाणवले. लागलीच खूप सारा धुराळा उडवत एक ट्रक सुरु झाला, आणि रोड इरो करत पसार झाला. नक्की काय झाल ते बघण्यासाठी मी अंधारातच चाचपडत होते तर चांदण्या प्रकाशात मला आडवी पसलेली ही एन्टायसर दिसली तिची अशी दुरावस्था करणाऱ्या ट्रकचा मला भयंकर राग आला म्हणून त्याचा पाठलाग करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्या धांदलीत पुलावर नेमक काय झालं हे बघायचं राहूनच गेल" वैजूने हुशारीने खुलासा केला आणि मोठ्या आशेने ती इन्स्पेक्टर मोरेकडे पाहू लागली

इन्स्पेक्टर मोरेनी वैजूच्या डोळ्यातील चमक पहिली आणि स्वतःशीच हसत टाळ्या वाजवत त्या तिला म्हणाल्या, "व्वा ! बहोत खूब ! वैजू, मला खरच माहित नव्हते, की एवढया क्रिटिकल सिच्युएशनमध्येसुद्धा तू एवढी अद्भुत कथा रचू शकतेस. म्हणून मानायला हव है, ग्रेट!" तुच्छतेने वैजूकडे पहात इन्स्पेक्टर चारुशीला मोरेंनी तिची अशी बोळवण केली,

"इन्स्पेक्टर, खरच वैजू खोट बोलत नाहीये. मी सुद्धा हेच पाहिलय काल रात्री प्लीज, विश्वास ठेवा. आम्ही खर सांगतोय. आम्ही निर्दोष आहोत." मयूही मिनतवाऱ्या करू लागली..

पण इन्स्पेक्टर मोरेनी आपला आदेश सोडत त्यांची चांगलीच बतावणी केली.

"जाघवबाई, यांना पहिले आत टाका. असल्या घुतल्या तांदळाला एकदा शिजवूनच काढायला हवं. मग बघा, या काय कसे शिट्टया

झाल्यासारख्या घडाघडा बोलताहेत ते. "इन्स्पेक्टर मोरे तावातावाने बोलत पुढल्या कामाला लागल्या. जाधवबाईनी धाकदपटशा दाखवीत त्या दिघींना एकदाचे लॉकअप केले. मयूचे रडून रडून डोळे सुजले. वैजू घडल्या प्रकाराने बावचळून

गेली होती. मयूला कसा धीर द्यावा हेही तिला कळेना मनाशी काहीतरी आराखडे बांधत मयूला कुशीत घेऊन तिने शांत केले.

इकडे इन्स्पेक्टर मोऱ्यांची धावपळ सुरू झाली. एव्हाना पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला. त्याच्यावर हलकेच नजर टाकत इन्स्पेक्टराची कामानिमित्त फोनाफोनी सुरू होती. तोवर फौजदार देसाई आणि नाईकबाईंनीही गाडीचा रिपोर्ट त्यांच्यासमोर सादर केला. एकेका निष्कर्षांचा मिळता-जुळता पडताळा घेताना त्यांच्या भुवया आक्रसत होत्या. एकंदरीत त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कुठल्याशा कामासाठी घटनास्थळी पोहोचायचे असल्याने मोजकी पोलीस फौज घेऊन त्यांनी जीप काढली आणि त्या निघाल्या निघताना त्यांनी जाधवबाईंना सांगितले,

"त्या दोघींच्या घरी कळवायच राहिलय. जामीनासाठी घरी कळवा म्हणाव मी येतेच एका तासाभरात " असे म्हणत इन्स्पेक्टर चारुशीला मोरे जीपमध्ये बसल्यादेखील सोबतच्या महिलापोलीसांव्यतिरिक्त दोन टू-व्हिलरधारी शिपाईही अन्य धावपळीसाठी त्यांनी सोबत घेतले. वैजू अगदी निवांतपणे त्यांच्या या घांदलीचे निरीक्षण करीत बसली होती...

इन्स्पेक्टर मोरे चौकीतून बाहेर जातात उरल्यासुरल्या महिला पोलीस जरा सुस्तावल्या, त्या पेंगुळलेल्या वातावरणात वैजू मात्र टक्क जागी

होती निवातपणे डबा खाणाऱ्या जाधवबाईंना तिने हाक मारली,

"मावशी, अहो मावशी, जरा इकडे या ना."

"कार्टी नीट जेवूही देत नाही." पुटपुटत जाधवबाई तिच्याजवळ आल्या.

"मावशी, मला जामीन हवाय." वैजू आदबीन त्यांना म्हणाली.

"मग घे ना. मी काय करू ?" जाधवबाई कंटाळवाण्या स्वरात म्हणाल्या.

"अहो, म्हणजे आम्हाला घरी कळवू दे ना." वैजू त्यांना पुन्हा समजावत म्हणाली.

"मग कळव. मी कुठे अडवलंय ? जेवू दे नीट मला" असे म्हणत त्या बाई पुन्हा एकदा आवडीन डब्यासमोर बसल्या.

"मावशी, मला जरा घरी फोन करू दे ना" बैजू पुन्हा अजीजीन म्हणाली.

"श्शी! काय कटकट आहे!" तणतणत जाधवबाईनी लोक उघडले. "मयू, चल घरी फोन लावू " वैजू मयूला हातानी धरून उठवत म्हणाली..

"पण काय सांगणार आत्त्याला ? आपण अटकेत आहोत म्हणून ?" मयू रडत रडत म्हणाली,

"तू फक्त माझ्यासोबत चल" वैजूने मयूची समजूत काढली.

जाधवबाई डब्यावर ताव मारण्यात मग्र पाहून बैजू मयूच्या कानात काहीतरी कुजबुजली. तिच्या बोलण्याने आश्चर्यचकीत होऊन मयू तिच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली. वैजू लॉकअपचे दार उघडून बाहेर पडणार तोच मयूने तिला मागे खेचले. हाताने तिच्या दोन्ही खाद्यांना घट्ट धरत परोपरीने तिच्याकडे पहात नकारार्थी मान हलविली वैजूने पुन्हा हलक्या आवाजात काहीतरी पुटपुटत तिची समजूत काढली. त्यासरशी मयूच्या डोळ्यातून गंगा-यमुना वाहू लागल्या. वैजूने तिचे डोळे पुसत प्रेमभराने तिला मिठी मारली. क्षणभर दोघींनाही अश्रू अडविणे मुश्कील झाले. तेवढ्यात त्याचे गूळपीठ पहात जाधवबाई मोठ्या आवाजात म्हणाल्या,

"ओ लव्हबर्ड्स, उरका उरका इन्स्पेक्टरीन येण्या आधी घरी फोन उरकून घ्या" दोघी हलकेच वाकून लॉकअप्वाहेर आल्या. टेबलाजवळ जाऊन मयूने वाहत्या डोळ्यांनीच रिसिव्हर हातात घेतला. वैजूकडे पहातच तिने फोन लावला. पलीकडून आत्त्या बोलू लागली, पण मयूचे तिच्याकडे लक्षच नव्हते. वैजूने तेव्हा तिला डोळ्यांनी काहीतरी खुणावले आणि

लक्षपूर्वक ती आत्त्याशी बोलू लागली..

"आतु, मी फैजलपूर पोलीस स्टेशनमधून बोलत आहे."

"फैजलपूर, हे कुठे आल ?" आत्याचा न उमजून प्रश्न

आत्त्याच्या या चौकशीने मयूला रडूच कोसळल.

"मयू, बेटा वरी आहेस ना तू ? बेटा रडतीयेस का ?" आत्त्या काळजीने विचारू लागली.

"आत्तु, आत्तु अगं मला अटक केलंय गं तुझी शप्पथ खरंच आम्ही काही नाही केलंय गं." मयूचा बांध फुटला. पुढचं तिला बोलवेच ना. हमसून हमसून ती रडू लागली.

तिच्या बोलण्याकडे पोलीस चौकीतील सगळ्यांचे लक्ष लागले हृदय हेलावणारे तिचे बोलणे ऐकून साऱ्यांचे काळीज पिळवटून गेले. जाधवबाईंसोबत जेवायला बसलेल्या आणखी एका महिला पोलीसाचा घास हातातच अडकला. करुणेने त्या मयूकडे पहात राहिल्या.

इकडे आत्त्याच्या प्रश्नानी ऊर दाटून आलेल्या मयूला स्वतःवर ताबा ठेवणे कठीण गेले. परंतु रडत रडत तिने सारा वृत्तीत आत्त्याला सांगितला. जवळपास पाच मिनीट फोनवर काढल्यानंतर मयूने संभाषण थांबवले. नंतर सावकाश पावले टाकत लॉकअपमध्ये येऊन ती डोळे चोळत बसली.

घडल्या प्रकाराने पोलीस चौकीतील वातावरण जरासे भावूक झाले होते. इतक्यात डबा बंद करून ढेकर देत जाधवबाईंनी तिला मोठ्यांदा सांगितले,

"तुझ्या मैत्रीणीलाही लवकर फोन उरकून घ्यायला सांग." पाणी पिताना मयूकडे लक्ष देत त्यांनी तिला न्याहाळले. जरा इकडे तिकडे नजर टाकत त्या काहीतरी शोधू लागल्या. आणि.. ..आणि अचानक विंचू चावावा तशा त्या ओरडल्या.


लक्षपूर्वक ती आत्याशी बोलू लागली.

"आत्तू, मी फैजलपूर पोलीस स्टेशनमधून बोलत आहे."

39

"फैजलपुर, हे कुठे आलं ?" आत्त्याचा न उमजून प्रश्न

आत्त्याच्या या चौकशीने मयूला रडूच कोसळल

"मयू, बेटा बरी आहेस ना तू ? बेटा रडतीयेस का ?" आत्या काळजीने विचारू लागली.

"आत्तु, आत्तु अग मला अटक केलंय गं तुझी शप्पथ खरंच आम्ही काही नाही केलय गमयूचा बांध फुटला, पुढच तिला बोलवेच ना. हमसून हमसून ती रडू लागली.

तिच्या बोलण्याकडे पोलीस चौकीतील सगळ्यांचे लक्ष लागले. हृदय हेलावणारे तिचे बोलणे ऐकून साऱ्याचे काळीज पिळवटून गेले... जाधवबाईसोबत जेवायला बसलेल्या आणखी एका महिला पोलीसाचा घास हातातच अडकला करुणेने त्या मयूकडे पहात राहिल्या.

इकडे आत्याच्या प्रश्नांनी ऊर दाटून आलेल्या मयूला स्वतःवर ताबा ठेवणे कठीण गेले. परंतु रडत रडत तिने सारा वृत्तांत आत्त्याला सांगितला. जवळपास पाच मिनीट फोनवर काढल्यानंतर मयूने संभाषण थाबवले. नंतर सावकाश पावले टाकत लॉकअपमध्ये येऊन ती डोळे चोळत बसली.

घडल्या प्रकाराने पोलीस चौकीतील वातावरण जरासे भावूक झाले होते. इतक्यात डबा बंद करून ढेकर देत जाधवबाईंनी तिला मोठ्यांदा सागितले,

"तुझ्या मैत्रीणीलाही लवकर फोन उरकून घ्यायला सांग." पाणी पिताना मयूकडे लक्ष देत त्यांनी तिला न्याहाळले. जरा इकडे तिकडे नजर

टाकत त्या काहीतरी शोधू लागल्या. आणि • आणि अचानक विंचू चावावा तशा त्या ओरडल्या,

"अहो देशमुख, ती दुसरी कार्टी कुठे ?"

त्यासरशी सगळ्यांनी चौकीभर नजर टाकली. दोघीजणी बाहेरही पळत गेल्या. सगळीकडे शोध घेतला पण वैजू कुठेच दिसेना. आता मात्र सगळ्याच धाबं दणाणलं. सर्वत्र धावाधाव करूनही वैजूचा मागमूसही लागेना. आपल्या हातावर तुरी देऊन बैजू सटकली हे लक्षात येताच साऱ्या महिला पोलीस 'आता काय ?' या नजरेने एकमेकीकडे पाहू लागल्या.

सारा प्रकार लक्षात येताच जाधवबाईनी लॉकअपमध्ये धाव घेतली मयू गुडघ्यात डोक खुपसून रडत होती. जाधवबाईनी तिच्या अंगावर

अक्षरशः झडपच घातली खसकन तिचे केस ओढून तिला विचारले,

"बोल, तुझी मैत्रीण कुठे आहे ?"

"वैजू ? कुठय वैजू ?" मयूनेही तितक्याच कुतूहलाचे भाव चेहऱ्यावर पसरवत विचारले.

“बास्स् आता नाटक एकदम्म बंद मला काय खुळी समजलीस का गं? दोघींचं एवढ गुळपीठ का चालू होत मघाशी ते आत्ताशी समजल

मला बोल, कुठे पळाली ती ?" जाधवबाईंनी मयूचा छळ मांडला.

पण मयू मात्र घाबरून आणखीनच रडू लागली.

"कार्टी इब्लिसच होती माझंच चुकल. आता खाते बोलणी इन्स्पेक्टरणीची" जाधवबाई स्वतःलाच दोष देऊ लागल्या.

"ए चित्रा, इन्स्पेक्टरणीला कळव. नाहीतर कच्ची खाईल ती मला."

"अहो बाई, तुम्हीच कळवा. आम्ही नाही कळवणार जो कळवेल त्याला काय मैडम सोडतील का ?" चित्राने हात झटकले.

"पण तुम्ही सगळ्याजणी काय झोपला होता का ती कार्टी पळेपर्यंत ? साध दोन घास सुखाने जेवही देत नाही. " बोट मोडत जाधवबाईनी रिसिव्हर हातात घेतला आणि मोठ्या धीरानेच त्यांनी इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना घडला प्रकार कळवला. पलीकडचे फायरिंग ऐकून तणतणत त्यांनी फोन आपटला.

“काय म्हणाल्या मॅडम ?" चित्राने खोचकपणे विचारले.

तशा जाधवबाईही मुद्दाम आवाज चढवून म्हणाल्या,

"काही नाही. आता प्रमोशनच करून टाकते एकेकीच अस म्हणाल्या इन्स्पेक्टरबाई."

एवढया तणावातही चौकीत खसखस पिकली,

Prajkta Gavhane ची आणखी पुस्तके

1

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023
3
0
0

प्रकरण १३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पना

2

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023
1
0
0

प्रकरण २'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली त

3

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ३

8 June 2023
0
0
0

अताशा उन्हाचा कडाका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने मोबाईलवर बोलत जावे तसे आपल्याच धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास केलेल्या या जोडग

4

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 4

8 June 2023
0
0
0

"गाडी नाही काढू देत म्हणजे काय ? पर्किंगसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत का ?" मयू हॉटेलच्या वॉचमनला विचारत होती..."देखो मैडम, मैं कुछ नहीं बता सकता! लेकीन मेमसाहब ने इस गाड़ी को बाहर भेजना म

5

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023
0
0
0

प्रकरण ५गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शू

6

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 6

13 June 2023
0
0
0

प्रकरण ६नानघरच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना

7

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 7

13 June 2023
0
0
0

प्रकरण ७पहाटे मयूला जाग आली तीच पायाशी काहीतरी थरथरल्याने अंग मुडपून रडत रडत डोळा लागलेल्या तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे काळोख होता. फक्त पहाऱ्यासाठीच्या दोन महिला पोलीस शिपाई जवळपास दिसत होत

8

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023
0
0
0

प्रकरण ८सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्

9

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ९

14 June 2023
0
0
0

प्रकरण ९सकाळी सकाळी मयूरीची आत्त्या वकीलाला सोबत घेऊन फैजलपूर पोलीस स्टेशनवर हजर इन्स्पेक्टर चारूशीला मोरे अजून ड्युटीवर आल्या नव्हत्या. जाधवबाईंनी आत्त्यांना सुचवलं आणि ASI चित्राच्या परवानगीने त्यां

10

एकदम्म बिन्धास्त प्रकरण १०

14 June 2023
0
0
0

प्रकरण १०.घड्याळात सकाळचे आठ वाजले होते. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आपल्या ड्युटीवर रुजू झाल्या. आपल्या खुर्चीवर बसत त्यांनी डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर काढून ठेवली. समोर उभ्या असलेल्या फौजदार नाईक बा

11

एकदम्म बिंधास्त प्रकरण 11

16 June 2023
0
0
0

प्रकरण ११जाग आल्याबरोबर वैजू उठून बसली खाली अंथरलेल्या मळक्या गोधडीकडे तिने आश्चर्याने पाहिले. झाडाच्या दाट सावलीने तिला उन्हाच्या झळापासून वाचविले होते खरे पण तरीही वातावरणातील गरम झळा कडक उन्हामुळे

12

एकदम्म बिंधास्त प्रकरण १२

16 June 2023
0
0
0

प्रकरण १२वेळ सायंकाळची फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. केस स्टडीत व्यत्यय आल्याने थोड्याशा अनिच्छिनेच इन्स्पेक्टरचारुशीला मोरेंनी फोन उचलला. पलीकडून कोणीतरी बोलू लागले,'हॅलो, फैजलपूर पोलीस स्टेश

13

एकदम्म बिंधास्त प्रकरण १३

16 June 2023
0
0
0

प्रकरण १३मयू भानावर आली. ते फोनच्या खणखणाटाने !"हॅलो, फौजलपूर पोलीस स्टेशन हिअर इज ASI चित्रा स्पिकिंग" चित्राने उगीचच आवाजात चढउतार करीत समोरच्यावर छाप मारण्याचाप्रयत्न चालविला."अग, एचित्रे, मी काय स

14

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023
0
0
0

प्रकरण १४समद फुलल व्हतं, परशेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली."ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्य

15

एकदम्म बिंधास्त प्रकरण 15

16 June 2023
0
0
0

प्रकरण १५सकाळी सकाळीच पेपर वाचून मयूच्या आत्याचा पारा चढला होता. 'सोमदत्त ढवळे खून प्रकरण: फरार गुन्हेगार वैजयतीने १२०५ फूट उंच 2wv लाईट टॉवरवरून धावत्या ट्रकवर उडी मारली आणि पुन्हा एकदा पोलीसांना गुं

16

एकदम्म बिंधास्त प्रकरण १६

19 June 2023
0
0
0

प्रकरण १६इकडे फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर चारूशीला मोरे हात चोळत बसल्या होत्या टारगट बैजू तर कधीच फरार झाली होती आणि तिच्याविरुद्ध साक्ष देणारा एकमेव 'गाडीवाला पैलवान ही सापडल्याची खबर आत्ता

17

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023
0
0
0

प्रकरण १७वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार क

18

एकदम्म बिंधास्त प्रकरण १८

20 June 2023
0
0
0

प्रकरण १८एव्हाना आत्याची मोटार नानघरच्या अलीकडच्या फाट्यावर येऊन पोहोचली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला."हॅलो, ""हॅलो अत्त्या, मी वैजू बोलतीये.""कोण ? वैजू !" आत्त्या पार उडालीच. लगेचच तिने साठेबाईं

19

एकदम्म बिंधास्त प्रकरण १९

20 June 2023
0
0
0

प्रकरण १९“मॅडम, तुमचं म्हणण खरय त्या मेसेजमधून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. " चित्रा मैसेज डिटेल्स इन्स्पेक्टर मोऱ्यासमोर ठेवतम्हणाली."कोणती माहिती ?" इन्स्पेक्टर मोरे."त्या मुलाचे - सौरभचे मेसे

20

एकदम्म बिंधास्त प्रकरण २०

20 June 2023
0
0
0

प्रकरण २०पिठीने दिलेल्या खास रुबाबदार 'मोगऱ्या' घोड्यावरून बैजूने गोवा हाय वे धरला. 'टग्-डग-टग्-डग्' घोड्याच्या टापांचा आवाज होत होता. थोड्याशा सरावान वैजूला भलत्याच वेगाने घोडा दामटता येऊ लागला.• च्य

21

एकदम्म बिंधास्त प्रकरण २१

20 June 2023
0
0
0

प्रकरण २१फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील आता मोठी रंगत येणार होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी कलिंगूट पार्टी डीटेल्स ऐकून मयूकडे धाव घेतली. जवळपास झडपच घातली तिच्यावर मयू मात्र आत्त्यापासून वैजूला

22

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023
0
0
0

प्रकरण २२"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या माल

23

एकदम्म बिंधास्त प्रकरण २३

20 June 2023
0
0
0

प्रकरण २३आत्ताशी कुठे पोलीसांची जीप गोवा हायवे ला लागली. पण अं हं! जीपवर 'महाराष्ट्र पोलीस' हा बोर्ड नव्हताच मुळी निघण्यापूर्वीच इन्सपेक्टर चारुशीला मोरनी तो काढून ठेवला होता. आणखी एक गोष्ट डोळ्यांना

24

एकदम्म बिंधास्त प्रकरण २४

22 June 2023
1
0
0

"श्शी! या कार्टीन खरंचच मोबाईलमधल कार्ड फेकून दिलेल दिसतय तशी महाईविस आहे ती आता हिला कशी शोधू मी? गोवा हायवे म्हणजे काय तिला तिच्या साताऱ्यातली लंबुळकी गल्ली वाटली की काय ?" वैजूच्या नावाने आत्त्या ख

25

एकदम्म बिंधास्त प्रकरण २५

22 June 2023
0
0
0

पाठलाग करणाऱ्या वैजूला चकवा देण्यासाठी ट्रकवाल्याने आता आपला ट्रक संकेश्वर मार्गाला वळवला होता. पण रस्त्यावरच्या एकसारख्या वर्दळीतूनही वैजूची नजर मात्र त्याच्यावरच पक्की होती. 'GA D४ EX ८०४६' ही नंबर

26

एकदम्म बिंधास्त प्रकरण २६

22 June 2023
0
0
0

"देवा, कुठल्या जन्मीच उरलं सुरलं पुण्य होत रे, तेव्हा पिठीच्या रुपाने ते माझ्या पदरात घातलंस." बैजू काळ्याकुट्ट आकाशात पातुरक्या-पिंजक्या ढगाकडे पहात म्हणाली."मैडम, घोडा," दूरवरून ऐकू आलेल्या आवाजाने

27

एकदम्म बिंधास्त प्रकरण २७

22 June 2023
0
0
0

इकडे पोलीसांची जीप कलिंगूटवर येऊन पोहोचली. मयूच्या काळजात मात्र कालवाकालव झाली. तिच्या आल्याने सांगितल्याप्रमाणे ती w. इथपर्यंत येऊन पोहोचली खरी, पण आता कसे शोधणार इथे वैजूला ? रस्त्यात ना दिसला तो ट्

28

एकदम्म बिंधास्त प्रकरण २८

22 June 2023
0
0
0

लांबवर कुठेतरी म्युझिक ढणढणत होत पण नक्की कुठे याचा काही अंदाज घेता येत नव्हता ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला, तो खूनी ट्रकड्राइव्हरही वैजूला बांधून केव्हाच फरार झाला होता. हात-पाय दोरीने घट्ट

29

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023
1
0
0

सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच

---

एक पुस्तक वाचा