shabd-logo

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023

5 पाहिले 5

प्रकरण ८

सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्त्यालगतच्या लाईट टॉवरच्या टोकाकडे बोट दाखवत होते. फौजदार नाईक बाई त्यांच्या आगमनाने कोड्यात पडल्या.

"मी एम.एस.ई.बी. कडून आली आहे. लाईट टॉवरवरील घटनेसंदर्भात चौकशीसाठी आलो आहे. किती वाजता घडला हा प्रकार ?" त्या अधिकाऱ्याने नाईक बाईंना विचारले,

"प्रकार? कोणता प्रकार ?" काहीच न समजून नाईकबाईंची प्रतिक्रिया..

"हाच. लाईट टॉवरचा मला वाटतंय शार्ट सर्कीट झाल असाव." सहअभियंत्याने पुस्ती जोडली.

"नाईट टॉवर ? शॉर्ट सर्कीट ?" नाईकबाईंना काहीच सुचेना.

"आज पहाटेच म्हणजे सहाच्या सुमारास जिन्नोरकडून येणाऱ्या अमृतधारा' दुध टैकरवरच्या ड्रायव्हरने आम्हाला लाईट टॉवरवर कोणीतरी चढल असल्याची खबर दिली. आत्ता हालचालही दिसत नाहीये कदाचित शॉर्टसर्कीटमुळे ती व्यक्ती जागीच खलास झाली असावी " मुख्य

अधिकाऱ्याने प्रकरणाचा खुलासा केला. "लाईट टॉवरवर कोणीतरी चढलय ? पण कशासाठी ?" अस त्यांनाच उलटपक्षी विचारत फौजदार नाईकबाईनी मान वळवून वर उंचावर

लाईट टॉवरच्या टोकाकडे पाहिले.

"हैं. दिसतंय बरं का कोणीतरी पण आम्ही काही त्या कामासाठी नाही थांबलीय इथे " फौजदार नाईकबाईनी आपली भूमिका स्पष्ट करण्याच्या हेतूने सांगितले.

"मग पहाटेपासून लाईट टॉवरजवळ अजून कोणते काम काढलेत ?" मुख्य अधिकाऱ्याचे कुतूहल जागे झाले.

"काल आमच्या पोलीस चौकीतून एक गुन्हेगार फरार झाली आहे. कालपासून तिच्या शोधात हा परिसर पिंजून काढतोय आम्ही."

"अस असे मला वाटलं याच कामासाठी आलाय की काय ? बरं मग आता आम्ही आमचं काम सुरू करतो फक्त एक मदत करणार का ?"

- मुख्य अधिकारी.

"काय ?"

"जरा तुमच्या गाड्या रोडपासून बाजूला लावता का ? म्हणजे कस, रोडवर आमची व्हॅन, शिडी, जाळी वगैरे व्यवस्थित फिल्डींग लावता येईल," अधिकाऱ्याने विनंती केली.

"एवढंच ना, पवार, तेवढ्या आपल्या सगळ्या गाड्या रोडपासून आतमध्ये आणा. आता निघुयातच आपण थोड्यावेळात इथून " फौजदार नाईकांनी सांगितले.

पटापट पोलीसाच्या सर्व गाड्या रोडपासून आत आणून खाचखळग्याच्या ओसाड जागेत लावल्या कंटाळवाणे शोधकाम बाजूला ठेवून सर्व महिला पोलीस एम.एस.ई.बी. ची मोहीम बघण्यातच गर्क झाल्या

मुख्य अधिकाऱ्याने टावरच्या टोकावरील व्यक्तीला नीट न्याहाळले. उगवत्या सूर्याचा प्रकाश डोळ्यावर येत असल्याने लाईट टावरवरील व्यक्तीकडे पाहणे अवघड झाले आहे. खूप उंचावरील स्थानामुळे काही अंदाज वर्तविणेदेखील शक्य नव्हते. अभियंत्याने कागदावर अगदी चोख प्लॅन आखला. हाताखालच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सूचना दिल्या.

"सर, काही हालचाल दिसत नाहीये म्हणजे जाळ्या लावायला काही हरकत नाही ना ?" अभियंत्याचा मुख्य अधिकाऱ्याला सवाल..

"मला वाटत की आधी सर्कीट चेकिंग करूयात. कोणत्या भागात जपून काम करायला हवे ते समजेल." मुख्य अधिकाऱ्याने सहअभियंत्याला मार्गदर्शन केले.

कर्मचाऱ्यांची, एम.एस.ई.बी. ऑफिसर्सची आपापसात बोलणी सुरू होती. दोन तंत्रज्ञ वर चढण्याची तयारी करीत होते. शक्य तिथपर्यंत त्यांनी शिडी लावली. पुढचा तंत्रज्ञ शिडीवरून वर चढणार तोच त्याने टॉवरवरील व्यक्तीला एकवार बारकाईने न्याहाळले. पुरेसे वर चढून गेल्यावर त्याच्या नजरेस ती व्यक्ती नीट दिसली. मोठ्या आश्चयनि त्याने खाली ओरडून सांगितले,

"सर, कोणीतरी माथेफिरु पोरगी आहे."

"काय वर कोणीतरी मुलगी आहे!" मुख्य अधिकाऱ्याच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही.

'वर कोणीतरी मुलगी आहे' ही बातमी वाऱ्यासारखी सर्व कर्मचाऱ्यांत पसरली. ती वर चढलीच कशी ?' या प्रश्नानेच साऱ्यांना भंडावून सोडले असावे. एव्हाना जमलेल्या सर्व पोलिसांनाही ही खबर मिळाली उत्सुकतेने सारेच टॉवरच्या टोकाकडे पाहू लागले कोणाच्या डोळ्यात हळहळ, तर कोणाच्या उत्सुकता. खरं तर एवढया वर चढलेल्या कोण्या माथेफिरु पोरीविषयी कोणाला आश्चर्यही वाटले पण खरंतर एक अव्यक्त कौतुकही !

"अहो, अहो पाहिलंत का मैडम, ती वैजू आहे. " एक महिला पोलीस जवळपास किंचाळतंच सुटली,

मुख्य अधिकाऱ्याने टावरच्या टोकावरील व्यक्तीला नीट न्याहाळले. उगवत्या सूर्याचा प्रकाश डोळ्यांवर येत असल्याने लाईट टॉवरवरील

व्यक्तीकडे पाहणे अवघड झाले आहे खूप उंचावरील स्थानामुळे काही अंदाज वर्तविणेदेखील शक्य नव्हते अभियंत्याने कागदावर अगदी

4G+

86

चोख प्लॅन आखला. हाताखालच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सूचना दिल्या.

"सर, काही हालचाल दिसत नाहीये म्हणजे जाळ्या लावायला काही हरकत नाही ना ?" अभियंत्याचा मुख्य अधिकाऱ्याला सवाल.

"मला वाटत, की आधी सर्कीट चेकिंग करूयात कोणत्या भागात जपून काम करायला हवे ते समजेल " मुख्य अधिकाऱ्याने सहअभियंत्याला

मार्गदर्शन केले.

कर्मचाऱ्यांची, एम.एस.ई.बी. ऑफिसर्सची आपापसात बोलणी सुरू होती. दोन तंत्रज्ञ वर चढण्याची तयारी करीत होते. शक्य तिथपर्यंत त्यांनी शिडी लावली पुढचा तंत्रज्ञ शिडीवरून वर चढणार तोच त्याने टॉवरवरील व्यक्तीला एकवार बारकाईने न्याहाळले पुरेसे वर चढून गेल्यावर त्याच्या नजरेस ती व्यक्ती नीट दिसली. मोठ्या आश्चर्याने त्याने खाली ओरडून सांगितले,

"सर, कोणीतरी माथेफिरू पोरगी आहे. "

"काय वर कोणीतरी मुलगी आहे!" मुख्य अधिकाऱ्याच्या आश्चर्याला पारावारच उरला नाही.

वर कोणीतरी मुलगी आहे' ही बातमी वाऱ्यासारखी सर्व कर्मचाऱ्यांत पसरली. 'ती वर चढलीच कशी ?' या प्रश्नानेच साऱ्याना भंडावून सोडले असावे. एव्हाना जमलेल्या सर्व पोलिसांनाही ही खबर मिळाली उत्सुकतेने सारेच टॉवरच्या टोकाकडे पाहू लागले कोणाच्या डोळ्यात हळहळ, तर कोणाच्या उत्सुकता. खरं तर एवढया वर चढलेल्या कोण्या माथेफिरु पोरीविषयी कोणाला आश्चर्यही वाटले पण खरंतर एक अव्यक्त कौतुकही !

"अहो, अहो पाहिलंत का मैडम, ती वैजू आहे." एक महिला पोलीस जवळपास किंचाळतच सुटली.

तिच्या अशा ओरडण्याने फौजदार नाईक बाईच्या डोळ्यासमोर तारेच चमकले.

"क्काय? ती कार्टी टॉवरवर!" त्यांना पुढे काही बोलवेचना.

"मॅडम, म्हणजे ती रात्रभर आपल्या डोक्यावर इथेच बसली होती. आणखी एक महिला पोलीस म्हणाली.

"ती कार्टी मेलीये हे जर इन्स्पेक्टर मोरे बाईंना कळाल तर त्या माझ भरीतच करतील.... • मरू दे स्वतःच्या कर्मानच मेली " फौजदार नाईक बाई वैजूला शिव्यांची लाखोली वाहू लागल्या.

फौजदार नाईक बाईंनी एम.एस.ई.बी. ऑफिसरकडे धाव घेतली. घडलेल्या चमत्कारिक घटनेविषयी मुख्य अधिकाऱ्याने जाणून घेतले.मदतीचे आश्वासन देत फौजदार नाईकांना त्यांनी निश्चित राहण्यास सांगितले.

"साहेब, कुठेच शॉर्टसर्कीट झाल नाहीये " चेकींग करणाऱ्या तंत्रज्ञाने खाली ओरडून सांगितले.

"शार्टसकट नाही ? मग ती मुलगी फक्त बेशुद्ध असेल" मुख्य अधिकाऱ्यासमोर आणखी एक समस्या निर्माण झाली. समोरच बसलेल्या महिला पोलीसाना पाहून त्यांना एक कल्पना सुचली.

"फौजदार बाई, गुन्हेगारही तुमचाच आहे आणि ती एक मुलगी आहे म्हणून मला तुमची एक मदत मिळू शेकल का ?"

"हो, हो नक्कीच काय मदत हवी आहे ?"

"आमच्या कर्मचाऱ्यांसोबत जर कोणी दोन महिला पोलीसही वर चढल्या तर तुमच्या गुन्हेगाराला खाली आणणे सोपे जाईल नाही का?

मदत करण्याचे आश्वासन अगाशी आल्याच नाईकाच्या लक्षात आल पण हाती आलेल्या फरार गुन्हेगाराला असे सोडणं शक्य नव्हत. अखेरीस जरा शक्कल लढवून, किंचित स्वार्थाचीही जाणीव होऊन त्यांनी सोबतच्या दोन तरुण महिला पोलीसांना आज्ञा केली.

"प्रज्ञा, सुजाता तुम्ही दोघी नक्कीच वर चढू शकाल. त्या वैजूला खाली आणण्याचं काम तुमच्यावर सोपवते कराल ना ?" आज्ञेपुढे कोणाचे चालते? निमुटपणे त्या दोघी त्या तंत्रज्ञापाठोपाठ शिडीवर चढू लागल्या.

शिडीच्या हादऱ्याने टॉवरचे खांब थोडेसे कंप पावले. खालच्या आवाजाने वैजूला जराशी जाग आली. पहाटेनंतर गार हवेत तिला जराशी झोप लागली होती. रात्रभराच्या अवघडून बसण्यानंतर अताशा तिला त्याची सवय होऊन चांगला डोळा लागला होता. अचानक बसलेल्या हादऱ्याने आता तिला अर्धवट जाग आली होती लागलेली दुर्मिळ झोप मोडल्याने नाराजीने तिच्या तोंडातून अगदी सहजच उद्गार निघाले,

च्यायला! भेडी ! चांगली झोप लागली होती तर "जाभ देत तिने खाली पाहिले आणि तिची झोप कुठल्याकुठे पळाली.
शिडी लावून दोन महिला पोलीस वर चढून येताना तिने पाहिले खालचा प्रत्येक अन् प्रत्येक माणूस आपल्याकडेच टक लावून पाहतोय या विचारानेच तिच्या पोटात एक गोळा उठला. 'आता काय ?' या विचारानेच तिला पुरते पछाडले काहीही झाल तरी याच्या हाती नाही लागायचं एवढंच मनाशी पक्क ठरवून तिने मदतीसाठी इकडे तिकडे पाहिले...




सगळी झाडेझुडूप आता ठेंगणी राहिली होती. काल रात्रीपासून मस्त वाटणारा तोच परिसर जणु तिला गिळायला लागल्याचा भास झाला. टॉवरपासून खाली सांडलेला काळाकभिन्न महाकाय रस्ता, रस्त्याच्या अगदी कडेला लावलेली एम. एस. ई. बी. ची व्हॅन, शिडी, सगळे कर्मचारी, पोलीसांचा कंपू आणि बाकी सारे उजाड माळरान.........एका कटाक्षातच सारे काही स्पष्ट नजरेस भरल 'पुन्हा आपल्याला अपमानस्पद कैद होणार हेही तितकंच स्पष्ट दिसत होत. पण का कोण जाणे, तरीही कुठेतरी एखाद अस्पष्टस सुटकेच भाकीत तिला खुणावत

होत. मनात एकच जिद्द पेटली. 'काहीही करून मी इथून सुटणार" एवढा एकच विचार तिनं मनाशी घोळवला. पण करावे काय ?

तिची अस्वस्थता, चुळबूळ शिडीवरून चढून येणाऱ्या एका महिला पोलीसाच्या नजरेत भरली तसे तिन ओरडून खाली सांगितल.

"मैडम, पोरगी शुद्धीवर आलीये."

तिच्या ओरडण्याने वैजूवर खूपच दडपण आले.

जवळपास पाऊण अंतर चढून आलेल्या महिला पोलीसांना आणि कर्मचाऱ्यांना आता प्रचंड थकवा जाणवू लागला. खालच्या सर्वांचा मात्र उत्साह वाढला होता. इकडे वैजूलाही काय करावे ते सुचेना. अजून वर चढायलाही कुठे जागा नव्हती कुठूनतरी एखादे विमान यावे आणि आपल्याला इथून अलगद उचलून घेऊन जावे, अशी तिची मनोमन इच्छा होती.

"वैजू, खाली उतर. आम्ही तुला सुरक्षित नेऊ " घामाने डबडबलेल्या एका महिला पोलीसाने वैजूला हमी दिली.

एss आणखी वर येऊ नकोस है, नाहीतर ढकलूनच देईन खाली." अजिबात न घाबरल्याचा आव आणत वैजूने तिलाच धमकावले. खरं तर स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याच्या जीवावर बेतेल अस काही करण तिच्या स्वभावातच नव्हत पण कोण जाणे, आता तिच्या जीवावरच बेतल्याने तिला असं बोलायला भाग पडलं असावं.

कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोघी तरुण महिला पोलीस चढून वर येताना पाहून वैजूला आता खरोखरीच घाम फुटला. काय करावं काही सुचेना... "नाही वैजू, अस घाबरून कस चालेल. क्षणात फासे बदलवू शकशील. जर युक्तीने योग्य वागशील!" वैजूने जणु तिचा यशोमंत्रच म्हटला... स्वतःला धीर देत तिने क्षण दोन क्षण गच्च डोळे मिटून घेतले. गरगरणार डोक हातानी घट्ट दाबले. 'मी यातून नक्की सुटेनच.' आतला हाच आवाज तिला साद देत होता.

डोळे उघडून पाहिले तर काय ती बसलेल्या दांडीपासून हातभर अंतरावर दोघी पोलीस पोहोचल्या होत्या मोठ्या शिताफीने तिने त्या टॉवरच्या चौकोनी दांड्या लक्षात घेऊन झट्कन बाजू बदलली आणखी एक उडी मारून ती वर चढून आलेल्या महिला पोलीसाच्या बरोब्बर विरुद्ध दिशेला, टॉवरच्या समोरासमोर दांडीवर उभी राहिली. जणु गढ जिंकल्याच्या आनंदात बेभान झालेल्या त्या महिला पोलीसाने तिला दरडावले,

पळून पळून तरी कुठे पळशील ग ? सापडलीस की नाही ? आता चल गपगुमान खाली."

"एऽऽऽ ज्जा नाही येत" बेडरपणे वैजूने तिला सांगून टाकले.

"नाही येssत ? अशी कश्शी नाही येत ? आता इथून जाशील कुठे ?" फुशारकीने ती पोलीस म्हणाली...

बैजूने पुन्हा एकवार खाली पाहिले. वर चाललेल्या नाट्यमय अॅक्शनपटाकडे सर्वजण तितक्याच उत्सुकतेने पहात होते. सारे सारे आयुष्य मनसोक्त जगलेल्या तिला अशी आगतिक कैद मान्यच नव्हती. अखेर तोही शेवटचा क्षण आला कुठूनतरी मदत मिळावी या अपेक्षेन डोळे भरून तिनं आकाशाकडे पाहिलं. तिच्या शेजारच्या दांडीवर ती पोलीस येऊन पोहोचली. शेवटच्या क्षणी होणारी वाघिणीची तडफड एवढ्या जवळून ती प्रथमच पहात असावी विजयी मुद्रेने तिने वैजूकडे पाहिले.

अजूनही वैजूच्या चेहऱ्यावर आशेची पुसटशी रेष बाकी होती. खालच्या आडव्या तिडव्या रस्त्यावर हलकेच तिची नजर गेली. मघापासून दूरवरून नजरेत भरणारा ठिपक्याएवढासा ट्रक आता आता त्या लाईट टॉवरच्या अगदी नजीक आल्याचे तिच्या चाणाक्ष नजरने हेरले. दांडीवरून कसरत करत त्या पोलीस महिलेने तिला गाठले. आपल्या सोबतच्या मागच्या सहकारी पोलीस महिलेलाही तिने हात देऊन चढण्यास मदत केली. दोघीही सरकत सरकत धरत तोल सांभाळत वैजूच्या दोन्ही बाजूनी येऊन उभ्या राहिल्या. वैजूच्या नजरेत एक - वेगळीच चमक आली होती. खालच्या साऱ्या जमावावर, रस्त्यावर, रस्त्यावरच्या गाड्यावर आणि हो.. धावणाऱ्या त्या खालच्या ट्रकवर तिने नजर स्थिर केली.......खेळण्यातल्या गाडीप्रमाणे

तिला पकडण्यासाठी जवळ आलेल्या एका महिला पोलीसाने हात पुढे केला अन् काय ? वैजूने छद्मी हसत तिच्याकडे तुच्छतेने पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रकवर तिने बिनधोकपणे उडी मारली.

तिच हे धाडस पाहणाऱ्यांच्या डोळ्यावर अक्षरशः झापड आल. सर्द पहाणारा आख्खा जमाव सर्द कसा विश्वास ठेवावा स्वतःच्या

डोळ्यांवर ? ज्याचा त्याचा हाच प्रश्न वैजूने कोणाला काही बाकीच ठेवलं नाही तिच्या अचाट धाडसाने सारेच आवाक् झाले.

सगळ्यांच्या डोळ्यादेखत तो मालवाहू ट्रक बैजूला घेऊन भरधाव निघून गेला...

"पवार, बघतेस काय ? चला, पाठलाग करा त्या ट्रकचा भानावर येताच फौजदार नाईक घाईघाईने निघाल्या.

एम.एस.ई.बी. च्या मदतीसाठी रस्त्यापासून बऱ्याच आत खाचखळग्यात लावलेल्या पोलीसाच्या गाड्या लवकर निघेचनात, फौजदार नाईक बाईंना तर कुठे कुठे पळू ? असं वाटू लागलं. तोपर्यंत वैजूने उडी मारलेला मालवाहू ट्रक बराच दूरवर निघून गेला होता.

अखेर उशीरा का होईना पोलीसांची फौज ट्रकचा पाठलाग करू लागली. तो टूक तर अक्षरश: 'ढणढणत चालला होता. गुळगुळीत पक्क्या डांबरी रस्त्यामुळे त्या सुसाट ट्रकला गाठणे जवळजवळ अशक्य कोटीतच होते. पण आता ट्रक जराशा कच्च्या रस्त्याला लागला तसा त्याचा वेग मंदावला. आपण जीवत आहोत' या कल्पनेनेच वैजूला दिलासा मिळाला. रस्त्यावरून पोलीस पाठलाग करतच असणार. त्यापूर्वीच काहीतरी करायला हवे तिने मनाशी विचार केला. पाय असा ठणकू लागला की कदाचित मोडलाच असावा, पण तरीही ती उठून बसली. जरासे डोके वर काढून भिरभिरत्या नजरेने रस्त्यावर चोरून पाहिले. पण कोणीच नव्हतं. दूरदूरवरही पोलीस दिसेनात. तशी तिला हुशारी आली. 'हीच संधी आहे!' एका क्षणात तिने मंदावलेल्या ट्रकमधून रस्त्यावर उडी मारली. एकदम्म बिनधास्त! आणखी खरचटल पण जीवाच्या किमतीत ते काहीच नव्हतं. आपल्याच धुंदीत धावणाऱ्या त्या ट्रककडे तिने एकवार पाहिलं. धुराळा उडवित तो पसार झाला इकडे मागून दूरवर पोलीस येताना तिच्या नजरेत भरले. क्षणार्धात तिने बाजूच्या ऊसाच्या शेतात अक्षरशः मुसुंडी मारली माणूस दोन माणूसभर उंचीचा ऊस तो तरीही खरचटल्या अंगान ती रस्ता फुटेल तशी पळत सुटली. दुखऱ्या पायानेच..... . खूप वेगात खूप खूप वेगात !

इकडे पोलीस मात्र मोठ्या शर्थीने ट्रकचा पाठलाग करीत दूरवर पोहोचलेदेखील. अर्ध्या तासाच्या पाठलागानंतर अखेर त्यांना तो ट्रक

अडवता आला. ट्रकमध्ये खूप शोधाशोध करूनही वैजू काही सापडेना. तशा वैतागलेल्या नाईकबाईंनी त्या ट्रकड्रायव्हरला चांगलेच फैलावर घेतले.

"ती का कुठेय?" ट्रकच्या मागच्या भागात पुन्हा एकदा नजर टाकत त्यांनी दरडावले.

"कार्टी ?"

"बोल ना, ती पोरगी कुठेय?" नाईकबाईच टेम्पर पार हालल होत.

"कोणती पोरगी ?"

ए नाटक एकदम्म बंद है, सांग तूच केलीस ना तिला पळून जायला मदत ? बोल ना.

"कोणती पोरगी ? कसली मदत : टुकड़ायव्हर पुरता गोंधळला,

केली.

“पवार, याला आख्ख कीर्तन ऐकायचंय अजून चला, आत घ्या याला " वैतागून फौजदार नाईक बाईनी ट्रकड्रायव्हरच्या अटकेची आज्ञा

कलंदर वैजू तर नाहीच हाती लागली उलट अगडबंब ट्रक आणि त्याचा ट्रकड्रायव्हर सोबत घेऊन महिला पोलीसांचा हा वाढलेला ताफा फैजलपूर पोलीस चौकीकडे परतला.

Prajkta Gavhane ची आणखी पुस्तके

1

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023
3
0
0

प्रकरण १३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पना

2

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023
1
0
0

प्रकरण २'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली त

3

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ३

8 June 2023
0
0
0

अताशा उन्हाचा कडाका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने मोबाईलवर बोलत जावे तसे आपल्याच धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास केलेल्या या जोडग

4

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 4

8 June 2023
0
0
0

"गाडी नाही काढू देत म्हणजे काय ? पर्किंगसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत का ?" मयू हॉटेलच्या वॉचमनला विचारत होती..."देखो मैडम, मैं कुछ नहीं बता सकता! लेकीन मेमसाहब ने इस गाड़ी को बाहर भेजना म

5

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023
0
0
0

प्रकरण ५गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शू

6

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 6

13 June 2023
0
0
0

प्रकरण ६नानघरच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना

7

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 7

13 June 2023
0
0
0

प्रकरण ७पहाटे मयूला जाग आली तीच पायाशी काहीतरी थरथरल्याने अंग मुडपून रडत रडत डोळा लागलेल्या तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे काळोख होता. फक्त पहाऱ्यासाठीच्या दोन महिला पोलीस शिपाई जवळपास दिसत होत

8

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023
0
0
0

प्रकरण ८सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्

9

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ९

14 June 2023
0
0
0

प्रकरण ९सकाळी सकाळी मयूरीची आत्त्या वकीलाला सोबत घेऊन फैजलपूर पोलीस स्टेशनवर हजर इन्स्पेक्टर चारूशीला मोरे अजून ड्युटीवर आल्या नव्हत्या. जाधवबाईंनी आत्त्यांना सुचवलं आणि ASI चित्राच्या परवानगीने त्यां

10

एकदम्म बिन्धास्त प्रकरण १०

14 June 2023
0
0
0

प्रकरण १०.घड्याळात सकाळचे आठ वाजले होते. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आपल्या ड्युटीवर रुजू झाल्या. आपल्या खुर्चीवर बसत त्यांनी डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर काढून ठेवली. समोर उभ्या असलेल्या फौजदार नाईक बा

11

एकदम्म बिंधास्त प्रकरण 11

16 June 2023
0
0
0

प्रकरण ११जाग आल्याबरोबर वैजू उठून बसली खाली अंथरलेल्या मळक्या गोधडीकडे तिने आश्चर्याने पाहिले. झाडाच्या दाट सावलीने तिला उन्हाच्या झळापासून वाचविले होते खरे पण तरीही वातावरणातील गरम झळा कडक उन्हामुळे

12

एकदम्म बिंधास्त प्रकरण १२

16 June 2023
0
0
0

प्रकरण १२वेळ सायंकाळची फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. केस स्टडीत व्यत्यय आल्याने थोड्याशा अनिच्छिनेच इन्स्पेक्टरचारुशीला मोरेंनी फोन उचलला. पलीकडून कोणीतरी बोलू लागले,'हॅलो, फैजलपूर पोलीस स्टेश

13

एकदम्म बिंधास्त प्रकरण १३

16 June 2023
0
0
0

प्रकरण १३मयू भानावर आली. ते फोनच्या खणखणाटाने !"हॅलो, फौजलपूर पोलीस स्टेशन हिअर इज ASI चित्रा स्पिकिंग" चित्राने उगीचच आवाजात चढउतार करीत समोरच्यावर छाप मारण्याचाप्रयत्न चालविला."अग, एचित्रे, मी काय स

14

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023
0
0
0

प्रकरण १४समद फुलल व्हतं, परशेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली."ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्य

15

एकदम्म बिंधास्त प्रकरण 15

16 June 2023
0
0
0

प्रकरण १५सकाळी सकाळीच पेपर वाचून मयूच्या आत्याचा पारा चढला होता. 'सोमदत्त ढवळे खून प्रकरण: फरार गुन्हेगार वैजयतीने १२०५ फूट उंच 2wv लाईट टॉवरवरून धावत्या ट्रकवर उडी मारली आणि पुन्हा एकदा पोलीसांना गुं

16

एकदम्म बिंधास्त प्रकरण १६

19 June 2023
0
0
0

प्रकरण १६इकडे फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर चारूशीला मोरे हात चोळत बसल्या होत्या टारगट बैजू तर कधीच फरार झाली होती आणि तिच्याविरुद्ध साक्ष देणारा एकमेव 'गाडीवाला पैलवान ही सापडल्याची खबर आत्ता

17

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023
0
0
0

प्रकरण १७वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार क

18

एकदम्म बिंधास्त प्रकरण १८

20 June 2023
0
0
0

प्रकरण १८एव्हाना आत्याची मोटार नानघरच्या अलीकडच्या फाट्यावर येऊन पोहोचली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला."हॅलो, ""हॅलो अत्त्या, मी वैजू बोलतीये.""कोण ? वैजू !" आत्त्या पार उडालीच. लगेचच तिने साठेबाईं

19

एकदम्म बिंधास्त प्रकरण १९

20 June 2023
0
0
0

प्रकरण १९“मॅडम, तुमचं म्हणण खरय त्या मेसेजमधून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. " चित्रा मैसेज डिटेल्स इन्स्पेक्टर मोऱ्यासमोर ठेवतम्हणाली."कोणती माहिती ?" इन्स्पेक्टर मोरे."त्या मुलाचे - सौरभचे मेसे

20

एकदम्म बिंधास्त प्रकरण २०

20 June 2023
0
0
0

प्रकरण २०पिठीने दिलेल्या खास रुबाबदार 'मोगऱ्या' घोड्यावरून बैजूने गोवा हाय वे धरला. 'टग्-डग-टग्-डग्' घोड्याच्या टापांचा आवाज होत होता. थोड्याशा सरावान वैजूला भलत्याच वेगाने घोडा दामटता येऊ लागला.• च्य

21

एकदम्म बिंधास्त प्रकरण २१

20 June 2023
0
0
0

प्रकरण २१फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील आता मोठी रंगत येणार होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी कलिंगूट पार्टी डीटेल्स ऐकून मयूकडे धाव घेतली. जवळपास झडपच घातली तिच्यावर मयू मात्र आत्त्यापासून वैजूला

22

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023
0
0
0

प्रकरण २२"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या माल

23

एकदम्म बिंधास्त प्रकरण २३

20 June 2023
0
0
0

प्रकरण २३आत्ताशी कुठे पोलीसांची जीप गोवा हायवे ला लागली. पण अं हं! जीपवर 'महाराष्ट्र पोलीस' हा बोर्ड नव्हताच मुळी निघण्यापूर्वीच इन्सपेक्टर चारुशीला मोरनी तो काढून ठेवला होता. आणखी एक गोष्ट डोळ्यांना

24

एकदम्म बिंधास्त प्रकरण २४

22 June 2023
1
0
0

"श्शी! या कार्टीन खरंचच मोबाईलमधल कार्ड फेकून दिलेल दिसतय तशी महाईविस आहे ती आता हिला कशी शोधू मी? गोवा हायवे म्हणजे काय तिला तिच्या साताऱ्यातली लंबुळकी गल्ली वाटली की काय ?" वैजूच्या नावाने आत्त्या ख

25

एकदम्म बिंधास्त प्रकरण २५

22 June 2023
0
0
0

पाठलाग करणाऱ्या वैजूला चकवा देण्यासाठी ट्रकवाल्याने आता आपला ट्रक संकेश्वर मार्गाला वळवला होता. पण रस्त्यावरच्या एकसारख्या वर्दळीतूनही वैजूची नजर मात्र त्याच्यावरच पक्की होती. 'GA D४ EX ८०४६' ही नंबर

26

एकदम्म बिंधास्त प्रकरण २६

22 June 2023
0
0
0

"देवा, कुठल्या जन्मीच उरलं सुरलं पुण्य होत रे, तेव्हा पिठीच्या रुपाने ते माझ्या पदरात घातलंस." बैजू काळ्याकुट्ट आकाशात पातुरक्या-पिंजक्या ढगाकडे पहात म्हणाली."मैडम, घोडा," दूरवरून ऐकू आलेल्या आवाजाने

27

एकदम्म बिंधास्त प्रकरण २७

22 June 2023
0
0
0

इकडे पोलीसांची जीप कलिंगूटवर येऊन पोहोचली. मयूच्या काळजात मात्र कालवाकालव झाली. तिच्या आल्याने सांगितल्याप्रमाणे ती w. इथपर्यंत येऊन पोहोचली खरी, पण आता कसे शोधणार इथे वैजूला ? रस्त्यात ना दिसला तो ट्

28

एकदम्म बिंधास्त प्रकरण २८

22 June 2023
0
0
0

लांबवर कुठेतरी म्युझिक ढणढणत होत पण नक्की कुठे याचा काही अंदाज घेता येत नव्हता ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला, तो खूनी ट्रकड्राइव्हरही वैजूला बांधून केव्हाच फरार झाला होता. हात-पाय दोरीने घट्ट

29

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023
1
0
0

सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच

---

एक पुस्तक वाचा