shabd-logo

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023

4 पाहिले 4
प्रकरण १७

वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार कॉलरचा उठावदार टॉप फुल हातीच्या बाह्या मागे दुमडत ती तरुणी सगळी गिन्हाईक जाण्याचीच वाट बघत होती. तिच्या शहरी चेहऱ्यावर रुळणाऱ्या फिकट कुरळ्या बटा एवढ्या लांबूनही नाम्याच्या नजरेतून सुटल्या नाहीत. समोरची गिन्हाईक पटापट हाकलून देत नाम्या गुणगुणू लागला,

नार नखऱ्याची..

नखऱ्याची चालतीया गाडी,

..... रस्त्याची भलतीच गोडी !"

हिल्ला रस्त्याची

तेवढ्यात त्या तरुणीन पुढे येत मोठ्या रुबाबात सांगितल,

"एक गोड पान, चुना मत लगाना।" काहीतरी चाळा करायचा म्हणून ती आपल्या बटाशी खेळू लागली.

"आर्र व्वा व्वा व्वा! आंधळा मागत्यो येक.

"सी.आय.डी. ऑफिसर मोरे " खिशातील लायसन दाणकन् त्याच्यासमोर आपटत ती आपल्या चॉकलेटी डोळ्यांनी आता त्याचा अंदाज घेऊ लागली.

आनू देव दोन्ही कान बी कापून नेतो." हादरलेला नाम्या गपगुमान पान करू लागला.

बरोब्बर ! वैजूच होती ती. नाम्याच्या चौकशीसाठी पिठीनं सुचविलेल्या युक्तीनुसार ती आली होती तिची एन्ट्री तर दमदार झाली होती पण आता वैजूला नेमकी हवी तीच माहिती नाम्याकडून काढून घ्यायची होती. पुन्हा आपला आवाज वर लावत तिने जवळपास दरडावलेच बिचाऱ्याला,

बोल, कोण गाडीवाला पहिलवान

"त्योच की त्यो कालचा ....." आपली चोरटी नजर उगीचच भोळीभाबडी करत नाम्या म्हणाला.

"देव फक्त तुझे दोन कानच कापेल पण इथून पुढे खोटं बोललास ना तर मी तुझी आख्खी गठडीच !" वैजूचा आवाज कमालीचा उचावला होता.

वळेन आणि थेट जेलची हवा...... झुईंग

त्या जरबेन नाम्याही ताळ्यावर आला आणि घडाघडा बोलू लागला.

"हो, सांगतो सांगतो. "

पान दे ते आधी "नाम्यान तिच्यासमोर सरकवलेलं पान अगदी सराईतासारखं दाढेत चघळत ती शांतपणे पुढचं ऐकू लागली.

"त्यो कालला पीकू अप्वाला आलता माह्याकड तेच्यामंदी गाडीवाला पैलवान व्हता." नाम्या पुन्हा आपल्याला चुना लावतोय हे लक्षात येताच तिने खसकन त्याची कॉलर घरली आणि म्हणाली,

हे बघ नाम्या, आख्ख्या डिपार्टमेंटला यडा समजतोस काय? आमच्या खालच्या मेंगळट बावळट बुद्ध लोकाना गुडाळलंस तु काल पण आम्हाला समजलंय सगळं जाता फक्त तुझ्या तोंडून कबूली घेण्यासाठी म्हणून मी डायरेक्ट कमीश्नर ऑफिसमधून आलीये. तेव्हा आता. 'त्याला धमकावत असतानाच वैजूचा मोबाईल वाजला.

एक लांब पिचकारी मारत तिने फोन घेतला.

"सी.आय.डी. ऑफिसर मोरे स्पिकिंग"

पलीकडून कोणीतरी मोठी व्यक्ती बोलत असल्याचा आव आणत तिच बेमालूम नाटक सुरू होत

"येस, सर चांगला धमकावलाय त्याला बोलेल हळूहळू "

"................'समोरच्याला बोलण्यासाठी मुद्दामच तिने पाँझ घेतला.

"डोन्ट वरी सर तसा काहीही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला कारण त्याच्यावर गावकऱ्यांनीही बरेच आरोप केले आहेत. लोकाचे पैसे बुडविणे, तरुणीची छेडछाड आणि एवढंच नाही, तर गेल्यावर्षी धनगरवस्ती मधील एका तरुणीच्या अब्रू नुकसानीचा देखील चार्ज आहे " वैजू मोठ्या खुबीनं नाम्याला गडवत होती. तिच फोनवरच बोलण ऐकून नाम्याच धाब दणाणलं.

त्याच्यावर

थोड्याच वेळात वैजूने आपले फोनवरच नाटक आटोपले तिने काही बोलण्यापूर्वीच नाम्या गयावया करू लागला.

"मैडम, माफ करा मला पुन्यांदा अश्शी भूल नाय व्हणार पाया पडतो म्या तुमच्या पन जेलात नगा धाडू मला."

"अस्स ना, मग सोग, नक्की काय घडल काल संध्याकाळी ? कोणी फोन केला होता इथून
"काल सांच्याला म्या असाच पान बनवित व्हतो गिराईक नव्हती तवाच यक टरक माह्या टपरीसमोर थांबला त्यातनं जरा सावळा बाबा खाली उतरला. त्योच डायव्हिंग करीत व्हता. बावऱ्या नजरेनं त्यानं समदीकडे पायल आन् काचच्या खोपट्यात जाया लागलं फोन कराया. तर म्या मनले त्येला टाळ हाये. क्वाईन बॉक्सवरन कर तर त्येन मलाच फटकारलं गड्यान उघडूनच घितल त्ये अन् नंतर फोनवर रुमाल टाकून त्ये बोलत व्हत मला समदं खटकलंच. म्हून म्या बी त्येला नीट नेहाळून घितल. त्येचा टरक पायता लंबर लक्षात ठिवला तर तवर त्येच बोलणं आटापले. त्येला बी राहून राहून मावा संशय यायला लागला पर बोललं काय न्हाय त्ये बिल दिल आन माह्या त्वंडाकडं पगत चढल रकमदी गाडी बी सुरू केली. पन् बाऊट खाल्ला व्हता ने त्याने पुन्यांदा काय जाल त्येच त्येलाच ठाव हाये लगीच गाडी वळवून थांबल उत्तारलं आन् आल माह्याकडं माह्या त्वडावर रगड बंडल फिकली आन् मला दरडावल,

जे काय पायलय त्यातला यक सबुद जरी बाहार सांगितला तर उग जीवानिशी जाशील. हो पैस ध्ये आन् बस गए !"

म्हून मंग म्या काल पोलीस बायांना फशिवलं काय बी न्हाय सांगाव तर फोन माह्या टपरीवरनच क्यलेला आनु खर सांगाव तर जीवानिशी जाव लागन म्हून म्या समद उलट सांगितल."

"उलट सांगितल ? म्हणजे ?" वैजूच्या डोळ्यांत चमक आली.

"म्हजी त्यो टरकवाला व्हता, म्या पिक अप वाला बोल्ली त्यो टरक खालागल्या सडकन जाऊन गोव्याकड ग्यला म्या बोल्लो कल्लापूरला यला, आन् त्येचा लवर बी ठाव आसून न्हाय दिला. "

"कम्माल आहे नाम्या तुझी! बर मग तुला आता जर पोलीस चौकीत नसेल भरती व्हायचे तर त्या ट्रकचा नंबर तेवढा सांगून टाक. "

हात्तीच्या यवढंच ना, ध्यो की लिवून GA 04 EX 80 जे ? अ ?"
"80..4.6!" 
अचानक वैजूनेच तो नंबर पूर्ण केला. अडखळणारा नाम्या तिच्या तोंडाकडे पहातच राहिला. वैजूलाही स्वतःचे आश्चर्य वाटले. पण तो नंबर नक्की कुठेतरी पाहिलाय एवढंच तिला

आठवल. नक्की कुठे ते मात्र आठवेना. "नाम्या, तुझी चूक तू कबूल केलीस म्हणून यावेळी तुला सोडून देते. इथून पुढे कोणाला फसवू नकोस, छेडू नकोस. नाहीतर मी स्वतः येऊन

तुला आत टाकेन आणि तेही कायमच चल तेवढे पैसे दे कालचे "

झक्कत सारी बडल तिच्या हातात ठेवून नाम्या नुसता बघतच राहिला

Prajkta Gavhane ची आणखी पुस्तके

1

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023
3
0
0

प्रकरण १३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पना

2

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023
1
0
0

प्रकरण २'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली त

3

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ३

8 June 2023
0
0
0

अताशा उन्हाचा कडाका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने मोबाईलवर बोलत जावे तसे आपल्याच धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास केलेल्या या जोडग

4

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 4

8 June 2023
0
0
0

"गाडी नाही काढू देत म्हणजे काय ? पर्किंगसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत का ?" मयू हॉटेलच्या वॉचमनला विचारत होती..."देखो मैडम, मैं कुछ नहीं बता सकता! लेकीन मेमसाहब ने इस गाड़ी को बाहर भेजना म

5

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023
0
0
0

प्रकरण ५गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शू

6

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 6

13 June 2023
0
0
0

प्रकरण ६नानघरच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना

7

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 7

13 June 2023
0
0
0

प्रकरण ७पहाटे मयूला जाग आली तीच पायाशी काहीतरी थरथरल्याने अंग मुडपून रडत रडत डोळा लागलेल्या तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे काळोख होता. फक्त पहाऱ्यासाठीच्या दोन महिला पोलीस शिपाई जवळपास दिसत होत

8

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023
0
0
0

प्रकरण ८सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्

9

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ९

14 June 2023
0
0
0

प्रकरण ९सकाळी सकाळी मयूरीची आत्त्या वकीलाला सोबत घेऊन फैजलपूर पोलीस स्टेशनवर हजर इन्स्पेक्टर चारूशीला मोरे अजून ड्युटीवर आल्या नव्हत्या. जाधवबाईंनी आत्त्यांना सुचवलं आणि ASI चित्राच्या परवानगीने त्यां

10

एकदम्म बिन्धास्त प्रकरण १०

14 June 2023
0
0
0

प्रकरण १०.घड्याळात सकाळचे आठ वाजले होते. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आपल्या ड्युटीवर रुजू झाल्या. आपल्या खुर्चीवर बसत त्यांनी डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर काढून ठेवली. समोर उभ्या असलेल्या फौजदार नाईक बा

11

एकदम्म बिंधास्त प्रकरण 11

16 June 2023
0
0
0

प्रकरण ११जाग आल्याबरोबर वैजू उठून बसली खाली अंथरलेल्या मळक्या गोधडीकडे तिने आश्चर्याने पाहिले. झाडाच्या दाट सावलीने तिला उन्हाच्या झळापासून वाचविले होते खरे पण तरीही वातावरणातील गरम झळा कडक उन्हामुळे

12

एकदम्म बिंधास्त प्रकरण १२

16 June 2023
0
0
0

प्रकरण १२वेळ सायंकाळची फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. केस स्टडीत व्यत्यय आल्याने थोड्याशा अनिच्छिनेच इन्स्पेक्टरचारुशीला मोरेंनी फोन उचलला. पलीकडून कोणीतरी बोलू लागले,'हॅलो, फैजलपूर पोलीस स्टेश

13

एकदम्म बिंधास्त प्रकरण १३

16 June 2023
0
0
0

प्रकरण १३मयू भानावर आली. ते फोनच्या खणखणाटाने !"हॅलो, फौजलपूर पोलीस स्टेशन हिअर इज ASI चित्रा स्पिकिंग" चित्राने उगीचच आवाजात चढउतार करीत समोरच्यावर छाप मारण्याचाप्रयत्न चालविला."अग, एचित्रे, मी काय स

14

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023
0
0
0

प्रकरण १४समद फुलल व्हतं, परशेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली."ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्य

15

एकदम्म बिंधास्त प्रकरण 15

16 June 2023
0
0
0

प्रकरण १५सकाळी सकाळीच पेपर वाचून मयूच्या आत्याचा पारा चढला होता. 'सोमदत्त ढवळे खून प्रकरण: फरार गुन्हेगार वैजयतीने १२०५ फूट उंच 2wv लाईट टॉवरवरून धावत्या ट्रकवर उडी मारली आणि पुन्हा एकदा पोलीसांना गुं

16

एकदम्म बिंधास्त प्रकरण १६

19 June 2023
0
0
0

प्रकरण १६इकडे फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर चारूशीला मोरे हात चोळत बसल्या होत्या टारगट बैजू तर कधीच फरार झाली होती आणि तिच्याविरुद्ध साक्ष देणारा एकमेव 'गाडीवाला पैलवान ही सापडल्याची खबर आत्ता

17

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023
0
0
0

प्रकरण १७वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार क

18

एकदम्म बिंधास्त प्रकरण १८

20 June 2023
0
0
0

प्रकरण १८एव्हाना आत्याची मोटार नानघरच्या अलीकडच्या फाट्यावर येऊन पोहोचली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला."हॅलो, ""हॅलो अत्त्या, मी वैजू बोलतीये.""कोण ? वैजू !" आत्त्या पार उडालीच. लगेचच तिने साठेबाईं

19

एकदम्म बिंधास्त प्रकरण १९

20 June 2023
0
0
0

प्रकरण १९“मॅडम, तुमचं म्हणण खरय त्या मेसेजमधून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. " चित्रा मैसेज डिटेल्स इन्स्पेक्टर मोऱ्यासमोर ठेवतम्हणाली."कोणती माहिती ?" इन्स्पेक्टर मोरे."त्या मुलाचे - सौरभचे मेसे

20

एकदम्म बिंधास्त प्रकरण २०

20 June 2023
0
0
0

प्रकरण २०पिठीने दिलेल्या खास रुबाबदार 'मोगऱ्या' घोड्यावरून बैजूने गोवा हाय वे धरला. 'टग्-डग-टग्-डग्' घोड्याच्या टापांचा आवाज होत होता. थोड्याशा सरावान वैजूला भलत्याच वेगाने घोडा दामटता येऊ लागला.• च्य

21

एकदम्म बिंधास्त प्रकरण २१

20 June 2023
0
0
0

प्रकरण २१फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील आता मोठी रंगत येणार होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी कलिंगूट पार्टी डीटेल्स ऐकून मयूकडे धाव घेतली. जवळपास झडपच घातली तिच्यावर मयू मात्र आत्त्यापासून वैजूला

22

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023
0
0
0

प्रकरण २२"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या माल

23

एकदम्म बिंधास्त प्रकरण २३

20 June 2023
0
0
0

प्रकरण २३आत्ताशी कुठे पोलीसांची जीप गोवा हायवे ला लागली. पण अं हं! जीपवर 'महाराष्ट्र पोलीस' हा बोर्ड नव्हताच मुळी निघण्यापूर्वीच इन्सपेक्टर चारुशीला मोरनी तो काढून ठेवला होता. आणखी एक गोष्ट डोळ्यांना

24

एकदम्म बिंधास्त प्रकरण २४

22 June 2023
1
0
0

"श्शी! या कार्टीन खरंचच मोबाईलमधल कार्ड फेकून दिलेल दिसतय तशी महाईविस आहे ती आता हिला कशी शोधू मी? गोवा हायवे म्हणजे काय तिला तिच्या साताऱ्यातली लंबुळकी गल्ली वाटली की काय ?" वैजूच्या नावाने आत्त्या ख

25

एकदम्म बिंधास्त प्रकरण २५

22 June 2023
0
0
0

पाठलाग करणाऱ्या वैजूला चकवा देण्यासाठी ट्रकवाल्याने आता आपला ट्रक संकेश्वर मार्गाला वळवला होता. पण रस्त्यावरच्या एकसारख्या वर्दळीतूनही वैजूची नजर मात्र त्याच्यावरच पक्की होती. 'GA D४ EX ८०४६' ही नंबर

26

एकदम्म बिंधास्त प्रकरण २६

22 June 2023
0
0
0

"देवा, कुठल्या जन्मीच उरलं सुरलं पुण्य होत रे, तेव्हा पिठीच्या रुपाने ते माझ्या पदरात घातलंस." बैजू काळ्याकुट्ट आकाशात पातुरक्या-पिंजक्या ढगाकडे पहात म्हणाली."मैडम, घोडा," दूरवरून ऐकू आलेल्या आवाजाने

27

एकदम्म बिंधास्त प्रकरण २७

22 June 2023
0
0
0

इकडे पोलीसांची जीप कलिंगूटवर येऊन पोहोचली. मयूच्या काळजात मात्र कालवाकालव झाली. तिच्या आल्याने सांगितल्याप्रमाणे ती w. इथपर्यंत येऊन पोहोचली खरी, पण आता कसे शोधणार इथे वैजूला ? रस्त्यात ना दिसला तो ट्

28

एकदम्म बिंधास्त प्रकरण २८

22 June 2023
0
0
0

लांबवर कुठेतरी म्युझिक ढणढणत होत पण नक्की कुठे याचा काही अंदाज घेता येत नव्हता ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला, तो खूनी ट्रकड्राइव्हरही वैजूला बांधून केव्हाच फरार झाला होता. हात-पाय दोरीने घट्ट

29

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023
1
0
0

सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच

---

एक पुस्तक वाचा