shabd-logo

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023

3 पाहिले 3
सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच इतक किळसवाणं वाटल मयूला. रश्शी! आयुष्यात पहील्यांदाच इतकं बिभत्स दृश्य पहात होती ती.

"सुटका! सुटका !!" मयूला दुसरे काही सुचणं शक्यच नव्हतं. आपल्यासोबत महिला पोलीसांची आख्खी फलटण आणि तो चंपू

सौऱ्यादेखील आहे याच तिला भानच उरलं नाही. त्या सगळ्या फालतूपणाचा उबग आलेली तिची पावल नकळत मागे फिरली आणि तत्क्षणी

तिच्या दंडाला एक जबर हिसका बसला. त्यासरशी तिन वर पाहिल "थांब, कुठे चाललीस ? वैजू सापडली वाटत" इन्स्पेक्टर मोरे होत्या त्या त्यांच्या दटावण्याने पहील्यांदा तिला खूप भीती वाटली, पण लगेचच खूप हायस वाटून गेल. कोणीतरी 'चांगल" इथे आहे. अगदीच काय आपण अजून एकटे पडलो नाही आहोत याच समाधान होतं ते.

"नाही, नाही मी कुठेच नाही चाललीये, इथेच तर आहे. शोधत होते वैजूला, "काहीतरी बोलावे म्हणून ती बोलली. तेवढ्यात सौऱ्याने तिला

आपल्यासोबत बोलावले. खरं तर तोही भेदरलाच होता. पण मयूसोबत पार्टी एन्जॉय करायचा त्याला आता मूड आला होता. कुठल्याशा

गाण्यावर अखेर दोघानी ठेका धरला.

वेश बदललेल्या महिला पोलीसदेखील एकदम्म खुशीत दिसत होत्या. काहींनी तर चांगलाच डिस्कोवर ताल पकडला होता. आपले वय - काळ-वेळ काम सारं सार विसरून एकदम्म बिनधास्त नाचू लागल्या. त्याना पाहून इन्स्पेक्टर मोरेंना हसू आवरेना, पण आपल्या कर्तव्यदक्ष मोकाट सहकाऱ्यांना पुन्हा एकदा कामाची आठवण करून द्यावी म्हणून प्रत्येकीजवळ जाऊन त्यांनी एकेकीची फिरकी घ्यायला सुरुवात केली. त्यासरशी सगळ्या महिला पोलीस भानावर आल्या.

पार्टी भलतीच रंगात आली होती. तरुण मंडळी एकमेकाच्या गळ्यात गळे घालून थिरकत होती. मयूने सुद्धा सौऱ्यासोबत तात्पुरती केमिस्ट्री जुळविली होती. कोणी ड्रिंक्स घेत होत तर कोणी ड्रग्ज हो, इग्जही उपलब्ध केले गेले होते त्या काळोख्या नरकात झिंगून झिंगून कोणी पडले होते तर थकूनदेखील कोणी बेताल नाचत होते. कदाचित लेट नाईटही उलटून गेली असावी.

साऱ्याच्या साऱ्या महिला पोलीस वैजूला शोधून शोधून दमल्या होत्या. कुणी झोपेला आल्या होत्या तर अजूनही कोणी अखेरच्या प्रयत्नात गाफील होत्या. एकंदरीत सारा उत्साहच पेंगुळला होता. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे मात्र टक्क जाग्या होत्या. सगळ्या शक्यतांचा उलट-सुलट पडताळा घेऊनही वैजूच कोडं काही त्यांच्याच्याने सुटेना. अखेर आता दुसरा उद्देश तरी सफल व्हावा या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली. एकसारखं दबक्या दबक्या आवाजात फोनवर बोलून त्या सापळा रचत होत्या तेवढ्यात त्यांना एक महत्त्वाचा फोन आला.

"मैडम, आम्ही पार्टी एरियाला चहू बाजूनी वेढलय. रस्त्यापर्यंत सेटिंग लावली आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा रेड टाकू वी ऑल आर रेडी."

"थैंक्यू सो मच आता एकदा फक्त मला शेवटचा प्रयत्न करून बघायचाय का कोण जाणे, मला अजूनही अस वाटतंय, की मला हवय ते नक्की इथे मिळेल. तसही आमच्या टीमला अजून फुल अलर्ट करायचय. ठीक आहे. पाच एक मिनीट आणखी बाबा जरा मी करेन फोन तुम्हाला." इन्स्पेक्टर मोऱ्यांनी फोन ठेवला खरा पण खरं तर आजूबाजूला एवढा गोंधळ सुरु झाला होता, की त्याच्या कानठळ्या बसू लागल्याने फोन आटोपता घ्यावा लागला होता. पण अचानक कसा काय वाढला होता एवढा आवाज ? नक्की झालं तरी काय होते ?

हलो ss पार्टी पीपल ss." लाऊडस्पीकरमधून आवाज येऊ लागला.

"हा ssss" पार्टीतील सगळ्यांनी मोठ्या आवाजात ओरडून प्रतिसाद दिला.

" दिस इज टूनाइट्स लास्ट सॉंग अॅन्ड इट इज व्हेरी व्हेरी व्हेरी स्पेशल फॉर यू sss M

"या 555 हू 555." आवाज गगनाला भिडला.

"आर यू आस्कींग व्हाय सो स्पेशल ? जस्ट सी गाईज हू इज परफॉर्मिग

आणि त्या घोषणेनंतर सारी तरुणाई आनंदाने किंचाळू लागली चाबकाच्या फटक्यांनी जनावर ओरडावीत ना तशीच सगळी मंडळी झिंगून भिंगून चित्कारत होती.

म्युझिक सुरू झाले आणि दोन क्षण टोटल ब्लॅक आऊट ! त्यानंतर लाईट इफेक्ट्स आणि क्षणार्धात एका दिलखेचक सुंदरीची एन्ट्री. तिला पाहताक्षणीच कित्येकाच्या काळजाचा ठोका चुकला, आणि सारी तरुण पोर शिट्ट्या वाजवून जलोष्यात थिरकू लागली. गाण्याचे शब्द सुरु झाले आणि त्यासोबत तिच्या मोहक अदा लाईट्समुळे चमचमणारे तिचे कपडे अंधारात फारच उठून दिसत होते मोठा चमत्कारीक पण रेखीव मास्क वापरून तिने आपल्या आकर्षक चेहऱ्यावर रहस्याची झालरही चढविली होती. जोशपूर्ण गाणं आणि भुरळ पडणारं तिचं नृत्य साऱ्या साऱ्या पार्टीला वेड लावत होत मुलीदेखील ड्रिंक्स घेत तिचा हेवा करीत होत्या. सगळेच दिलखुश तरुण तिच्यासोबत एखादा तरी ठेका धरता यावा म्हणून आसुसले होते, पण तिने मात्र आपल्या लीलया अदाकारीने सगळ्यांना सहज लांब ठेवले होते.

इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी पुन्हा आपली शोधमोहिम सुरु केली. दरम्यान आपल्या टीमला सावध केलं आणि इशाऱ्याकडे लक्ष देण्याची सूचना केली. एवढ्या गोंधळातही चपू सौन्या मात्र मयूवरच भाळला होता. मूर्खासारखा एकटक तिच्या डोळ्यात बघत बसला होता. मयूचे हात त्याच्या खांद्यावरच पण तिचं लक्ष मात्र अजिबात त्याच्याकडे नव्हतं मध्यावर चाललेला नाच तिलाही भुरळ पाडून गेला पण का कोण जाणे त्यात तिला फार ओळखीचं काहीतरी भासत होतं. बेधुंद नाचणाऱ्या त्या बिनधास्त नर्तिकेकडे तिचं सारं लक्ष लागलं होतं. तिच्या डोळ्यातही मला फारच जुनी ओळख गवसत होती. सारखं सारखं मयूला वाटे, 'हिला नक्की कुठेतरी पाहिलय. पण कुठे ? त्या अप्रतिम नर्तिकेचा अर्धा चेहरा मास्कने झाकला गेल्याने ती नक्की कोण आहे, हे मात्र मयूच्या लक्षात येईना...

साऱ्या पार्टीत जान आणणारी ती नटखट नर्तकी आता अधिकच खुलून नाचू लागली. बेधुंद बेफिकीर बिनधास्त! शेकडो शिवशिवणाऱ्या हातांकडे साफ कानाडोळा करीत ती नाचत नाचतच ड्रिंक्सपर्यंत पोहोचली. आपल्या नाजूक हातानी तिने एक रंगीत कॉलर खेचली आणि एका आडदांड इसमाला आपल्यासोबत नाचवत मध्यावर आणलं तिनं तिच्यावर फिदा असणाऱ्या सर्वांनीच तिच्या या पसंतीला मात्र नाखुषीच दर्शविली. कारणही तसच होत. मघाच्याच ट्रकचा साधा ट्रकड्रायव्हर तर होता तो ना देखणा ना चिकना चुपड़ा. बघावा असा तर नव्हताच नव्हताच पण साला शुद्धीतही नव्हता नशेतच बरळत होता. तिच्या या पसंतीने त्या ट्रकड्रायव्हरसकट साऱ्यांनाच आश्चर्य वाटलेल.

पण शेवटी स्वप्नीची अप्सराच ती जणु तेव्हा आपल्या वाट्याला ती कशी येणार? असे म्हणत बऱ्याचजणांनी कसाबसा तो धक्का पचवला. हा हा म्हणता गाणं संपल आणि त्याबरोबरच तो लाजवाब नाचही.टाळ्या आणि शिट्ट्यांचा नुसता धुडगूस चालू होता. त्या नर्तकीभोवताली तर नोटाचा नुसता कचरा पडला होता. तिचा नाच संपूनही त्याची नशा मात्र प्रत्येकाच्या डोळ्यांवर अजूनही कायम होती. त्या शेवटच्या आयटमने पार्टी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली होती. तेवढ्यात,

- तेवढ्यात अचानक सगळीकडे लख्ख प्रकाश पडला पिवळ्या प्रकाशाच्या मोठमोठ्ठाल्या फोकसने सारा पार्टी एरिया स्वच्छ लख्ख

दिसू लागला. काय होतय ते कळायच्या आतच इन्स्पेक्टर चारुशीला मोरेनी मध्यावर येऊन हवेत गोळीबार केला. त्यासरशी एकच.

पळापळ एकच गोंधळ उडाला पुन्हा इन्स्पेक्टर मोरेंनी तीन फेरी हवेत झाडल्या, आणि साऱ्या बेगुमान पार्टीला एका जरबेत तळ्यावर आणले. "यू ऑल आर अण्डर अरेस्ट कोणीही पळून जायचा शहाणपणा करू नका कारण दूरपर्यंत सगळ्या एरियाला पोलिसानी विळखा घातलाय.

त्यामुळे चुकुनही कोणी तस करण्याचा प्रयत्न केलाच तर तर डायरेक्ट गोळी घालून उडवून दिलं जाईल. सोssssss स्टॉप द म्युझिक अण्ड यू ऑल ड्रग्ज सप्लायर्स, कम हार चित्रा, बेड्या घाल त्यांना. "

सगळी भेदरलेली तरुण मंडळी धाडून शुद्धीत आली तरुणीचे पाय लटपटू लागले वरवरणारी कोवळी पोर पञ्चात्तापाने रडू लागली. निर्ढावलेले ड्रग्ज सप्लायर्स, DJ, पार्टी अरेंजर सगळे ढिम्म उभे. चित्राने त्यांना बेड्या ठोकल्या. सगळी 'बाप' माणसच अडकल्याने बाकीच्यांच्या सुटकेचा प्रश्नच उद्भवत नव्हता. दोनच मिनीटापूर्वी नाचून जान आलेली ती पार्टी आता सगळं त्राण निघून गेल्यासारखी चिडीचूप्प ! इन्स्पेक्टर मोऱ्याच्या साऱ्या महिला पोलीस त्यांना सहकार्य करीत होत्या. जब्बरदस्त टीम वर्कची ऐशीतैशीच होती. ती शे-दिडशे मद्यधुंद तरुण तरुणी • शुद्ध हरपलेली बेफाम तरुणाईच ती सारी एवढ्या सगळ्यांना काबूत ठेवण मोठं मुश्कील काम होते दरडावून, धमकावून इन्स्पेक्टर मोरे सारी परिस्थिती हाताळत होत्या.

तेवढ्यात माईकचा ताबा त्या मघाचश्या सुंदर नर्तकीने घेतला. आता ती काय बोलणार याकडेच सगळ्याचं लक्ष लागलं.

"अभिनंदन! इन्स्पेक्टर चारुशीला मोरे, मनःपूर्वक अभिनंदन!" तिच्या बोलण्याने इन्स्पेक्टर मोऱ्यांचं लक्ष चाळवलं. पण ही तिऱ्हाईत आयटम गर्ल का आपलं कौतुक करत आहे ते मात्र त्यांना समजेना..

"आता ही यशस्वी रेड टाकल्याबद्दल अभिनंदन करायला नको का तुमचं ? फार कौतुक वाटत असेल ना स्वतःचं ? पण फारसे नका वाटून घेऊ, कारण तुम्ही ज्या मुख्य कामासाठी इथे आला होता ते कुठे पूर्ण झालंय अजून?" मास्कजाडच्या अर्धवट झाकलेल्या त्या चेहऱ्याला आपले काम कसे काय ठाऊक बरे? याच इन्स्पेक्टर मोऱ्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होत...

इकडे चपू सौऱ्याची तर पार घाबरगुडीच उडाली होती भागुबाईसारखा मयूच्या पाठीमागे लपला होता. मयू मात्र विस्मयाने पुनःपुन्हा त्या

नर्तिकेला न्याहाळत होती. तिच बोलणं तिचा आवाज सारे सारे लक्षपूर्वक ऐकत होती. आणि... . क्काय आश्चर्य! मयूला तिची ओळख

पटलीच एकदाची आनंदाने तिचे डोळे चमकले. घावत जाऊन आपल्या लाडक्या मैत्रीणीच्या गळ्यात पढाव अस वाटल तिला, पण आता ती

नर्तकी काय करणार याकडेच तिचंही लक्ष लागून राहिल.

हो, वैजूच होती ती! पण मयूव्यतिरिक्त अजून कोणीच तिला ओळखलं नव्हत इन्स्पेक्टर मोऱ्यांनाही आता ती पुढे

उत्सुकता होती.

काय बोलणार याचीच

"वैजूला पकडायला इथवर येऊन पोहोचलात ना ? मग कुठे पकडली आहे अजून तिला ? इन्स्पेक्टर चारुशीला मोरे, आता मी काय ऐकवते

ते नीट कान उघडून ऐका. (खिशातला मोबाईल बाहेर काढून तिने तो माईकजवळ धरला.)

"ए. यडचाप, माझ्या नादी लागलीस तू ?.

• च्यामारी आता कशाला पळतोस रे भित्र्या भागूबाईसारखा ? त्या

दिवशीसुद्धा असाच पळून गेलास ना नानघरला त्या माणसाला उडवून ?.. •देख पगली, नसीब के खेल होते है।.

सुदैवाने त्यांना तू सापडलीस आणि त्यांनी तुलाच खुनी डिक्लेअरसुद्धा केल. वैसे भी मैं बडा किस्मतवाला हूँ | मग त्यांना माझा काय

... माझ्या

फायदा उरला होता का ? •. म्हणून मग त्यांच्याकडे नसलेली खोटी साक्षसुद्धा फोनवरून देऊन टाकली मी आता खरंच तो खून केलाच होता मी तर मग घाबरायचं कशाला ? फक्त माझ्याऐवजी तुझे नाव सांगायचं, एवढं सोप्प होतं ते! मग देऊन टाकली साक्ष आणि लागली सगळीकडे आग ही ही हीऽऽ हही ही!" (तिने रेकॉर्डींग स्टॉप केली.)'

"ऐकलत ना इन्स्पेक्टर चारूशीला मोरे, या रेकॉर्डमध्ये स्वतःच कबूल झालेला हा घ्या तो खरा खुनी" नशेत झोकाडया खाणाऱ्या शेजारच्या ट्रकड्रायव्हरची कॉलर पकडून धक्के मारत भारत बिलंदर वैजूने त्याला इन्स्पेक्टर मोऱ्यांच्या पायावर लोळवल..

चालू प्रकार उपस्थित सगळ्यांनाच नवा असल्याने कोणाला कशाचाच पत्ता लागत नव्हता इन्स्पेक्टर मोऱ्याची टीम, चपू सौऱ्या आणि मयू मात्र त्या नर्तकीच्या साहसाने थक्क झाले होते. पण अजूनही इन्स्पेक्टर मोरेनी नर्तकीच्या वेशात नक्की कोण आहे. हे ओळखल नव्हत...

चेहऱ्यावरील अर्धा मास्क बाजूला काढून आता ती लावण्यवती नर्तकी इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्याचा तोरा उतरवत म्हणाली, "इन्स्पेक्टर, ही घ्या, मी स्वतः बैजू आता तुमच्यासमोर उभी आहे. अजूनही जर तुम्हाला मीच खुनी वाटत असेल तर याउपर तुमची मर्जी.

खुशाल अटक करा मला " कितीतरी वेळापासून तिला पाहण्याची तगमग लागून राहिलेली सर्व तरुण मंडळी त्या सुंदरीच्या अचाट धाडसाने आता मात्र चाट पडली. 

"ए यडचाप, माझ्या नादी लागलीस तू ?. • च्यामारी! आता कशाला पळतोस रे भित्र्या भागूबाईसारखा ? त्या दिवशीसुद्धा असाच पळून गेलास ना नानघरला त्या माणसाला उडवून ?.. . देख पगली, नसीब के खेल होते है। माझ्या सुदैवाने त्यांना तू सापडलीस आणि त्यांनी तुलाच खुनी डिक्लेअरसुद्धा केल वैसे भी मैं बड़ा किस्मतवाला हूँ। मग त्यांना माझा काय फायदा उरला होता का ? म्हणून मग त्याच्याकडे नसलेली खोटी साक्षसुद्धा फोनवरून देऊन टाकली मी आता खरंच तो खून केलाच होता मी तर मग घाबरायचं कशाला ? फक्त माझ्याऐवजी तुझे नाव सांगायच, एवढं सोप्प होत ते मग देऊन टाकली साक्ष आणि लागली सगळीकडे आग ही ही हीऽऽ हही ही!" तिने रेकॉर्डींग स्टॉप केली. '

"ऐकलंत ना इन्स्पेक्टर चारुशीला मोरे, या रेकॉर्डमध्ये स्वतःच कबूल झालेला हा घ्या तो खरा खुनी " नशेत झोकांडया खाणाऱ्या शेजारच्या ट्रकड्रायव्हरची कॉलर पकडून धक्के मारत मारत बिलंदर बैजूने त्याला इन्स्पेक्टर मोऱ्यांच्या पायावर लोळवले.

चालू प्रकार उपस्थित सगळ्यांनाच नवा असल्याने कोणाला कशाचाच पत्ता लागत नव्हता, इन्स्पेक्टर मोऱ्यांची टीम, चपू सौऱ्या आणि मयू

मात्र त्या नर्तकीच्या साहसाने थक्क झाले होते. पण अजूनही इन्स्पेक्टर मोरेनी नर्तकीच्या वेशात नक्की कोण आहे, हे ओळखल नव्हत. चेहऱ्यावरील अर्धा मास्क बाजूला काढून आता ती लावण्यवती नर्तकी इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांचा तोरा उत्तरवत म्हणाली,

"इन्स्पेक्टर, ही घ्या, मी स्वतः वैजू आता तुमच्यासमोर उभी आहे अजूनही जर तुम्हाला मीच खुनी वाटत असेल तर याउपर तुमची मर्जी.

खुशाल अटक करा मला." कितीतरी वेळापासून तिला पाहण्याची तगमग लागून राहिलेली सर्व तरुण मंडळी त्या सुंदरीच्या अचाट धाडसाने। आता मात्र चाट पडली.

वैजूचं बोलणं ऐकून आता मात्र मयूचा संयम सुटला. त्या घाबरट सौऱ्याला पार उडवून देत ती धावतच वैजूजवळ पोहोचली आणि अना वाट करून देत तिच्या गळ्यातच पडली. किती किती दिवसाचा दुरावा होता तो! किती साऱ्या व्यथा आणि केवढातरी मोठ्ठाला आनंद तो ! सार सारे बोलत होती तिची मिठी अगदी कडकडून भेटल्या एकमेकीना दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी क्षण दोन क्षणापूर्वीच केवढी कठोर झाली होती वैजू ! पण तिचाही गळा दाटून आला, एक अपूर्व भेट.. .एक जिवलग यारी.. बिनधास्त जोडगोळी! • एक नितळ स्वच्छ मैत्री. एक

इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांचा चेहरा पार पडला. खजील झालेल्या त्या स्वताला सावरत वैजू-मयूजवळ आल्या. अक्षरशः हात जोडून म्हणाल्या,

"माझे कर्तव्य करताना माझ्या हातून नकळत चुका झाल्या. पण इथून पुढे मी नक्की काळजी घेईन. जमल्यास मला माफ करा."

वैजू-मयू काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या नजरेला नजरही न भिडवता इन्स्पेक्टर चारुशीला मोरे त्यांच्यासमोरुन दूर झाल्या. उतरल्या चेहऱ्यानेच त्यांनी चित्राला सांगितले,

"चित्रा, या दोघीना सोडून बाकी सगळ्यांना गोवा पोलीसांच्या हवाली कर." "इन्स्पेक्टर, एक विनंती आहे. " पाठमोऱ्या इन्स्पेक्टर मोऱ्यांना मयूने विनंती करीत म्हटले, " तुम्हाला तर माहीत आहे, की आपण कोणामुळे

इथे आत येऊ शकतो ते तेव्हा त्या बिचाऱ्या सौरभला तेवढं प्लीज अटक करू नका तो बिचारा नव्हताच येत आतमध्ये, मी बळेच आणला त्याला तेव्हा. "इन्स्पेक्टर मोऱ्यांनी मानेनेच होकार दिला.

जाधवबाई, त्या भित्र्या पोराला तेवढ सोडा. "

बाकी सगळ्याना पोलीसांनी धाकदपटशा दाखवित गाड्यामध्ये कोंबलं आणि हा हा म्हणता सारी गर्दी ओसरली.

मुळूमुळू रडणाऱ्या चंपू सौऱ्याकडे पाहून वैजून विचारल, "मयू, याला का गं सोडलस ?"

"त्याला अजून बरीच कामे करायची आहेत ना." छद्मी हसत मयू म्हणाली. तिच्या उपकारानी दबलेला सौऱ्याही जणु एका पायावर तयारच होता.

"करणार ना रे? उद्या फैजलपूरला जाऊन तुझी गाडी तुझ्या ताब्यात घे. आमच्या डिपॉझिटचा चेक तर तू लिहून देणारच आहेस. पण आता

दोन दिवस आम्हाला गोव्यात भटकायचंय. तेव्हा सगळी सोय तू बघणारेस मान्य ?"

"मान्य पण मग आज, आत्ता काय करू मी ?"

"आत्ता ना, आत्ता त्या पार्किंगमध्ये जा आणि ट्रकमधून आत्त्याला घेऊन ये. अंधारात जमेल ना एवढं तुला ? चल, नव्वदने नीघ बैजूने स्वाबात फर्मान सोडल, तसा सौऱ्या गपगुमान निघून गेला.

"आता आपण काय करूयात ?" मयूने खिदळत वैजूकडे पाहिल.

"रात बाकी..

• बात बाकी ! चल बीचवर गप्पा मारत हुंदड्यात. "

• पिठुर चादण्यात आणि लाटांच्या आवाजात वैजू मयू यथेच्छ भटकत बसल्या. गार वाऱ्यात फेसाळत्या पाण्यात कित्येक दिवसांच्या गुजगोष्टी उफाळून आल्या ' 'आज खरंचच त्या 'एकदम्म बिनधास्त झाल्या होत्या..

Prajkta Gavhane ची आणखी पुस्तके

1

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023
3
0
0

प्रकरण १३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पना

2

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023
1
0
0

प्रकरण २'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली त

3

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ३

8 June 2023
0
0
0

अताशा उन्हाचा कडाका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने मोबाईलवर बोलत जावे तसे आपल्याच धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास केलेल्या या जोडग

4

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 4

8 June 2023
0
0
0

"गाडी नाही काढू देत म्हणजे काय ? पर्किंगसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत का ?" मयू हॉटेलच्या वॉचमनला विचारत होती..."देखो मैडम, मैं कुछ नहीं बता सकता! लेकीन मेमसाहब ने इस गाड़ी को बाहर भेजना म

5

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023
0
0
0

प्रकरण ५गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शू

6

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 6

13 June 2023
0
0
0

प्रकरण ६नानघरच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना

7

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 7

13 June 2023
0
0
0

प्रकरण ७पहाटे मयूला जाग आली तीच पायाशी काहीतरी थरथरल्याने अंग मुडपून रडत रडत डोळा लागलेल्या तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे काळोख होता. फक्त पहाऱ्यासाठीच्या दोन महिला पोलीस शिपाई जवळपास दिसत होत

8

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023
0
0
0

प्रकरण ८सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्

9

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ९

14 June 2023
0
0
0

प्रकरण ९सकाळी सकाळी मयूरीची आत्त्या वकीलाला सोबत घेऊन फैजलपूर पोलीस स्टेशनवर हजर इन्स्पेक्टर चारूशीला मोरे अजून ड्युटीवर आल्या नव्हत्या. जाधवबाईंनी आत्त्यांना सुचवलं आणि ASI चित्राच्या परवानगीने त्यां

10

एकदम्म बिन्धास्त प्रकरण १०

14 June 2023
0
0
0

प्रकरण १०.घड्याळात सकाळचे आठ वाजले होते. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आपल्या ड्युटीवर रुजू झाल्या. आपल्या खुर्चीवर बसत त्यांनी डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर काढून ठेवली. समोर उभ्या असलेल्या फौजदार नाईक बा

11

एकदम्म बिंधास्त प्रकरण 11

16 June 2023
0
0
0

प्रकरण ११जाग आल्याबरोबर वैजू उठून बसली खाली अंथरलेल्या मळक्या गोधडीकडे तिने आश्चर्याने पाहिले. झाडाच्या दाट सावलीने तिला उन्हाच्या झळापासून वाचविले होते खरे पण तरीही वातावरणातील गरम झळा कडक उन्हामुळे

12

एकदम्म बिंधास्त प्रकरण १२

16 June 2023
0
0
0

प्रकरण १२वेळ सायंकाळची फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. केस स्टडीत व्यत्यय आल्याने थोड्याशा अनिच्छिनेच इन्स्पेक्टरचारुशीला मोरेंनी फोन उचलला. पलीकडून कोणीतरी बोलू लागले,'हॅलो, फैजलपूर पोलीस स्टेश

13

एकदम्म बिंधास्त प्रकरण १३

16 June 2023
0
0
0

प्रकरण १३मयू भानावर आली. ते फोनच्या खणखणाटाने !"हॅलो, फौजलपूर पोलीस स्टेशन हिअर इज ASI चित्रा स्पिकिंग" चित्राने उगीचच आवाजात चढउतार करीत समोरच्यावर छाप मारण्याचाप्रयत्न चालविला."अग, एचित्रे, मी काय स

14

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023
0
0
0

प्रकरण १४समद फुलल व्हतं, परशेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली."ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्य

15

एकदम्म बिंधास्त प्रकरण 15

16 June 2023
0
0
0

प्रकरण १५सकाळी सकाळीच पेपर वाचून मयूच्या आत्याचा पारा चढला होता. 'सोमदत्त ढवळे खून प्रकरण: फरार गुन्हेगार वैजयतीने १२०५ फूट उंच 2wv लाईट टॉवरवरून धावत्या ट्रकवर उडी मारली आणि पुन्हा एकदा पोलीसांना गुं

16

एकदम्म बिंधास्त प्रकरण १६

19 June 2023
0
0
0

प्रकरण १६इकडे फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर चारूशीला मोरे हात चोळत बसल्या होत्या टारगट बैजू तर कधीच फरार झाली होती आणि तिच्याविरुद्ध साक्ष देणारा एकमेव 'गाडीवाला पैलवान ही सापडल्याची खबर आत्ता

17

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023
0
0
0

प्रकरण १७वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार क

18

एकदम्म बिंधास्त प्रकरण १८

20 June 2023
0
0
0

प्रकरण १८एव्हाना आत्याची मोटार नानघरच्या अलीकडच्या फाट्यावर येऊन पोहोचली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला."हॅलो, ""हॅलो अत्त्या, मी वैजू बोलतीये.""कोण ? वैजू !" आत्त्या पार उडालीच. लगेचच तिने साठेबाईं

19

एकदम्म बिंधास्त प्रकरण १९

20 June 2023
0
0
0

प्रकरण १९“मॅडम, तुमचं म्हणण खरय त्या मेसेजमधून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. " चित्रा मैसेज डिटेल्स इन्स्पेक्टर मोऱ्यासमोर ठेवतम्हणाली."कोणती माहिती ?" इन्स्पेक्टर मोरे."त्या मुलाचे - सौरभचे मेसे

20

एकदम्म बिंधास्त प्रकरण २०

20 June 2023
0
0
0

प्रकरण २०पिठीने दिलेल्या खास रुबाबदार 'मोगऱ्या' घोड्यावरून बैजूने गोवा हाय वे धरला. 'टग्-डग-टग्-डग्' घोड्याच्या टापांचा आवाज होत होता. थोड्याशा सरावान वैजूला भलत्याच वेगाने घोडा दामटता येऊ लागला.• च्य

21

एकदम्म बिंधास्त प्रकरण २१

20 June 2023
0
0
0

प्रकरण २१फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील आता मोठी रंगत येणार होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी कलिंगूट पार्टी डीटेल्स ऐकून मयूकडे धाव घेतली. जवळपास झडपच घातली तिच्यावर मयू मात्र आत्त्यापासून वैजूला

22

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023
0
0
0

प्रकरण २२"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या माल

23

एकदम्म बिंधास्त प्रकरण २३

20 June 2023
0
0
0

प्रकरण २३आत्ताशी कुठे पोलीसांची जीप गोवा हायवे ला लागली. पण अं हं! जीपवर 'महाराष्ट्र पोलीस' हा बोर्ड नव्हताच मुळी निघण्यापूर्वीच इन्सपेक्टर चारुशीला मोरनी तो काढून ठेवला होता. आणखी एक गोष्ट डोळ्यांना

24

एकदम्म बिंधास्त प्रकरण २४

22 June 2023
1
0
0

"श्शी! या कार्टीन खरंचच मोबाईलमधल कार्ड फेकून दिलेल दिसतय तशी महाईविस आहे ती आता हिला कशी शोधू मी? गोवा हायवे म्हणजे काय तिला तिच्या साताऱ्यातली लंबुळकी गल्ली वाटली की काय ?" वैजूच्या नावाने आत्त्या ख

25

एकदम्म बिंधास्त प्रकरण २५

22 June 2023
0
0
0

पाठलाग करणाऱ्या वैजूला चकवा देण्यासाठी ट्रकवाल्याने आता आपला ट्रक संकेश्वर मार्गाला वळवला होता. पण रस्त्यावरच्या एकसारख्या वर्दळीतूनही वैजूची नजर मात्र त्याच्यावरच पक्की होती. 'GA D४ EX ८०४६' ही नंबर

26

एकदम्म बिंधास्त प्रकरण २६

22 June 2023
0
0
0

"देवा, कुठल्या जन्मीच उरलं सुरलं पुण्य होत रे, तेव्हा पिठीच्या रुपाने ते माझ्या पदरात घातलंस." बैजू काळ्याकुट्ट आकाशात पातुरक्या-पिंजक्या ढगाकडे पहात म्हणाली."मैडम, घोडा," दूरवरून ऐकू आलेल्या आवाजाने

27

एकदम्म बिंधास्त प्रकरण २७

22 June 2023
0
0
0

इकडे पोलीसांची जीप कलिंगूटवर येऊन पोहोचली. मयूच्या काळजात मात्र कालवाकालव झाली. तिच्या आल्याने सांगितल्याप्रमाणे ती w. इथपर्यंत येऊन पोहोचली खरी, पण आता कसे शोधणार इथे वैजूला ? रस्त्यात ना दिसला तो ट्

28

एकदम्म बिंधास्त प्रकरण २८

22 June 2023
0
0
0

लांबवर कुठेतरी म्युझिक ढणढणत होत पण नक्की कुठे याचा काही अंदाज घेता येत नव्हता ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला, तो खूनी ट्रकड्राइव्हरही वैजूला बांधून केव्हाच फरार झाला होता. हात-पाय दोरीने घट्ट

29

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023
1
0
0

सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच

---

एक पुस्तक वाचा