shabd-logo

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023

1 पाहिले 1
प्रकरण १४

समद फुलल व्हतं, पर

शेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली.

"ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्याला साधं हे जाणवलं देखील नाही तिलाच तिचे नवल वाटेल.

हात धुऊन वैजू शांतपणे जेवू लागली. पिठी मात्र तिला मोठ्या आग्रहाने एकेक पदार्थ वाढत होती पिठल-भाकरी - चटणीचाच साधासा बेत.

. पण पिठीला वजूसोबत जेवण्याचे कौतुकच भारी वैजू मात्र तिच्या कोणत्याच पदार्थाला दाद देईना. अखेरीस पिठीने जरासे चाचरतच

विचारले. "ताय, तुमास्री दुधासगटच ज्यवायची सवय आसन ना ? पर म्या हटकूनच न्हाय इच्चारलं दुधाच अव आमच्यापाशी असतया बकरीचं दूध आन तुमच्यावानी शिटीतल्या लोकासी कसचं चालाच त्ये ? म्हून.. "पिठीच्या मनातील सल आणि आपल्याविषयीची आत्मीयता चढून

वैजूच्या लक्षात आली...

"अगं, नाही ग पिठी, तसं काही नाही बघ तुझ्या हातच्या चवीनंच माझं मन तृप्त झालंय. खरंच मला आवडलाय हा मेनू"

"अ ? हो, हो, त्ये व्हावंद्यात उसक बेसन घ्या की " पिठीने आग्रहाने वैजूला पिठले वाढले. वैजू मात्र पुन्हा स्वतःच्याच विचारात गर्क झाली. तिच्या या शांत बसण्यानं पिठी मात्र खट्ट झाली. न रहावून तिने विचारलेच,

"ताय, बरं न्हाय वाटते का तुमास्री ?"

"नाही गं, कशी एकदम्म ठिकठाक आहे बघ." वैजू.

"मंग? असे अचानक काहून गप बसलात ?"

"मी ? अगं मी कुठे गप्प बसलीये ? किती बडबडतीये तर तुझ्यासोबत

"हावंद्यात नगा सांगू दिसभर माझ्या संग भटकलात तवा चेऱ्यावर कस पार जाई-जुई, गुलाब-चमेली.

मगासच्या यका फोन नंतर पार त्वांड पाडून बसलात पावन लयी बोलल्यात का काय तुमास्री ?"

"पाहुणे ? कोणते पाहुणे " आपल्याच विचारात बुडाल्याने वैजू जरा गोंधळली.

" अव त्येच की वो त्ये तुमच्या मागावरल ओ." पिठी अगदी भाबडेपणे म्हणाली.

वैजूने नुसतीच मान हलवली आणि पुन्हा ती खोल विचारात हरवून गेली. थोडावेळ कोणीच कोणाशी काही बोलल नाही. पिठीला मात्र वैजूच

असं वागणं जरा विचित्रच वाटलं.

जेवण उरकली. पण वैजू ताटातच कसल्याशा रेघोट्या मारत बसली होती. बारीक डोळे करून तिनं मनाशी काहीतरी ठरवलं. पिठी तिलाच निरखत होती. अचानक वैजूने तिला विचारलं,

"पिठी, कुळवाडा कुठे आहे ग ?"

"ह्योच की कुळवाडा."

"क्काय ?" वैजू जवळपास किंचाळलीच.

"का वो ताय, काय झालं ?"

बैजूने पटकन उठून पिठीच्या खोपट्याचं दार आतून घट्ट लावून घेतलं. तिच्या या चमत्कारीक वागण्याने पिठी आणखीनच चक्रावली.

"ताय, काय झालय वो ? काहून दचकलात ?"

"नाही, काही नाही बरं, मला सांग हथे ए-वन् पान शॉप कुठे आहे ?"

"म्हजी ? तुमी त्या नाम्याच्या पानाच्या टपरीला हुडकताय ?" पिठी भलतीच रागावल्यासारखी दिसू लागली.

"कोण नाम्या ?"

"समच्या कुळवाड्यात तेवढी एकलीच पानाची टपरी हाये आन् ती त्या नाम्याची हाये." पिठीच्या बोलण्यात पहिल्यांदाच एवढा तिरस्कार

जाणवला.

"मग उद्याच मला त्याच्याकडे जायचंय. नेशील का ?"

"न्हाय, न्हाय न्हाय, न्हाय, अजाब्बत जमनार न्हाय. जानू तुमचं काय आडलंय त्या नाम्यापाशी खेटर ?" पिठी.

"पिठी, जस्ट कूल डाऊन ठिक आहे, तू नको येऊस माझ्याबरोबर पण मला निदान सांगशील तरी का, की तुझा त्याच्यावर इतका राग का आहे ते?"

"अब म्याच काय, समदा गाव डोळ्यावर धरतंय तेला, बेन हाईच तसं.

पिठीने कडाकडा बोट मोडली.

"अग हो. हो, पण मला सांगशील का नक्की कोण आहे हा नाम्या ? आणि एवढं काय केलय त्यान ?" -

"अव काय क्काय न्हाय केलं ते इच्यारा!" पिठी मुद्द्यावर येऊन पुढे म्हणाली, "पण ताय तुमास्री कशापायी हवा त्येचा नाव-गाव- पत्या १

अं...अं....अं.......समजा, मी तुझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून तुला काही सांगितल, तर तू माझ्यावर विश्वास ठेवशील ? मला थोडी मदत करशील ?" बऱ्याच विचार अन्ती वैजू या निर्णयावर येऊन पोहोचली.

"आत्ता गं बया, काय सारख इस्वास इस्वास लाऊन धरलंय ? त्यो कवा दाखिवलाच नसता तर आनल असतं का तुमास्नी त्या जनुबाच्या

शिवारापास्रं हिथवर ?” पिठीच्या कपाळावरच्या आठ्या तिच्या तोंडाहूनही जास्त बडबडून गेल्या.

"अगे तसे नाही ग पिठी.

.." वैजू समजूतीच्या सुरात म्हणाली.

"काय झालंय त्ये यका दमात बोला."

"मी जेलमधून पळून आले आहे " जितक्या शांतपणे वैजूने हे सांगितले तितक्याच जीऽऽरात पिठीच्या काळजात धस्स झाले.

"आर माह्या कर्मा!" पिठीने कपाळावर हात मारून घेतला.

"तरी वाटतंच व्हतं मला, की.. .." बदललेल्या पिठीला तिथेच अडवून वैजू म्हणाली,

"पिठी प्लीऽऽज, आधी माझे ऐकून तर घे."

"आस पावन्यांकडन कोन सडकला पळून येत व्हय ? बेसूद झाल्याल चावलात काय अन् नाम्याच्या टपरीवर काम काढलेत काय ?.

सकाळपासूनच सगळे आठवत आठवत पिठी मनाशी विचार करू लागली.

"काहून पळालात ?"

"आमची काहीच चूक नसताना उगीचच डोबल पोलिसांनी आम्हाला म्हणून " वैजू एकेक खुलासा करू लागली.

"आमची आम्ही! म्हजी अजूक कोनकोने तुमच्या संग ?"

"मी आणि माझी मैत्रीण. "

"आस्स उगीच कवा पोलीस डाबत्यात का ?"

बघ, मी तुला सांगितलं नव्हत. की तू सुद्धा नाही विश्वास ठेवणार माझ्यावर म्हणून." वैजून मदतीची अपेक्षाच जणु सोडून दिली होती.

"अब अस्स नाय व ताय, पर मला बी भ्याव वाटतं ना..आस्स...'पिठीला मध्येच अडवत वैजू म्हणाली.

"इट्स ओके, पिठी तुझी तरी काय चूक आहे म्हणा. सगळे चुकलं ते माझंच पण, पण तू घाबरू नकोस, जेलमधून पळून आले म्हणून मी सराईत गुन्हेगार असेल असच वाटतंय ना तुला, पण अस घाबरु नकोस मी चूक केलीच नाहीये तर कशाला मी शिक्षा भोगू ? एवढंच म्हणून भागत नाही तर खरच ज्याने चूक केली आहे. त्याला आधी पकडून द्याव लागत आणि त्याचसाठी मी तुरुंगातून पळून आले आहे खऱ्या गुन्हेगाराला मला पकडून द्यायचय" वैजूच्या बोलण्यातला सच्चेपणा बघून पिठी खजील झाली.

"बोला ताई तुमी फकस्त काय मदत हवी तुमास्री ?"

“हा, पर त्येचा आधि सांगणार का येक ? पिठी

"काय ते ?" वैजूच्या डोळ्यांत पुन्हा एक नवी चमक दिसू लागली.

"नक्की काय काय आन कसं कसं घडलं त्ये वाईच सांगता का ?"

"हो. हो. का नाही, तिथेच तर मघापासून अडलोय आपण तर मग ऐक... "वैजूने घडलेली सर्व हकिकत प्रांजळपणे सांगितली. पिठीदेखील वैजूची करामत ऐकून थक्क झाली. "अवं ताय, काय धरून व बसलात त्या बाताड्या नाम्याचं ? येकाला सांगन शेळी हिकडं गेलती तर दुसऱ्याला सांगन आर, हिकडं कवा

आलती ? त्ये काय लयी शान हाये का ?" "म्हणजे? तुला काय म्हणायचंय ? पोलीसांना त्याने खोट सांगितल असेल ?" हळूहळू या नव्या प्रकरणाची वैजूला तोंडओळख होऊ लागली.

" अव खोटे म्हंजी काय, माझ्या मेवशप्पथ सांगते वाटच सांगितलं आसन् त्यानं खर बोलाया बी जीभेला वळन लागत
"नक्की कसा आहे ग हा नाम्या ?"

"समद्या गावाला चुना लावतो त्यो समदे बापे चुकायला फुकायला त्येच्या टपरीवरच मरत्यात. मंग काय, परत्येक घरातलं कळाया काय - येळ लागतोय व्हय? कवा याच्या चुलीतल कोळस त्येच्या चुलीत घालन त्ये समजायच बी न्हाय कवा कवा तर माझी बोकड गुपचिप कोनाकोनाकडन लपास करून घितलीया आनू भलत्यालाच इकलीत या नामड्यान हो, आमच्या धनगर वस्तीवर तर लयी पाळत असती त्येची. समद्या चिकन्या बायावर डोळा वो त्येचा वरीस दीड वरीस झाल जाता, माह्या मावळनीच्या पुरीवर हात टाकला व्हता नालायकान लयी चोपला व्हता तवाच त्येला. तवापासनं न्हाय फिरकत हिकड़ लयी बाण्यारड हाये बेन. त्येला कवा ना कवा चांगला धडा शिकवायचाय. लयी जुना हिसोचे म्हणाव" नाम्याविषयी बोलताना पिठी फोडणी दिल्यासारखी तडतडत होती.

"तो बात ऐसी है !" वैजूला कामाचा आवाका अताशा जाणवू लागला होता. काहीशा विचाराने तिने विचारलं,

"पण पिठी, मला एक गोष्ट कळत नाहीये, तो कशाला खोट बोलेल पोलिसाशी ? ठीक आहे, मान्य की तो फार बर नाही वागत. खोटही बोलतो पण जरा नीट विचार कर, की त्याच्या फोनवरून आमच्याविरुद्ध कोणीतरी पोलिसांना खबर दिली. सगळे खोटच सांगितलं, पण नाम्याला काय माहित की ते खरं की खोट ते तो माणूसही खोटारडा आहे हे त्याला कुठे माहित होत ? आणि म्हणूनच वाटतं, की त्याने जे काही पाहिल ते ते सगळं भोळेभाबडेपणे पोलीसांना सांगितल तो कितीही वाईट असला तरी याचा अर्थ असा तर होत नाही ना, की तो सगळं सांगेल म्हणून काय हरकत आहे त्याच्यावर विश्वास ठेवून बघायला ?"

"ठिवा. खुशाल इस्वास ठिवा पर नंतर येळ निघून गिल्यावर हात चोळत बसाया लागेल न, तवाच कळल, नाम्या कच्या जातीच इब्लिस हाये ते !" पिठी पोटतिडकीन बोलत होती.

"नाम्याकडे ट्रक आहे का ?

"न्हाय."

"बरं, त्याच त्या नानघरच्या ढवळेशी काय वाकड आहे का ?"

"आता त्ये कुनाला ठाऊके ? पन येक नक्की, कुनाशी वाकडं हाये म्हून त्यो कुनाचा मुडदा न्हाय पाडनार यवढं भित्रं हाये म्हूण सांगू..

"त्याची ट्रकवाल्याशी दोस्ती वगैरे.

"नसन आवो टरक पळत्यात पार खालागल्या सडकन यवद आतमदी कुळवाड्याला कशापायी फिरकल्यान ते १

"मग नक्की काय घडलं असाव की त्यामुळे तो खूनी ट्रकड्रायव्हर खोटा फोन करायला एवढ्या लांब, आत गावामध्ये आला आणि त्यानं नाम्याच्या टपरीवरून फोन केला ?" वैजू स्वतः च्या प्रश्नामध्ये अडकू लागली.

पिठी मात्र वैजूला कुतूहलानं निरखत तिचाच विचार करत बसली होती. त्याची जाणीव होताच अवघडल्याने वैजू सहजच तिला म्हणाली,

"अशी काय बघतेस टक लावून ?*

"ताय तुमास्री यक सुचवू का? पिठी -

"काय ?" पिठीची बदललेली नजर ध्यानात घेऊन तिला वैजून विचारल,

बगा ताय, म्हंजी तुमास्री पटतंय का, तुमानी इचारायचंय ना नाम्याला त्या टरकवाल्याबद्दल मंग असे करा....🎵......🎵......🎵.....🎵.....🎵.....🎵.....🎵.....🎵नाम्याला नमवायची एक नामी युक्तीच पिठीन वैजूला सांगितली. तशी वैजूचीही कळी खुलली डोळे आनंदाने चमकू लागले, पिठुर चांदण्यात गार वाऱ्याने कधी तिला भुरळ घातली ते चंद्रालाच ठाऊक!

Prajkta Gavhane ची आणखी पुस्तके

1

एकदम्म बिनधास्त प्रकरण १

7 June 2023
3
0
0

प्रकरण १३६७....३६६.....३६५....३६४.....३६३.. छे, छे! हा काय क्रिकेटचा स्कोअर नाहीये, हे तर आहे चक्क सिग्नलच काउंटडाऊन,चुकून जरी ही वेळ शाळा ऑफिसात पोहोचायची असती ना, तर तुम्हा आम्हा कोणालाच साधी कल्पना

2

एकदम्म बिनधास्त प्रकरण 2

7 June 2023
1
0
0

प्रकरण २'बीप् बीबीए बीप' मेसेज आलेला पाहून मयूने गाडीवर बसल्या बसल्याच मोबाईल उघडला. टळटळीत उन्हामुळे मेसेज नीटसा दिसेना. जर्कीनचा अंधार करून मयूने तो वाचण्याचा प्रयत्न केला. आणि जसजशी ती वाचू लागली त

3

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ३

8 June 2023
0
0
0

अताशा उन्हाचा कडाका कुठल्या कुठे पळाला होता. पक्षी परतीच्या वाटेने मोबाईलवर बोलत जावे तसे आपल्याच धुंदीत आवाज करीत परतत होते. दिवसभर निर्मनुष्य रस्त्यावरून प्रवास केलेल्या या जोडग

4

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 4

8 June 2023
0
0
0

"गाडी नाही काढू देत म्हणजे काय ? पर्किंगसाठी वेगळे पैसे भरायचे आहेत का ?" मयू हॉटेलच्या वॉचमनला विचारत होती..."देखो मैडम, मैं कुछ नहीं बता सकता! लेकीन मेमसाहब ने इस गाड़ी को बाहर भेजना म

5

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 5

13 June 2023
0
0
0

प्रकरण ५गाडी पोलीस स्टेशनच्या आवारात आली. वैजू हा नवखा प्रदेश सारे काही विसरून तितक्याच नवलाईने न्याहाळत होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आणि अन्य महिला पोलीस सहकारी पटापट गाडीतून उतरल्या. मयू मात्र शू

6

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 6

13 June 2023
0
0
0

प्रकरण ६नानघरच्या पुलावर भरपूर मोठा जमाव जमावाला हटकत, पत्रकारांना चुकवत इन्स्पेक्टर मोरे स्थानिक सरपंच मामासाहेब आदकांची भेट घेण्यास गेल्या. स्वतः मामासाहेब आदक हात जोडून इन्स्पेक्टर चारुशीला मोरेना

7

एकदम्म बिन्धास्त प्रकरण 7

13 June 2023
0
0
0

प्रकरण ७पहाटे मयूला जाग आली तीच पायाशी काहीतरी थरथरल्याने अंग मुडपून रडत रडत डोळा लागलेल्या तिने दचकून इकडे तिकडे पाहिले. सगळीकडे काळोख होता. फक्त पहाऱ्यासाठीच्या दोन महिला पोलीस शिपाई जवळपास दिसत होत

8

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ८

14 June 2023
0
0
0

प्रकरण ८सकाळी सकाळी कागवाडा फाट्यावर एम.एस.ई.बी. ची व्हॅन दाखल झाली. समोर उभ्या असलेल्या पोलीसाच्या जीपकडे एम.एस.ई.बी. च्या ऑफिसरचे लक्ष गेले. त्याच्यासोबत आलेले इतर कर्मचारी एकमेकाशी बोलत एकसारखे रस्

9

एकदम्म बिन्धास्त प्रकरण ९

14 June 2023
0
0
0

प्रकरण ९सकाळी सकाळी मयूरीची आत्त्या वकीलाला सोबत घेऊन फैजलपूर पोलीस स्टेशनवर हजर इन्स्पेक्टर चारूशीला मोरे अजून ड्युटीवर आल्या नव्हत्या. जाधवबाईंनी आत्त्यांना सुचवलं आणि ASI चित्राच्या परवानगीने त्यां

10

एकदम्म बिन्धास्त प्रकरण १०

14 June 2023
0
0
0

प्रकरण १०.घड्याळात सकाळचे आठ वाजले होते. इन्स्पेक्टर चारुशीला मोरे आपल्या ड्युटीवर रुजू झाल्या. आपल्या खुर्चीवर बसत त्यांनी डोक्यावरची खाकी टोपी टेबलावर काढून ठेवली. समोर उभ्या असलेल्या फौजदार नाईक बा

11

एकदम्म बिंधास्त प्रकरण 11

16 June 2023
0
0
0

प्रकरण ११जाग आल्याबरोबर वैजू उठून बसली खाली अंथरलेल्या मळक्या गोधडीकडे तिने आश्चर्याने पाहिले. झाडाच्या दाट सावलीने तिला उन्हाच्या झळापासून वाचविले होते खरे पण तरीही वातावरणातील गरम झळा कडक उन्हामुळे

12

एकदम्म बिंधास्त प्रकरण १२

16 June 2023
0
0
0

प्रकरण १२वेळ सायंकाळची फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये फोन खणखणला. केस स्टडीत व्यत्यय आल्याने थोड्याशा अनिच्छिनेच इन्स्पेक्टरचारुशीला मोरेंनी फोन उचलला. पलीकडून कोणीतरी बोलू लागले,'हॅलो, फैजलपूर पोलीस स्टेश

13

एकदम्म बिंधास्त प्रकरण १३

16 June 2023
0
0
0

प्रकरण १३मयू भानावर आली. ते फोनच्या खणखणाटाने !"हॅलो, फौजलपूर पोलीस स्टेशन हिअर इज ASI चित्रा स्पिकिंग" चित्राने उगीचच आवाजात चढउतार करीत समोरच्यावर छाप मारण्याचाप्रयत्न चालविला."अग, एचित्रे, मी काय स

14

एकदम्म बिंधास्त प्रकरण 14

16 June 2023
0
0
0

प्रकरण १४समद फुलल व्हतं, परशेवटची भाकरी तव्यावर टाकून पिठीने वैजूला हाक मारली."ताय, चला ज्यवाया. लय अंधारून आलंय." तिच्या हाकेसरशी बैजू भानावर आली. गेला तासभर तरी आपण विचारात गढून गेलो होतो. आणि आपल्य

15

एकदम्म बिंधास्त प्रकरण 15

16 June 2023
0
0
0

प्रकरण १५सकाळी सकाळीच पेपर वाचून मयूच्या आत्याचा पारा चढला होता. 'सोमदत्त ढवळे खून प्रकरण: फरार गुन्हेगार वैजयतीने १२०५ फूट उंच 2wv लाईट टॉवरवरून धावत्या ट्रकवर उडी मारली आणि पुन्हा एकदा पोलीसांना गुं

16

एकदम्म बिंधास्त प्रकरण १६

19 June 2023
0
0
0

प्रकरण १६इकडे फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर चारूशीला मोरे हात चोळत बसल्या होत्या टारगट बैजू तर कधीच फरार झाली होती आणि तिच्याविरुद्ध साक्ष देणारा एकमेव 'गाडीवाला पैलवान ही सापडल्याची खबर आत्ता

17

एकदम्म बिंधास्त प्रकरण १७

19 June 2023
0
0
0

प्रकरण १७वेळ सकाळी आठ-साडेआठची नाही म्हटल तरी एक-दोन गि-हाईक होतीच नाम्याच्या दुकानासमोर तेवढ्यात त्या सगळ्या गिन्हाईकांच्या पाठीमागे एक गोरीपान नाजूक तरुणी येऊन उभी राहिली. स्टाईलीश ट्राऊझर, टोकदार क

18

एकदम्म बिंधास्त प्रकरण १८

20 June 2023
0
0
0

प्रकरण १८एव्हाना आत्याची मोटार नानघरच्या अलीकडच्या फाट्यावर येऊन पोहोचली होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला."हॅलो, ""हॅलो अत्त्या, मी वैजू बोलतीये.""कोण ? वैजू !" आत्त्या पार उडालीच. लगेचच तिने साठेबाईं

19

एकदम्म बिंधास्त प्रकरण १९

20 June 2023
0
0
0

प्रकरण १९“मॅडम, तुमचं म्हणण खरय त्या मेसेजमधून खूपच भयानक माहिती बाहेर येणार आहे. " चित्रा मैसेज डिटेल्स इन्स्पेक्टर मोऱ्यासमोर ठेवतम्हणाली."कोणती माहिती ?" इन्स्पेक्टर मोरे."त्या मुलाचे - सौरभचे मेसे

20

एकदम्म बिंधास्त प्रकरण २०

20 June 2023
0
0
0

प्रकरण २०पिठीने दिलेल्या खास रुबाबदार 'मोगऱ्या' घोड्यावरून बैजूने गोवा हाय वे धरला. 'टग्-डग-टग्-डग्' घोड्याच्या टापांचा आवाज होत होता. थोड्याशा सरावान वैजूला भलत्याच वेगाने घोडा दामटता येऊ लागला.• च्य

21

एकदम्म बिंधास्त प्रकरण २१

20 June 2023
0
0
0

प्रकरण २१फैजलपूर पोलीस स्टेशनमध्ये देखील आता मोठी रंगत येणार होती. इन्स्पेक्टर चारुशीला मोऱ्यांनी कलिंगूट पार्टी डीटेल्स ऐकून मयूकडे धाव घेतली. जवळपास झडपच घातली तिच्यावर मयू मात्र आत्त्यापासून वैजूला

22

एकदम्म बिंधास्त प्रकरण २२

20 June 2023
0
0
0

प्रकरण २२"मोगऱ्या, अरे माझ्या पट्ट्या, दमलास का रे इतक्यात ?" सोबतच्या पांढऱ्या शुभ्र घोडयाच्या मानेवर थाप मारत बैजू त्याला गोंजारत होती... प्रवासाने त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. आपल्या माल

23

एकदम्म बिंधास्त प्रकरण २३

20 June 2023
0
0
0

प्रकरण २३आत्ताशी कुठे पोलीसांची जीप गोवा हायवे ला लागली. पण अं हं! जीपवर 'महाराष्ट्र पोलीस' हा बोर्ड नव्हताच मुळी निघण्यापूर्वीच इन्सपेक्टर चारुशीला मोरनी तो काढून ठेवला होता. आणखी एक गोष्ट डोळ्यांना

24

एकदम्म बिंधास्त प्रकरण २४

22 June 2023
1
0
0

"श्शी! या कार्टीन खरंचच मोबाईलमधल कार्ड फेकून दिलेल दिसतय तशी महाईविस आहे ती आता हिला कशी शोधू मी? गोवा हायवे म्हणजे काय तिला तिच्या साताऱ्यातली लंबुळकी गल्ली वाटली की काय ?" वैजूच्या नावाने आत्त्या ख

25

एकदम्म बिंधास्त प्रकरण २५

22 June 2023
0
0
0

पाठलाग करणाऱ्या वैजूला चकवा देण्यासाठी ट्रकवाल्याने आता आपला ट्रक संकेश्वर मार्गाला वळवला होता. पण रस्त्यावरच्या एकसारख्या वर्दळीतूनही वैजूची नजर मात्र त्याच्यावरच पक्की होती. 'GA D४ EX ८०४६' ही नंबर

26

एकदम्म बिंधास्त प्रकरण २६

22 June 2023
0
0
0

"देवा, कुठल्या जन्मीच उरलं सुरलं पुण्य होत रे, तेव्हा पिठीच्या रुपाने ते माझ्या पदरात घातलंस." बैजू काळ्याकुट्ट आकाशात पातुरक्या-पिंजक्या ढगाकडे पहात म्हणाली."मैडम, घोडा," दूरवरून ऐकू आलेल्या आवाजाने

27

एकदम्म बिंधास्त प्रकरण २७

22 June 2023
0
0
0

इकडे पोलीसांची जीप कलिंगूटवर येऊन पोहोचली. मयूच्या काळजात मात्र कालवाकालव झाली. तिच्या आल्याने सांगितल्याप्रमाणे ती w. इथपर्यंत येऊन पोहोचली खरी, पण आता कसे शोधणार इथे वैजूला ? रस्त्यात ना दिसला तो ट्

28

एकदम्म बिंधास्त प्रकरण २८

22 June 2023
0
0
0

लांबवर कुठेतरी म्युझिक ढणढणत होत पण नक्की कुठे याचा काही अंदाज घेता येत नव्हता ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला, तो खूनी ट्रकड्राइव्हरही वैजूला बांधून केव्हाच फरार झाला होता. हात-पाय दोरीने घट्ट

29

एकदम्म बिंधास्त प्रकरण २९

22 June 2023
1
0
0

सगळीकडे नुसता सिगरेटचा धूर मंद प्रकाश गाण्यांचा कर्णकर्कश्श ढणढणाट. त्यावर थिरकणारे शे-दीडशे तरुण-तरुणी त्यांच्या हातात झिग झिगत मद्याचे प्याले, आणि कळपाकळपाने नाचणारी त्यांची बेताल पावले ! आत शिरताच

---

एक पुस्तक वाचा