मुलीला काही प्रमाणात द्यावे. मुलाला द्यावे, पण ठराविक प्रमाणात. बाकी अर्थी पुंजी तर स्वतः जवळाच ठेवावी. अर्थात प्राईवेट ! जाहीर केली नसेल तशी!! दुसरे सगळे जाहिर करावे व म्हणावे की आम्हा दोघांना जगेपर्यंत पाहिजे ना ?
अर्थात् आम्हाला पद्धतशीर, समंजसपणे काम करायचे आहे.
प्रश्नकर्ता: पण मनुष्य मृत्यू पावतो, त्या नंतरचे वील कसे असावे ?
दादाश्री : नाही, मृत्यूनंतर तर जे आहे ना आमच्याजवळ, समजा अडीच लाख रुपये उरलेत, ते तर आपल्या उपस्थितीतच, म्हणजे मृत्यूपर्यंत राहू द्यायचेच नाही, शक्य असेल तर ओवरड्राफ्ट काढून घ्यावा. हॉस्पिटलचे, ज्ञानदानाचे, असे सगळे ओवरड्राफ्ट काढून घ्यावे, आणि नंतर जे उरेल ते मुलांना दयावे. आणि थोडे वाचवावे सुद्धा. ती तशी त्यांची लालच आहे ना, त्या लालचेसाठी पन्नास हजार ठेवावे. मग दुसऱ्या दोन लाखांचा ओवरड्राफ्ट काढून घ्यावा, पुढच्या जन्मी आम्ही काय करणार? हे सगळे मागच्या जन्माचे ओवरड्राफ्ट आता खर्च करत आहात, तर या जन्मात ओवरड्राफ्ट नाही का काढावा लागणार? हो, आम्ही कोणाला देऊन नाही टाकले हे. हे तर लोकांच्या हितासाठी, लोक कल्याणासाठी खर्च केले, त्यास ओवरड्राफ्ट म्हणतात. मुलांना देऊन तर पस्तावले आहेत, असे पस्तावले होते ना खरोखरचे! मुलांचे हित कसे करावे, हे तुम्हाला समजले पाहिजे. म्हणून माझ्याजवळ येऊन बातचीत (चर्चा) करुन घ्यावी.
म्हणून मी म्हणतो की धुळीत जावो, त्याऐवजी एखाद्या चांगल्या मार्गी जावे, असे काही करा. सोबत आपल्या उपयोगी पडतील आणि ते तेथे तर जातांना चार नारळ बांधून देतील ना! आणि ते सुद्धा मुलगा काय म्हणेल, 'जरा स्वस्तातले बिन पाण्याचे दद्या ना!' तुमच्या जवळ जर जास्त पैसे असतील तर चांगल्या मार्गी वापरावे, लोकांच्या सुखासाठी खर्च करावे. तेवढेच तुमचे, बाकी गटारीत.......
हे असे सर्व बोलायचे तर नसते. पण तरी आम्ही बोलतो.