मग त्याच्या पुढे ज्ञानदान म्हटले आहे. ज्ञानदानात पुस्तके छापावी, लोकांना समजावून खऱ्या मार्गावर आणावे, आणि लोकांचे कल्याण व्हावे अशी पुस्तके छापून घ्यावी इत्यादी, हे झाले ज्ञानदान, ज्ञानदान दिले तर चांगल्या गतीत, उच्च गतीत जातो किंवा मग मोक्षालाही जातो.
म्हणून मुख्य वस्तू ज्ञानदान असे भगवंतांनी म्हटले आहे. आणि जिथे पैशांची गरज नाही तेथे अभयदानाची गोष्ट सांगितली आहे. जेथे पैशांची देवण-घेवण आहे तेथे हे ज्ञानदान म्हटले आहे. आणि साधारण परिस्थिती, नरम परिस्थितीच्या लोकांना औषधदान व आहारदान द्यायला सांगितले आहे.
ना ?
प्रश्नकर्ता: पण पैसे उरले असतील, तर त्याचे दान तर करावे ना ?
दादाश्री : दान तर उत्तम आहे. जेथे दुःख असेल तेथे दुःख कमी करा आणि दुसरे सन्मार्गावर खर्च करा. लोक सन्मार्गावर जातील असे ज्ञानदान करा. या दुनियेत उच्च असे ज्ञानदान आहे! तुम्ही जरी एक वाक्य जाणले (शिकले तरी किती लाभ होतो तेव्हा हे पुस्तक लोकांच्या हातात आले तर कितीतरी लाभ होईल.
प्रश्नकर्ता आता नीट लक्षात आले......
दादाश्री : हो, म्हणून ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे, त्याने मुख्यतः ज्ञानदान केले पाहिजे.
तर आता हे ज्ञानदान कसे असावे? लोकांना हितकारी होईल असे ज्ञान असावे. हो, पण लुटारुंच्या कथा ऐकण्यासाठी नव्हे. ते तर खाली पाडतात. ते वाचल्यावर आनंद तर होतो, पण खाली अधोगतीत जात राहतात.