प्रश्नकर्ता अर्थात् अशी जागृती ठेवावी की थोडासा पण उलट- सुलट विचार करु नये,
दादाश्री : असे होणे शक्य नाही. असे विचार आल्याशिवाय राहणारच नाही. त्यांना आपण मिटवून टाकू, तेच आपले काम. असे विचार येऊ नये असे आपण ठरवले, तो निश्चय मानला जातो. परंतु विचारच येणार नाही, असे तेथे चालत नाही. विचार तर येतील पण बंध पडण्यापूर्वी त्यांना मिटवून टाकावे. तुम्हाला विचार आला की 'याला दान द्यायचे नाही.' परंतु तुम्हाला ज्ञान दिले आहे तेव्हा तुम्हाला जागृती येईल की मी मध्ये अंतराय का टाकले ? मग त्याला तुम्ही असे मिटवून टाकता. पत्र पोस्टात टाकण्यापूर्वी त्याला मिटवून टाकले तर हरकत नाही ना! पण ते तर ज्ञानाशिवाय कोणी मिटवत नाही ना, अज्ञानी तर मिटवतच नाही ना ? उलट आपण त्याला असे विचारले की असा उलट विचार का केला? त्यावर तो म्हणेल की असे तर करायलाच हवे होते, यात तुम्हाला समजणार नाही. अशा प्रकारे त्याला उलट दुप्पट करून जाड करतो. अहंकार असा वेडेपणाच करतो, नुकसान करतो, त्याचेच नाव अहंकार. स्वतःच स्वतःच्या पायावर कुल्हाड़ी मारतो, त्याचे नाव अहंकार.
आता तर आपण पश्चाताप करुन सगळे मिटवू शकतो आणि मनात निश्चय करावा की असे बोलू नये. आणि हे जे बोललो 'त्या बद्दल क्षमा मागतो' तर सर्व मिटून जाईल. कारण हे पत्र अजून पोस्टात गेलेले नाही. त्या अगोदरच आपण परिवर्तन करुन टाकावे की पूर्वी आम्ही मनात जो विचार केला होता की दान नाही दिले पाहिजे तो विचार खोटा आहे, पण आता आम्ही विचार करतो की 'हे दान करणे चांगले आहे.' म्हणून पूर्वीचे तुमचे मिटून जाईल.
दान करणे, लोकांवर उपकार करणे, ओब्लाईजिंग नेचर ठेवणे, लोकांची सेवा करणे, या सर्वाला रिलेटीव धर्म म्हटले आहे. त्यात पुण्य बांधले जाते. आणि शिव्या दिल्याने, मारामारी करण्याने, लुटण्याने पाप बांधले जाते. पुण्य आणि पाप जेथे आहेत तेथे रियल धर्म नाहीच. पाप- पुण्यरहित धर्म हे रियल धर्म आहे.