प्रश्नकर्ता: लक्ष्मी टिकत नाही, तर काय करावे ?
दादाश्री : लक्ष्मी तर टिकेल अशी नाहीच, पण त्याचा मार्ग बदलून टाकला पाहिजे. ती ज्या मार्गाने जात असेल त्याचा प्रवाह बदलून टाकावा आणि धर्माच्या मार्गावर वळवावी. ती जेवढी सुमार्गावर जाईल तेवढी खरी. भगवंत येतील तेव्हा लक्ष्मी टिकेल, त्याशिवाय लक्ष्मी टिकणारच कशी ? भगवंत असतील तेथे क्लेश होत नाही आणि फक्त लक्ष्मीजी असेल तर क्लेश आणि भांडणे होतात. लोक लक्ष्मी भरपूर कमवतात, पण ती वाया जाते. एखाद्या पुण्यशाली माणसाच्या हातून लक्ष्मी चांगल्या मार्गाने वापरली जाते. लक्ष्मी चांगल्या मार्गाने वापरली जाते, हे एक मोठे पुण्य म्हटले जाते.
सन १९४२ नंतर लक्ष्मीमध्ये काही सारच नाही. हल्ली लक्ष्मी योग्य ठिकाणी वापरली जात नाही. योग्य जागी खर्च झाली, तर फारच चांगले म्हटले जाईल.