आणि दुसरे आहे औषधदान, ते आहारदाना पेक्षा उत्तम मानले जाते, औषधदानाने काय होते? साधारण परिस्थिती असलेला मनुष्य जर आजारी पडला, तर तो इस्पितळात जातो. आणि तेथे कोणी तरी म्हणतो की, 'अरे डॉक्टरांनी सांगितले आहे, पण माझ्याजवळ औषध आणायला पन्नास रुपये नाहीत. म्हणून मी औषध कसे काय आणू ? तेव्हा आपण म्हणायचे की, हे घे पन्नास रुपये औषधसाठी आणि दहा रुपये आणखी घे. किंव्हा मग कुठून तरी औषध आणून आपण त्याला मोफत द्यावे. आपण स्वतः पैसा खर्च करुन औषधे आणून त्याला फ्री ऑफ कॉस्ट
(मोफत) द्यावी. मग त्याने ते औषध घेतले तर तो विचारा चार सहा वर्ष जगेल. अन्नदानाच्या तुलनेने औषधदानाने अधिक फायदा आहे, समजले का तुम्हाला ? कशात फायदा अधिक ? अन्नदान चांगले की औषधदान ?
प्रश्नकर्ता: औषधदान,
दादाश्री : औषधदानाला अन्नदानापेक्षा अधिक मूल्यवान मानले आहे कारण तो दोन महिने पण जिवंत ठेवतो. मनुष्याला थोडे जास्त काळ जिवंत ठेवतो. वेदनेतून थोडी फार मुक्ती करवितो.
बाकी अन्नदान आणि औषधदान तर आपल्याकडे वायका, मुले सर्व सहज करत असतात. ते काही फार मूल्यवान दान नाही. पण तरी केले पाहिजे. जर असा कोणी आम्हाला भेटला, आमच्याकडे कोणी असा दुःखी मनुष्य आला, तर आपल्याकडे जे काही तयार असेल ते लगेच त्याला देऊन टाकावे.