प्रश्नकर्ता : आत्मार्थीकरीता तर कीर्ति अवस्तू आहे ना ?
दादाश्री कीर्ति तर फार नुकसानदायक वस्तू आहे. आत्म्याच्या मार्गावर तर त्याची कीर्ति फार पसरते, पण त्या कीर्तित त्याला इन्टरेस्ट नसतो. कीर्ति तर पसरेलच ना. चकाकणारा हिरा असेल तर त्याला बघून प्रत्येक जण म्हणेल ना की, 'किती चांगला प्रकाश येतोय, किरणे कशी , छान निघत आहे!' लोक म्हणतात नक्कीच पण त्याला स्वतःला त्यात खुशी वाटत नाही. जेव्हाकी ही सांसारिक संबंधाची जी कीर्ति आहे, त्या कीर्तिचेच भिकारी आहे. कीर्तिची भिक आहे म्हणून तर हाईस्कूलमध्ये लाक रुपये देतो, इस्पितळात देतो, पण त्याला कीर्ति मिळाली म्हणजे फार झाले!
मग ते देखिल व्यवहारात असे म्हणतात की दान गुप्त ठेवा. असे गुप्त रुपाने क्वाचितच कोणी देईल, बाकी सगळ्यांना कीर्तिची भूक आहे म्हणून देतात. लोक सुद्धा कौतुक करतात की बुवा! या शेठचे काय संगावे, अहोहो लाख रुपयांचे दान दिले! त्याचा बदला त्याला इथल्या इथेच मिळाला.
अर्थात दिल्यानंतर त्याचा मोबदला इथल्या इथेच घेऊन टाकला. अणि ज्याने गुप्त ठेवले, त्याने मोबदला घेण्याचे पुढच्या जन्मावर सोडले. मोबदला मिळाल्याशिवाय तर रहातच नाही. तुम्ही घ्या की घेऊ नका पण त्याचा मोबदला (ठरलेला) असतोच.
आपपल्या इच्छेनुसार दान द्यायचे असते. हे तर सगळे ठीक आहे, व्यवहार आहे. कोणी आग्रह करेल की आपल्याला दयावेच लागतील. मग फुलहार घालतात म्हणून देतात ते.
दान गुप्त असावे. जसे हे मारवाडी लोक देवाजवळ चुपचाप पेटीत टाकतात ना कोणालाही कळले नाही, तर ते उगवते,