प्रश्नकर्ता: ऑन चे पैसे भले खर्च होत असतील, पण तरी धर्माची ध्वजा लागतेच की धर्माच्या नावावर खर्च केले.
दादाश्री हो पण धर्माच्या नावावर खर्च केले तर चांगले आहे. 8 पण ऑनच्या नावाने करतात. कारण ऑन हा मोठा गुन्हा नाही. 'ऑन' म्हणजे काय की सरकारी टॅक्स जो आहे, तो लोकांना जड जातो, की तुम्ही आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आकाराताय म्हणून हे लोक लपवतात.
प्रश्नकर्ता: काहीतरी प्राप्त करण्याच्या अपेक्षेने जे दान करत, त्याची पण शास्त्रात मनाई नाही. त्याची निंदा केलेली नाही.
दादाश्री अशी अपेक्षा ठेवली नाही तर उत्तम आहे, अपेक्षा ठेवली : तर ते दान निर्मूल झाले, सत्वहीन झालेले म्हटले जाते. पाचच रुपये द्या पण अपेक्षेरहीत द्या.