प्रश्नकर्ता: बरेच जण असे म्हणतात की दान केले तर देवता बनतो, ते खरे आहे काय ?
दादाश्री दान केले, तरी नरकात जातील, असे पण लोक आहे. कारण ते दान कोणाच्या तरी दबावात येऊन करतात. असे आहे की आता या दुषमकाळात लोकांजवळ दान देऊ शकू अशी लक्ष्मीच नसते. दुषम काळातील जी लक्ष्मी आहे ती तर अघोर कर्तव्याची लक्ष्मी आहे. म्हणून जर त्याचे दान दिले तर उलट नुकसान होते. तरीपण जर आपण कोणी दु:खी मनुष्याला दिले, दान देण्याऐवजी त्याची समस्या दूर करण्यासाठी काही केले तर चांगले आहे. दान तर नाव कमवण्यासाठी करतात, त्याला काय अर्थ ? उपाशी असेल तर खायला द्या, कपडे नसतील तर कपडे दया. बाकी या काळात दान देण्यासाठी रुपये कुठून आणावे ? तिथे सगळ्यात चांगले तर दान-बीन देण्याची गरज नाही. स्वतःचे विचार चांगले करा. दान देण्यासाठी धन कुठून आणावे ? खरे धन आलेच नाही ना! आणि खरे धन सरप्लस राहतच (उरतच नाही. हे जे मोठे मोठे दान देतात ना, ते सर्व खात्या बाहेरचे, वरचे धन आले आहे, ते आहे. तरीपण जे दान देतात त्यांच्यासाठी चुकीचे नाही, कारण वाईट मर्गाने मिळवले व चांगल्या मार्गाने दिले, तरी पण मधेच पापापासून मुक्त तर झाले! शेतात बी पेरले गेले, म्हणून उगवले आणि तेवढे तरी फळ मिळाले.
प्रश्नकर्ता : भक्तिपदांमध्ये एक ओळ आहे ना, की दाणचोरी करणारे सुईदानाने सुटू इच्छितात. तर तेथे एके ठिकाणी दाणचोरी (चुकीच्या मार्गाने खूप सारे धन कमावणे, तस्करी) केली आणि दुसऱ्या ठिकाणी दान केले, तर त्याने तेवढे तरी प्राप्त केले ना ? असे म्हणू शकतो ?
दादाश्री : नाही, प्राप्त झाले असे नाही म्हणवत. ती तर नरकात
जाण्याची निशाणी म्हटली जाईल. तो तर नियत चोर आहे. दाणचोराने (तस्कराने) चोरी केली आणि सुईचे दान दिले. त्या ऐवजी दान नाही दिले पण सरळ राहिला तरी बरे. असे आहे ना, की सहा महिन्याची जेलची शिक्षा बरी मध्ये दोन दिवस बागेत घेऊन जातील, त्याचा काय अर्थ ?
हे तर काय सांगू इच्छिता की हा सगळा काळा बाजार, तस्करी वगैरे केली आणि नंतर पन्नास हजार दान दिले, जेणे करुन स्वतः चे नाव खराब दिसू नये, स्वतःचे काम बिघडू नये, म्हणून दान देतात, यालाच सुईचे दान म्हणतात.
प्रश्नकर्ता म्हणजे असे सात्विक तर आता नाहीत ना? :
दादाश्री : असे संपूर्ण सात्विकतेची आशा तर ठेवूच शकत नाही ना! पण हे तर कोणासाठी आहे, की जे मोठे लोक करोडो कमवतात " आणि एकीकडे लाख रुपयांचे दान देतात. ते कशासाठी ? तर स्वतःचे नाव खराब होऊ नये. या काळातच असे सुईचे दान चालते, हे खूप समजण्यासारखे आहे. दुसरे लोक दान देतात, त्यातील काही सदगृहस्थही असतात. साधारण परिस्थितीचे असतात. ते लोक दान देतात त्यात हरकत नाही. हे तर सुईचे दान देऊन स्वतःचे नाव बिघडू देत नाही. आपले नाव झाकण्यासाठी कपडे बदलून टाकतात! फक्त दिखाव्यासाठी असे दान देतात!
प्रश्नकर्ता म्हणजे असे सात्विक तर आता नाहीत ना?
दादाश्री असे संपूर्ण सात्विकतेची आशा तर ठेवूच शकत नाही ना! पण हे तर कोणासाठी आहे, की जे मोठे लोक करोडो कमवतात आणि एकीकडे लाख रुपयांचे दान देतात. ते कशासाठी? तर स्वतः चे नाव खराब होऊ नये. या काळातच असे सुईचे दान चालते. हे खूप समजण्यासारखे आहे. दुसरे लोक दान देतात, त्यातील काही सदगृहस्थही असतात. साधारण परिस्थितीचे असतात. ते लोक दान देतात त्यात हरकत नाही. हे तर सुईचे दान देऊन स्वतः चे नाव बिघडू देत नाही. आपले नाव झाकण्यासाठी कपडे बदलून टाकतात! फक्त दिखाव्यासाठी असे दान देतात!
आता तर धनदान देतात की घेतात? आणि दान जे देतात ते तर 'मिसा'चे (तस्करीचे).