कित्येकांना दान द्यायचे नसते, त्यांच्या मनात नसते पण ते वाणीने
म्हणतात की मला दयायचे आहे, आणि वर्तनात ही तसे ठेवतात आणि
देतातही. परंतु मनात यायचे नसल्यामुळे फळ मिळत नाही.
प्रश्नकर्ता: दादाजी, असे का होते ?
दादाश्री : एक मनुष्य मनाने देतो, कारण त्याच्याकडे तेवढी सोय नाही आणि वाणीने तो असे बोलतो की मला दयायचे आहे पण मी देऊ शकत नाही. त्याचे फळ त्याला पुढच्या जन्मी मिळते, कारण ते दिल्यासारखेच आहे. देवाने स्वीकार केला. अर्धा लाभ तर झालाच.
देवळात जाऊन एका मनुष्याने एकच रुपया ठेवला दुसऱ्या एका शेठने एक हजार रुपये दानात दिले, ते पाहून तुमच्या मनात आले की अरे, माझ्याजवळ असते तर मी पण दिले असते. ते तुमचे तेथे जमा होतात. तुमच्याजवळ नाहीत, म्हणून तुमच्याकडून दिले जात नाही. येथे तर दिले त्याची किंमत नाही, भावनेची किंमत आहे. वीतरागांचे विज्ञान आहे.
आणि जो देणारा आहे, त्याचे केव्हा कितीतरी पट होईल. पण ते कसे ? तर जेव्हा मनापासून द्यायचे आहे, वाणीने द्यायचे आहे, वर्तनाने दयायचे आहे, असे असेल तर त्याचे फळ तर या जगात काय नसेल ते विचारा. आता तर सगळे म्हणतील, त्या अमक्यामुळे मला द्यावे लागले, नाहीतर मी दिले नसते. त्या साहेबाने दबाव घातला म्हणून मला द्यावे लागले. म्हणून मग तेथे तुमचे जमाही तसेच होते बरं का? ते तर आपण मनापासून, राजीखुशीने दिलेले कामी येते. असे करतात का लोक? असे कुणाच्या दबावामुळे देतात ?
प्रश्नकर्ता हो, हो !
दादाश्री : अरे कित्येक तर आपला स्वाव जमवण्यासाठी देतात. नाव, स्वतःची अब्रु वाढविण्यासाठी देतात. मनात तर असे असते, की जाऊ द्या ना! देण्यासारखे तर नाही, पण आमचे वाईट दिसेल, तेव्हा मग तसे फळ मिळते. हे सर्व जसे चित्रित करतात तसे फळ मिळते. आणि एखाद्या मनुष्याजवळ पैसे नसतील पण तरी 'माझ्याजवळ असते तर मी दिले असते.' असे म्हणेल, त्याला कसे फळ मिळते ?