प्रश्नकर्ता : हिराबाच्या बाबतीत आपण त्यांच्या मागे (त्यांच्या मृत्युनंतर) जो खर्च तेला, तो व्यवहारात कसा समजला जातो ?
दादाश्री या संसार व्यवहारात तो चांगला मानला जातो.
प्रश्नकर्ता: आम्हाला संसार व्यवहारातच राहायचे.
दादाश्री : या संसार व्यवहारात हे बरोबर पण त्यात हे चांगले दिसते. आणि ते चांगले दिसावे म्हणून मी केले नाही. ही तर हिरावाची इच्छा होती म्हणून मी केले, मला बरे-वाईटाची काही पर्वा नसते, पण तरीही वाईट दिसू नये असे मी वागतो.
प्रश्नकर्ता : ही तर तुमची गोष्ट झाली पण आमच्यासाठी काय ?
दादाश्री तुम्हाला थोडे फार करावे लागते, फार खेचण्याची गरज नाही, साधारण व्यवहार करावा लागेल.